बीज अंकुरे अंकुरे
रुपं नव्हाळ मातीला,
गर्भारता देह तिचा
रंग केतकी कांतीला!
बीज अंकुरे अंकुरे
माझे स्वप्न तुझ्या डोळा,
सूर ल्याले रे तुझे मी
शब्द शब्द झाला खुळा...
बीज अंकुरे अंकुरे
जमिनीला लागे ध्यास,
वाढ वाढावे गं रोप
नको आभास आभास...
बीज अंकुरे अंकुरे
आता स्वप्नांना आकार,
उद्या उमलेल पातं
घरी बहार बहार..
बीज अंकुरे अंकुरे
म्हणे करा तपासणी,
जर देशी वंशा दिवा
आकाशास गवसणी!
बीज अंकुरे अंकुरे,
का हा वणवा पेटला?
नवा जन्म रुजताना
कुणी गळा गं घोटिला?
-बागेश्री
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित : http://venusahitya.blogspot.com/
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3421
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम! शेवटचे कडवे वाचून
सुंदर.
अत्यंत
मस्त
सुंदर
ऊत्कृष्ट काव्य.
बीज अंकुरे अंकुरे म्हणे करा
छान !
+१
In reply to छान ! by परिकथेतील राजकुमार
काव्यरचना सुंदर जमलीय
छान
मस्त जमली आहे कविता.
खल्लास!
++१ अगदी असेच म्हणायचे आहे.
In reply to खल्लास! by दादा कोंडके
दाद देतो दादा
In reply to खल्लास! by दादा कोंडके
__/\__ अप्रतिम
मस्तच!
"बीज अंकुरे अंकुरे रुपं
ह्या पापातून
खुप छान...!!!
+१
In reply to खुप छान...!!! by पिलीयन रायडर
आवडली..
भरभरून प्रतिसादांसाठी
मस्त