काय कमावलं अन काय गमावलं ,ह्या एकाच प्रश्नाच उत्तर माणूस शेवट पर्यंत शोधत शोधतच वाट चालत रहातो .काही वळणावर थांबतो विसावा घेतो अन पुन्हा चालू लागतो .बस फक्त चालताना कुणाच्यातरी मायेचा हात ,कुणाच्यातरी प्रेमाची साथ एवढ मात्र कायम सोबत राहावं अशी अपेक्षा न चुकता करतो .माझ्याही पाठीवर असाच एक हात ,अशीच एक साथ , माझ सर्वस्व ,माझी माय ..
अजून आठवतो ,बाबा गेले तो दिवस .मला जास्त कळत नव्हत पण माईच्या डोळ्यातन वाहणारे दुखाचे लोट ,
वाफाळणारे अश्रू माझ्या गालावरण खाली वाहत होते .माईला घट्ट मिठी मारून बसलो होतो मी कारण माई सारखी बाबांच्या छातीवर जोरजोरात मारत होती .मला जाम भीती वाटली तेव्हा .माईच्या बांगड्यांच्या काचांनी माईचे हात रक्त बंबाळ झाले होते ,वाहणारे अश्रू घशाला कोरड पडेपर्यंत केलेला आकांत , राहून राहून मध्येच मला तीच जवळ घेण किती तरीच असह्य होत सगळं ,पण माईला तेव्हा एकट ठेवण ,तिच्यापासून दूर राहाण मला शक्य नव्हतं .
माझी भावंड लहान होती .चीनुला तर काहीच कळत नव्हत ,इन मीन दोन वर्षांची होती ती .अन मनु तोही साडे तीन वर्षांचा .मी थोरला माझ वय तेव्हा पाच पूर्ण ..बाबांच्या अकस्मात जाण्यान आयुष्यातले पुढचे सगळेच प्रश्न समोर आ वासून उभे होते .मिळकतीचा मार्ग खुंटला ,मायेन डोक्यावर फिरणारा हात सुटला ,कधीतरी सुट्टीच्या दिवशी मिळणारी दादर चौपाटी वरची भेळही ह्या सगळ्या दुखात कुठेतरी सांडून गेली .अभ्यासासाठी ओरडणारे ,चिनूला खांद्यावर घेवून फिरणारे ,मनूच्या खोड्यांनी येणारी भांडण हसतखेळत सोडवणारे आणि माझ्यासाठी ,माझ्यासाठी नवीन नवीन पुस्तक मला भेट म्हणून आणणारे बाबा ..माझे बाबा हरवले होते ..शोधूनही सापडणार नाहीत अश्या ठिकाणी लपून बसले होते .
आमचे प्रश्न हे आमचे होते ,तर माई..माईच्या पुढे अर्धवट संसाराची गाडी ..ज्याचे पुढचे पाय निघून ,गळून पडले होते .अशी हि गाडी ओढायची होती तिला ..तिला एकटीला .माई जास्त शिकली नव्हती .संसाराच गणित मात्र तिने उत्तम संभाळल होत ,लिहिता वाचता येत होत पण कुठे नोकरी करू शकेल इतपत शिक्षण नव्हतं .गडद अंधारात एक आशेचा किरण होता ,तो म्हणजे माझा मामा .माझ्या माईपेक्षा मामा तीन वर्षांनी लहान होता .बाबा गेले त्यावेळी मामाच लग्न नव्हत झालं ,नुकताच नोकरीला लागला होता .माईन जास्त दिवस दु़:ख कुरवाळलच नाही ,तिला तेवढीही उसंत पुन्हा परत कधी मिळालीच नाही .
आम्हाला घेवून माईन पुन्हा एकदा कंबर कसली .मामा आईला माई म्हणायचा ,त्याच्यामुळ तिला सगळेच माई म्हणायचे .माझ्या पाठोपाठ माझी भावंड हि तिला माईच म्हणू लागले .आजीन माईला माहेरी रहायला बोलावलं पण माईन ते आमंत्रण पाहुनी म्हणून स्वीकारलं ..." माझ्या पदरात माझी पिल्लं आहेत , मायेचा एक हात दुरावलाय पण दुसर्या हातात त्या पहिल्या हातानं काही जवाबदार्या दिल्यात त्या मी तुमच्याच आधारान पेलणार .मला फक्त आधार द्या ,माझ्या पायात पुन्हा उभ राहाण्याच बळ द्या .." एवढीच एक हक्काची मागणी माईन तिच्या माहेरच्या माणसांकडं केली ...बाबांच्या माणसांच आणि माईच..जास्त जिव्हाळ्याच काहीच नव्हतं ..आजी आजोबा केव्हाच आभाळात गडप होवून गेलेले तर आत्त्या ,ती तिच्या संसारात रमलेली .त्यामुळे मदत मागावी ,आधाराची अपेक्षा करावी अस तिथे काहीच नव्हतं .
एकाच शहरात माईच माहेर आणि सासर ..त्यामुळे आजी आजोबांच येन जाण होत ..
मामालाही आमचा लळा होता .मामा हा एकमेव माईला गरजनार्या पावसात मिळणारा एका झाडाचा आडोसा होता .मोठा आधार वाटायचा तिला त्याचा ,मामाही शक्यतो आमच्याकडे राहूनच त्याच्या ऑफिसला जायचा .मामा बराच हातभार लावायचा पण माईला वाटायचं किती लहान जीव ,आम्ही एकत्र वाढलो ,खेळलो, बागडलो .जिथे मी त्याच्या पाटीवर आधाराचा हात ठेवायचा तिथे तोच माझ्या संसाराचा गाडा आपल्या पाठीवर घेवून माझ्या अश्रुना हलकं करण्याचा प्रयत्न करतोय .नाती अतूट असतात ,त्या नात्यात विरघळताना केव्हा समरस होवून जातो ह्याच भानच राहत नाही आणि मग जीवाला जीव देन ..एकमेकांसाठी होण ..ह्या शब्दांचा खरा खुरा अर्थ सापडतो .
माईच शिक्षण नव्हत पण समंजसपणा आणि बुद्धी ह्यांचा एक अजब मेळ होता .सुरुवातीला माईनं घरगुतीच काही
करण्याच ठरवलं माई वाती वळायला आणायची ,दिवसरात्र जागून जागून काम करायची ,जास्त पैसे सुटायचे
नाहीत .शंभर वाती केल्यावर माईला दोन रुपये सुटायचे .दिवसाला माई दहा बारा रुपयापर्यंत करायची .कधी मध्ये
कपड्यांचे धागे तोडायला आणायची .हाताला धागा लागून लागून बर्याच चिरा गेल्या होत्या ,पण त्या चीरांमध्ये
तिला तिच्या मुलाचं भरलेलं पोट ,शाळेची न मिटनारी पण तात्पुरती पुढे ढकलली गेलेली चिंता दिसायची .
माई कष्टाची भाकरी खायची ,चिंतेन व्यापलेली झोप घ्यायची अन तिच्या पिल्लांच्या चेहेर्यावरच्या समाधानान रोज
नवीन स्वप्न बघण्याच बळ मिळवायची ..माझी माई .
अति कष्टान माई हळूहळू थकत चालिय .जिथे हळूहळू चालून आयुष्याची रंगीत तालीम हर्षभरित नजरेन पहायचे दिवस तिच्यासोबत असायला हवे होते तिथे रोज रात्री उद्याच्या काळजीन ओल्या डोळ्यात उरलेलें प्राण आणून उजाडायची वाट बघण्याचे दिवस माईला सोबत करू लागले होते .माईन नंतर खानावळ चालू केली .आधी दोन जणांचा स्वयंपाक मग हळू हळू पाच जन आणि नंतर माईकडे दहा जणांच्या जेवनाच काम आलं त्यात बराच पैसा सुटू लागला .पण कष्ट फार होत .मला जमेल तशी मदत मी करायचो .मनु थोडा अवखळ होता पण तेवढीच चिनू हुशार ,बोलघेवडी अन कामात चपळ होती .चिनुची माईला बरीच मदत व्हायची ,भाजा चिरून देण, माई कामात असताना अभ्यास सांभाळत ...घर संभाळण .माईला वाटायचं ,परिस्थितीन माझ्या मुलाचं बालपण हिरावून घेतल .किती लवकर प्रौढपणा ..समजूतदारपणा आला ह्यांच्यात .पण त्याचवेळी माईच्या चेहेर्यावर एक समाधानही होत कि तिच्या मुलाना परिस्थितीची जाणीव आहे ह्या सगळ्यात खरच आमच बालपण हरवल .आम्ही तिघेही कधी मोठे झालो कळल देखील नाही .तिघांच्याहि स्वप्नाना माईन तिच्या कष्टाचे पंख ,त्या पंखात मायेच बळ दिल .मामान वडिलांची जागा मनात मिळवली .लग्नानंतर मामा वेगळ बिर्हाड करून राहिला पण हाकेच्या अंतरावर ,त्याच अजूनही माईकडे ,घराकडे तेवढच अन अगदी तसच लक्ष असतं .
आज माई खूप थकलीय ,फार वाकलीय पण तरीही तिच्या डोळ्यात अजूनही कष्टाची तयारी असल्याची चमक
जाणवते कि जी एखाद्या तरुणालाही लाजवेल .माईन त्यावेळी खंबीर राहून जर संसाराच्या वेलीला कष्टांच खतपाणी घालून मायेच्या ओंजळीन पाणी घातल नसत तर आज ..आज आम्ही आणि आमची माई ,माहित नाही कस कुठे आयुष्य चालत गेल असत .किवा मग आम्हीकुठे कसे चालते झालो असतो .
आयुष्यभर चालता चालता माईन कधीच स्वतःची काळजी घेतली नाही ..माईचे गुढगे थकले ..त्यात ग्याप आला ...
माईच्या मानेची शीर ..तिला अधून मधून सूज येवू लागली ..माईला हळूहळू दिसायचं कमी झाल ..पण माई ..माईन
एवढ दुर्लक्ष केल स्वतःकडे कि ..कि माईला ब्रेन ट्युमर झाला .तिच्या ह्या रिपोर्ट ने माझ्या पायाखालची जमीन
सरकली .क्षण क्षण फक्त आमचाच विचार करणारी माई ..आज दुख भोगायलाही एकटीच सज्ज झाली .माईन
कधीच मनातल कसलच दुख चेहेर्यावर दाखवल नाही .बाबा गेले त्यावेळी जी माई आमच्यासमोर रडली ते एकदाच
आणि शेवटच ,त्यानंतर माईचे अश्रू हे फक्त एकट्या माई साठीच ..तिला एकांतातच येवून भेटायचे .आज ह्या सगळ्या गोष्टी अगदी आत्ता घडल्यासारख्या डोळ्यासमोरून जातायत .माईच्या चेहेर्यावरच समाधान म्हणजे आम्हा तिघा भावंडाना जगातलं अनमोल दान पण आज मात्र माई एकटीच आहे .तीनं कधीच तिच्या पिल्लांच्या भरारीला आपल्या मायेचा अडसर होऊ दिला नाही .." उंच उडा आकाशात ..तिथपर्यंत ...जिथन खाली पाहताना तुमची माई तुम्हाला तांदळाच्या दाण्या एवढी दिसावी ..आन माईला तुमची भरारी बघून आलेल्या आनंदाश्रुना खाली गाळायलाही मिळू नये ..तेही माझ्यावानी तिथल्या तिथच थिजल्या वाणी गप्प गुमान ...."
आज चिनू एच. आर. म्यानेजर आहे ,सध्या सिंगापूरला पोस्टिंग आहे तिची तर मनु सोफ्टवेअर इंजिनियर .सध्या
इंग्लंड ला आणि मी मी अमेरिकेत एक न्युरो सर्जन .आज आम्ही कुणीच एकत्र नाही पण मनान ..मनान असे काही बांधलो गेलो आहोत आणि त्या बांधून ठेवणार्या धाग्याला आज आमची गरज आहे .माईन जे भोगल ,माईन जे केल ,माईन जे आम्हाला बनवल ,माईन जे आयुष्य आमच्या वाट्याला दिल ..त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे .पण देवाण कुणावर इतकीही वाईट वेळ आणू नये ,जी माझ्यावर आणलीय .
आयुष्यात जे काही जिच्यामुळे मिळाल आज त्या मिळकतीचीच ,त्या यशाचीच परीक्षा घेतली जातेय त्या मायेचा पदर माझ्या हातातून निसटतोय ..अन मीच आहे जो तो पदर अजूनही जशाचा तसा अंगावर ओढून ठेवू शकतो अस काहीबाही मनात येवू लागलय .माझ्या माईसाठी आज मी स्वतःच स्वतःच्याच हाताना मागण मागतोय ,स्वतःच्याच बुद्धीला साकड घालतोय .अशी वेळ ..अशी वेळ माझ्यावरच का यावी ..मीच का ? माझ्या माई साठी मलाच का?..
लिहितानाही गहिवरून याव ,वाचतानाही अश्रूंच्या पावसात भिजावं ,जगतानाही भावनाना कळवळून याव ,
अन आयुष्यभर ..मला मिळालेल्या माझ्या माई रूपी सर्वस्वाला मी मनातून पूजावं .माझ्याच मनाचा थांगपत्ता आज लागत नाहीय .सकाळी पहाटेची ७:३० फ्लाईट पकडून मी माईजवळ जाणार आहे ..माझ्या माईजवळ ,माझ्या माईची सर्जरी आहे ..माझ्याच हातून .
*************************************************************
याद्या
3900
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुन्दर....
छान
शेवटी आई ही आई असते आणि
आपल्याला आवडले पण ..............
आणि जर माईबद्दल सगळ्या भावा-
Take it easy!!
In reply to आणि जर माईबद्दल सगळ्या भावा- by ५० फक्त
'माईंची इच्छा नसेल कदाचित!
In reply to Take it easy!! by अन्या दातार
+१ टू ५०. प्रतिसाद आवडला.
In reply to 'माईंची इच्छा नसेल कदाचित! by ५० फक्त
+१
In reply to 'माईंची इच्छा नसेल कदाचित! by ५० फक्त
नेहमीपेक्षा वेगळं.
नाही आवडली.. कथा खुललीच
कथा बरी आहे पण
बहुगुनि प्रतिसादाबद्दल
In reply to कथा बरी आहे पण by बहुगुणी
छान लिहिलय पूजा. कथा आवडली.
हि कथा नाही
एकदम .....
प्रेडिक्टेबल आहे
अरे, आधीच मराठीच्या
In reply to प्रेडिक्टेबल आहे by अमृत