तव चिंतनातही मी
तव चिंतनातही मी,
बाहुंतही तव मीच मी \-२
माझीच दोन्ही घरे,
ए प्रियकरा ही इथे
जणू दिप्ती पहाटेसची,
नेत्रांत तव हरपली
उघड लोचने तू तुझी,
पुतळ्यांत असणार मी
मी आहे, कला ज्या स्थळी,
नेत्रांत तुझिया उभी
मदनमस्त चंचल ही सांज,
संकेतच देते तुला
दगडांत कर शायरी,
वंदन मी करते तुला
तू अससी, तेथ मी,
नाचे ही भू-आसमान
शांतारामांच्या रोमांचक स्वप्नाला हसरत जयपुरींनी शब्द दिले तेव्हा हे गीत निर्माण झाले.
उघडच आहे की ते माझे नाही.
हा आविष्कार मात्र माझाच आहे.
त्याला वाण नाही तर नाही पण गुण तरी लागला आहे की नाही, हे मात्र तुम्हीच सांगू शकाल.
काव्यरस
वाचने
2563
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा.. मी ओळखले
तेरे खयालोंमे हम.. तेरेही बाहोंमे हम!! अपने हैं दोनों जहाँ..
(गीत गाया पत्थरोंने बहुधा)
:)
तुम्ही मराठी रुपांतर मस्तच करता!
तेरे खयालोमे हम ?
गोळे साहेब ,
भावानुवादाला एक सुरेख गीत आपण निवडले आहे. व भावानुवादही मस्त ! प्रथम माझा गैरसमज असा झाला की मराठी साहित्यातील
" शांताराम" यांचे लेखन हसरत नि हिदीत नेऊन गीत केले की काय कारण व्ही शांताराम मधला व्ही किंवा शांताराम बापू मधले बापू पक्के
डोक्यात बसलेले.
वाण व गुण दोन्ही आले आहेत.
जाता जाता- या गीतात फारच सुंदरपणे वेगवेगळे अंतरे रामलाल यानी स्वरात गुंफलेले आहेत. तो एक वेगळाच आनंद आहे !
अशाच मस्त दोन ओळी मला दिसताहेत पहा आपल्याला कशा वाटतात
सावन आये या ना आये जिया जब झुमे सावन है
तार मिले ज्ब दिलसे दिलके वो ही समय मन भावन है
श्रावण यावा ना तर यावा , जेंव्हा डोले मन श्रावण समजावा
जुळती जेंव्हा तारा ह्र्दयाच्या , तो क्षण हर्षोल्लासी समजावा
वाण व गुण दोन्ही आले आहेत.>>> धन्यवाद!
In reply to तेरे खयालोमे हम ? by चौकटराजा
चौकटराजा,
आपण केलेला अनुवाद चांगला आहे.
सावन आये या ना आये जिया जब झुमे सावन है
तार मिले जब दिलसे दिलके वो ही समय मन भावन है >>>> ह्याचा अनुवाद मी खालीलप्रमाणे केला असता.
श्रावण येवो वा न येवो, मन थिरके, तो श्रावण होय
हृदयी तारा जुळता येतो, तो क्षण मन संतोषवी हो
ह्या संदर्भात तुम्हाला कदाचित
https://www.manogat.com/node/14134 "पद्यानुवादांचा रसास्वाद"
हा माझा मनोगतावरील लेखही वाचावासा वाटू शकेल.
आपला लेख
In reply to वाण व गुण दोन्ही आले आहेत.>>> धन्यवाद! by नरेंद्र गोळे
आपला मनोगत वरचा लेख मोठा आहे. पाहिल्या थोड्या वाचनात आवडला आहे. पण आपण ज्या गंभीरपणे तो लिहिला आहे त्याच गंभीरपणे
अभ्यासण्यासाठी काही वेळ घेतो. दरम्यान एकाच ओळीचे वेगवेगळे मेंदू कसे अनुवाद करतात हे पहाणे मोठे रंजक आहे. उदा. तुम्ही दिलेले
तुम्सा नही देखा चे उदाहरण.
येत रहा !
तव चिंतनात मी.
श्री गुगल यांच्या सौजन्याने गाणं सापडलं पण 'तव चिंतनात मी' सुरुवातच लैच खडी खडीच्या रस्त्याने झाली.
रुपांतर किती जमलं ते वाचक मायबाप सांगतीलच. मला तितकसं आवडलं नाही.
-दिलीप बिरुटे
खयाल = चिंतन ?
'खयाल' ह्या हिंदी शब्दाला पर्याय म्हणुन मराठी 'चिंतन' ?
नाय हो गोळेकाका, पहिल्या ओळीलाच विषयांतर होत आहे.
'खयाल' चा मुड टिकवण्यासाठी 'चिंतन' ऐवजी अन्य दुसरा शब्द शोधावा लागले. चिंतन ह्याच अर्थ फार वेगळा होतो.
स्मरण, आठवण वगैरे जमतेय का बघा पण ते चिंतन वगैरे 'प्राचील गच्ची टाईप' झाले की हो ;)
- छोटा डॉन
जाउ द्या हो डॉन काका
In reply to खयाल = चिंतन ? by छोटा डॉन
जाउ द्या हो डॉनकाका ,
कवि आपले शब्द स्वयंप्रेरणेने लिहून जातो. आता त्याचे काय म्हणून चर्वण करायचे ! मन मोठे करा राव !
@गोळे काका
In reply to खयाल = चिंतन ? by छोटा डॉन
@गोळे कक्का ,
चिंतन हा शब्द " आठव" या अर्थाने एका नाट्यगीतात वापरला गेला आहे. कवि बहुदा वसंत कानेटकर
नको विसरू संकेत मीलनाचा या गीतात
तुझे चिंतन तो करीन मी मनाशी अशी ओळ आढळली.
चिंतन
In reply to @गोळे काका by चौकटराजा
चिंतन याचा अर्थ विचार करणे असाच आहे. आठवा संघाची "चिंतन शिबिरे." आठवणे म्हणजे "स्मरण".
कदाचित त्यांच्या खयालांचा चिंतनाशी संबंध नसू शकेल!
In reply to चिंतन by पैसा
चौकट राजा आणि पैसाताई,
समर्थनार्थ खूप खूप धन्यवाद. खयालचा अर्थ मलाही चिंतन असाच वाटतो. मात्र इतरांच्या मनात काय काय खयाल येत असतील त्याचा कदाचित चिंतनाशी संबंधच नसू शकेल!
सुंदर. आविष्कार आवडला.
सुंदर.
आविष्कार आवडला.
+१
In reply to सुंदर. आविष्कार आवडला. by प्रचेतस
+१
असा गेय भावानुवाद करणे ही
असा गेय भावानुवाद करणे ही देखील वेगळीच प्रतिभा आहे.
प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद!
मस्त कलंदर, पैसा, चौकट राजा, डॉ.बिरुटे, छोटा डॉन, वल्ली आणि सांजसंध्या सगळ्यांना
प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद!
डॉ.बिरुटे,
सुरुवातच लैच खडी खडीच्या रस्त्याने झाली.>>>>
ज्या दिवशी सरळ, सपाट, कणखर सिमेंटच्या पक्क्या रस्त्याची चैन करणे झेपेल तो सुदिन!
तरीही आपल्या अपेक्षांना पात्र ठरण्याचा प्रयत्न मी नक्कीच करू चाहेन!!
छोटा डॉन,
'खयाल' ह्या हिंदी शब्दाला पर्याय म्हणुन मराठी 'चिंतन' ?
नाय हो गोळेकाका, पहिल्या ओळीलाच विषयांतर होत आहे.>>>
यावर दोन उपाय आहेत. लेखनप्रकारात "विषयांतर" समाविष्ट करणे किंवा विषयच बदलल्यानंतर मग जे काय लिहीले आहे ते बदलेल्या विषयाला धरून असल्याचा समज करून घेणे. असो. अनुवाद तुम्हाला फारसा आवडला नाही ह्याची मी नोंद घेतली आहे. मात्र मूळ गाण्याचा आस्वाद तुम्ही तरीही घेऊ शकताच की. नीट लक्ष देऊन " पाहिलेत " तर सुरस वाटण्याची मला उमेद आहे! https://www.youtube.com/watch?v=RHBBcQ462TI "तेरे खयालो में हम" (धन्यवाद बिरूटे सर!)
सांजसंध्या,
असा गेय भावानुवाद करणे ही देखील वेगळीच प्रतिभा आहे.>>>>
खरंय! आपल्या ह्या आकलनाचे मला अपरूप आहे.
कुणाला तरी आपल्याला वाटले तसेच वाटले असेल तर ती सह-अनुभूती झाली.
ती मिळाली तर मग आणखी कशाला काय हवंय!