✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्त्री पुरुष समानता म्हणजे काय?

स
सोत्रि यांनी
Tue, 03/13/2012 - 04:00  ·  लेख
लेख
स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमके काय? हा प्रश्न फार दिवसा झाले पडला आहे. अदितीच्या ह्या लेखामुळे त्यावर जरा विचार करून उत्तर शोधून काढावेच असे वाटते. ह्या बाबतीत मला असे वाटते किंबहूना आजवरचे माझे मत असे की पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्री
  • आर्थिकदृष्ट्या परावलंबी असते
  • शिक्षणापासून वंचित राहते
  • सत्तेत किंवा अधिकारामध्ये तिला वाटा नसतो
  • चूल आणि मूल ह्या संकल्पनेत तिला जखडून टाकले गेले असते (हे समाजातील तळागाळापासून एलिट असे सर्व थर गृहीत धरून व्यक्त केलेले मत आहे)
तर, तिला शिक्षण मिळून ती आर्थिकदृष्ट्या स्वाबलंबी होऊन तिला सत्तेत किंवा अधिकारामध्ये वाव मिळायला हवा ही झाली स्त्री मुक्ती आणि त्यासाठी ‘सर्व पातळीवर समान संधी’ मिळणे म्हणजेच शिक्षण, करियर, सत्तेत (अधिकारात) वाटा ह्यामध्ये स्त्री पुरूष असा लिंगभेद न होता समान संधी मिळणे म्हणजे स्त्री पुरुष समानता. त्या अनुषंगाने आंतरजालावर जरा शोध घेतला तर फार काही हाती लागले नाही. खरंच हे जरा विस्मयकारकच होते. पण जे काही थोडे बहुत वाचायला मिळाले, काही चर्चा वाचायला मिळाल्या तेथेही मुळात स्त्री पुरुष समानता म्हणजे काय हेच स्पष्ट नाही. एके ठिकाणी स्त्रिया कुंकू लावतात पुरूष नाही, पुरुषाला फक्त मिस्टर असे संबोधन तर स्त्रियांना मिस आणि मिसेस असे वैवाहिक स्टेटस असलेले संबोधन असे काहीसे मत मांडून समानता आणि (अ)समानता असा उहापोह केला होता. हे वाचून हसू तर आलेच पण कीवही आली. सांख्यिकीच्या आधारे ही समानता मोजण्याचा प्रयत्न वर उल्लेखलेल्या अदिती ह्यांच्या लेखात झाला आहे. ज्या ज्या गोष्टी पुरूष करू शकतात त्या त्या स्त्रियांनी करणे म्हणजे समानता का? किंवा मग तसे नसेल तर निदान ज्या गोष्टी स्त्रिया करू शकतात त्यात त्यांची संख्या पुरुषांएवढी(च) हवी का? म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का? ही स्त्री पुरुष समानता नेमकी काय हा विचार करता करता ‘दिमाग का दही’ का काय म्हणतात तसे झाले आणि अचानक एक छान लेख वाचायला मिळाला (हिंदीत आहे). ह्यात म्हटले आहे की स्त्री पुरूष हे अर्धनारीश्वर (शीव-पार्वती) असून ते एकमेकांना पूरक आहेत आणि समानता म्हणजे एकमेकांना Complement करणं आणि निर्भेळ सहजीवन अनुभवणं. मला हे एकदम भावले आणि पटले. साधक-बाधक चर्चा होऊन ह्याचे उत्तर इथे मिळेल असे वाटते ब्वॉ.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
127822 वाचन

💬 प्रतिसाद (247)

प्रतिक्रिया

आजोबा म्हणा आजोबा.

Nile
Mon, 03/19/2012 - 12:37 नवीन
कसय ना काका/दादा...
ते आजोबा आहेत.
(मला तुमचे वय माहीत नाही)
वय काही का असेना! ;-) बाकी पर्ल, पिलीयन राईडर, मनीषा इत्यांदींचे चांगला प्रतिवाद केल्याबद्दल अभिनंदन. (पण इथे बरेच पालथे घडे आहेत हे लक्षात असू द्या हा प्रेमळ सल्ला!) ;-) बाकी चालू द्या. (पालथा टँकर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

(पण इथे बरेच पालथे घडे आहेत

पिलीयन रायडर
Mon, 03/19/2012 - 12:48 नवीन
(पण इथे बरेच पालथे घडे आहेत हे लक्षात असू द्या हा प्रेमळ सल्ला!)
म्हणुन तर नुकताच एका घड्याला रामराम ठोकलाय..!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

(मी कराटे खेळायचे.आणि

पिलीयन रायडर
Sun, 03/18/2012 - 20:57 नवीन
(मी कराटे खेळायचे.आणि ह्यामध्ये माझा मासिक धर्म कधीही मध्ये आला नाही.माझाच नाही तर माझ्याबारोर्च्या इतर मुलींनाही कधी मासिक धर्म म्हण्जे कटकट वगैरे वाटला नाही.) असा मुद्दा मांडताना तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता आहात. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात हे तुम्हाला सांगायला हवे असे नाही. तुम्हाला त्रास झाला नाही/होत नाही म्हणजे इतरांना तो होत नसेलच असे नाही ना? आणि या व्यतिरिक्त इतरही कारणे आहेत. गर्दीमधे ,प्रवास करताना स्त्रियांना (भारतात) अनेक त्रास होतात. त्याचा अगदी शब्दशः उल्लेख करायची जरूरी नाही. त्यामुळे अशा तर्‍हेचे आरक्षण जर स्त्रियांसाठी असेल तर ते योग्यच आहे. फक्त यात स्त्रियांनी थोडे तारतम्य दाखवायला हवे. प्रत्येक ठिकाणी केवळ अधिकार गाजवू नये.
अगदी बरोबर, माझ्या शाळेत ह्या काळात "कबड्डी " खेळणार्या मुली होत्या तशाच ४ दिवसा पैकी २ दिवस सुट्टीची परवानगी असणार्‍या सुद्धा.. त्यांची केवळ ह्या त्रासासाठी ट्रीटमेंट घेत होत्या, पण पुढे त्यांना नोकरीत प्रवास करवा लागायचा तेव्हा रडकुंडीला यायच्या बिचार्या... दर महिन्याला हिच कहाणी... माझी एक बहीण ह्या दिवसात गडाबडा लोळायची म्हणे.. आणि बसमधील भयंकर अनुभवा नंतर मी एका मोठ्या कॉलेजला प्रवेश घ्ययचाय नाही म्हणजे प्रवास टळेल ह्या विचारापर्यंत आले होते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

१.सरकारने गर्भलिंग चाचणीवर

पिलीयन रायडर
Sun, 03/18/2012 - 20:50 नवीन
१.सरकारने गर्भलिंग चाचणीवर बंदी घालूनही गर्भलिंग निदान केले जाते आणि त्यात अनेक मुलींचा बळी जातो हि अतिशय लांच्छनास्पद गोष्ट आहे.
बर मग?? ह्याला असमानता म्हणायचं की नाही?? तुमच्या लक्षात येतंय का, इथेच सगळी सुरवात झालीये? म्हणजे कसय ना ताई... बस मधली जागा ह्या पेक्षा ह्या मुद्द्यवर जास्त बोलायला हव होतत तुम्ही... तुमची जहाल आणि विस्त्रुत मतं आवडली असती वाचायला...
२.वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती हि ग्रामीण भागात जास्त असते.ग्रामीण भागात मुळातच पुस्तक वाचल्यान पोट भरणार नाहीये हे तत्वाद्यान असत.अनेक शाळांमध्ये मुलं आणि मुली फक्त हजेरीलाच असतात.नंतर हळूच पळून जाऊन मुल, मुली गुर राखायला, शेतीच्या कामाला घरच्यांना मदत करतात.त्यामुळे मुलांचही शिक्षण थांबत आणि मुलींचाही.
अभ्यास वाढवा... तुमचं जर हे मत असेल की याही बाबतीत मुला-मुलिंना समान निकष आहेत तर कमाल आहे.. तेही ग्रामीण भागात? इथे शहरात माझी कामवाली बाई १० वीत मुलीच लग्न लावुन देते का तर डोक्याला ताप नको आणि मुलाला मात्र परवडत नसुन इंग्लिश मिडियम मध्ये घालते.. तर तुम्ही काय सांगताय... ती पोरगी पण पुढे धुणि-भांडी करणार.. आणि हो, ग्रामीण भाग म्हणजे फक्त गुरं हाकायला जातात का लोक?? मग सरपंच इ खुप पैसा असणार्‍या घरी स्त्रिया एक्दम खुप शिकत असतील ना? त्यांची काही १६-१८व्या वर्षी लग्न होत नसतील.. आणि नोकरी पण करत असतील त्या... (राजकारणा बद्दल तर बोलुच नका.. कारण कुणाच्या हातात 'खरी' सत्त असते हे सगळ्यांना माहित आहे.
३.शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते.
समजा घरात परिस्थिति वाईट आहे, एक मुलगा आणि एक मुलगी आहे... कुणाला शिकवतात हो?? आणि मुलींच्या लग्नाचा आणि शिक्षणाचा संबध काय?? एखद्या मुलीला नुसतंच शिकायच असेल तर? लग्न नको असेल तर..सौदा घाट्यात का??
४. एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात.
भले शाब्बास... वर तर लिहिलय की मुलीला चांगल्या नवर्‍याच्या अपेक्षेने शिक्वायच.. तिला "हे काही तुझं घर नाहि" , " लग्ना नंतर आई-वडिल मुलीच्या घरच पाणी पण पित नाहीत" असले फलतु विचार शिकवायचे.. आणि मग म्हणायच की 'तु थोडिच आमचा आधार होणारेस"... ।याच..असल्याच गलिच्छ मानसिकतेतुन मुलिंना गर्भात मारतात, त्यांना शिकु देत नाहीत, संपत्तीमध्ये वाटाही देत नाहीत, इकडे सासरी काडिचीही सत्ता नाही..दिलेला हुंडा -सोनं पहायला पण मिळत नाही.. काहो, जर मुलीला शिकवलं आणि समानतेने वागवलं तर त्या आई वडिलांना सांभाळ्णार नाहीत??? तुम्ही स्वतःच लग्न थांबवुन भावाच शिक्षण करणार्‍या बहीणी पाहिल्या नाहिएत?? (मी पाहिल्यात..) मला बहीणच आहे.. भाउ नाही.. मग अता आमच्या आइ-वडिलांच काय?? हे असले दरिद्री विचार माझ्या आई वडीलांनी केले असते तर जन्मलो असतो का आम्हि? नाही तर ढिग भर बहीणी नंतर एक "वंशाचा दिवा" उगवला असता आमच्याही घरात... आज माझ्या आई -वडीलानी मला शिकवलं आणि मुलगी म्हणुन बिनकामचे विचार माझ्या डोक्यात भरले नाहीत, म्हणुन मी त्यांनी अपेक्षा न ठेवता पण मी त्यांना सांभाळान्याच्या पुर्ण तयारीत आहे..
५. मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.
तर मग नाहिये का बायकां मध्ये "गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान"??? ताई, शिकुच दिलं नाही तर येणार कुठुन? नोकरी करुच दिली नाही तर पोझिशन मिळणार कुठुन? आपल्या घरासठी खुप तडजोड करतात बायका... नोकरी मध्ये आधी घराला प्राधान्य देतात..कारण मुख्य हे असतं की " सामान्यतः" नवरा हे करत नाहि .... मी आधीही तुम्हला दिलेल्या प्रतिसादात लिहिलं होतं, परत लिहिते... पुरुषांना दु:ख नाहीत, ते जवाबदारी पार पाडत नाहीत, ते स्तियांवर फक्त अन्याय करतात असं नाहीये.. पण त्यांच्या दःखापेक्षा "बाई म्हणुन असणारी दःख" खुप जास्त आणि खुप मोठी आहेत... तुम्ही 'स्टुपिडीटी' अशा उथळ शब्दात त्याची वासलात लावलीत... नक्कीच परिस्थिति अशी नाहीये.. मुलगा "म्हातार पणाची काठी, वंशाचा दिवा" तरी असतो.. त्या स्वर्था साठी तरी तो जन्मला येतो...मुलगी जन्मायच्या आधी पासुन्च "ओझं" असते.. तिलाही आवडेल ना "म्हातार पणाची काठी, वंशाचा दिवा" बनायला..पण ती संधी सुद्धा मिळत नाही... देउन बघा.. सोनं असतात मुली... (एका ८० वर्षाच्या खेड्यातल्या आजोबांनी माझ्या बाबांना विचारलं होतं की तुम्हला किती मुलं?.. बाबा म्हणाले "दोन मुली".. मी "मुलीच? मुलगा नाहि????" ह्या वाक्याची तयारी ठेवली होती...तर आजोबा म्हणाले "सुखी आहात... मुलगीच प्रेमानी सांभाळते... तिला माया असते ना" ) आणि हो.. एवढ्या मोठ्या प्रतिसादा नंतर सुद्धा " स्त्री-पुरुष समानता " हा मुर्खपणा आहे असं आपलं मत आहे की नाही हे नीटस कळालं नाहि... म्हणजे भ्रुणहत्या, बलत्कार, हूंडाबळि असं काही नाहिचे का?? की त्यलाही पॅरेलल पुरुषांचे त्रास सांगणार अता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा

पिलीयन रायडर
Sun, 03/18/2012 - 21:20 नवीन
बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत.
ह्या साठी स्पेशल प्रतिसाद... म्हणजे एकंदरीत काय... मुलगी जन्मु द्यायची नाही... जन्मलीच तर मुलींना जास्त शिकवायचे नाही... परत "हे घर तुझे नाही" असं बिंबवायच... मुलगा हाच आमचा आधार असं मानायच... तिचं लग्न करताना "नोकरी करणार नाही" अशा अटी मुलीच्या वतीने स्वतःच मान्य करायच्या... हुंडा-सोनं द्यायचं आणि "हाच तुझा संपत्तीतील वाटा" असं म्हणायचं.. तिकडे नवर्याकडे तर आनंदी-आनंद... नोकरी नाही.. सत्ता नाही... स्वतःचा असा पैसा नाहिच हातात तर कुठुन म्हणायचं भावाला "५०-५०" % खर्च करते??????? आणि अशा घरात जेव्हा मुली ५०|% वाटा मागतात तेव्हा शक्यतो सासरचा दबाव असतो... आता..ज्या घरात मुली शिकतात... तुमच्या-आमच्या सारख्या.... का हो..तुम्ही नाही करणार भावाला मदत खर्चात?? मी तर नक्कीच केली असती.. (मला भाउच नाहीये..त्यामुळे सगळाच मी करते) आणि अता त्या मुली ज्या नोकरी करत असुन मदत करत नाहीत पण वाटा मागतात... असं तर बरीच मुलं पण करतात.. आई-वडिलांकडे बघतही नाहीत आणि वाटा मिळावा म्हणून भांडत बसतात.. परत एकदा.. हा "व्यक्तीसापेक्ष" मुद्दा आहे.. "लिंगसापेक्ष" नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

प्रतिसादांचि शंभरी गाठेल एवढं

किचेन
Sun, 03/18/2012 - 22:01 नवीन
प्रतिसादांचि शंभरी गाठेल एवढं मटेरिअल आहे तुमच्याकडे.एखादा धागा का नाहि काढत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

धन्यवाद...

पिलीयन रायडर
Mon, 03/19/2012 - 11:57 नवीन
१०० काय हो १००० गाठेल एवढं मटेरिअल आहे माझ्यकडे.. पण असो... प्रत्येक ठिकाणीच चांगली /वाईट कशी का असेना पण प्रसिद्धी मिळवण्याचे प्रयत्न करणारे लोक असतात.. आम्ही group discussion मध्ये हाच फंडा वापरायचो.. सर्वांच साधारणपणे जे मत असेल त्याच्या अगदी विरुद्ध मत द्ययचो.. त्यामुळे १ Vs सगळे अशी स्थिती व्हायची आणि निवड पक्की... पण तिथे आम्हला खुप अभ्यास करुन मत द्यावे लागयचे कारण त्याला फाडुन खाणारे १० लोक समोर असायचे.. तुमचंही हेच चाललं आहे..पण फक्त उथळ पणे वर वर विचार करुन... अन्यथा " स्टुपिडिटी" असले शब्द निघाले नसते.. माझ्या एवढ्या मोठ्या प्रतिसादाला तुमची एवढी एक्च ओळ?? तुमचा अभास कळला... हूंडाबळी, भ्रुण्हत्या असल्या गंभीर विषयांना मारलेली टांग सांगुन जाते काय ते... बस मधील जागा, म्हातार पणाची काठी असल्या मुद्द्यां पलीकडे काही असेल बोलण्यासरखं तर ऐकायला आवडेल अन्यथा राहु द्या... तशीही मला तुमच्या कडुन फार अपेक्षा नाही... इथे भर्पुर मुली सक्षम पणे आपले मत मांडत आहेत... तुमच्या सारख्या एकीचे विचार तेही एकांगी... सहज ओलांडुन पुढे जाता येइल... माझ्या मते मी तुम्हाला माझा भर्पुर वेळ आणि संधी दिली होती... पण तुमच्या कडे मुद्द्द्लात "मटेरिअल " नाही हे लक्षात आल्याने तुमच्याशी बोलण्याची माझी इच्छा नाही... धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

.

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 03/19/2012 - 00:19 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

किचेन ताई, मस्त प्रतिसाद आहे.

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 03/19/2012 - 00:21 नवीन
किचेन ताई, मस्त प्रतिसाद आहे. यातले काही मुद्दे आधी असे अधोरेखित झाले नव्हते (माझ्यापुरते बोलत आहे).
शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.
लाख रु की बात कही है !!!
मी कराटे खेळायचे
point noted.... आजपासून मस्करी बंद.. ए सगळ्यांनी नोंद घ्या रे ;-) (मी वेगळ्याच प्रतिसादाला उत्तर देत आहे. पण माझा प्रतिसाद चुकीच्या ठिकाणी येत आहे. तांत्रिक मंडळाने लक्ष द्यावे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

तुमची एकूणच सगळी मतं पाहता

Pearl
Wed, 03/21/2012 - 19:02 नवीन
किचेनताई, तुमची एकूणच सगळी मतं पाहता तुम्हाला अभ्यास वाढवण्याची गरज आहे असं सांगावसं वाटत आहे. आपण आपल्या भोवतीची(च फक्त), चार (सोयीस्कर) उदाहरणं पहायची. त्यावरून काहितरी निष्कर्ष काढायचा. असा एकूण प्रकार वाटतो. त्यामागे ओपन माइंड ठेवून चर्चा करण्याची बिलकूल तयारी दिसत नाहिये. (तसे नसते तर बलात्कार, हुंडाबळी, स्त्रीला घराबाहेर पडताना वाटणारी आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी असुरक्षितता याबद्दल तुम्ही मौन पाळले नसते.) आणि तुमच्याकडे रोजचे वर्तमानपत्र अजिबात येत नसावे असा अंदाज आहे :-) रात्री बेरात्री कामावरून परततानाचा बस, लोकल, ट्रेन ने प्रवास करणारी स्त्री सुरक्षित आहे का?. इतकच काय कंपनीच्याही कॅबने प्रवास करणं सुरक्षित राहिलं आहे का. आणि जीव गेला तरच फक्त त्रास होतो असं नाहिये हो. येता-जाता सार्वजनिक ठिकाणी (संधी मिळताच) स्त्रीला (कमेंट पास करणे, लगट करणे, ..............इत्यादी) अनेक प्रकारचे त्रास (केवळ स्त्री असल्याने) सहन करावे लागतात त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे. >>१.सरकारने गर्भलिंग चाचणीवर बंदी घालूनही गर्भलिंग निदान केले जाते आणि त्यात अनेक मुलींचा बळी जातो हि अतिशय लांच्छनास्पद गोष्ट आहे.>> बसं. संपल?? तुमच्या लेखी एवढीच सिविअ‍ॅरिटी आहे या गोष्टीची. हे इतक साधं, सरळ, सोपं नाहिये. जाऊ दे परत रिपिट नाही करत. http://www.misalpav.com/node/20997#comment-380517 हे वाचा. आणि या प्रश्नांची उत्तर द्या अशी विनंती आहे. १)स्त्री आणि पुरूष दोघांना समाजात समान (सारखचं) स्थान असेल, तर ज्यांना असे वाटते त्यांनी स्त्री-भ्रूण हत्येचे रूट-कॉज अ‍ॅनालिसिस करावे आणि का लोकांना मुली नकोशा झाल्या आहेत ती कारणे स्पष्ट करावीत आणि त्यावर काय उपाय करता येतील सुचवावेत. २)अगदी भ्रूणहत्या तर लांब राहिली, मुलगी झाली की ज्यांना मुलगी झाली आहे ते माता-पिता, बाळाचे आजी-आजोबा, नातेवाईक यासगळ्यांच्या मनात काय भावना येते?, पहिली प्रतिक्रिया काय असते?, ते खूष होतात का दु:ख्खी होतात?. जर समान स्थान असतं तर का वाईट वाटलं असतं लोकांना. [याला अपवाद असतात. नाही असं मी म्हणत नाही. पण %चा विचार करा.] मुलगी झाली की लोकांना वाईट का वाटतं? किंवा का वाईट वाटत असेल याचा विचार करा. याचाही रूट-कॉज अ‍ॅनालिसिस करा ना. काय कारण आहेत? ती दूर करणं आवश्यक आहे की नाही. >>२.वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती>> या विषयावर माझा जास्त अभ्यास नाहिये. म्हणून तूर्तास मुद्दा बाजूला ठेवत आहे. >>३.शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते.>> असं सरसकट विधानं करणं चुकीचं आहे. >>४. एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात.>> असं काही नाहिये. जर घरातील करता माणूस हरपला तर पहिली जबाबदारी त्याच्या वैवाहिक सहचर्‍यावर येऊन पडते. आणि आई आणि वडिल दोघही निर्वतले आणि मुलं लहान असतील तर सर्वात मोठ्या अपत्यावर (मग मुलगा असो किंवा मुलगी) घरची जबाबदारी येऊन पडते. तेव्हा त्याला/तिला अकाली मोठं होऊन घर आणि भावंड सांभाळावं लागतं. मुलींनीही हे केलेलं नक्कीच पाहिलं आहे. >>५. मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.>> हे अगदी मान्य आहे. पण हेही तितकच खरं आहे की, लग्नानंतर करियर करताना स्त्रियांना अनेक अडथळे येतात आणि मग नाइलाजाने काही वेळा करियरला दुय्यम स्थान द्यावे लागते. (यामध्ये स्त्रियांची दोन्हीकडून मानसिक ओढाताण होत असते. करियरला दुय्यम स्थान दिले तरी आणि नाही दिले तरी.) १) नवरा आणि बायको वेगळ्या ठिकाणी(शहरात/देशात) नोकरी करत असतील तर लग्नानंतर मुलींना आपली कष्टाने मिळवलेली, रूळलेली, जम बसवलेली, स्वत: प्रयत्न करून मेहनत घेऊन स्वतःचे काही स्थान निर्माण केलेली नोकरी सोडून दुसर्‍या जागी जावे लागते. तिथे परत (नोकरी मिळवण्यासाठी, तिथे जम बसविण्यासाठी) शून्यातून प्रयत्न करावे लागतात. स्ट्रगल करावं लागतं. म्हणजे बॅक टू स्क्वेअर वन. कारण अशा वेळी नवीन नोकरी धरताना काही वेळा (नवीन ठिकाणी आधीपेक्षा कमी पगार मिळणे, कमी पद मिळणे, सिनिअ‍ॅरिटी नसणे(प्रमोशनसाठी वगैरे), नव्या पॉलिटिक्सचा सामना करणे, तिथे नवा जम बसवणे,) काही तडजोडी कराव्या लागतात. २)लग्नानंतर जर नवरा घरकामात पुरेसा हातभार लावत नसेल तर परत शारिरिक आणि मानसिक ओढाताण. आणि ओव्हर एक्जर्शन. ३)मुलं झाल्यावर तर मग काय कथा सांगावी. (प्रेग्नन्सी आणि डिलीव्हरी या नैसर्गिक गोष्टी असल्या तरी त्यामुळे येणार्‍या मर्यादांमुळे पण करियरला ब्रेक लागतो. मुलं दोघांच म्हणून जन्माला येणार असलं तरी करियर फक्त आईच बाजूला रहातं. पण हे तूर्तास बाजूला ठेवू.) मुलं लहान असताना त्याच्या संगोपनासाठी बर्‍याच आयांना करियरमधून ब्रेक घ्यावा लागतो. ह्यामुळे करियरमध्ये गॅप पडते, करियर पुन्हा सुरू करताना परत बॅक टू स्क्वेअर वन. पुन्हा नोकरी मिळवण्यासाठी तिच स्ट्रगल, तिथे स्थान मिळवण्यासाठी स्ट्रगल. यामुळे करियरमध्ये तडजोड करावी लागते. बर हे करताना पॅरलली मुलांच करणं, घर सांभाळणं. (यामध्येही नवर्‍याचा सहभाग असेल तर ठीक नाहितर अजून लोड) मुलांचं दुखणं-खुपणं, आजारपणं, यासाठी रजा घ्या. सणावारासाठी रजा घ्या नाहितर स्वतःची लिमिट्स स्ट्रेच करून ऑफिसमधून आल्यावर हे सगळं करा. मुलांचा होमवर्क घ्या. आल्यागेल्याच बघा. हे सगळ आलं. साधी कामवाली आली नाही तरी त्रेधा-तिरपीट उडते कारण घरी आल्यावर वेळ आणि एनर्जी कमी असते. हे सगळ सांभाळून (घरीच द्यायला वेळ नाही तर) ऑफिसमध्ये द्यायला एक्ट्रॉ टाईम कोठून द्यायचा मग काय तडजोड आलीचं ना. >>प्रत्येकवेळेस मुलांकडे वंशाचा दिवा म्हणून बघितले जात नाही.जसा जसा मुलगा मोठा होतो तसं तसं ह्या वंशाच्या दिव्यच रुपांतर म्हतार्पांच्या काठीत होत.>> मुलांच्या आई-वडिलांना निदान म्हातारपणीची काठी तरी आहे.आणि मुलीच्या किंवा फक्त मुली असणार्‍या आई-वडिलांच्या म्हातारपणीच्या काठीबाबत तुमचं काय मतं आहे. त्यांना कोणती काठी. त्यांनी पण मुलींना जपलं, वाढवलं, शिकवलं, मोठं केलं. मग आता त्यांनी म्हातारपणीची काठी म्हणून कोणाकडे पहाव? >>बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.>> प्रत्येक दांपत्याला एक तरी मुलगा असतोच. ह्या गृहितकाला धरून तुमचं सर्व बोलणं चालू आहे/असतं. कमाल आहे तुमची. फक्त मुली(किंवा १ मुलगीच) असणार्‍या आई-वडिलांना तुमच्या मते कोणी आधार द्यावा. >>मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.>> तुमच्या मते फक्त मुली(किंवा १ मुलगीच) असणार्‍या आई-वडिलांची सेवा कोणी करावी? खर्च कोणी करावा? हे सगळ करू शकणार्‍या आणि करू इच्छिणार्‍या मुलींच्या नवर्‍यांचा याला किती सपोर्ट असतो? >>त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत.>> जी अपत्य सेवेच्या वेळेस येत नाही आणि फक्त वाटणीच्या वेळेस येतात त्या अपत्यांचा निषेध. असं वागणं चूकच आहे. (मग तो मुलगा असो वा मुलगी) मी तरी खूपशी उदाहरणं पाहिली आहेत ज्यामध्ये बहिणींनी आपल्या वाट्याची मालमत्ता स्वखुशीने भावांच्या नावावर केली आहेत. >>बसमध्ये उभ्या/बसलेल्या प्रत्येक बाईला मासिक धर्म असतोच का हो?एखादे वृध्द आजोबा जर उभे असतील तर तुम्ही त्यांना बसायला जागा करून द्याल कि स्वतःचा मासिक धर्म साम्बालात बसाल?बर हाच मासिक धर्माचं कौतुक करत बसलात तर उच्चपदस्थ व्हायची स्वप्न कधीच प्रत्यक्षात येणार नाहीत.ह्या चार दिवसात घरी बाजूला बसवलं तर तो अन्याय आणि बसमध्ये बसूला बसण्यासाठी तर आम्ही सदा रेडी असतो.>> १)मासिक धर्माचं कौतुक कोणालाच नसतं. झालाच तर त्रास असतो. आणि तो प्रत्येकीला कमी जास्त प्रमाणात होतो. तुम्ही खूप त्रास अनुभवला नसेल तर चांगलचं आहे. पण त्यावरून उगाच टिपण्णी करू नये. काही काही जणींना त्या दिवशी ऑफिसला/शाळेला सुट्टी घेण्यावाचून पर्याय नसतो, प्रचंड विकनेस येतो, काहिंना एक क्षण उभं रहाताही येत नाही हे पाहिलं आहे. २)शिवाय बसमध्ये मुलींना त्रास देणे, छेडछाड, लगट करणे हे प्रकारही सर्रास चालू असतात ना. ३)आणि बसमध्ये प्रेग्नंट स्त्रिया, लेकुरवाळ्या स्त्रिया असतातच ना. ज्यांना बसायला जागा मिळणे/देणे अत्यावश्यक आहे. हेही मान्य आहे कि अपंग/वृद्ध, स्त्री/पुरूषांनाही बसायला जागा मिळणे/देणे अत्यावश्यक आहे. आणि जितक्या सहजपणे तुम्ही एखाद्या वृद्ध आजोबांना तुम्ही एक माणूस म्हणून समजून घेता आणि ते वृद्ध असल्याने जे प्रोब्लेम आहेत ते समजून घेता. तसेच स्त्रीलाही ती एक स्त्री आहे म्हणून फेस करावे लागणारे प्रोब्लेम समजून घेतले पाहिजेत. >>शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.>> एक माणूस म्हणूनच जो सगळ्यात बेसिक अधिकार आहे जन्म घेण्याचा. तोच मिळत नाहिये, तर बाकीच्या अधिकारांची काय कथा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

>>स्त्री पुरुष समानता वगैरे

Pearl
Fri, 03/16/2012 - 09:05 नवीन
>>स्त्री पुरुष समानता वगैरे मूर्खपणा आहे.>> माझी तुम्हाला विनंती आहे की असं असेल तर कृपया मला काही प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरे द्यावीत. http://www.misalpav.com/node/20997#comment-380517 बाकीच्या मुद्द्यांवर 'पिलीयन रायडर' शी सहमत असल्याने तेच मुद्दे रिपीट करत नाहिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

प्रकाटाआ

टिवटिव
Fri, 03/16/2012 - 14:55 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

आणी ह्यामुळेच..........

इरसाल
Tue, 03/13/2012 - 13:25 नवीन
मला कधी कधी सौशय येतो....तो ..... किचेन, पुप आणि पि. बद्दल.
  • Log in or register to post comments

मी दु आयडी नाहीये.आणि मी एक

किचेन
Tue, 03/13/2012 - 15:14 नवीन
मी दु आयडी नाहीये.आणि मी एक स्त्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

<<मी दु आयडी नाहीये.आणि मी एक

शिल्पा ब
Tue, 03/13/2012 - 22:55 नवीन
<<मी दु आयडी नाहीये.आणि मी एक स्त्री आहे. हे असं सागावं लागतंय याचा अर्थ काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

लेख आवडला. म्हणजे कुठल्याश्या

सांजसंध्या
Tue, 03/13/2012 - 13:44 नवीन
लेख आवडला. म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का? माहीत नाही . पण असं नसावं. त्या १०० जणांची निवड स्त्री कि पुरूष हे न पाहता व्हावी आणि एकमेकांचा आदरही स्त्री / पुरूष याचा विचार न करता व्हावा..
  • Log in or register to post comments

म्हणजे कुठल्याश्या सर्वे

धन्या
Tue, 03/13/2012 - 15:27 नवीन
म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का?
म्हणजे काय? तुम्ही लिटरेचर वाचत नाही का?
त्या १०० जणांची निवड स्त्री कि पुरूष हे न पाहता व्हावी आणि एकमेकांचा आदरही स्त्री / पुरूष याचा विचार न करता व्हावा..
ह्या ह्या ह्या... फारच मागासलेले विचार ब्वॉ तुमचे. ही १७६० सालची व्याख्या झाली. आजची स्त्री पुरुष समानतेची व्याख्या अशी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

जगाच/समाजाच माहीत नाही. पण

गणपा
Tue, 03/13/2012 - 14:02 नवीन
जगाच/समाजाच माहीत नाही. पण समानतेच्या उपदेशाचे डोस इतरांना पाजण्या पेक्षा ह्या चांगल्या कामाची सुरवात स्वतःच्या घरापासुनच करावी. ह्याच संस्कारांच केवळ बाळकडू आई बाबांनी आम्हा बहिण भावंडाना पाजल नाही तर स्वतःच्या आचरणातुन आम्हाला ते दाखवून दिल. तेच संस्कार आता पुढच्या पीढीत उतरवण हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. जर प्रत्यकाने अशी सुरवात आपल्या घरापासुन केली तर लगेच नाही पण पुढल्या एक दोन तपांत आपल्याला या अश्या चर्चांची आणि त्यातुन उद्भवणार्‍या विवादांची गरज भासु नये.
  • Log in or register to post comments

+१

धन्या
Tue, 03/13/2012 - 15:34 नवीन
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

पेदाड या शब्दाप्रमाणे पेदाडी

विजुभाऊ
Tue, 03/13/2012 - 14:39 नवीन
पेदाड या शब्दाप्रमाणे पेदाडी हा शब्द जेंव्हा मराठी भाषेत येईल त्यावेळेस समानता आली असे मानायला हरकत नसावी. बाकी हल्ली बर्‍याच ठिकाणी फुंक्यांसोबत फुंकीण्या एकेकट्याही दिसतात. त्यामुळे ही समानता फार दूर नाही असे वाटते
  • Log in or register to post comments

पेदाड ?

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/13/2012 - 15:31 नवीन
इजुभौ तुम्हाला पेताड म्हणायचे आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

=))

सोत्रि
Tue, 03/13/2012 - 17:21 नवीन
पराशेठ, विजूभाऊ की भावनाओंको समझो! :D - (पेदाड) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

समानता.

प्रभाकर पेठकर
Tue, 03/13/2012 - 15:32 नवीन
पुरुषापुरूषांमध्ये तरी कुठे समानता आहे? शारीरिक, मानसिक, भावनिक दुर्बल पुरूषावरही इतरांकडून (त्यात सबल स्त्रियाही आल्याच) दडपशाहीचा अवलंब होतोच. स्वतः विचार करू न शकणारे पुरुषही कधी एकाच्या तर कधी दुसर्‍याच्या विचारांचे 'गुलाम' असतात. स्त्री-पुरुष असमानता किंवा समानता अन्याय्य नसावी.
  • Log in or register to post comments

ह.च घ्या.

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/13/2012 - 23:48 नवीन
पुरुषांनी पुरूषप्रधान संस्कृतीची तक्रार करणं हे मला पाकीस्तानने स्वतःला दहशतवादपिडीत संबोधण्यासारखं वाटतं. (हे ह.च घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

निव्वळ अज्ञानजनक प्रतिसाद.

बॅटमॅन
Wed, 03/14/2012 - 00:06 नवीन
निव्वळ अज्ञानजनक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कालच जोरु का गुलाम चित्रपट

गोंधळी
Wed, 03/14/2012 - 22:59 नवीन
कालच जोरु का गुलाम चित्रपट बघितला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

...पेट्लेले दिसतंय परत!

कवितानागेश
Tue, 03/13/2012 - 15:47 नवीन
...पेट्लेले दिसतंय परत! :)
  • Log in or register to post comments

हो ओ....

इरसाल
Fri, 03/16/2012 - 11:31 नवीन
वरती २/४ जणांच्या हातात.......सॉरी प्रतिसादात रॉकेलचे ड्रम पाहिले.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

प्रश्नपत्रीका क्रं १

अन्नू
Tue, 03/13/2012 - 16:11 नवीन
खालील प्रश्नांची थोडक्यातच उत्तरे घ्या १> स्त्री पुरूष समानता म्हणजे काय त्याची व्याख्या द्या:- "स्त्रीची उंची जर साडेपाच फूट असेल तर पुरुषाची उंची सुद्धा साडेपाचच असणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय!" किंवा "स्त्रीची उंची पुरुषाच्या उंचीएवढी वाढणे म्हणजेच स्त्री-पुरुष समानता होय." २> स्त्री-पुरूष समानतेसाठी काही उपाययोजना:- <१> स्त्रीला रोज कॉम्लॅन बॉर्नविटा यांसारख्या वस्तू चघळायला देणे <२> आणि सगळ्यांच स्त्रीयांना उंच टाचांचे सॅन्डल्स वापरायला देणे. आता हे स्त्रीयांनी करावयचे काही जालीम उपाय:- <३> पुरूषांच्या उंचीवर आळा घालणे, त्यासाठी त्यांना बॉर्नविटा म्हणून शिळ्या नाचणीच्या भाकर्‍या कुटून देणे <४> दुध म्हणून त्यांना चुन्याची निवळी देणे. <५> एका वेळेत किमान ५०० बैठका त्यांना रोज काढायला लावणे. काही महिन्यांतच स्त्री-पुरुष समानता नक्कीच प्रस्थापित होईल! ;) (रेफरन्स:- ताईचा सल्ला साभार!)
  • Log in or register to post comments

<परा मोड ऑन> वांझोटी चर्चा

स्पा
Tue, 03/13/2012 - 16:13 नवीन
<परा मोड ऑन> वांझोटी चर्चा वाचण्यापेक्षा ,आज जरा लवकरच कावेरीचा रस्ता धरावा हेच बरे <परा मोड ऑफ >
  • Log in or register to post comments

आता ह्या सोकाजीला काय म्हनावं?

योगप्रभू
Tue, 03/13/2012 - 16:26 नवीन
सोका, ल्येका, पुन्यांदा होळी पेटविलीस का? पब्लिक काय बोंबा मारायला येका पायावर तयार आसतंय म्हना. मला काई स्वतःचे इच्यार न्हाईत. दत्तगुरुंनी २४ गुरु केले तसं मीबी माज्या गाडवाला गुरु क्येलं हाय. तर सांगायचं म्हनजी दरसाल महिला दिनाच्या आसपास ही धुळवड लोक न्येमानं ख्येळत्यात. माजा घोळ व्हतो. कदी वाटतं बायांच बरुबर हाय, कदी वाटतं बाप्येबी बरुबर हाईत. मंग कंटाळून म्या माज्या गुरु म्हाराजांना इनंती क्येली. आदुगर त्ये बोलायला तयारच नव्हते. त्वांडात कायतरी काडं चगळीत व्हते. त्यात त्यांची उकेरड्यात लोळाया जायाची येळ झालेली. म्या लईच पिच्छा पुरवला त्येंचा. तवा सद्गुरु गाडव म्हाराज म्हनाले, ' नीट आईक रं शिष्या भा*. पुन्यांदा इच्चारु नगंस. सगळे सद्गुन आन् दुर्गुन पुरुष आनि स्त्रियांमदे समान आसत्यात. ज्या घरांमदी बाया नमतं घ्येत्यात तितं पुरुष माजलेले असत्यात. मंग 'बळी त्यो कान पिळी' म्हनून बाया मुकाट सहन करत्यात. दुसरीकडं ज्या घरात बाया माजलेल्या असत्यात तितं 'दुभत्या गाईच्या लाथाबी गोड' आसं म्हनून पुरुष आन त्यांच्या घरातले पडती बाजू घ्येत्यात. बायांना संधी मिळंल तितं त्या पुरुषाच्या धनावर डल्ला मारत्यात आन पुरुषांना संधी मिळंल तितं त्ये बायांच्या डबोल्यावर हात मारत्यात. येळ आली, की दोगंबी शोषण करत्यात, अन्याव करत्यात, येकमेकांची आन मुलाबाळांची फरपट करत्यात, कचाकचा भांडत्यात, कायद्याचं हिस्कं दाखिवत्यात. परत्येक घरात 'डॉमिनेटिंग फॅक्टर' कोन हाय, ह्ये महत्त्वाचं. (आमचं गुरुम्हाराज रद्दीतलं विंग्रजी प्येपर चगळीत आसल्यानं सायबाची भाषा येकदम फर्डी बोलत्यात) 'म्हाराज! मग खरी समानता कशी येनार?' मी भाबडेपनानं इच्यारलं. 'आईक मग. स्त्री आन् पुरुषाचं स्वतंत्र आस्तित्व कुटपर्यंत? तर जोवर दोगं येकमेकांच्या रक्तामासापासून नवा जीव पैदा करत न्हाईत तोपर्यंतच. येकदा का प्वार झालं का मग पुडचं आयुष्य दोगानाबी 'एक आत्मा एक शरीर' म्हनून घालवावं लागतं. खरी मुक्ती त्यातच आसतीय. ज्यांना स्वतःचं प्वार नसंल त्यानी समाजातल्या निराधार बालकाला आधार द्यावा, पन ह्यो मंत्र इसरु नये. ह्ये ज्यांना समजत न्हाई त्ये जनमभर आसंच खुनशी वागत राहत्यात. म्हनून दोगानीबी येकमेकांना समजून घ्यावं. कमी पडंल तितं हात द्यावा. जोडीदार खुश-पोरं खुश की आपनबी खुश असावं. आमा गाडवांपासून काई शिका. 'लाथाळ्या' बी आमच्याच आनि 'गाडवी प्रेम' बी आमचंच.
  • Log in or register to post comments

लोटांगण ...

छोटा डॉन
Tue, 03/13/2012 - 16:30 नवीन
_/\_ लोटांगण हो योगप्रभु, तुमच्या गुरुंपर्यंत हे लोटांगण पोहचवा. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

लोटांगण हो योगप्रभु, तुमच्या

गणपा
Tue, 03/13/2012 - 16:41 नवीन
लोटांगण हो योगप्रभु, तुमच्या गुरुंपर्यंत हे लोटांगण पोहचवा.
असेच म्हणतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

काथ्याकूट होणार तिथे योप्र

सूड
Tue, 03/13/2012 - 16:36 नवीन
काथ्याकूट होणार तिथे योप्र लिहीणार हॅट्स ऑफ !! मान गये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

तस्मात

श्रावण मोडक
Tue, 03/13/2012 - 17:26 नवीन
गाढव व्हा, या जगात कुंभारांची कमी नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

एक नंबर

सोत्रि
Tue, 03/13/2012 - 17:27 नवीन
फुकाची चर्चा सोडून एक नंबरचा प्रतिसाद! योगप्रभू म्हणजे शब्दप्रभू. आमचाही दंडवत स्विकारावा! - (योग'प्रभू' भक्त) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

_/\_ _/\_ _/\_

सुहास झेले
Tue, 03/13/2012 - 18:12 नवीन
....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

पटतयं,,,,,किति वेळ चावुन चोथा

किचेन
Tue, 03/13/2012 - 18:16 नवीन
पटतयं,,,,,किति वेळ चावुन चोथा झलेला विषय चघळात बसायचा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

सोयिस्कर ठिकाणीच प्रतिसाद

पिलीयन रायडर
Tue, 03/13/2012 - 18:35 नवीन
सोयिस्कर ठिकाणीच प्रतिसाद द्यायचा असं ठरवलय वाटतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

हॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Tue, 03/13/2012 - 19:35 नवीन
महिला दिनाच्या आसपास ही धुळवड लोक न्येमानं ख्येळत्यात. माजा घोळ व्हतो. कदी वाटतं बायांच बरुबर हाय, कदी वाटतं बाप्येबी बरुबर हाईत
हॅहॅ ! स्त्री- पुरुष समानता ऐवजी मानव मादी -नर समानता असा शब्दप्रयोग केला तर ल्वॉक काय म्हंतीन? समान म्हनायच्या ऐवजी यकमेकांना पूरक अस म्हनल तर काय बिघडतय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

@'एक आत्मा एक शरीर' लाख लाख

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/13/2012 - 23:36 नवीन
@'एक आत्मा एक शरीर' लाख लाख दंडवत ---^--- योगप्रभू तुंम्हाला व तुमच्या खास गुरुला ;-) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

+१ असेच म्हणतो.

भिकापाटील
गुरुवार, 03/15/2012 - 22:51 नवीन
कहर पुणेरी पाट्यांचा एका गृहस्थाला सपाटून भूक लागली , म्हणून तो हॉटेल शोधत होता.तेवढ्यात त्याला पाटी दिसली. त्यावर लिहिलं होतं , ' जेवणाची उत्तमसोय ' जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले . एकावर लिहिलं होतं ' शाकाहारी ' तर दुसर्याववर ' मांसाहारी ' तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला. आतमध्ये आणखी दोन हॉल होते. डावीकडे पाटी होती , ' भारतीय बैठक ' तर उजवीकडे , ' डायनिंग टेबल ' तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला. आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.एकावर पाटी होती 'रोख' तर दुसर्याावर 'उधार' तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला. वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली. तोअचंबीत झाला . त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच त्याला खिजवायला , 'फुकट्या , मागे वळून काय बघतोस ? हा रस्ताच आहे. हॉटेल नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

एकदम

सुमीत भातखंडे
गुरुवार, 05/31/2012 - 14:53 नवीन
एकदम पटेश...टाळ्या!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

केवळ स्‍त्री आहे या कारणामुळे

यकु
Tue, 03/13/2012 - 17:45 नवीन
केवळ स्‍त्री आहे या कारणामुळे आणि चार बटणं दाबता येतात, इकडे तिकडे जाऊन असतात म्हणून स्‍त्रीमुक्तीचा आपल्याकडेच ठेका आहे असं मानणार्‍या, सावित्रीबाई, आनंदीबाईंसारख्‍या ग्राऊंड लेव्हलवर काम करणार्‍या साध्‍वींची नावं स्वत: अंगाला काहीही लाऊन न घेता घेणार्‍या आणि तथाकथित स्‍त्रीमुक्तीच्या कार्याने त्यांच्या निरर्थक अस्तित्वाला झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार्‍या स्‍त्रियांची जमात जोपर्यंत फोफावत राहिल, तोपर्यंत ज्या स्‍त्रीयांना खरोखर मुक्ततेची आवश्‍यकता आहे त्यांच्याबाबत काडीचाही बदल होणार नाही. या असल्या शोभेच्या आणि स्वत:भोवतीच फिरणार्‍या बेगडी बाहुल्यांमुळेच 'स्‍त्रीमुक्ती' या शब्दाचाच ज्यांना खरी गरज आहे त्या स्‍त्रीयांना आणि स्‍त्रीयांना चार सुखाचे दिवस पाहू देऊ इच्छिणार्‍या लोकांना धसका बसला आहे. यामुळं या विदुषींनी जुलूम सहन करणार्‍या स्‍त्रीयांवर थोडे उपकार करावेत आणि स्वत:साठी दुसरी एखादी हॉबी शोधावी. आजही सिंधूताई सपकाळ समाजात आहेत - त्या बेगडी बाहूल्यांनी स्वत: ची कुवत ओळखावी आणि पब्लिकचा वेळ नासवू नये.
  • Log in or register to post comments

हा प्रतिसाद वाचून मिपावर

नितिन थत्ते
Tue, 03/13/2012 - 17:54 नवीन
हा प्रतिसाद वाचून मिपावर आल्याचं सार्थक झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

यकु! माझ्या सुदैवाने मला

बिपिन कार्यकर्ते
Tue, 03/13/2012 - 17:56 नवीन
यकु! माझ्या सुदैवाने मला आजपर्यंत तरी स्त्रीमुक्तीच्या क्षेत्रात काम करणार्‍या किंवा या विषयाशी संबंधित बोलणार्‍या / लिहिणार्‍या बेगडी स्त्रिया भेटलेल्या नाहीयेत. कधीच नाही. त्यातल्या काहींची मतं टोकाची वाटू शकतात / असतीलही. पण त्या बेगडी निशितच नव्हत्या. मूळात त्या स्वतः कोणत्या तरी परिघात स्वतःचं स्थान आधी निर्माण करून मग स्त्रीमुक्तीच्या वाटेला गेलेल्या आहेत. त्यामुळे असावं कदाचित. पण माझं सुदैवच. तुम्ही म्हणता तशा असतीलही / असतीलच. मात्र, दांभिक स्त्रियाच काय पुरूषही चिक्कार भेटले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

@ नितीन थत्ते: बोलावं असा

यकु
Tue, 03/13/2012 - 19:21 नवीन
@ नितीन थत्ते: बोलावं असा सुस्पष्‍ट अर्थ प्रतिसादातून दिसत नसल्याने काही उत्तर देत नाही. माझा प्रतिसाद वाचून मिपावर आल्याचं खरंच सार्थक झाल्यासारखं वाटलं असेल तर धन्यवाद. @ बिका:
यकु! माझ्या सुदैवाने मला आजपर्यंत तरी स्त्रीमुक्तीच्या क्षेत्रात काम करणार्‍या किंवा या विषयाशी संबंधित बोलणार्‍या / लिहिणार्‍या बेगडी स्त्रिया भेटलेल्या नाहीयेत. कधीच नाही.
चांगली गोष्‍ट आहे बिका. तुम्ही बाजू घेऊन बोलताय म्हणून इथेच बोलतो. पहिल्यांदा तर इथे अंतर्जालावर सदासर्वकाळ स्‍त्रीमुक्ती, स्‍त्री-पुरुष समानता वगैरे पालुपदाचा निरर्थक जप करणार्‍या स्‍त्रीया माझ्‍या पहाण्‍यात आहेत. बरं करेनात का, पण त्या इकडच्या तिकडच्या, स्वत:चा इगो सुखावणार्‍या गोष्‍टींसह तेवढंच करतात ही तक्रार आहे. बरं यांना नेमकी कुठल्या स्‍त्रीयांची मुक्ती करायची आहे हे पक्कं नाही. रात्रीचा 1-1, 2-2 वाजेपर्यंत क्लबमध्‍ये बसणार्‍या (अर्थात करण्‍यासारखं काहीच नसल्याने कालहरणासाठी तिथे जाणार्‍या, स्त्रीयांनी पत्ते खेळावेत की नाही याबद्दल मला काही म्हणायचं नाही. मला माझ्‍या आजीने पत्त्यांमधले काही डाव शिकवले आहेत ) स्‍त्रीयांची मुक्ती की आजही हुंडा, निरक्षरता, अज्ञान, शोषण यांना बळी पडणार्‍या स्‍त्रीयांची मुक्ती? तिथे या नसतात. म्हणून या बेगडी बाहुल्या आहेत. आणखीही मुद्दे आहेत, पण त्याबद्दल बोलण्‍याची काहीच कारण नाही म्हणून आवरते घेतो.
त्यातल्या काहींची मतं टोकाची वाटू शकतात / असतीलही. पण त्या बेगडी निशितच नव्हत्या. मूळात त्या स्वतः कोणत्या तरी परिघात स्वतःचं स्थान आधी निर्माण करून मग स्त्रीमुक्तीच्या वाटेला गेलेल्या आहेत. त्यामुळे असावं कदाचित.
स्वत:ची मतं टोकाची आहेत ती व्य‍क्तीगत बाब आहे. टोकाची मतं असणं स्‍त्री किंवा स्‍त्री मुक्तीवाद, स्‍त्रीपुरुष समानतावादी असण्‍याचा प्राधिकार नाही. स्वत:चं स्‍थान निर्माण केलं आहे - चांगली गोष्‍ट आहे. ती गोष्‍ट प्रॅक्टीकली इतर गरज असलेल्या स्‍त्रीयांसोबत शेअर केलीय का? तसा प्रयत्न आहे? की नुसतेच बाजार उठवणारे, नित्याचा बौद्धीक मैथुन करवणारे टाइमपास लेख पाडले आहेत?
पण माझं सुदैवच. तुम्ही म्हणता तशा असतीलही / असतीलच.
मला जे वाटतं ते मी लिहितो. ते तसंच आहे हे ठणकावण्‍याचा अट्‍टहास नाही.
मात्र, दांभिक स्त्रियाच काय पुरूषही चिक्कार भेटले आहेत.
यावर ज्यांच्यासोबत व्हायला हवी त्यांच्यासोबत पुरेशी चर्चा झाली आहे. तुम्हाला किंवा त्यांना आणखी एकदा हवी असेल तर तसा चर्चाप्रस्ताव टाकून जाहीरपणे करायला तयार आहे. माझ्यासमोर जशा गोष्‍टी येत गेल्या आणि मी जी थट्टा केली अगदी त्याच रुपात तो चर्चाप्रस्ताव मी लिहीन. लोकांची मतं घेऊ.. ती दांभिकता आहे की आणखी काय ते तिथे ठरवू. संबंधितांची परवानगी घ्‍या आणि कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

प्र.का.टा.आ.

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/15/2012 - 01:18 नवीन
प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

समता असे काही असेल

अविनाशकुलकर्णी
Tue, 03/13/2012 - 18:41 नवीन
समता असे काही असेल
  • Log in or register to post comments

क्या बात है !

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/13/2012 - 18:55 नवीन
योगप्रभुला आपल्याकडून येक लार्ज नेक्स्ट टैमाला ! 'एक आँख मारु तो रस्ता रुक जाय' चा फॅन... परा
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा