हे सगळं कशासाठी सुरु आहे ? लोक का जन्माला येतात? लग्न का करतात? दु:खी का असतात ? या प्रश्नांची उत्तरं कुणीही समाधानकारकपणे देऊ शकत नाही. उत्तरं लाख मिळतात पण ती लागू पडत नाहीत. याचं कारण हे प्रश्न पडले असले तरी कुणीही उत्तरं मिळेपर्यंत त्यांना तडीस नेलेलं नाहीय. ज्यांनी नेलं ते गेले.. उलटून गेले.. त्यांचंही नेमकं काय झालं हे फक्त वर्णनं वाचून कळतं.
वास्तविक आजूबाजूला जन्म, मृत्यू, लग्ने, संसार गतीमान असणे या सगळ्या प्रोसेसला बळ आहे फक्त विचाराच आणि समोर अफाट पसरलेल्या अंध:कारमय भविष्याचं, भावनांचं, आकांक्षांचं - शब्द कोणतेही आणि कितीही वापरा, परिणाम एकच होतो. विचार माणसांना 'कंझ्युम' करतोय, वापरुन घेतोय.. आपण आत्ता मेलो तरी त्याला काही घेणं नाहीय. कारणं थोड्या फार फरकानं तसलेच विचार फिड असलेले लाखो मानवी जंतू जगभर पसरले आहेत. आणि तेही त्या विचारामागं धावत आहेत.
माकडाची उत्क्रांती होऊन माणूस झाला म्हणतात. पण माणूस होऊन त्या तिथेच ती उत्क्रांती थांबलीय की काय? ती सुरुच आहे. आणि हे आजूबाजूला पसरलेलं सगळं तिचं हीणकस म्हणा, विकृत म्हणा, आनंददायक म्हणा जसा तुमचा मूड असेल तसा शब्द त्याला द्या - त्या उत्क्रांतीचं आजचं रुप आहे. एकतर कोट्यवधी इतरांप्रमाणं एक 'सब्जेक्ट' म्हणून स्वत:ला आपल्या विचारांकडून 'कंज्यूम' करुन घ्या. म्हणजे असुरक्षित वाटणार नाही - कारण इतर कोट्यवधी लोक तेच करीत आहेत. त्यांच्याकडे ते करीत असलेल्या गोष्टी कशा योग्य आहेत याचे दाखले आहेत.. हे दाखले युगानुयुगांपासून साचून राहिलेत.
उत्क्रांतीच्या कुठल्यातरी टप्प्यावर असलेल्या विचाराला सुस्पष्टता, एकरुपता हवीय. ती कधीच मिळत नाही.
कारण आपलं जे आताचं रुप आहे तेच पुरेसं सुस्पष्ट, एकरुप आहे. हे आताचं मानवी रुप टेक् ऑफचा पॉइंट आहे. कशात टेकऑफ करायचा ते नेहमीच अज्ञात राहिलं आहे आणि राहिल. कारण आपण हा प्रश्न विचारतो म्हणजे पुन्हा विचारालाच सुस्पष्टता देतो, 'ज्ञात' जे काही असेल ते विचाराचा भाग होऊ शकत असेल.. 'अज्ञात' नेहमीच विचारांच्या पार आणि आपल्याला अनोळखीच राहिल.
एरव्ही माणसात विचार येण्याचं काय प्रयोजन आहे? अवतीभवती अफाट पसरलेल्या एकन् एक वस्तूची, गोष्टीची, अगदी आपल्याला हव्या असलेल्या कशाचीही प्रतिमा विचार झटकन खेचून आपल्यासमोर धरतात, पण जगातलं सगळंच असतं 'नो डायमेन्शन' मध्ये, तरीही प्रत्येक गोष्टीच्या असंख्य मिती जाणवतात, असंख्य पैलु जाणवतात कारण विचार ज्या बाजूनं, ज्या कोनातून, जी विशिष्ट वस्तू विशिष्ट बाब समजून घेण्यासाठी जगातल्या कुठल्याही बाबीला गवसणी घालत जातो तसतसा कॅलिडोस्कोप उघडत मिटत जातो.. मग नेमकं आपण काय करतोय काय?? विचाराच्या माध्यमातून आपल्या हाती पडलेल्या प्रतिमेच्या प्रेमात पडतोय, ती दुसर्यांना दाखवतोय.. त्यांच्या हातात दुसरीच प्रतिमा आहे. ती कदाचित त्यांना आवडेल, आवडणार नाही, कदाचित आपल्याच विचारांतून आपल्याच हातात पडलेली प्रतिमा आपल्यालाच आवडणार नाही आणि दुसर्यांच्या बाबतीत याउलटही होईल म्हणजे सगळा गोंधळ आहे. सगळी आंधळी कोशिंबिर सुरु आहे.
दिलाशाची बाब म्हणजे हवं तेव्हा हा सगळा वर मांडलेला कचरा अगदी दगडासारखा स्थिर होतो, होत्याचा नव्हता होऊन जातो आणि बहुतेकवेळा हा सगळा कचरा उडत नाही ते बरं आहे.. कधीतरी उडतो आणि खाली बसतो.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
11317
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म
'विचार ही जड वस्तू आहे' या
यशवंता.. काय काय खाल्लंयस
नाय हो.. नाय.. भांग नाय.. आज
In reply to यशवंता.. काय काय खाल्लंयस by गवि
काय रे यशवंता, काय झालं एकदम?
काअहीई कळलं नाही
तुमचा हा विचार खुप विचार
छान
पाचवी मिति
पाचवी मिति
येश्या!
अरेरे
चमचा
बापरे ! पुन्हा वाचायला लागेल
यक्कु शेठ
=)) =))
In reply to यक्कु शेठ by परिकथेतील राजकुमार
मायला एवढं सोपं, साध्या
>>>आता सर्वांसाठी प्रॅक्टीकल
In reply to मायला एवढं सोपं, साध्या by यकु
>>>>>>अरे येशा, कसं व्हायचं
In reply to >>>आता सर्वांसाठी प्रॅक्टीकल by प्यारे१
=)) =))
In reply to मायला एवढं सोपं, साध्या by यकु
>>>>>पण यक्कुशेठ कडून आम्हाला
In reply to =)) =)) by परिकथेतील राजकुमार
अज्ञाताचे ज्ञान व्हावे ही
गांभीर्याने चर्चा होत नाही हा
प्रतिसादाबद्दल थँक्यू
In reply to गांभीर्याने चर्चा होत नाही हा by गवि
अरे यात पुलं कसे महान किंवा
In reply to प्रतिसादाबद्दल थँक्यू by यकु
>>>>अरे यात पुलं कसे महान
In reply to अरे यात पुलं कसे महान किंवा by गवि
सहमत हो गवि. 'का?' याला
In reply to अरे यात पुलं कसे महान किंवा by गवि
>>> तसेही चुकून निर्माण
In reply to सहमत हो गवि. 'का?' याला by नगरीनिरंजन
कळीचा मुद्दा
In reply to >>> तसेही चुकून निर्माण by यकु
येस्स.
In reply to कळीचा मुद्दा by पैसा
पुलंचा उल्ल्लेख म्हणून,
कामधंदा....
पण मग गवींना असा प्रतिसाद
In reply to कामधंदा.... by मन१
काहीही....
In reply to पण मग गवींना असा प्रतिसाद by स्पंदना
आरोप नाही
In reply to काहीही.... by मन१
तुझं युजींपासूनचं जवळ जवळ
तुझ्या प्रतिक्रियेबद्दल
In reply to तुझं युजींपासूनचं जवळ जवळ by राघव
विचार आपल्याला वापरून घेतात
In reply to तुझ्या प्रतिक्रियेबद्दल by यकु
उत्तम धागा, अशा ब-याचश्या
>>>अशा ब-याचश्या प्रश्नांची
In reply to उत्तम धागा, अशा ब-याचश्या by ५० फक्त
जास्त ईचार केला तर डॉस्क
यक्कू शेठ