जशी रंग बोटांवर ठेवून... - ४
जशी रंग बोटांवर ठेवून... - १
जशी रंग बोटांवर ठेवून... - २
जशी रंग बोटांवर ठेवून... - ३
पितृपक्षाचा पंधरवडा सुरु झाला होता. त्यामुळे पितृपक्षाचे पंधरा दिवस, नंतर नवरात्र आणि त्यानंतर दिवाळी असा अजूनही जवळपास एक महिना जाणार होता. दिवाळी येण्याची वाट पाट पाहणे एव्हढंच अश्विन करु शकत होता. नाही म्हणायला तो अधूनमधून मॅट्रीमोनी साईटवर लॉगिन करत असे श्रेयाला एकतर ऑनलाईन किंवा नुकतीच ऑफलाईन झालेली पाहून उसासा टाकत असे.
एक दिवस सहज म्हणून त्याने श्रेयाला "हाय, हाऊ आर यू?" एव्हढा एका ओळीचाच मेसेज केला. आणि काय आश्चर्य, श्रेयाने चक्क त्याला उत्तरही दिलं. त्यानंतरही दोन तीन वेळा त्याने श्रेयाला मेसेज केले. तिनेही लगेच रीप्लाय केले. याचा अश्विनला अर्थातच आनंद झाला होता. परंतू एका गोष्टीचं त्याला वाईटही वाटत होतं, ते म्हणजे श्रेया स्वतःहून कधी मेसेज करत नव्हती.
दसर्याचा दिवस उजाडला. रात्री ऑनलाईन टाईमपास करत उशिरा झोपल्यामुळे अश्विनने उठायलाही उशीर केला. नेहमीच्या सवयीनूसार त्यान डोळे चोळत, आळोखेपिळोखे देत मोबाईल पाहिला. आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. चक्क श्रेयाने त्याला दसर्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मेसेज केला होता. अश्विनच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यानेही पटकन रीप्लाय केला.
अजून दोन तीन दिवस असेच गेले. रविवारी संध्याकाळी तो सहज म्हणून मित्रासोबत तलावपाळीला फीरायला गेला. इकडच्या तिकडच्या गप्पाटप्पा सुरु असतानाच मोबाईलने दोनदा बीप केलं. आता कुणाचा बरे मेसेज आला म्हणून पाहतो तर काय, चक्क श्रेयाने मेसेज केला होता. कसा आहेस, काय करतोयस, आई बाबा कसे आहेत असे दोन तीन प्रश्न विचारले होते तिने. अश्विनला तिथेच आनंदाने बेभान होऊन नाचावसं वाटत होतं. त्याचं स्टॅटीस्टीकल अॅनालिसिस अचूक ठरल्यात जमा होतं. श्रेयाने स्वतःहून मेसेज करुन त्याची, त्याच्या घरच्यांची चौकशी करणे याचाच दुसरा अर्थ होता, श्रेया आणि तिच्या घरच्यांनी अश्विनला होकार दिला होता. आता तिच्या घरच्यांनी दिवाळीत ठाण्याला त्याचं घर पाहायला येणं ही केवळ औपचारीकता होती. अश्विन तर चक्क हवेत तरंगत होता. त्याने मॅट्रीमोनी प्रोफाईलवरुन डाऊनलोड केलेले श्रेयाचे फोटो टक लावून पाहत होता. मनात तिच्यासोबतच्या आयुष्याची स्वप्नं पाहत होता. एव्हाना त्याने तिला एकदा संध्याकाळच्या वेळी फोनही केला होता. ती ही मनमोकळेपणाने बोलली होती.
आणि कशी कोण जाणे कुठेतरी माशी शिंकली. त्यानंतर अश्विनने केलेल्या मेसेजना श्रेयाने रीप्लाय करणं बंद केलं. काहीतरी गडबड आहे हे अश्विनला जाणवलं. तिनं आपल्या मेसेजला रीप्लाय न करण्यासारखं आपल्याकडून काही झालं का याचा विचार अश्विन करु लागला. पण तसं काहीच झालं नव्हतं. शेवटी न राहवून अश्विनने तिला मेसेजमधून अगदी स्पष्ट शब्दांत "काही झालंय का? माझं काही चुकलं का?" असं विचारलं. त्याच मेसेजमध्ये त्याने तिला हे हे समजावण्याचा प्रयत्न केला की मोकळेपणाने बोलणं हा कुठल्याही नात्याचा पाया असतो. या मेसेजला मात्र श्रेयाने उत्तर दिलं, की तसं काही नाही. घरी थोडं टाईल्सचं काम चालू असल्यामुळे त्याच्या मेसेजेसना उत्तर देणं तिला जमलं नाही. अर्थात तिच्या या उत्तराने अश्विनचे समाधान झाले नाही. दिवाळी झाल्या झाल्या श्रेयाची माणसे ठाण्याला त्याचं घर पाहायला येण्याआधी त्याने पुण्याला जाऊन तिला भेटून या सगळ्या गोष्टींचा उलगडा करायचे ठरवले. अगदी कुठल्या दोन दिवसांची सुट्टी घ्यायची, किती वाजताच्या शिवनेरीने पुण्याला जायचं याचंही प्लानिंग त्याने केलं.
दिवाळी एक दोन दिवसांवर येऊन ठेपली होती. दिवाळीला पुण्यात श्रेयाला भेटायला जाणे शक्य नव्हतं. ते ठीकही दिसलं नसतं, म्हणून अश्विनने एका ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवरुन तिच्या घरी दिवाळीची भेट पाठवली. पण या भेटीची ना त्या ऑनलाईन पोर्टलकडून डीलीवरीची पोच मिळाली, ना श्रेयाने त्याबद्दल काही मेसेज केला. शेवटी न राहवून अश्विननेच त्या ऑनलाईन पोर्टलच्या कस्टमर सर्विसला फोन केला. आपला ऑर्डर क्रमांक दिला आणि डीलीवरीसंबंधी विचारणा केली. त्यांनी ती ऑर्डर डीलीव्हर केली आहे असं सांगितलं, रिसिव्ह कुणी केली असं विचारलं असता श्रेया असं नाव सांगितलं. क्षणभर अश्विनला काही सुचेना. काहीतरी गडबड आहे. श्रेयाला घातलेल्या मागणीचा आणि नंतर घडलेल्या घटनांचा एकदा नव्याने विचार करण्याची गरज आहे हे त्याला जाणवलं. बाकी काहीही असो, श्रेयाने ते गिफ्ट रिसीव्ह केल्यानंतर त्याचे आभार मानणारा निदान दोन शब्दांचा तरी मेसेज पाठवायला हवा होता असं त्याला राहून राहून वाटत होतं.
या झाल्या प्रकारावरून पुढे काय होणार याचा अंदाज अश्विनला आला होता. त्याचं मॅट्रीमोनी प्रोफाईल्स संदर्भातलं स्टॅटीस्टीकल अॅनालिसिस जरी अगदी अचूक ठरलं असलं तरी त्याच्यावरुन पुढे काय होईल याबद्दलचा अश्विनचा अंदाज पार चुकला होता. श्रेया अजूनही मॅट्रीमोनी पोर्टलवर अधूनमधून ऑनलाईन असायची म्हणजे अजूनही अश्विनपेक्षा उजवं स्थळ सापडलं नव्हतं. पण श्रेयाने हल्ली हल्ली ज्या पद्धतीने वागत होती त्यावरुन श्रेयाच्या घरचे अश्विनलाही होकार देतील अशी अजिबात शक्यता वाटत नव्हती.
अश्विनने आपल्या दिवाळीनंतर श्रेयाला भेटायला जायचा विचार निकालात काढला. कशाला जायचं, असं तो स्वतःलाच विचारू लागला होता. तिचे आई बाबा शिक्षक आहेत, आजी निवृत्त मुख्याध्यापिका आहे, आणि अशा सुशिक्षीत लोकांनी हे असं "स्थळाचं पॅरलल प्रोसेसिंग" करावं हे त्याला अजिबात पटलं नव्हतं. पण तरीही ते सारे मागच्या जनरेशनचे आहेत, आपल्या उच्चशिक्षीत, उच्चपदस्थ आणि चांगला पगार घेणार्या मुलीला चांगला मुलगा नवरा म्हणून मिळावा या भावनेने असा स्वार्थी विचार त्यांनी केला असेलही. पण श्रेयाला कळत नाही का? ती तर आजच्या पीढीची आहे. आपल्याला कुणी मुलगा लग्नासाठी मागणी घालून गेला आहे, तो आपल्यात हळूहळू गुंतत चालला आहे याचं भान तिला असायला नको का? काही कारणास्तव तिचा किंवा तिच्या घरच्यांचा अश्विनला नकार असेल तर तिने त्याची घरच्यांशी चर्चा करुन ठामपणे काहीतरी निर्णय घ्यायला नको का? असे एक ना अनेक विचार अश्विनच्या डोक्यात पिंगा घालू लागले.
दिवाळी संपली. उत्तर काय येणार हे माहिती असूनही अश्विनने बाबांना श्रेयाच्या घरी फोन करायला सांगितलं. यावेळीसुद्धा श्रेयाच्या आईने कधी येणार आहात ठाण्याला या प्रश्नाला "आमचं अजून काही ठरलं नाही" असंच उत्तर दिलं. त्याच्या आई बाबांना असं काहीतरी होऊ शकेल असा अंदाज आधीच आला होता. श्रेयाच्या उलट सुलट वागण्याने अश्विनही मानसिकरीत्या या निर्णयासाठी तयार झाला होता. त्यामुळे मनातून कितीही वाईट वाटत असलं तरी, श्रेया हा विषय त्याने तिथेच संपवला होता. अगदी "नेमकं काय झालं असेल" हा मनात वळवळणारा किडाही त्याने झटकून टाकला.
... आणि आता अचानक त्याच्या वाढदिवसाला श्रेयाचा मेसेज आल्याने त्या आठवणी मनाचे कप्पे उलगडून बाहेर पडत होत्या. कॉलेजमध्ये कधीतरी ऐकलेली ती चारोळी त्याला आता आठवत होती,
काही नाती तुटत नाहीत, ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातून सुटून जातात
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संपली कथा. अर्थात ही कथा नसून सत्यकथा आहे हे एव्हाना मायबाप वाचकांच्या लक्षात आले असेलच. काही जास्तच संवेदनशील चेतना असलेल्या साहित्यिक सरंजामदारांनाही हे ही कळले असेल की सार्या कथा या कथा नसतात, तर काही कथा सत्यकथा असतात. आणि सत्यकथांचा शेवट सहसा "आणि मग शेवटी समेत होऊन शेवट "जिलेबी" सारखा गोड होतो..आणि ह्या कथानकात अनेक जन आपल्याला पाहून मोरपीस अंग्वरून फिरवल्याचा आनंद लुटतात..." असा होत नाही हे ही त्यांना जाणवले असेल.
असो. मागच्या तीनेक वर्षांत "फ्लॅट पाहावा घेऊन आणि स्थळ पाहावे शोधून" या म्हणीचा आम्ही चांगलाच अनुभव घेतला. अर्थात फ्लॅटची भानगड आम्ही "तिकडे" असल्यामुळे नात्याने सख्ख्या काकीचा सख्खा भाऊ असलेल्या आमच्या एका जिवलग मित्राने निस्तरली. मात्र स्थळ पाहणे या गोष्टीने आमची दोन वर्ष अगदीच वाया घालवली नसली तरी दोन वर्ष घेतली म्हणायला हरकत नाही. या दोन वर्षांत आम्हाला तर्हेतर्हेचे अनुभव आले. याच वेळी आमचे इतरही काही मित्र मांडवाखालून जायच्या तयारीत होते. आणि त्यांचे अनुभवही अगदी मासलेवाईक होते. उपरोल्लिखित अनुभव असाच एका मित्राचा अनुभव आहे. समदु:खी असल्याने त्या तीन महिन्यांमधील प्रत्येक "डेव्हलपमेंट"बद्दल तो आम्हाला सांगत असे. हा अनुभव लिहिताना आम्ही अस्मादिकांचेच दैनंदिन जीवन कथेच्या वातावरण निर्मितीसाठी वापरले. त्यामुळे आम्हाला वैयक्तिकरीत्या ओळखणार्या आमच्या सृहदांना ही आमचीच गोष्ट आहे असं वाटणं साहजिक होतं. त्यामुळेच कथेमध्ये विमे, वल्ली आणि अन्याने प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे पुण्याचे ठाणे, अमेरिकेचे ऑस्ट्रेलिया आणि आय टेनचे स्विफ्ट डीझायर केले आहे असे वाटेल.
अर्थात ही कुणाची कथा आहे याने वस्तूस्थितीत फारसा फरक पडत नाही. "पॅरलल प्रोसेसिंग" हा आजच्या लग्न जमवण्याच्या प्रोसेसमधील एक भाग झाला आहे. आणि ते कधी मुलाकडून तर कधी मुलीकडून होतं. आणि मग "समोरच्या पार्टीला" त्याचा नाहक ताप होतो. बाकी या कथेत कुणाचं चुकलं हे ते तुमचं तुम्हीच ठरवा.
Book traversal links for जशी रंग बोटांवर ठेवून... - ४
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रत्येक घोडं गंगेतच न्हालं
फार मोठी शिकवण पण अंमळ १०
असो, आता हा झाला ३ वर्षातला
अप्रतिम
मस्त लिहिलेय
या भागात शेवट केल्याबद्दल
ताकाला जाउन....
पुरुष बिचारा आता तरी समोरची
सुतावरून स्वर्ग गाठण्याचा हा प्रकार
छान लीहीलेस धना मला माझ्या
छान लिहिलेय
त्यावेळेस कीती शाळा पालथ्या
पूर्वी म्हणे मुलींच्या
मस्त (सत्य)कथा!
अरे रे ...खेद जनक आहे तुमच्या
हम्म ..... बिगुल वाजला आहे
कथेतल्या तपशीलावरुन मलाही ही
यातुन
छान लिहिलंय
माझ्या एका कलिगच्या सॉफ्टवेअर
पैसातै, असा बाण मारलाय ना की
असा हाय काय!
धन्या, आवडली लेखमाला..
हम्म्म... वाईट वाटले पण वर
हुरहूर असते हीच ऊरी...
आवडली
कथा आवडली रे आणि चारोळीही
चारोळी बहुतेक चंद्रशेखर
मी माझा.
लेखमाला आवडली.
अप्रतिम
असाच अनुभव येईल असे सारखे
प्रभावी
च्यामारी प्रॅक्टिकली माझ्या
इतकं स्पष्ट कळलं असेल तर खुप
बाजार !! बाजार च !!! अर्थात