आज दुपारी दिडच्या सुमारास जेवायला भोजनकक्षात गेलो असता सर्वत्र दाट धुके दिसले. माझी कचेरी कालिना -बीकेसी भागात आहे. आमच्या इमारतीच्या मागच्या बाजुने पश्चिम द्रुतगती मार्ग सरळ रेषेत जेमतेम १ किमी असेल. मात्र तो दिसेनासा झाला होता. सी लिंक वा वरळीच्या इमारती दिसणे तर दूरच.
हे धुके कसे काय? सकाळी येताना स्वच्छ प्रकास होता. आता गारवा संपला असून रखरखाट सुरू झाला आहे. मग हे धुके कसले? प्रदुषण तर नेहेमीचेच आहे. आणि धुर थिजुन धुके व्हायला थंडी तर हवी?
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्रे हस्तसंचावर टिपली आहेत .
वाचने
2973
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो आज कायच्या काय धुळीची
हो आज कायच्या काय धुळीची वावटळ उठलेली होती.. काहीही दिसत नव्हत.. ते धुक नव्हत.. कुठूनतरी धूळ आलेली होती...
हो आज कायच्या काय धुळीची
In reply to हो आज कायच्या काय धुळीची by स्पा
स्पाकाका हि धूळ म्हणजे जगबुडी जवळ आल्याची निशानी आहे
मी या वेळी ऑफिसला येत
मी या वेळी ऑफिसला येत होतो.
धुक्यासम जाणवले, पण धुळ , उन आणि आणि काय असे मिक्स झाले असेन म्हणुन पुढे गेलो. हा मात्र कालच्या प्रमाणे उन नव्हते जास्त जाणवत.
आणि एक .. फोटो नेहमीप्रमाणे दिसला नाहि.
[:)]
धुळीचे वादळ...
मस्कत मध्ये धुळीचे वादळ आहे. वारे विशेष वेगाने वाहात नाहीएत पण प्रचंड - अगदी प्रचंड प्रमाणात धुळ आकाशात उडून धुळीचे ढग निर्माण झाले आहेत. येये चार दिवस असे वातावरण (इथे तरी) असणार आहे. मुंबईतील पावसाचा, थंडीचा परीणाम इथल्या वातावरणावर झालेला अनेकदा अनुभवला आहे. कदाचित हेच धुळीचे ढग मुंबईपर्यंत वाहात जाऊन त्यांनी वातावरण ढगाळ, धुकंसदृष्य केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई - मस्कत अंतर साधारण पणे १६०० कि.मी. आहे.
अवांतरः आत्ताच पाहिलेल्या झी२४ च्या बातमी पत्रात वरील मुद्यास दुजोरा देण्यात आला आहे.
खरे आहे
In reply to धुळीचे वादळ... by प्रभाकर पेठकर
मागच्या आठवड्यात इकडे दुबैला पण अशीच धुळवड होती.
हे घ्या
https://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12355246.cms
मुंबई
निसर्गाने मुंबईकरांना धूळ चारली म्हणायची.
हं! एकुण पेठकर काकांची भेट
हं! एकुण पेठकर काकांची भेट आहे म्हणायची ही ! गोड मानुन घ्या.
काका हलक घ्याल ना?
आखाती धूळ....
In reply to हं! एकुण पेठकर काकांची भेट by स्पंदना
हा: हा: हा:....
आपल्यात एक म्हण आहे. 'मोहम्म्द पर्वताकडे येत नसेल तर पर्वतालाच मोहम्मदाकडे जावे लागते'. तद्वत, मुंबईकर पर्यटनासाठी आखाती प्रदेशाकडे दुर्लक्ष्य करीत असतील, त्यांची पायधूळ इथे झाडत नसतील, म्हणून आखाती धूळच मुंबईकरांच्या भेटीला आली आहे.
ही धूळ राजस्थानातुन आल्याचं
ही धूळ राजस्थानातुन आल्याचं "सकाळवाल्यांचं"म्हणणं आहे.
फोटु दिसत नाही :-(
१ पण फोटो दिसत नाहीये
पिकासा वरुन अपलोड करावे म्हणजे आम्हालापण बघता येतील.
गणेशा...गणेशा....
In reply to फोटु दिसत नाही :-( by चिमी
गणेशा...गणेशा....
या धुळवडीमुळे प्रत्येक फोटोत
या धुळवडीमुळे प्रत्येक फोटोत बळवंत पटवर्धन दिसेनासे झालेले वाटतय ! ;)
आरोग्याच्या कटकटी वाढल्या त्याचे काय?
वातावरणातील / हवामानातील असलेल्या बारीक धूळीमुळे मला श्वसनाचा बराच त्रास जाणवत आहे. दोन दिवस नाहक सुट्टी आणि ३/४शे रुपयाचे औषधी याचा खर्च तो वेगळाच