✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रार्थना.. आता एकच...

५ — ५० फक्त, गुरुवार, 04/05/2012 - 23:01
(*परवा एका दवाखान्यात गेलो होतो, एका मित्राला भेटायला, तिथं आयसियुच्या दरवाजाच्या काचेतुन एक आजी दिसल्या,बाजुला कॉटवर आजोबा होते, ते दृश्य डो़ळ्यासमोरुन जात नव्हतं, लेख लिहिणार होतो पण आज प्रार्थना पुन्हा वाचली अन त्यावरच लिहिलं, याला विडंबन किंवा सुडंबन म्हणण्यापेक्षा दु:(ख्)डंबन म्हणावं का ?) कोपरापुढचे हात सुने होत नाहीत, विटत नाहीट, विरत नाहीत, त्रासदायक माणसांची विल्हेवाट कशी लावतात ? बोळकं झालेल्या तोंडात पेज भरवताना दोन चमचे उकळतं पाणि टाकावंसं वाटतं आहे माझी म्हणावी अशी अपेक्षा उरलेली नाही माझे म्हणावे असे ' हे ' पण फार उरले नाही गोळ्या,सुया, सलाईन ह्यांचा वरखर्च रक्त संपत आलेल्या देहाला आज पेज पचणार की नाही ?? रात्र उलटताना पुन्हा त्याच स्क्रिनकडे लक्ष जाते श्वासाचं पुक्क अन उश्वासाचा ट्यॅन बाजुला लटकवलेली पिशवी अन कॉटखालचं पॅन मरणाची भिक्षा मागतात ह्यांचे सुरकुतले हात दिसु लागतो बाजुचा पडद्यामागं मेलेला ऐकु येतो त्याच्या बायकोचा शोक अशावेळेस हात कुणासमोर जोडू? कुणासमोर मागु, स्वातंत्र्य अशा शोकाचं? दवाखानातल्या ह्या एकविसाव्या रात्री पुक अन ट्यॅन ऐकताना वाटते आहे उद्याचं कोवळं उन ह्यांच्या मिटत्या डोळ्यांवर कोसळण्याआधीच मिळाली थोडी आंतरिक शक्ती तर तर . . . . ती पिवळी नळी ओढावी म्हणते........ प्रेरणा - http://misalpav.com/node/21243

प्रतिक्रिया द्या
5171 वाचन

💬 प्रतिसाद (20)

मुक्तकाचं विडंबन छान.

प्रचेतस
गुरुवार, 04/05/2012 - 23:07 नवीन
मुक्तकाचं विडंबन छान. यकुशेठच्या रसग्रहणाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

मिळाली थोडी आंतरिक शक्ती

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/05/2012 - 23:25 नवीन
मिळाली थोडी आंतरिक शक्ती तर तर . . . . ती पिवळी नळी ओढावी म्हणते........ >>> Image removed. @यकुशेठच्या रसग्रहणाच्या प्रतिक्षेत@+++++++१११११११११ जोरदार अनुमोदन यक्कू लवकर या.... तुमच्या शिवाय या विषयाला मोक्ष मिळणे नाही ;-) अ.आ.-अवांतरः- चला....कुणीतरी सुरवात केली म्हणायची ;-)
  • Log in or register to post comments

:(

पैसा
गुरुवार, 04/05/2012 - 23:27 नवीन
जे काय आहे ते चांगलंच जमलंय. भयाण आहे. यात विडंबन म्हणून हसण्यासारखं काय आहे? की मलाच कविता कळत नाहीत हल्ली?
  • Log in or register to post comments

मलाही काही हसण्यासारखं वाटलं

सूड
Fri, 04/06/2012 - 00:33 नवीन
मलाही काही हसण्यासारखं वाटलं नाही. खरंच कविता कळत नसाव्यात.पन्नासराव पुन्हा तीच आयसीयू ची भयाण खोली, तिथल्या यंत्रांचे आवाज , आक्रोश, हुंदके, एक जीव वाचवण्याची धडपड सगळं झरझर डोळ्यासमोरुन गेलं. मी कधीपासून विचारात आहे यावर लिहीण्याच्या . कितपत जमेल माहित नाही, एक प्रयत्न करुन बघेन म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+११११

प्यारे१
Fri, 04/06/2012 - 09:22 नवीन
डोकं बधिर झालं राव सकाळी सकाळी... ही एक वेगळी 'कविता' च आहे. दुर्दैवानं वास्तवाचे चटके देणारी आहे. यकु, काय चाललंय काय? पूर्ण वाच जरा नीट! -(मिपा सदस्यांच्या परिपक्वतेबद्दल/ संवेदनशीलतेबद्दल साशंक आणि निराश) प्यारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

जे काय आहे ते चांगलंच जमलंय.

मनीषा
Fri, 04/06/2012 - 04:27 नवीन
जे काय आहे ते चांगलंच जमलंय. भयाण आहे.
+१ :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ही कविता संपादन मंडळाने

यकु
गुरुवार, 04/05/2012 - 23:39 नवीन
ही कविता संपादन मंडळाने जास्तीत जास्त सदस्यांनी वाचण्‍यापूर्वीच उडवावी अशी कळकळीची विनंती. मिपा आणि 50 फक्त मुळे अनेकांचा हसून हसून जीव गेला ही बातमी निश्चितच चांगली असणार नाही ;-) =)) =)) =)) =)) =)) मी पूर्ण वाचलेली नाहीय, पहिल्या काही ओळीतच मी खात असलेले बनाना चीप्स खोलीभर उडाले! त्याबद्दल 50 फक्त यांचा निषेध!!!!!
  • Log in or register to post comments

मला विडंबन नाहि वाटत . उलट

जेनी...
गुरुवार, 04/05/2012 - 23:45 नवीन
मला विडंबन नाहि वाटत . उलट खूप छान मांडणी वाटतेय एका विदारक द्रुश्याची .. अक्षरशा समोर उभ केलत हर्शद . ह्याट्स ऑफ्फ टू यु म्यान .....
  • Log in or register to post comments

उलट खूप छान मांडणी वाटतेय एका

यकु
गुरुवार, 04/05/2012 - 23:49 नवीन
उलट खूप छान मांडणी वाटतेय एका विदारक द्रुश्याची ..
हो, 50 फक्त कुणाच्या तरी (कुणाच्या हो 50 फक्त? ) डेथबेड जवळ उभं राहून त्या मरणार्‍याच्या तोंडात उकळतं पाणी टाकत आहेत हे खरोखर विदारक दृश्‍य आहे. याबद्दलही निषेध! =)) =)) =)) =)) उद्या मोर्चा पक्का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

कशाला छळताओ ..त्याना असुद्या

जेनी...
गुरुवार, 04/05/2012 - 23:54 नवीन
कशाला छळताओ ..त्याना \( असुद्या कि वाटत एखाद्याला ,जिव मेटीकुटीला आल्यावर :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

मस्तच!

पेशवा
Fri, 04/06/2012 - 00:34 नवीन
दु:(ख)डंबन आवडले... तर नंतर थिपक्यांच्या ओळी रसभंग करत आहेत ...
  • Log in or register to post comments

इतक्या दु:खद घटनेबद्दल

अन्या दातार
Fri, 04/06/2012 - 09:19 नवीन
इतक्या दु:खद घटनेबद्दल लिहिलेले स्पष्ट जाणवत असतानाही कुणाला काय दिसेल याचा खरंच नेम नाही. हर्षद, वस्तुस्थितीचे भेदक चित्रण! @पेशवा: तुम्ही यात (म्हणजे मुक्तकातही) रसभंग वगैरे गोष्टी करताय?? महान आहात! :(
  • Log in or register to post comments

@ यकु यात हसु हसुन खोलिभर

पियुशा
Fri, 04/06/2012 - 10:14 नवीन
@ यकु यात हसु हसुन खोलिभर चिप्स उडण्यासारखे काय आहे नक्की ? ( किन्वा माझा अभ्यास कमी पडत असावा बहुतेक ) विड्म्बन वास्तवदर्शी वाटल ,मला तरी वाचल्यानन्तर भयाण वाटल :(
  • Log in or register to post comments

यात विनोदी काय?

स्मिता.
Fri, 04/06/2012 - 14:25 नवीन
हे विडंबन असलं तरी यात विनोदी काय ते मात्र कळलं नाही. मला तरी त्यात वृद्धापकाळातलं असहाय्य, भयाण, भकास दु:ख दिसलं. (माझी विनोदबुद्धी कमी पडतेय असं वाटतंय.)
  • Log in or register to post comments

मला यात गंभीर होण्यासारखं (

यकु
Fri, 04/06/2012 - 16:20 नवीन
मला यात गंभीर होण्यासारखं ( ठिक आहे झालात) काय आहे ते कळलेलं नाही. मी पण गंभीर झालो होतो पण त्रासदायक माणसांची विल्हेवाट कशी लावतात, उकळत पाणी, श्वासोच्छवासाचं पुक्क आणि टॅन आणि हाईट म्हणजे 'ती पिवळी नळी ओढावी वाटते' या जागांवर तुम्हाला विनोद दिसला नाही? तुमच्या गांभिर्याचा तणाव या जागांवर फुटला नाही? कॅय तरी बोलायचं रॅव !
  • Log in or register to post comments

@श्वासोच्छवासाचं पुक्क आणि

अत्रुप्त आत्मा
Sun, 04/08/2012 - 18:05 नवीन
@श्वासोच्छवासाचं पुक्क आणि टॅन आणि हाईट म्हणजे 'ती पिवळी नळी ओढावी वाटते' या जागांवर तुम्हाला विनोद दिसला नाही? तुमच्या गांभिर्याचा तणाव या जागांवर फुटला नाही? +१०१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

सुन्न..

चिगो
Sun, 04/08/2012 - 21:06 नवीन
हर्षदराव, अतिशय भेदक कविता..
दवाखानातल्या ह्या एकविसाव्या रात्री पुक अन ट्यॅन ऐकताना वाटते आहे उद्याचं कोवळं उन ह्यांच्या मिटत्या डोळ्यांवर कोसळण्याआधीच मिळाली थोडी आंतरिक शक्ती तर तर . . . . ती पिवळी नळी ओढावी म्हणते.......
मला तरी ह्या ओळींमध्ये आपल्या प्रिय व्यक्तिच्या आजारपणामुळे, त्या/तिच्या दु:खामुळे आलेला अगतिकपणा जाणवला.. "त्याला इतक्या त्रासात, केविलवाणेपणे जिवंत ठेवण्यापेक्षा आपणच त्याला मृत्यु द्यावा." ही टोकाची भावना जाणवली. :-( आणखी वेगळे काही असल्यास माझी विनोदबुद्धी (आणि समज) कमी पडत असेल..
  • Log in or register to post comments

धन्यवाद चिगो, तुम्हाला मला

५० फक्त
Mon, 04/09/2012 - 01:02 नवीन
धन्यवाद चिगो, तुम्हाला मला काय म्हणायचं होतं ते कळालं अगदी बरोबर, अर्थात यात आपल्या प्रिय व्यक्तीची सुटका ही भावना तर आहेच पण त्याचबरोबर त्याच्या बरोबर जो त्रास आपल्याला होतो आहे त्यामधुन सुटका अपेक्षित आहे. कारण वयाच्या या वळणावर प्रेमाच्या रेसिपिमधले बरेचसे पदार्थ संपलेले असतात किंवा संपत आलेले असतात. एखाद्या लेखनावर आधारलेलं दुसरं लेखन हे विनोदीच असायला हवं का ? पहिले दोन प्रतिसाद वाचल्यावर ती वरची दोन -तीन वाक्यं पैसातै ना सांगुन अ‍ॅड केली आहेत. म्हणजे निदान माझ्या लिखाणातुन काही अस्पष्टता असेल तर ती दुर व्हावी या उद्देशानं. पुन्हा एकदा धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

चिगो अगदि हेच मलाहि जानवलं

जेनी...
Mon, 04/09/2012 - 06:45 नवीन
चिगो अगदि हेच मलाहि जानवलं ,त्यामुळे नक्कि कशावर हसायच ते शेवटपर्यन्त कळलच नाहि :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

मी पूर्ण वाचलेली नाहीय,

ajay wankhede
Mon, 04/09/2012 - 08:56 नवीन
मी पूर्ण वाचलेली नाहीय, पहिल्या काही ओळीतच मी खात असलेले बनाना चीप्स खोलीभर उडाले! त्याबद्दल 50 फक्त यांचा निषेध!!!!! ஜஜ۩۩ यक्कू क्रूरसिंह ۩۩ஜஜ आपण खोलीत एकटेच होता ना... नाही म्हणजे ..''आय व्हीटनेस"
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा