युद्धाची पार्श्वभूमी आणि शिवरायांची धामधूम: शिवरायांनी शके १५७७ पौष महिन्यात जावळी जिंकली.हाती लागतील तेवढे मोरे कापले.
चंद्रराव,हणमंतराव,बाजीराव,कृष्णराव या मोरे बंधूंना मारण्यात आले.
पुढेमागे जावळीत गडबड होऊ नये म्हणून खबरदारी साठी जावळीच्या वरच्या अंगाला असलेल्या 'ढोपर्या ' डोंगरावर किल्ला बांधला,प्रतापगड ऎसे नाव दिले.
नंतर जुन्नर आणि नगर कडे शिवरायांनी मोर्चा वळवला,बरीच धुमाळी झाली पण फारसे यश लाभले नाही.या भागात युवराज औरंगजेबाने नौसीर खान नावाचा सुभेदार ठेवला होता तसेच बंदोबस्तहि चोख होता त्यामुळे माघार घेऊन तहाची बोलणी करावी लागली.रघुनाथ बल्लाळ यांच्या हस्ते औरंगजेबाला पत्र पाठवले त्याचे उत्तर असे आले.
"तुमच्या पेश्जीच्या गोष्टी विसराव्याजोग्या नाहीत, तथापि तुम्ही तुमच्या कृतकृत्यांचा पश्चाताप केला असे समजोन पूर्वकृत्य मनात आणत नाही "
असे सांगून ५०० घोडेस्वार देत बादशाही नोकरीत आमंत्रित करत शिवरायांना ऑफर लेटर देऊन तो लगबगीने (शहाजहान आजारी असल्याने) उत्तरेस गेला .तरीसुद्धा जाताजाता त्याने मीर जुमला(शाही सरदार) व अली आदिलशाहास तंबी दिली कि "शिवाजीवर लक्ष ठेवा,तुमचे किल्ले त्याने बळकाविले आहेत ते सोडवा अथवा तुम्हास त्याच्या नोकरीची अपेक्षा असेल तर त्यास दक्षिणेस पाठवा".
बादशहाची करडी नजर राहू नये म्हणून शिवरायांनी १६५९ जून मध्ये औरंगजेब गादीवर बसला तेव्हा सोनोपन्तांबरोबर एक अर्जदास्त राज्यारोहण प्रसंगी पाठवली त्यास उत्तर म्हणोन उंची पोशाख आणि उत्तर पाठवले.
औरंगजेबाने दिलेली तंबी आदिलशहाने बरीच मनावर घेतली कारण बरेच सरदार दरबारात शिवरायांविषयी कागाळ्या करत यात अफझल आघाडीवर होता,वाई प्रांत आणि आसपासचा मुलुख सर्वात जास्त शिवरायांकडून प्रभावित होता...येथील वतनदार राजांच्या बाजूने फिरले त्यामुळे महसूल नीट येत नव्हता,तसेच राजांच्या सैन्याचा वारंवार त्रास होत असे.वळवाचा पाउस येतो तशी शिवाजीची माणसे येतात आणि जातात हाती कोणी लागत नाही त्यामुळे हे काम पत्करण्यास कोणीही तयार नव्हते.वाईचा सुभेदार म्हणून हि कामगिरी अफझलखानच्याच माथ्यावर आली तो कबूल हि झाला. मोहिमेला जाण्यापूर्वी तो आपल्या कोणी अवलिया फकिराला भेटायला गेला होता तेथे फकिराने त्यास अनिष्ट होईल असे सांगितले म्हणतात.
स्वारीवर जाण्यापूर्वी निर्वाणीचे उपाय म्हणून त्याने आपल्या ६३ बायकांना जीवे मारले...हाच आकडा काहीजण २०० हि सांगतात नक्की माहिती नाही. स्त्रियांना मारायचे कारण असे कि आपल्या नंतर त्यांनी काही बदमामल करू नये किंवा दुसर्या पुरुषास आपले सुखाचा वारीस करून आपल्या नावास बट्टा लावू नये.
या कबरी विजापूर जवळील अफजलपूर येथे पहावयास मिळतात.
अफझलखानाचा मोहीम मार्ग विजापूर -तोरवे-डोन-माणकेश्वर-करकंवभोस-शंभू महादेव-मलवडी-रहिमतपूर
(भोसले बखर मध्ये खान भिमतीरी होता असा उल्लेख आहे, खानाने तुळजाभवानी ची मूर्ती जात्यात भरडली,पांडुरंगाची मूर्ती फोडली असे बखरकार सांगतात परंतु त्यास तत्कालीन पुरावे नाहीत)
अफझलखान हा १२-१५ वर्षे वाई चा सुभेदार होता,याने परगण्यातील कित्येत देवळांना,पुजार्यांना तसेच पूजेअर्चेसाठी सनदा दिल्याचे पुरावे आहेत.त्यातीलच एक हा वरील पुरावा.
नरसोभट बिन रंगभट चीत्राऊ यास वडिलोपार्जित धर्मादाय सनद दिली...ती अफझलखानने पुन्हा नवी (renew) करून दिली !
युद्धानंतर कारागीर तुळजापूर ला पाठवून तुळजाभवानी प्रमाणेच मूर्ती प्रतापगडावर घडविण्यास महाराजांनी सांगितले होते,यावरून असे म्हणण्यास जागा आहे कि भवानीची मूर्तीला अपाय झाला नसावा.
शिवराय आणि खानाची सरदारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी केलेली मुत्सद्देगिरी: पांढरे,घाटगे,घोरपडे,इंगळे हे लोक तर खानच्या बरोबर होतेच त्या बरोबरच खानाने मोठी गौरवाची पत्रे लिहून मावळातील लोक आपल्या बाजूने वळविण्यास सुरुवात केली.शिळीमकर,जेधे ,बांदल,जगदाळे,धुमाळ इ. लोकास आपल्या हस्तका मार्फत आपल्या बाजूने घेण्यास सुरुवात केली.शीळींमकरांचा तंटा शिवाजीने सोडवला होता त्यामुळे ते २ भाऊ शिवाजीच्या बाजूने आले तर विठोजी नाईक खानच्या बाजूला गेला.
तसेच मंबाजी भोसले ला खानाने ओढला तर बाबाजी भोसले ला चिठ्ठी लिहून शिवरायांनी बोलावून घेतले.
अशी हि ओढाओढी दोन्ही बाजूने चालू होती पासलकर,ढोर (धुमाळ),मरळ,बांदल ,ढमाले यांना आपल्या बाजूने वळवून शिवाजीने त्यांस कडून शपथा घेतल्या !
क्रमश:
वाचने
14848
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखमालेचे स्वागत :)
'ढोपर्या ' का 'भोरप्या' ? हाच
In reply to लेखमालेचे स्वागत :) by इष्टुर फाकडा
भोरप्याच तो. त्याचाच पुढे
In reply to 'ढोपर्या ' का 'भोरप्या' ? हाच by धन्या
मिपावरचे इंडीयाना जोन्स आले
In reply to भोरप्याच तो. त्याचाच पुढे by प्रचेतस
अगदी अगदी पसरणी घाट चढल्यावर
In reply to मिपावरचे इंडीयाना जोन्स आले by सागर
होय वल्लीशेठ भोर्प्याच
In reply to भोरप्याच तो. त्याचाच पुढे by प्रचेतस
मागच्या लेखाचा आणि तुझ्या
अरे अन्या गडबड झाली ....चुकून
In reply to मागच्या लेखाचा आणि तुझ्या by अन्या दातार
सुरवात मस्त
सुंदर लेख आहे. स्वारीवर
अफझलखानाने त्याच्या ६३
In reply to सुंदर लेख आहे. स्वारीवर by प्रसाद प्रसाद
या भागाला 'साठ कबरी' असेही म्हणतात !
In reply to अफझलखानाने त्याच्या ६३ by मृगनयनी
पुढे वाचण्यास उत्सुक . छान
वरील लेख चुकून 'पूर्वदृश्य'
फक्कड जमला आहे
In reply to वरील लेख चुकून 'पूर्वदृश्य' by मालोजीराव
पूर्ण लेख द्या.
In reply to वरील लेख चुकून 'पूर्वदृश्य' by मालोजीराव
धन्यवाद बिरुटेसर, माझा जीमेल
In reply to पूर्ण लेख द्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अफजल खान वध
पुढचा भागही येऊद्या ...मग
वा! पुभाप्र.
उत्तम लेख..
अरेरेरेरे ! बिच्चारा
अफझल अफझल !!
एकच लेख?
मग काय ठरवलयं?
लेख अतिशय माहितीपुर्ण आहेत
चांगला लेख..
अफजलखानाच्या वधाचे चित्र
वाचतोय
मस्त
धन्यवाद चितळे साहेब, आपण
In reply to मस्त by रणजित चितळे
सुंदर
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला ...
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त
In reply to केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला ... by मोदक
चित्रगुप्त मुसलमानांचेही
In reply to मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त by JAGOMOHANPYARE
खुप छान काव्य !
महितीपुर्ण लेख चांगलाच आहे.