✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

निसर्गकविता ३: कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी...

ग — गणेशा, Mon, 03/19/2012 - 18:15
निसर्गकविता १ : झाडांच्या पानात (With Mp3 song) - http://www.misalpav.com/node/20633 निसर्गकविता २ : प्रिय प्राजक्त - http://www.misalpav.com/node/20703
कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी... भरारल रान सारं, गंधाळली माती गच्च ओल शिवार.. फुललेली कांती हिरव्या पात्यावर,. मोत्यांची नक्षी पांढर्‍याफटुक ढगांची रेशमी दुलई काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती बांधावर उभी कोवळी रानजाई नटलेल्या सृष्टीवर आभाळाची प्रिती कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी... भरारल रान सारं, गंधाळली माती || गर्द झिम्माड रानात.. टिफण चालती.. सर्जा-राजाच्या पायामधी भिंगरी फिरती औंदाच्या पावसात बांधणार मी चारभिंती घराच्या छप्पराला स्वप्न टांगली कौलांची ------------- शब्दमेघ (कविता पुनःप्रकाशित)

Book traversal links for निसर्गकविता ३: कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी...

  • ‹ निसर्गकविता २ : प्रिय प्राजक्त
  • Up
  • निसर्गकविता ४: पाऊस ›

प्रतिक्रिया द्या
2523 वाचन

💬 प्रतिसाद (9)

मावळातील मळवलीला पावसाळ्यात

चौकटराजा
Mon, 03/19/2012 - 18:43 नवीन
आपली कविता वाचून पावसाळ्यातील वर्षाविहाराची ( उन्हाळ्यातील वर्षाविहार कसा असतो हो ....? हा प्रश्न अतृप्त आत्मा यांचा येण्या साठी मुद्दाम ही जागा केली आहे...... त्याना कोणी सांगू नका हं ) आठवण झाली.त्यातील एकेका फ्रेमचा पुनःप्रत्यय मस्त येतो. पहिल्या कडव्याची शेवटची ओळ व शेवटच्या कडव्यातील शेवटची ओळ यांचे यमक तोडण्याचे काही खास कारण ?
  • Log in or register to post comments

धन्यवाद चौकट राजा जी!

गणेशा
Mon, 03/19/2012 - 20:12 नवीन
धन्यवाद चौकट राजा जी!
पहिल्या कडव्याची शेवटची ओळ व शेवटच्या कडव्यातील शेवटची ओळ यांचे यमक तोडण्याचे काही खास कारण ?
खरे तर पहिली दोन कडवी ही शेतकर्‍याच्या मनाने टिपलेले चित्र आहे, आणि शेवट त्याला काय वाटते ते. ज्या प्रमाणे पहिल्या निसर्गकवितेत प्रेमिका आपला सखा येणार आहे तेंव्हाचे गीत आहे, दूसर्या कवितेत पतीच्या निधनानंतर ही प्राजक्ताच्या झाडाशी बोलुन शृंगार आठवणारी नायिका आहे, तसेच या निसर्गकवितेत शेतकर्याची भावना दाखवली आहे. ( पण ही कविता आधी लिहिलेली आहे.. आजकाल लिहिण्याला भावना नाहि तर शब्द चिकटले जात असल्याने नविन काही लिहित नाहिये) त्यामुळे निसर्गकविता + माणसाचे मन हे कवितेत दाखवण्याचा एक छोटा प्रयत्न . आणि एक ते मावळ लिहिल्यामुळे सांगतो, कवितेत आलेले वर्णन हे कोरीगडास पावसात आपल्याच मिपाकरांबरोबर गेलो होतो तेंव्हाचेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

कविता आवडेश !

हारुन शेख
Mon, 03/19/2012 - 20:26 नवीन
अजून कविता वाचायला आवडतील. चौकट राजा म्हणतो तसे यमक जुळून आले असते तर काव्य अनुभव अजून गहिरा झाला असता. तरीपण मनात चित्र रेखाटणारी प्रेक्षणीय कविता लिहिलीय त्याबद्दल अभिनंदन ! ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments

गणेशा राग नसावा

चौकटराजा
Mon, 03/19/2012 - 21:24 नवीन
कविला पर्याय सुचवित रहाणे हा त्याच्या सृजनशीलतेचा अधिक्षेप असतो. यास्तव प्रथम माफी मागतो. आता पर्याय यमकासह गच्च ओल शिवार.. फुललेली कांती हिरव्या पात्यावर,. दाणेदार मोती औंदाच्या पावसात बांधणार चारभिंती घराच्या छप्पराला स्वप्ने सांगाती
  • Log in or register to post comments

कोसळल्या सरी.. दूर

गणेशा
Mon, 03/19/2012 - 22:06 नवीन
कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी... भरारल रान सारं, गंधाळली माती गच्च ओल शिवार.. फुललेली कांती हिरव्या पात्यावर,. नक्षीदार मोती पांढर्‍याफटुक ढगांची रेशमी दुलई काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती बांधावर उभी कोवळी रानजाई नटलेल्या सृष्टीवर आभाळाची प्रिती कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी... भरारल रान सारं, गंधाळली माती || गर्द झिम्माड रानात.. टिफण चालती.. सर्जा-राजाच्या पायामधी भिंगरी फिरती औंदाच्या पावसात बांधणार चारभिंती घराच्या छप्पराला स्वप्ने सांगाती. ----------- कविता सांपादन करता येत नसल्याने येथे पुन्हा दिली आहे. @ चौकट राजा : धन्यवाद मनापासुन. आता कविता आनखिन छान वाटते आहे. आणि एक माफी वगैरे मागु नका.. हक्काने बोला एक मित्र बनुन, आवडेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

सुंदर. परत ही कविता वाचून्

प्रचेतस
Mon, 03/19/2012 - 22:53 नवीन
सुंदर. परत ही कविता वाचून् फारच छान वाटले. कोरीगडाच्या त्या झिम्माड आठवणी Image removed. तुझ्या कवितेसाठी एक समर्पक फोटो-कोथळीगडाच्या वाटेवर- Image removed.
  • Log in or register to post comments

मला निळे आकाश तितकेसे पसंत नाही

चौकटराजा
Tue, 03/20/2012 - 09:44 नवीन
वल्ली , फ्रेम चा उल्ल्लेख झाल्यावर लगेच फ्रेम अवतरल्या की ! धन्यवाद ! मला अर्धवट उन, ओला रस्ता व राखाळलेले आकाश हा नेचरचा मूड निळाशार आकाशा पेक्शा जास्त आवड्तो. दुसरे चित्र तसेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मला निळे आकाश तितकेसे पसंत नाही

चौकटराजा
Tue, 03/20/2012 - 09:45 नवीन
वल्ली , फ्रेम चा उल्ल्लेख झाल्यावर लगेच फ्रेम अवतरल्या की ! धन्यवाद ! मला अर्धवट उन, ओला रस्ता व राखाळलेले आकाश हा नेचरचा मूड निळाशार आकाशा पेक्शा जास्त आवड्तो. दुसरे चित्र तसेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वाह. कडाक्याच्या उन्हाळ्यात

जागु
Tue, 03/20/2012 - 15:15 नवीन
वाह. कडाक्याच्या उन्हाळ्यात कविता वाचून वर्षाऋतूच आगमन झाल्यासारख वाटल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा