Skip to main content

धुक्यात हरवली मुंबई

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 21/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारी दिडच्या सुमारास जेवायला भोजनकक्षात गेलो असता सर्वत्र दाट धुके दिसले. माझी कचेरी कालिना -बीकेसी भागात आहे. आमच्या इमारतीच्या मागच्या बाजुने पश्चिम द्रुतगती मार्ग सरळ रेषेत जेमतेम १ किमी असेल. मात्र तो दिसेनासा झाला होता. सी लिंक वा वरळीच्या इमारती दिसणे तर दूरच. हे धुके कसे काय? सकाळी येताना स्वच्छ प्रकास होता. आता गारवा संपला असून रखरखाट सुरू झाला आहे. मग हे धुके कसले? प्रदुषण तर नेहेमीचेच आहे. आणि धुर थिजुन धुके व्हायला थंडी तर हवी? fog 4 fog5 fog3 Ifog2 fog1 चित्रे हस्तसंचावर टिपली आहेत .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2936
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

हो आज कायच्या काय धुळीची वावटळ उठलेली होती.. काहीही दिसत नव्हत.. ते धुक नव्हत.. कुठूनतरी धूळ आलेली होती...

In reply to by स्पा

हो आज कायच्या काय धुळीची वावटळ उठलेली होती.. काहीही दिसत नव्हत.. ते धुक नव्हत.. कुठूनतरी धूळ आलेली होती...
स्पाकाका हि धूळ म्हणजे जगबुडी जवळ आल्याची निशानी आहे

मी या वेळी ऑफिसला येत होतो. धुक्यासम जाणवले, पण धुळ , उन आणि आणि काय असे मिक्स झाले असेन म्हणुन पुढे गेलो. हा मात्र कालच्या प्रमाणे उन नव्हते जास्त जाणवत. आणि एक .. फोटो नेहमीप्रमाणे दिसला नाहि. [:)]

मस्कत मध्ये धुळीचे वादळ आहे. वारे विशेष वेगाने वाहात नाहीएत पण प्रचंड - अगदी प्रचंड प्रमाणात धुळ आकाशात उडून धुळीचे ढग निर्माण झाले आहेत. येये चार दिवस असे वातावरण (इथे तरी) असणार आहे. मुंबईतील पावसाचा, थंडीचा परीणाम इथल्या वातावरणावर झालेला अनेकदा अनुभवला आहे. कदाचित हेच धुळीचे ढग मुंबईपर्यंत वाहात जाऊन त्यांनी वातावरण ढगाळ, धुकंसदृष्य केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई - मस्कत अंतर साधारण पणे १६०० कि.मी. आहे. अवांतरः आत्ताच पाहिलेल्या झी२४ च्या बातमी पत्रात वरील मुद्यास दुजोरा देण्यात आला आहे.

निसर्गाने मुंबईकरांना धूळ चारली म्हणायची.

In reply to by स्पंदना

हा: हा: हा:.... आपल्यात एक म्हण आहे. 'मोहम्म्द पर्वताकडे येत नसेल तर पर्वतालाच मोहम्मदाकडे जावे लागते'. तद्वत, मुंबईकर पर्यटनासाठी आखाती प्रदेशाकडे दुर्लक्ष्य करीत असतील, त्यांची पायधूळ इथे झाडत नसतील, म्हणून आखाती धूळच मुंबईकरांच्या भेटीला आली आहे.

१ पण फोटो दिसत नाहीये पिकासा वरुन अपलोड करावे म्हणजे आम्हालापण बघता येतील.

वातावरणातील / हवामानातील असलेल्या बारीक धूळीमुळे मला श्वसनाचा बराच त्रास जाणवत आहे. दोन दिवस नाहक सुट्टी आणि ३/४शे रुपयाचे औषधी याचा खर्च तो वेगळाच