✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक हिंस्र कविता (?)... (१८+ only)

अ — अस्वस्थामा, Fri, 03/16/2012 - 17:59
हाणा रे हाणा , या विडंबकांना.. हे चावताती, हळव्या कवींना.. टांगून उलटे, माळावरी अन.. नवकवितांची धुरी द्या हो त्यांना.. जशी कोवळ्या कवितांची, पिसे हे उपटती.. यांच्या बोडक्याचे, केस केस उपटा.. तरीही जर उरले, अतृप्त अस्वस्थ आत्मे, हृद्य गद्य ललितात यांना बुडवून टाका.. (अपूर्ण आणि विस्तारासाठी सर्वाना खुले आवाहन... आणि ह. घ्या. हे सांगणे न लगे.. )

प्रतिक्रिया द्या
7746 वाचन

💬 प्रतिसाद (30)

...

गवि
Fri, 03/16/2012 - 18:02 नवीन
हॅ हॅ.. १८+ कशापाई?
  • Log in or register to post comments

ते १८+ बहुतेक बोडक्यासाठी

धन्या
Fri, 03/16/2012 - 18:14 नवीन
ते १८+ बहुतेक बोडक्यासाठी असेल. आमच्या रायगड जिल्ह्यात बोडके हा शब्द फारसा प्रचलित नाही. त्याऐवजी ** बोडकी अशी जोड शीवी खुपच प्रसिद्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१

दादा कोंडके
Fri, 03/16/2012 - 19:44 नवीन
१८+ बघून मोठ्ठ्या आशेने आलो होतो. हे म्हणजे अस्सल कोल्हापुरी मटण थाळी खाण्यासाठी हॉटेलात जावं आणि त्यानी शिकरण पुरी किंवा मटार उसळ आणून द्यावी तसं झालं! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१

सोत्रि
Fri, 03/16/2012 - 23:18 नवीन
अगदी अगदी! एकतर कविता ह्या दालनात मी येत नाही पण १८+ वाचून अपेक्षेने लाळ गाळतच आलो होतो पण..... KLPD ;) - (आंबट शौकीन) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

जिल्बी विडंबक.....................

इरसाल
Fri, 03/16/2012 - 18:11 नवीन
कुठेतरी कामाला लागलेले असतीलच. तात्पर्य : तयार रहा.
  • Log in or register to post comments

निराशा झाली. तुमच्याकडे इनो

धन्या
Fri, 03/16/2012 - 18:12 नवीन
निराशा झाली. ;) तुमच्याकडे इनो मिळत नाही का ?
  • Log in or register to post comments

अरेरे

अस्वस्थामा
Fri, 03/16/2012 - 18:27 नवीन
तुम्ही कसली आशा लावून बसले होते या 'जिलबी' कडून.. :) यात कसलेही साहित्यिक मूल्य शोधायला नका हो जाऊ.. वांत्या होतील.. इनो दूरच मग.. (तरी "हलके घ्या." असा बोर्ड पण लावला आहे.. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

काय राव, मी इनोचं तुमच्यासाठी

धन्या
Fri, 03/16/2012 - 19:18 नवीन
काय राव, मी इनोचं तुमच्यासाठी विचारलं होतं. :)
यात कसलेही साहित्यिक मूल्य शोधायला नका हो जाऊ..
कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

मस्त कविता ! खरोखरच मस्त !

चौकटराजा
Fri, 03/16/2012 - 18:22 नवीन
भा रा तांबे यानी वीररसात लिहिलेली " डुमडुमत डमरू ये" यातील" कडकडा फोड नभ उडव उडू मक्षिका , खडबडवी दिग्गजा तुडव रविमालिका " याची आठवण झाली. किवा" विरूप झाली शुर्पंणखा ही दाशरथीची कृती सूड घे त्याचा लंकापति" या गदिमांच्या ओळींची आठवण झाली. अवस्थामा आपण वीरू सेह" वाघ" चे काम केले आहे. धन्यवाद ! मुख्य म्हणजे कविता पटकन समजावी अशी लिहिलेली आहे. त्यासाठी खास आभार ! पुढे ही लिहित रहा !
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

अस्वस्थामा
Fri, 03/16/2012 - 18:33 नवीन
"चौकटराजा" आपले आधीच्या कवितांचे प्रतिसाद वाचले आहेत.. तेव्हा आपल्याकडून काही सुधारणा सुचवण्याची अपेक्षा होती तरी प्रोत्साहनाबद्दल आभार... बाकी गदिमांची कविता ऐकली आहे.. परंतु भा. रा. तांबे यांच्या कवितेबद्दल प्रथमच ऐकतोय.. शोधून वाचेन आता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

इधर तोच

चौकटराजा
Fri, 03/16/2012 - 19:18 नवीन
ओ त्थामू बुवा ! इधर तोच तुम्हारा चुकता है ! भौ , मी काय इथं पाने ( कवितेची पाने नव्हे वर्कशॉप मधले पाने ) आणि पकड ( पकड म्हणजे जी कवि आस्वादकाची घेउन पहातो ती नव्हे ही पकड म्हणजे आईच्या भाषेत प्लायर ) घेऊन बसलोय काय ? जे निर्दोष आहे त्यात काय दुरुस्ती? त्या भारांच्या कवितेतील काही ओळी पाड सिहासने दुष्ट ती पालथी ओढ हतीवरूनी मत्त नृप खालती मुकुट रंकासी दे करटी भूपाप्रति झाड खट खट तुझे खडग रुद्रा ( ह्यातील मत्त राजा म्हणजे ब्रिटीश साहेब )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

बरेच दिवसांचा राग

पैसा
Fri, 03/16/2012 - 18:46 नवीन
एकदम सुसाट बाहेर आलेला दिसतोय! पण विडंबक कुठे आहेत? ;)
  • Log in or register to post comments

घाबरु नका आम्ही इथेच आहोत

पक पक पक
Fri, 03/16/2012 - 22:01 नवीन
घाबरु नका आम्ही इथेच आहोत ;) सद्ध्या यशस्वी माघार घेतली आहे ,लवकरच भेटु ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

भा रा तांबे हे राज कवि होते.

निश
Fri, 03/16/2012 - 18:53 नवीन
भा रा तांबे हे राज कवि होते. त्यांचि एक नितांत सुंदर कविता आहे , जन पळभर म्हणतिल हाय हाय, मि जाता राहिल कार्य काय, जन पळभर म्हणतिल हाय हाय. अप्रतिम कविता चौकटराजा साहेब, भा रा तांबे ह्यांचि आठवण करुन दिलित म्हणुन तुम्हाला धन्यवाद
  • Log in or register to post comments

पण विडंबक कुठे आहेत? या

विजुभाऊ
Fri, 03/16/2012 - 18:54 नवीन
पण विडंबक कुठे आहेत? या कवितेच्या विडंबनाचे काम बहुतेक शरदिनी तैच करु शकतील ;)
  • Log in or register to post comments

हं तुर्तास हे घ्या!

शरदिनीआप्त
Fri, 03/16/2012 - 20:24 नवीन
वितंड तांडव अस्वस्थांचे रापोनिया पंख दिशांचे आत्म्यांचे भयात्कारी मुखवटे जळमटे जळमटे आणी जळमटे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

कोण कोण आहे हा अस्वस्थामा बनु

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/16/2012 - 19:00 नवीन
कोण कोण आहे हा अस्वस्थामा बनु पाही हळव्या कविंचा हा माम्मा ;-) नावापरी वाटे जख्मी कधीचा असा का हा आला..? करण्या पंचनामा :-p आंम्हास देण्यास जाशी धुरी तू पचवेल का रे आग नवकवितांना..? तैलार्त केसास आमुच्या उपटतांना तव पार्श्वभागे येवो मज्जा अपटतांना ;-) तरिही जर उरलास जख्मी अस्वस्थाम्मा ;-) करु आंम्ही तुझा वारंवार माम्मा :-p अवांतर--- ज्यांना क्षमस्व म्हणायचे त्यांना म्हणुन झाले,,,आणी आम्च्या एखाद वेळेस झालेल्या थोड्याश्या अवांतरपणाला तथाकथित टोला द्यायला,फुकाच्या जख्मा घेऊन हे अस्वस्थामा बनुन कशाला आले...? ते काहि केल्या कळेना..! ...असो... याउप्परही खेळायचे असल्यास अमच्याकडुन येलकम ;-)
  • Log in or register to post comments

अरेरे..

अस्वस्थामा
Fri, 03/16/2012 - 20:07 नवीन
कावळा बसायला आणि फांदी तुटायला.. असे काहीसे झालंय वाटते.. मी स्वतः विडंबक पक्षाचा समर्थक असून अतृप्त आत्मा आणि वल्ली दोघांचा पण फ्यान आहे तसा.. पण
" ज्यांना क्षमस्व म्हणायचे त्यांना म्हणुन झाले,,,आणी आम्च्या एखाद वेळेस झालेल्या थोड्याश्या अवांतरपणाला तथाकथित टोला द्यायला,फुकाच्या जख्मा घेऊन हे अस्वस्थामा बनुन कशाला आले...? ते काहि केल्या कळेना..! "
हे अवांतर वाचून असे वाटतेय की अशुभ घडलेल्या ठिकाणी आम्ही पेढे वाटायला पोचलोत बहुतेक... येथे आधी काही घडले असल्यास मला काही कल्पना नाही आणि त्यात पडायचे ही नाही.. हे "विडंबकांचे विडंबन" असे काहीसे डोक्यातले गेल्या रविवारी लिहिलेले फक्त इथे टाकलेय.. अतृप्त आत्म्यास काही व्यक्तिगत वाटले असल्यास क्षमस्व.. परंतु तुमच्या लेखणीस दाद द्यावी तितकी कमीच... इथे व्यक्तीशः कोणास ओळखत नाही आणि वावर ही कमीच... त्यामुळे कोणाबद्दल काही राग अथवा लोभ नाहीय.. आणि कोणत्याही व्यक्तिगत वादापासून तर दूरच राहणे पसंत करीन .. बाकी खेळीमेळीने खेळणार असाल तर खेळू नायतर आमी कटाप आत्ताच.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

. मी स्वतः विडंबक पक्षाचा

प्रचेतस
Fri, 03/16/2012 - 20:45 नवीन
. मी स्वतः विडंबक पक्षाचा समर्थक असून अतृप्त आत्मा आणि वल्ली दोघांचा पण फ्यान आहे तसा.
आमचे नाव आल्यामुळे आम्ही भरून पावते झालोत. पण मी विडंबक नाही हो, एखाद दोन फुटकळ कधी मधी टाकली असतील तितकीच. बाकी आत्म्याबद्दल सांगायचे तर तो महान विडंबक आहे. तो सुद्धा खेळीमेळीने खेळात भाग घेईल हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

तरी मी विडंबकांना सांगत होतो

प्रचेतस
Fri, 03/16/2012 - 19:02 नवीन
तरी मी विडंबकांना सांगत होतो की आता नवकवी उठावाच्या तयारीत आहेत. भविष्य खरं ठरलं म्हणायचं.
  • Log in or register to post comments

तरी मी विडंबकांना सांगत होतो

पक पक पक
Fri, 03/16/2012 - 22:04 नवीन
तरी मी विडंबकांना सांगत होतो की आता नवकवी उठावाच्या तयारीत आहेत. सद्ध्या बोटांना तेल लावत आहे... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@तरी मी विडंबकांना सांगत होतो

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/16/2012 - 22:24 नवीन
@तरी मी विडंबकांना सांगत होतो की आता नवकवी उठावाच्या तयारीत आहेत.>>> ऐका हो ऐका...! वल्ली विडंबक नाहित बंरं ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छे हो, फारच हिंस्त्र लेखन आहे

५० फक्त
Fri, 03/16/2012 - 19:14 नवीन
छे हो, फारच हिंस्त्र लेखन आहे हे, अशा हिंस्त्र लेखनप्रकाराला कविता असे कोमल्,नाजुक नाव द्यायला तुमचं मन तरी कसं धजावलं ? बाकी, या लेखनात उल्लेखिलेला उपक्रम उत्तम, पण हळव्या कवींच्या, नवकवितांची धुरी करुन दिल्यावर नवकविता उरणारच नाहीत विडंबनं करायला,म्हणजे सुंठिवाचुन खोकला गेला असा प्रकार होईल. मग हे विश्व किती रुक्ष आणि रखरखीत होउन जाईल, बाहेर असलेल्या उन्हाळ्याप्रमाणे होउन जाईल हे विश्व. असो.
  • Log in or register to post comments

अत्रुप्त आत्मा हा खरच मोठया मनाचा मित्र आहे

निश
Fri, 03/16/2012 - 19:16 नवीन
अत्रुप्त आत्मा हा खरच मोठया मनाचा मित्र आहे. मि सकाळी त्याच्या विड्बनाला आक्षेप घेतला होता. त्याने माझि माफि मागितलि अगदि मोठया मनाने. मित्र म्हटल त्याने मला. मग त्यावर मि राग कसा धरु. मित्रांवर राग धरायचा नसतो.
  • Log in or register to post comments

निश...धन्यवाद... अता तरि

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/16/2012 - 19:49 नवीन
निश...धन्यवाद... अता तरि मामांना शांती ;-) मिळो ही सदिच्छा :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

दोन मित्रांचे हृद्य संवाद

प्रचेतस
Fri, 03/16/2012 - 20:02 नवीन
दोन मित्रांचे हृद्य संवाद वाचून डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@डोळे पाणावले>>> दुष्ट

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/16/2012 - 21:23 नवीन
@डोळे पाणावले>>> दुष्ट ;-) दुष्ट ;-) दुष्ट ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अत्रुप्त आत्मा हा खरच मोठया

पक पक पक
Fri, 03/16/2012 - 22:13 नवीन
अत्रुप्त आत्मा हा खरच मोठया मनाचा मित्र आहे. त्यावर दुमत नाहीच मुळी.. :) मि सकाळी त्याच्या विड्बनाला आक्षेप घेतला होता. त्याने माझि माफि मागितलि अगदि मोठया मनाने. का घेतला..? मला आवड्ली होती :crazy: मित्र म्हटल त्याने मला. मग त्यावर मि राग कसा धरु. त्यावर राग धरु नकाच्..खुप चांगला आहे तो ...फक्त कविता तेव्ह्ड्या चांगल्या करा ;) मित्रांवर राग धरायचा नसतो. भड्भडुन आले आहे... :bigsmile: :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

@भड्भडुन आले आहे... >>> आता

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/16/2012 - 23:30 नवीन
@भड्भडुन आले आहे... >>> आता बास... प्लीज नको... ;-) मी शाप दिला तर तुंम्हाला ------ होतिलं हं ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

पुनर्वाचनात मज्जा आली.

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/01/2017 - 12:40 नवीन
पुनर्वाचनात मज्जा आली. Image removed. आणी आगोबानी लावलेली आगंही आठवली. दू दू आगोबा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा