तव चिंतनातही मी
तव चिंतनातही मी,
बाहुंतही तव मीच मी \-२
माझीच दोन्ही घरे,
ए प्रियकरा ही इथे
जणू दिप्ती पहाटेसची,
नेत्रांत तव हरपली
उघड लोचने तू तुझी,
पुतळ्यांत असणार मी
मी आहे, कला ज्या स्थळी,
नेत्रांत तुझिया उभी
मदनमस्त चंचल ही सांज,
संकेतच देते तुला
दगडांत कर शायरी,
वंदन मी करते तुला
तू अससी, तेथ मी,
नाचे ही भू-आसमान
शांतारामांच्या रोमांचक स्वप्नाला हसरत जयपुरींनी शब्द दिले तेव्हा हे गीत निर्माण झाले.
उघडच आहे की ते माझे नाही.
हा आविष्कार मात्र माझाच आहे.
त्याला वाण नाही तर नाही पण गुण तरी लागला आहे की नाही, हे मात्र तुम्हीच सांगू शकाल.
काव्यरस
वाचने
2528
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा.. मी ओळखले
:)
तेरे खयालोमे हम ?
वाण व गुण दोन्ही आले आहेत.>>> धन्यवाद!
In reply to तेरे खयालोमे हम ? by चौकटराजा
आपला लेख
In reply to वाण व गुण दोन्ही आले आहेत.>>> धन्यवाद! by नरेंद्र गोळे
तव चिंतनात मी.
खयाल = चिंतन ?
जाउ द्या हो डॉन काका
In reply to खयाल = चिंतन ? by छोटा डॉन
@गोळे काका
In reply to खयाल = चिंतन ? by छोटा डॉन
चिंतन
In reply to @गोळे काका by चौकटराजा
कदाचित त्यांच्या खयालांचा चिंतनाशी संबंध नसू शकेल!
In reply to चिंतन by पैसा
सुंदर. आविष्कार आवडला.
+१
In reply to सुंदर. आविष्कार आवडला. by प्रचेतस
असा गेय भावानुवाद करणे ही
प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद!