बीज अंकुरे अंकुरे
रुपं नव्हाळ मातीला,
गर्भारता देह तिचा
रंग केतकी कांतीला!
बीज अंकुरे अंकुरे
माझे स्वप्न तुझ्या डोळा,
सूर ल्याले रे तुझे मी
शब्द शब्द झाला खुळा...
बीज अंकुरे अंकुरे
जमिनीला लागे ध्यास,
वाढ वाढावे गं रोप
नको आभास आभास...
बीज अंकुरे अंकुरे
आता स्वप्नांना आकार,
उद्या उमलेल पातं
घरी बहार बहार..
बीज अंकुरे अंकुरे
म्हणे करा तपासणी,
जर देशी वंशा दिवा
आकाशास गवसणी!
बीज अंकुरे अंकुरे,
का हा वणवा पेटला?
नवा जन्म रुजताना
कुणी गळा गं घोटिला?
-बागेश्री
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित : https://venusahitya.blogspot.com/
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3495
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम! शेवटचे कडवे वाचून
अप्रतिम!
शेवटचे कडवे वाचून सुन्न झालोय.
सुंदर.
सुंदर.
अत्यंत
सुरेख रचना... ज्याप्रकारे गेयता सांभाळली आहे, ते खरचं कौतुकास्पद आहे.
व्वाह!!
मस्त
सुरेख काव्य आहे. तुमची या आधीची अष्टाक्षरी ही छान होती
सुंदर
सुंदर :-)
ऊत्कृष्ट काव्य.
विषय बरोबर पेलला गेला आहे. शेवट्च्या कडव्यातून अनपेक्षित धक्का देवून कविता संपते आणि कविता जबरदस्त परिणाम सोडून रहाते.
१०० % ऊच्च रचना. अभिनंदन.
बीज अंकुरे अंकुरे म्हणे करा
बीज अंकुरे अंकुरे
म्हणे करा तपासणी,
जर देशी वंशा दिवा
आकाशास गवसणी!
बीज अंकुरे अंकुरे,
का हा वणवा पेटला?
नवा जन्म रुजताना
कुणी गळा गं घोटिला?>>> ब्बास...! एखाद्या विषयातली जाणिव,वेदना असे सामाजिक विषयावरच्या काव्याच्या बाबतीत जे काही म्हणतात ना, ते हेच...! मान गये.... आपला सलाम या रचनेला :-)
छान !
अर्थपूर्ण अष्टाक्षरी फक्कड जमली आहे.
+१
In reply to छान ! by परिकथेतील राजकुमार
+१
काव्यरचना सुंदर जमलीय
काव्यरचना सुंदर जमलीय
छान
थोडक्या शब्दात सामाजिक भान जपलंय. नीरस काथ्याकुटापेक्षा हजार वेळा छान!
मस्त जमली आहे कविता.
मस्त जमली आहे कविता.
खल्लास!
खत्रा कविता!
मिपावरच्या दहा कवितांवर क्लिक केल्यावर एखादीतरी असली कविता वाचल्यामुळे चिडचिड होत नाही. :)
++१ अगदी असेच म्हणायचे आहे.
In reply to खल्लास! by दादा कोंडके
++१
अगदी असेच म्हणायचे आहे. अलिकडे इतक्या आशयघन कविता फार थोड्या वाचायला मिळताहेत.
दाद देतो दादा
In reply to खल्लास! by दादा कोंडके
दादा , आपल्या शी अगदी सहमत म्हण्जे सहमत !
__/\__ अप्रतिम
__/\__ अप्रतिम :)
मस्तच!
परिणामकारक आणि दर्जेदार रचना आहे.
बीज अंकुरल्याच्या आनंद ते तो अंकुर खुडल्यापर्यंतचा हेलकावा छातीत धस्स करून जातो.
"बीज अंकुरे अंकुरे रुपं
"बीज अंकुरे अंकुरे
रुपं नव्हाळ मातीला,
गर्भारता देह तिचा
रंग केतकी कांतीला!"
छान .. सुंदर..
ह्या पापातून
बीज अंकुरे अंकुरे,
का हा वणवा पेटला?
नवा जन्म रुजताना
कुणी गळा गं घोटिला?
ह्या पापातून कधी मो़कळा होणार मानव ? तो हवा तशी ती पण हवीच ना ?
एका चाकाचा रथ काय कामाचा ,जरी असेल आलिशान नि राजाचा ?
@कवयित्री ,
मला सापडलेला अर्थ च आपल्याला अभिप्रेत आहे ना ?
कविता सुघटली आहे .
पुलेशु
खुप छान...!!!
खुप छान...!!!
+१
In reply to खुप छान...!!! by पिलीयन रायडर
सहमत
आवडली..
छानच आहे. . . शेवटचे कडवे चटका लावून जाणारे..
अमृत
भरभरून प्रतिसादांसाठी
भरभरून प्रतिसादांसाठी मनःपूर्वक आभारी आहे.
चौकटाराजाजी, कवितांचे आपले अनेक अर्थ निघतात, मी लिहीली, आता ती वाचकांची- अर्थ ही त्यांचेच, तुम्ही लिहीलेला अर्थ फारच सुरेख आहे, :)
मस्त
सुरेख रचना. आवडली.