(*परवा एका दवाखान्यात गेलो होतो, एका मित्राला भेटायला, तिथं आयसियुच्या दरवाजाच्या काचेतुन एक आजी दिसल्या,बाजुला कॉटवर आजोबा होते, ते दृश्य डो़ळ्यासमोरुन जात नव्हतं, लेख लिहिणार होतो पण आज प्रार्थना पुन्हा वाचली अन त्यावरच लिहिलं, याला विडंबन किंवा सुडंबन म्हणण्यापेक्षा दु:(ख्)डंबन म्हणावं का ?)
कोपरापुढचे हात सुने होत नाहीत, विटत नाहीट, विरत नाहीत,
त्रासदायक माणसांची विल्हेवाट कशी लावतात ?
बोळकं झालेल्या तोंडात पेज भरवताना
दोन चमचे उकळतं पाणि टाकावंसं वाटतं आहे
माझी म्हणावी अशी अपेक्षा उरलेली नाही
माझे म्हणावे असे ' हे ' पण फार उरले नाही
गोळ्या,सुया, सलाईन ह्यांचा वरखर्च
रक्त संपत आलेल्या देहाला आज पेज पचणार की नाही ??
रात्र उलटताना पुन्हा त्याच स्क्रिनकडे लक्ष जाते
श्वासाचं पुक्क अन उश्वासाचा ट्यॅन
बाजुला लटकवलेली पिशवी अन कॉटखालचं पॅन
मरणाची भिक्षा मागतात ह्यांचे सुरकुतले हात
दिसु लागतो बाजुचा पडद्यामागं मेलेला
ऐकु येतो त्याच्या बायकोचा शोक
अशावेळेस हात कुणासमोर जोडू?
कुणासमोर मागु, स्वातंत्र्य अशा शोकाचं?
दवाखानातल्या ह्या एकविसाव्या रात्री
पुक अन ट्यॅन ऐकताना वाटते आहे
उद्याचं कोवळं उन ह्यांच्या मिटत्या डोळ्यांवर कोसळण्याआधीच
मिळाली थोडी आंतरिक शक्ती तर
तर
.
.
.
.
ती पिवळी नळी ओढावी म्हणते........
प्रेरणा -
http://misalpav.com/node/21243
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5207
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुक्तकाचं विडंबन छान.
मिळाली थोडी आंतरिक शक्ती
:(
मलाही काही हसण्यासारखं वाटलं
In reply to :( by पैसा
+११११
In reply to मलाही काही हसण्यासारखं वाटलं by सूड
जे काय आहे ते चांगलंच जमलंय.
In reply to :( by पैसा
ही कविता संपादन मंडळाने
मला विडंबन नाहि वाटत . उलट
उलट खूप छान मांडणी वाटतेय एका
In reply to मला विडंबन नाहि वाटत . उलट by जेनी...
कशाला छळताओ ..त्याना असुद्या
In reply to उलट खूप छान मांडणी वाटतेय एका by यकु
मस्तच!
इतक्या दु:खद घटनेबद्दल
@ यकु यात हसु हसुन खोलिभर
यात विनोदी काय?
मला यात गंभीर होण्यासारखं (
@श्वासोच्छवासाचं पुक्क आणि
In reply to मला यात गंभीर होण्यासारखं ( by यकु
सुन्न..
धन्यवाद चिगो, तुम्हाला मला
In reply to सुन्न.. by चिगो
चिगो अगदि हेच मलाहि जानवलं
In reply to सुन्न.. by चिगो
मी पूर्ण वाचलेली नाहीय,