जागो ग्राहक जागो - एक अनुभव
दिड एक वर्षापूर्वीची गोष्टं..
टिपिकल ट्रॅप.. बिग बझार/ उत्सव प्रदर्शनात स्लिप भरलेली.. तिथे मिळवलेला फोन नं. वापरून फोन आला.. लकी ड्रॉ मध्ये तुमचा नंबर लागलाय.. ३ दिवस ४ रात्री हॉलिडे फ्री वगैरे वगैरे.. खरं तर फक्त टाइमपास म्हणून गेलो. ठरवलं होतं थोड ऐकायचं.. काय फ्री असेल तर घ्यायचं आणि परत फिरायचं..
भन्नाट दावे केलेले.. ज्या हॉटेल्सचा मार्केट रेट ७०००-८०००रु दर दिवशी आहे अशी हॉटेल्स ७००-८००रुपयात मिळतील.. ते पण फक्त "युटिलिटि चार्जेस"!! भारतात आणि परदेशात हजारो ठिकाणी टायअप्स्.. सर्व बुकिंग सेवा ऑनलाइन उपलब्ध.. परदेशात तर युटिलिटि चार्जेस दर आठवड्याला फक्त $१०० !! व्हिसा, तिकिट बुकिंग साठी हेल्प डेस्क आहेच.. १० वर्षाची मेंबरशिप होती.. ८०,००० आणि २० वर्ष-१,५०,०००
एवढे पैसे नक्कीच घालायचे नव्हते.. आम्ही परत फिरायच्या तयारीत..
तो म्हणाला तुमच्यासाठी खास ५ वर्षाचे फक्त ३५,५००
वाटलं एखादी सिंगापूर्/दुबई वारी केली तर होतीलं पैसे वसूल.. एअर टिकिट्स सुद्धा आजकाल १० हजाराच्या आत मिळतात.. एकंदरीत ७-८ दिवसाचा खर्च केसरी/सचिन पेक्षा खूपच कमी येतोय.. म्हटलं उद्या सांगतो..
पण त्याने मार्केटिंग वाल्यांचा हुकुमी एक्का टाकला.. ऑफरचा आजचा शेवटचा दिवस!!
आणि त्या बेसावधक्षणी अनपेक्षितपणे त्या विक्रेत्याच्या विपणन कौशल्याला बळी पडुन "सेंचुरियन स्प्रिंग हिल्स हॉलिडेज" ची ५ वर्षाची मेंबरशिप घेतली.
विक्रेत्यानं आपलं काम चोख पार पाडल होतं..
आता पाळी होती कस्ट्मर सर्व्हिसची..
फोन मेल करण्यापूर्वी बघु ऑनलाइन होतं का काम .. पहिला धक्का बसला.. साइटवर बुकिंग वगैरे काहीच लिंक सापडली नाही..
मग फोन केले.. मेल्स केली.. तारखा सांगितल्या आणि सिंगापूर हॉटेल्सची क्वोट्स मागवली.. पहिल्यांदा फोनवर "२-३ दिवसात हॉटेल्सकडून कन्फर्मेशन येइल.. आल्यावर कळवतो" अशी उत्तरं मिळाली.. मग फोनच कोणी उचलेना.. उचललाच तर "आत्ता बिझी आहे, थोड्यावेळाने फोन करतो/ते" अशी उत्तरं.. आणि परत फोन करणे वगैरे नाहीच.. एस्कलेट करायलाही काही वाव नाही.. फोन नं/ मेल आयडी काहीच नाही.. कसाबसा त्या सेल्सवाल्याचा नंबर मिळवला.. त्याला गाठला.. तो धादान्त खोटं बोलला होता.. आता म्हणतो.. सिंगापूर?? दुबई?? तिथे आमचे टायअप्स् नाहीत.. त्या कस्टमर सर्व्हिसवाल्याना काहि माहित नाही!! तुम्ही इकडे जा.. तिकडे जा.. हे छान आहे.. ते छान आहे..
म्हटल तुम्हाला वाटत तिथे जायला नाही घेतलीय मेंबरशिप ..माझे पैसे परत करा..
आता कॅन्सलेशन शक्य नाही.. अॅग्रीमेंट वाचा.. घेतल्यापासून २४ तासाच्या आतच कॅन्सलेशन करता येतं.
आणखी धक्का!!
काही दिवसांनी वाटलं महाबळेश्वर/माथेरान ई. ट्राय करु..
त्याची क्वोट्स मागवली.. आता मात्र लगेच रीप्लाय.. ८-१० हॉटेल्सचे रेट्स पाठवले होते.. जरा जीवात जीव आला..सहज म्हणून त्यातल्या काही हॉटेल्सच्या साईट्स बघितल्या.. तर जवळजवळ तेच रेट्स.. ५०-१०० रु कमीच..
परत फोन केले.. ऑफिसमध्ये जाउन भांडलो.. कंझ्युमर कोर्टाची धमकी दिली..
काही फरक नाही..
उत्तर एकच.. आमचे हेच रेट्स आहेत.. हवे तर घ्या .
आता मात्र साफ कळून चुकलं की ही शुद्ध फसवणूक आहे.. पैसे बुडित खाती टाकले होतेच .. पण कुठलीही खरेदी/गुंतवणूक करताना काटेकोर असल्याचा अभिमान असल्यामुळे या फसवणूकीच दु:ख जास्त होतं..
ग्राहक मंच/ कोर्ट वगैरेसुद्धा काही अनुभव नसल्यामुळे नक्की कस पुढे जायच हे कळत नव्हतं.. पण काहीतरी पाउल उचलायची खुमखुमी मात्र होती.. पण एवढा वेळ्सुद्धा नाही .. साहजिकच पहिला विचार आला ऑनलाईन काही करता येत का पाहू..
बरचसं गुगलून बघितल्यावर खूप माहिती मिळाली.. त्यात संपूर्ण ऑनलाईन पर्याय मिळाला तो म्हणजे "ICRPC- International consumer rights protection council"
त्यांचे नियम खूपच स्ट्रिक्ट वाटले.. फोन करुन डिस्टर्ब करु नका, सतत स्टेट्स विचारु नका.. ६० दिवसांनंतर तुमची केस हाताळली जाईल वगैरे वगैरे.. पण एक गोष्ट महत्वाची वाटली की ICRPC च्या रेप्युटेशन मुळे बर्याच केसेस कंझ्युमर कोर्टात जाण्यापूर्वीच मिटवल्या जातात..
त्यांच्या सूचनेप्रमाणे यच्चयावत कागदपत्र ताबड्तोब पाठवून दिली आणि त्यानी नोटीस पाठवण्याची वाट पहात बसलो.. बरोबर ६० दिवसांनी मेलवर चौकशी केल्यावर कळले की कागदपत्रं त्यांना मिळालीच नाहीत.. त्यांचा पत्ता असा आहे कि तिथे कुरियर जात नाही (कासारवडवली, जि. ठाणे) म्हणून पाठवलेली साध्या टपालाने.. मग परत सगळी कागदपत्रे पाठवा.. यावेळी मात्र Regd. A.D.ने..
यावेळी मात्र ७ दिवसात मेल मिळालं "Legal Notice to Centurion" आणि एक आशेचा किरण दिसला.. आणि काय आश्चर्य दुसर्या दिवशी सेंच्युरियन एक्झिक्युटिव्ह्कडून फोन.. तुम्ही म्हणाल तिथे हॉलिडेज देतो, आपण भेटू, मी नवीन स्किम तुम्हाला सांगतो वगैरे.. पण यावेळी मात्र ठामपणे सांगितलं ३५५००+२०००० नुकसान भरपाईचा चेक घेउन येणार असाल तर या नाहीतर मला तुमच्याशी बोलयची इच्छा नाही.. पुढील कारवाईसाठी तयार रहा . तेही तुमच्या खर्चाने..
शेवटी ३५५००+९% व्याजावर तुकडा पडला.. चेक मिळाला.. पैसे खात्यात जमा झाले.. आणि सचिनला शंभरावे शतक झळकवल्यावर झालं नसेल इतक समाधान झालं..
आता आपल्या माहितीत तरी असं कोणी फसू नये म्हणून किंवा असल्यास योग्य दिशा दाखवावी म्हणून हा लेखप्रपंच !!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्तच माहितीपूर्ण अनुभव...
अतिशय
मिपा नियमीत वाचत चला.. असल्या
उत्तम लेख.
इरसाल शेठ
परासाहेब धन्यवाद.
परा, आपण दिलेली साईट मुळ
पराशेठनी दिलेली लिंक बरोबर
ख ल्ला स !
जगात
अभिनंदन!
अभिनंदन!
आंम्ही एकदा(च) गंडता/गंडता
"लकी ड्रॉ", "फ्री", "ऑफर" हे
अभिनंदन
अभिनंदन.. शेवटी काय
हम्म्म
आयायायाया
चांगली माहिती
"फुकट जेवण" अस्तित्वात नसते
चांगली माहीती...
अनुभव शेअर केल्याबद्दल
उत्तम माहिती , अभिनंदन आणि
बरं झालं धडा शिकवलात
कोणतीही फुकट वस्तू तुमचा पैसा, वेळ आणि मनाची शांतता हिरावून घेऊ
या
अभिनंदन आणि धन्यवाद
स्वतःची फसवणूक होऊनही लोकजागृतीसाठी लिहिलंत हे उत्तम!
हो तेच ते.. या
इतक्या स्वस्तात महागाची वस्तु
'फुकट' चा लोभ टाळा
जबरा अनुभव!
अभिनंदन आणि धन्यवाद
भन्नाट....
कार्टं पयल्यापासून हुश्शार
धन्यू हो प्यारे काका..
+१
चिकाटी..
+१
अभिनन्दन!!!
उपयुक्त माहिती.. आभार!