सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा
महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा धगधगत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये घुमतो आवाज मराठीचा एकतेची साद घेवुनी संवाद मराठीचा शब्द चिंगार आवाज मराठीचा संस्कार दिसे खुलुनी साजशृंगार माय मराठीचा हाती तेजोमय तलवार तळपते रणांगणात गर्जतो यल्गार मराठीचा गरजले परके सारे जरी घरात आपापल्या नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा शिवबाची ज्योत ह्रदयी ठेवतो तेवत, बाणा मराठीचा . . . . . . . . . . .--- ---शब्दमेघ ------
अप्रतिम कविता रे.
+१११
झेंड्यासकट उत्तम कविता. छान
गणेशा ,काव्यमय भगवा खुप खुप
समयोचित कविता
समरगीतकार गणेशभाऊंचा इजय
आता जमला झेंडा!
भगवा झेंडा! जय महाराष्ट्र!
ज ब र द स्त !!!
भगव्या झेंड्यासह कविता
कविता अतिशय आवडली गणेशा. "