हल्ली मिपावर कवितांचा सुकाळ बघून आणि आपल्या शारूकभायच्या ह्या कवितेतून प्रेरणा घेउन.
म्याबी कवि होनार
कुतून कुतून शबुद पाडनार,
रातीला "गंधाळलेली रात्र" म्हननार,
दवन्यासारकं कायबाय लिवनार,
आन म्याबी कविता करनार...
नावावरन बाय हाय आसं भासवनार,
मंग पोराटोरानचे परतिसाद येनार,
येक काका येउन भांडान करनार,
पन म्याबी कविता करनार...
कुनीच नाय परतिसाद देलं तरी,
बाकीचं कवि 'भारी लिवलय' म्हननार,
मंग येक भूत विडांबान पाडनार,
आन म्याबी कविता करनार...
कायच नाय जमलं तर,
येकांदी लावनी लिवनार,
नायतर बालगीत लिवनार,
पन म्याबी कविता करनार...
टिपः या कवितेतील काल्पनिक नसलेल्या पात्रांनी हलके घेणे. :)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2165
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
कोंडक्यानू, लै झ्याक लिवलय.
(No subject)
खिखिखि!
ओ भौ, रसग्रहनाला .....
रच्याकने ते विडंबन पाडणार भूत
लै भारी
माला सौशय येतुया
खपल्या गेले आहे. =)) =)) =))
चौरा काकातुम्हाला शक्य
का हो प्रकाटाआ केलात?
In reply to चौरा काकातुम्हाला शक्य by सांजसंध्या
आपल्या कवितेचे रसग्रहण होउ नये !
दादासाहेब ...