निसर्गकविता ३: कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी...
निसर्गकविता १ : झाडांच्या पानात (With Mp3 song) - http://www.misalpav.com/node/20633
निसर्गकविता २ : प्रिय प्राजक्त - http://www.misalpav.com/node/20703
कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी... भरारल रान सारं, गंधाळली माती गच्च ओल शिवार.. फुललेली कांती हिरव्या पात्यावर,. मोत्यांची नक्षी पांढर्याफटुक ढगांची रेशमी दुलई काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती बांधावर उभी कोवळी रानजाई नटलेल्या सृष्टीवर आभाळाची प्रिती कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी... भरारल रान सारं, गंधाळली माती || गर्द झिम्माड रानात.. टिफण चालती.. सर्जा-राजाच्या पायामधी भिंगरी फिरती औंदाच्या पावसात बांधणार मी चारभिंती घराच्या छप्पराला स्वप्न टांगली कौलांची ------------- शब्दमेघ (कविता पुनःप्रकाशित)

मावळातील मळवलीला पावसाळ्यात
धन्यवाद चौकट राजा जी!
कविता आवडेश !
गणेशा राग नसावा
कोसळल्या सरी.. दूर
सुंदर. परत ही कविता वाचून्
मला निळे आकाश तितकेसे पसंत नाही
मला निळे आकाश तितकेसे पसंत नाही
वाह. कडाक्याच्या उन्हाळ्यात