एप्रिल फूल -
रंग नाही, रूप नाही, सुगंध नाही
पान नाही, पाकळी नाही, देठही नाही -
अजबसे फूल, देते हूल, कुठे दिसेना
आकर्षण आहे तरी तयाचे सर्वांना ;
फजितीत फसवते, स्वत:लाच हसवते
एप्रिलमध्येच कसे नेमके बघा उगवते -
एक तारखेचे "एप्रिल फूल" भारी जीव जडवते,
मी मी म्हणणाऱ्याची खिल्ली पाहता पाहता उडवते !
एस ओ डबल आर इ...
छान आहे कविता.
एप्रिलचान चान आहे
एक एप्रिलच्या शुभेच्छा!
कविता वाचुन एप्रिल फुल करायची
आवडली !