✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भारत "IT" मध्ये प्रगत आहे म्हणजे नक्की काय आहे?

च
चेतनकुलकर्णी_85 यांनी
Wed, 02/15/2012 - 22:29  ·  लेख
लेख
मित्रानो, मी एका सरकारी संधोधन आणि विकास प्रबोधानीत काम करतो..माझ्या कामा निमित्त गेल्या आठवड्यात एका अमेरिकन स्थित बेंगलोर मधील "software" विकसित करणाऱ्या कंपनी बरोबर संबंध आला ...आम्हाला त्यांच्या कडून एक "software" घ्यायचे होते जे अभियांत्रिकी शी निगडीत होते.परंतु त्यांनी हजार सबबी सांगून (अमेरिकन कायद्याचा हवाला देत... व "end use certificate" वर सही करणे आवश्यक आहे जे अर्थातच शक्य नव्हते ...) आमची ऑफर नाकारली. ह्या घटने वरून असा प्रश्न पडतो कि आपण रोज वाचतो कि भारतीय "IT" कंपन्यांनी इतकी प्रगती केली वगैरे वगैरे.. पण ह्याच कंपन्या अभियांत्रिकी शी निगडीत "softwares" बनविण्यात अग्रेसर का नाहीत ?(उदाहरणार्थ "MATLAB",ANSYS,PSpice). कि या कंपन्या फक्त "support" देण्याचे काम करीत आहेत...मला माहित आहे कि बँकिंग क्ष्रेतात काही भारतीय कंपनी अग्रेसर आहेत मग अभियांत्रिकी क्ष्रेतातील "softwares" विकसित करणायत का नाहीत??? मिपा वर बरेच "IT" मधील बरीच तज्ञ व अनुभवी मंडळी आहेत असे माहित आहे म्हणून योग्य उत्तराच्या अपेक्षेत.... :) ह्या लेखाने मला IT and non IT हा वाद मला बिलकुल काढायचा नाहीये.... ;)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
44439 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

अगंबै!!! तुम्ही कधी "इकडे"

शिल्पा ब
गुरुवार, 02/16/2012 - 23:42 नवीन
अगंबै!!! तुम्ही कधी "इकडे" आलात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतनकुलकर्णी_85

अहो ताई, मी इथलाच आहे हो....

चेतनकुलकर्णी_85
गुरुवार, 02/16/2012 - 23:48 नवीन
अहो ताई, मी इथलाच आहे हो.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

नुकतेच इंजिनीअरींग होउन बाहेर

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 02/16/2012 - 20:38 नवीन
नुकतेच इंजिनीअरींग होउन बाहेर पडलेले रस्त्याच्या कडेला गळ्यात बॅज अडकवून, स्मार्टफोनशी चाळाकरत कंपनीच्या बसची वाट बघत आठ-दहा लाख पॅकेज घेणारी मुलं-मुली बघितली की च्यायला (बिचार्‍यांचा काय दोष, पण) डोक्यात सणक जाते.
माझ्या पण जाते, स्वतः त्या क्षेत्रात असूनही (किंवा कदाचित असल्यामुळे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

आयटी हब पुणे नसणार आहे

ताजे प्रेत
गुरुवार, 09/03/2020 - 20:21 नवीन
जो आयटी हब की काय म्हणतात तो येत्या चार पाच वर्षात पुणे नसणार आहे. - 16 Feb 2012 चे विधान 4 नाही 8 वर्षे झाली - ये टी हब म्हणून पुणे संपले का ? केंव्हा ? कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

आपण सॉफ्टवेअर क्षेत्रात

मराठी_माणूस
गुरुवार, 02/16/2012 - 21:21 नवीन
आपण सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रगतीवर आहोत वगैरे म्हणणे म्हणजे बांधकामावरच्या मजुरानी आपण दहा बिल्डिंगा बांधल्याची फुशारकी मारावी..
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

?

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/16/2012 - 11:31 नवीन
सरकारी संधोधन म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments

मस्त विषय ..

सोत्रि
गुरुवार, 02/16/2012 - 11:48 नवीन
अतिशय चांगल्या विषयाला तोंड फोडले आहे. भारत आयटी मध्ये प्रगत आहे काय ह्याचे उत्तर शोधण्यासाठी थोडे भूतकाळात जावे लागेल. Y2K चे भूत जेव्हा सर्व जगाच्या मानगूटीवर बसले होते तेव्हा प्रचंड मनुष्यबळाची गरज निर्माण झाली होती. एकंदरीतच भारतीय माणूस हुषार (गणिती बेस पक्का असल्यामुळे) . त्यात पुन्हा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व ह्या गोष्टींमुळे त्या काळात अमेरिकेत लोकं जायला लागली. त्यातुन सुरू झाले 'बॉडी शॉपिंगचे' पर्व. १९९० ते २००१ पर्यंत बहुतेक कंपन्यांनी अक्षरशः खोर्‍याने पैसा ओढला. तेही फक्त मनुष्यबळ पुरवून. मग प्रॉपर 'बनियागीरी' सुरू झाली आणि भारतीय आयटी इंडस्ट्रीचे हेच मॉडेल बनले. कमीत कमी कष्टात आणि फार डोकॅलिटीचे काम न करता बक्कळ पैसा कमविणे. १९९५ ला विंडोज ९५ च्या उदयानंतर भयंकर मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आणि पैसा मिळवणे आणखिणच सोपे झाले. २००१ च्या .COM बर्स्ट नंतर पाश्चात्य जग जरा शहाणे झाले आणि Outsourcing कडे वळले. कामे Offshore वरून करून घेण्यातला फायदा त्यांना बरोबर कळला. आपल्याकडील काही हुषार कंपन्यांनी त्याचा फायदा करून घेत आणखीण बक्कळ पैसा कमविण्याचे नवे नवे मार्ग शोधून काढले, जसे की BPO, ITO, KPO. पण ह्याच्या सगळ्याच्या मागे हेतू एकच, चीप लेबर पुरवणे आणि बक्कळ पैसा कमविणे. ह्यात झाले काय कि 'Core' कामं करण्यात आपण जास्त इंटरेस्ट दाखविलच नाही. खरंतर तसा इंटरेस्ट नव्हताही, 'बक्कळ पैसा जास्त डोके न लावता' हेच सूत्र बनले होते. त्यात अमेरिकन आणि युरोपियन त्यांचे 'Core' कामं देण्यास उत्सुक नसतातही. मग मेंटेनन्सची कामे ती देत रहातात. भारतीय कंपन्याही त्यातच खुश असतात. सगळ्या मोठ्या कंपन्यांचा मेजर रेव्हेन्यु हा अश्या कामातूनच येत असतो. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे, 'संगणक वि़ज्ञान' ह्या शाखेशी काहीही संबंध नसलेली अभियांत्रिकी फौज आयटी मध्ये ह्या असल्या मेंटेनन्सच्या कामामुळेच आली. भरपूर पैसा हे त्यामगचे कारण. पण ही झाली एक आणि मुख्य बाजू. भारतीयांच्या हुषारीवर आणि कर्तृत्वावर अपार विश्वास असल्यामुळे अनेक मोठ्या मोठ्या 'Core' कामं करनार्‍या कंपन्यांची "संशोधन आणि विकास" अशी कामेही इथे भारतात चालतात. जसे की मायक्रोसोफ्ट, गूगल, अ‍ॅमेझॉन इ. पण ह्याचे प्रमाण फार किरकोळ आहे. तिथे फक्त IIT सारख्या तत्सम नावाजलेल्या शिक्षण संस्थेतील अभियंत्यांना प्रवेश असतो. मग बाकीची जनता काय करणार? त्यांच्या कुवतीचे 'मेंटेनन्स' काम! त्यामुळे भारत आयटीमध्ये प्रगत आहेच. कुठलेही कामं असो, आपण पुढे आहोतच. आता कसे ते ज्याच्या त्याच्या पहाण्याच्या चश्म्याच्या रंगावर अबलंबून असेल :) - (आयटीग्रस्त) सोकाजी
  • Log in or register to post comments

>>>मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे,

पाषाणभेद
गुरुवार, 02/16/2012 - 20:12 नवीन
>>>मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे, 'संगणक वि़ज्ञान' ह्या शाखेशी काहीही संबंध नसलेली अभियांत्रिकी फौज आयटी मध्ये ह्या असल्या मेंटेनन्सच्या कामामुळेच आली. खरं आहे. इंटरव्ह्यु मध्ये उगाचच टेक्नीकल प्रश्न विचारतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

झक्कास!

आनंदी गोपाळ
Fri, 02/17/2012 - 00:36 नवीन
ह्यात झाले काय कि 'Core' कामं करण्यात आपण जास्त इंटरेस्ट दाखविलच नाही. खरंतर तसा इंटरेस्ट नव्हताही, 'बक्कळ पैसा जास्त डोके न लावता' हेच सूत्र बनले होते.
हे बोल्ड केलेले 'बक्कळ पैसा जास्त डोके न लावता' सूत्र बनले 'होते' नाही. हेच आपले सूत्र आहे, होते अन राहील. इथेच ग्यानबाची मेख आहे. We dont 'make' money like americans do. we 'earn' money.. पहा विचार करून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

मूळ

चिरोटा
गुरुवार, 02/16/2012 - 14:00 नवीन
मूळ प्रश्न- भारतात अभियांत्रिकी सॉफ्ट्वेयर्स विकसित का होत नाहीत हा आहे. ह्याचा भारतिय संस्कृतीशी संबंध आहे असे वाटत नाही. ८०च्या दशकात अशा कंपन्या भारतात होत्या कारण त्यावेळी अशा प्रणालींना भारतातही डिमांड होता. गूगल्,फेस्बूक वगैरे autocad सारखे बनवू शकतील का? उत्तर- नाही. प्रचंड पैसा असला तरी ह्या कंपन्या ही जोखीम घेणार नाहीत. अशा गोष्टी बनवताना फक्त आवड असून चालत नाही. आर्थिकदृष्ट्या ते परवडायला हवे. ते आणि मनुष्यबळ असेल तर जमू शकते. अभियांत्रिकी सॉफ्ट्वेयर बनवणे आणि फेस्बूक,ऑर्कुट सारखी 'cute' साईट बनवणे ह्यात मूलभूत फरक आहे. खालील कंपन्या पहा- http://www.ittiam.com (The world's most preferred DSP IP supplier) www.tejasnetworks.com/ ( ही कंपनी टेलिकॉम प्रॉड्क्ट्स बनवते.) www.onmobile.com/ ( मोबाईल सॉफ्ट्वेयर- ५३ देशांमध्ये अनेक ISPs ना caller tunes etc सॉफ्ट्वेयर पुरवतात).
  • Log in or register to post comments

हम्म!

आत्मशून्य
गुरुवार, 02/16/2012 - 15:12 नवीन
पुरेसा पैसा दिला की सर्व काही जुळुन येते हो. माहीत नसलेली तंत्रज्ञान ही शिकली शिकवली जातात, अगदी पल्याड पाठवुनही ट्रेनींग होऊ शकते पण.... पण सरकारी रुपयाचा आब डॉलर माजपुढे तोकडा पडतो. कोणी सांगीतलय युरो/डॉलर सोडुन इतर करन्सीमधे कामं घ्यायला ? हा सोपा हिशेब आहे.
  • Log in or register to post comments

कोणी सांगितलं हो

रमताराम
गुरुवार, 02/16/2012 - 16:47 नवीन
की भारत IT मधे प्रगत आहे म्हणून? उद्या आमच्या पुण्यातील दांडेकर पूल झोपडपट्टी वा वारजे नाका कन्स्ट्रक्शन बिजनेस मधे प्रगत आहे म्हणाल. (आयटी बिगारी) रमताराम
  • Log in or register to post comments

छान चर्चा ...

छोटा डॉन
गुरुवार, 02/16/2012 - 17:51 नवीन
चर्चा उत्तम प्रकारे चालली आहे असे दिसते आहे. वाचतो आहे. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

चर्चा चाळतोय.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/16/2012 - 21:22 नवीन
. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रा डॉ

कुंदन
गुरुवार, 02/16/2012 - 23:28 नवीन
प्रा डॉ तुम्ही पण येता का IT मध्ये ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाटलंच अजून कुंदनसेठ कसे नै बोल्ले. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/17/2012 - 09:15 नवीन
'बक्कळ पैसा जास्त डोके न लावता' असं आयटीत आहे म्हणे. पण, फूट्कळ काम करण्यापेक्षा भारत प्रगती करेल, प्रगती करतोच आहे. पण, चिरोट्याचे प्रतिसाद वाचून कळले की आपण ऑपरेटींग सिष्टीम, लँग्वेज सारखे आपल्याकडून काही मोठे काम होत नाही. केवळ प्रॉग्रामर म्हणून काम करतात .म्हणजे केवळ मजूरासारखे राबराब राबणारे आपले आयटीतल्या तज्ञाकडून मोठी अपेक्षा आहे. तेव्हा कुंदनशेठ, आयटीवाल्यांनी आम्हा भारतीयांना अभिमान वाटेल असं काम करुन दाखवावं ना.......! कुंदनशेठ, आम्ही बरे आहोत आमच्या क्षेत्रात. ओढाताण करुन कोणतीही शिल्लक न राखता दोन वेळच्या जेवणाची उत्तम व्यवस्था होते. आणि शांत झोपही येते. बाय द वे, आमच्या पगारावर सरकारनं संक्रात आणली आहे. दि.२१ ला महाराष्ट्रभर विद्यापीठांवर मोर्चा आहे, कुंदनशेठ येता काय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

मोर्चाला

कुंदन
Fri, 02/17/2012 - 11:11 नवीन
मोर्चा कशाबद्दल हो ? ६वा वेतन आयोग तर कधीच लागु झालाय ना? बाकी , जर पगारवाढीसाठी असेल तर मोर्चाला नैतिक पाठिंबा आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/17/2012 - 11:15 नवीन
वाढीव पगारासाठी नै भो. जो आहे तो वेळेवर मिळू दे यासाठी मोर्चा आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

पण ...

कुंदन
Fri, 02/17/2012 - 22:18 नवीन
मोर्चासाठी वेळ चुकीची निवडलीत की हो. राज्यात बर्‍याच ठिकाणी नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर , आता सगळे राजकारणी सत्तासमीकरणे जुळवण्यात व्य्ग्र असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी चौकटराजा हे नाव का घेतले ?

चौकटराजा
Fri, 02/17/2012 - 09:56 नवीन
एका चित्रपटातील मतिमंद पात्राचे हे नाव आहे. आयटी च्या शी मी २८६ च्या प्रोसेसर व ८ एम बी च्या " हार्ड डिस्क च्या जमान्यापासून जोडला गेलेलो ( हा भूतकाळाचा नवीन प्रकार १९८० नंतर जन्मलेल्या मुलानी जन्माला घातलेला .बापरे ! मला पण ही सवय लागली की ! ) तर सांगायचे काय की विविध कोनांमधून ही आय टी ची माहिती मिळाली त्यावरून मी आपल्यामधे मिपावर कसा चौकट राजा आहे हे कळले. ए मुन्नी मुन्नी ... ते सगळे बघ कसे आय टी आय टी करताहेत.....ते आईला चटका द्यायला निघालेत की टी ( चहा ?) ...... ए मुन्नी बोल ना गं
  • Log in or register to post comments

राहवलं नै म्हणुन...

वपाडाव
Fri, 02/17/2012 - 14:07 नवीन
ए मुन्नी मुन्नी ...
हे वाचुन कांती शाहच्या गुंडा चित्रपटाची आठवण झाली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

सही है भिडू...........

इरसाल
Fri, 02/17/2012 - 11:03 नवीन
सगळ्या गाड्या व्यवस्थित रूळावरून धावत आहेत. क्या बात ?
  • Log in or register to post comments

चर्चा वाचतिये.

रेवती
Fri, 02/17/2012 - 20:43 नवीन
चर्चा वाचतिये.
  • Log in or register to post comments

एक अनुभव

निशदे
Fri, 02/17/2012 - 23:36 नवीन
काही काळापूर्वी Los Angeles मधील श्री. पुराणिक यांच्याशी भेट झाली. सदर गृहस्थ IBM मधे Cosumer Marketing/IT Development विभागाचे प्रमुख आहेत. ते IBM च्या बर्‍याच प्रोजेक्ट साठी outsourcing चे काम बघतात. त्यांच्याशी बोलताना वरील विषयातील त्यांची कळकळ अक्षरशः जाणवत होती. त्यांच्या मते भारतीय आयटी कंपन्यांची उदासीन वृत्ती हे यामागचे एकमेव कारण आहे. Development साठी पूरक शिक्षणपद्धती तयार करणे आणि संशोधनासाठी पैसा ओतणे या दोन मार्गांनीच सुरुवात होऊ शकते. याबाबतीत त्यांनी अझीम प्रेमजी, एन्.एस राघवन(Infosys), रवी पंडित (KPIT) अशा दिग्गजांशी चर्चा केल्याचे सांगितले पण त्यातून त्यांचे एकच मत बनले की Service Industry मधून मिळणारा अफाट पैसा अशा मार्गाने गुंतवायला कोणतीही कंपनी तयार नाही त्यामुळे परदेशातून पाठवल्या जाणार्‍या maintainence project वर काम करणे याल पर्याय नाही........ :(
  • Log in or register to post comments

अतिशय सुदृढ व निकोप चर्चा

५० फक्त
Sat, 02/18/2012 - 11:42 नवीन
अतिशय सुदृढ व निकोप चर्चा वाचुन ब-याच गोष्टी कळाल्या, माझा आयटि क्षेत्रावर राग आहे कारण आम्ही शाळा कॉलेजातुन बाहेत पडलो १९९६-९९ च्या काळाअत, या आयटि क्षेत्रानं माझे खुप चांगले मित्र मैत्रिणी तोडुन नेले. आणि आज ही ते सगळे पैशानी श्रीमंत आहेत हा राग नाही पण या पैशानं आमची मैत्री तोडली याचं वाईट वाटतंय.
  • Log in or register to post comments

नीटसे कळले नाही पन्नास राव.

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 02/19/2012 - 20:01 नवीन
नीटसे कळले नाही पन्नास राव. जी मैत्री पैशाने तुटते ती चांगली होती हे फारसे पटले नाही. मुद्दा तुम्ही नीट मांडला नाहीत कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अभियांत्रिकी शी निगडीत

अविनाशकुलकर्णी
Sat, 02/18/2012 - 22:27 नवीन
अभियांत्रिकी शी निगडीत "softwares" बनविण्यात अग्रेसर का नाहीत ? ........................................................................... मुळात अभियंत्रीकी कारखान्याची सरकारने का वाट लावली हा प्रष्ण महत्वाचा आहे.. त्या मुळे "निर्माण करण्याचे "कौशल्य असलेले कुशल कामगार निर्माण होत नाहित.. सा~या वस्तुसाठी आज आपण व जग चिन वर अवलंबुन आहोत.. खर तर भारतात ति क्षमता होति.. पण आता बस चुकली.... शोप फ्लोअर वर -१० तास उभा राहुन काम करणा~या इंजीनिअरला किंमत नाहि.. पण त्याच ईजीनिअरने एखादा सोफ्ट वेअर चा कोर्स केला कि ए.सी त बसुन महिन्याला ६ आकडी पगार.. हा खरा प्रष्ण आहे.. तरुणांची कष्टाची सवय मोडली "softwares" वाल्यांनी... 'पृथ्वी ही भगवान विष्णुच्या शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे', अण्णाभाऊ साठे
  • Log in or register to post comments

कष्टाची सवय

कुंदन
Sat, 02/18/2012 - 22:36 नवीन
प्रोग्रॅमिंग साठी कष्ट अन कौशल्य लागत नाही काय? की प्रोग्रॅमिंगचा कोड एसी च्या व्हेंट मधुन टपा टपा खाली पडतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

असे तुम्हाला का वाटते?

क्लिंटन
Sun, 02/19/2012 - 23:15 नवीन
अभियांत्रिकी उद्योगाची भारतात वाट लागली आहे असे तुम्हाला का वाटते? भारतातील जी.एम.आर /जी.व्ही.के या सारख्या EPC कंपन्या कोणत्या गोष्टीत कमी आहेत? आज जी.एम.आर ग्रुपने बांधलेले दिल्ली/हैद्राबाद विमानतळावरील टर्मिनल किंवा जी.व्ही.के ग्रुपने बांधलेले बंगलोर विमानतळावरील टर्मिनल आंतरराष्ट्रीय निकषांवर कुठे कमी पडेल असे वाटत नाही. इस्तंबूलमधील विमानतळाच्या modernization चे काम जी.एम्.आर ग्रुपने आधीच पूर्ण केले आहे. तसेच ब्राझील्/स्पेनमधील विमानतळांसाठी पण तो ग्रुप मध्यंतरी आपल्या निविदा सादर करत होता. १९८० च्या सुमारास मारूती उद्योगबरोबर collaboration करावे यासाठी सुझुकी उद्योगाच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या होत्या. पण आज भारतीय वाहन उद्योगातील टाटा कंपनी जाग्वारसारखी युरोपीयन कंपनी विकत घेऊ शकते. महिन्द्राचे ट्रॅक्टर्स अनेक देशांमध्ये निर्यात केले जातात. अडानी, जी.व्ही.के सारख्या कंपन्या इतर देशांमध्ये खाणी विकत घेण्याची पात्रता ठेवतात. अशी इतर अनेक उदाहरणे देता येतील. भारतीय अभियांत्रिकी कंपन्या आपला ठसा जगात उद्योगाची वाट लागलेली असताना कशा उमटवू शकतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

आपल्याकडे "श्रमप्रतिष्ठा" हा

अविनाशकुलकर्णी
Sun, 02/19/2012 - 12:06 नवीन
आपल्याकडे "श्रमप्रतिष्ठा" हा अस्पृश्य विचार आहे. त्यास कोणीच शिवत नाही. तथाकथित उच्चदर्जाची कामं (व्हाईट / येलोकॉलर) करणारे लोक प्रतिष्ठीत आणि इतर सगळे, "वाले" वाले लोकं शेलक्या दर्जाची कामं करतात एक विचार वाचलेला
  • Log in or register to post comments

या निमित्ताने

तिमा
Sun, 02/19/2012 - 12:30 नवीन
कोण आय टी वाले आणि कोण इतर ते समजले. चेर्चा उदबोधक होत चालली आहे. पाय कसा मोडायचा (अक्षराचा) ते कोणी सांगावे.
  • Log in or register to post comments

तेच अक्षर दोनदा टंकुन मग

मराठी_माणूस
Sun, 02/19/2012 - 13:26 नवीन
तेच अक्षर दोनदा टंकुन मग backsapce वापरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

ही चर्चा वाचून एक सुचले तसे

अन्या दातार
Sun, 02/19/2012 - 14:01 नवीन
ही चर्चा वाचून एक सुचले तसे इथे मांडत आहे. यातले गुण-दोष वगैरेवर मी फारसा विचार केला नाहीये. आयटी कंपन्यांमधून कितीतरी मनुष्यबळ बेंचवर (पक्षी फुकट जाणारे मॅन-अवर्स) असतात. मान्य कि काही लोक अनऑफिशिअली काही प्रोजेक्ट्सवर वापरले जातात. पण बाकीच्या लोकांना पगार देऊन बिनकामाचे पोसावे लागते. नुसते बेंचवर माश्या मारत बसवण्यापेक्षा छोटी छोटी मॉड्युल्स बनवण्यासाठी वापरले तर चालणार नाही का? उदा. एखादे मॅथेमॅटीकल सॉफ्टवेअर डोळ्यापुढे ठेवा. बेंचमार्क सॉफ्टवेअरः मॅटलॅब. आणि करा एक एक मॉड्युल. मॅट्रिक्स अ‍ॅडिशन, मल्टीप्लिकेशन वगैरेचे कोड तर नुकतेच इंजिनीअर झालेले लोक पण बनवू शकतात. त्यात हळूहळू सुधारणा करत गेल्यास ३-४ वर्षातच एखादे चांगले सॉफ्टवेअर डेव्हलप का होणार नाही? घेतलेल्या लोकांचे स्किलसेट वाढेलच, शिवाय कंपनीला काही रेवेन्युपण तयार होऊ शकेल.
  • Log in or register to post comments

चांगली सुचना

कुंदन
Sun, 02/19/2012 - 14:42 नवीन
चांगली सुचना , विकांताला अमलात आणुन बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

छान

चिरोटा
Mon, 02/20/2012 - 12:13 नवीन
ही कल्पना चांगली आहे. मोठ्या भारतिय आय टी कंपन्या अशा प्रकारचे काही बनवतही असतात. प्रॉड्कट्स नव्हे पण पोर्टल्स,साईटस वगैरे व त्याचा उपयोग कस्टमर मिळवण्यासाठीही केला जातो. पण मॅटलॅब म्हणजे पॅकेज सॉफ्ट्वेयर बनवण्यासाठी फक्त programming skills पुरेशी असतात का? विज्ञानविषयक सॉफ्ट्वेयर बनवण्यासाठी dedicated staff पाहिजे असे माझे मत आहे. त्या विषयीचे ज्ञान असलेल्या व्यक्तीही हव्यात.( I T च्या भाषेत domain knowledge असलेला). अशा प्रकारच्या सॉफ्ट्वेयरवर काम केलेले कुणी आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

सहमत...

वपाडाव
Mon, 02/20/2012 - 14:46 नवीन
विज्ञानविषयक सॉफ्ट्वेयर बनवण्यासाठी dedicated staff पाहिजे असे माझे मत आहे. त्या विषयीचे ज्ञान असलेल्या व्यक्तीही हव्यात.
हा मुद्दा मी पुर्वीही सांगितला आहे, तो इथे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

सोकाजी रावांच्या प्रतिसादाशी

मदनबाण
Sat, 09/19/2020 - 20:04 नवीन
सोकाजी रावांच्या प्रतिसादाशी मी सहमत आहे, मी आयटीतील ३ र्‍या पिढीचा,म्हणजे आउट सोर्सिंगचा पिक अनुभवणार्‍या पिढीतील. माझ्या मते आपण डिजिटल स्लेव्हरी मध्ये आहोत आणि या स्लेव्हरीतुन जर बाहेर पडायचे असेल तर जश्या अमेरिकन कंपन्या इकोसिस्टिम तयार करतात त्याच तोडीचे किंवा त्याहुन सरस इकोस्टिम आपण बनवली पाहिजे होती ! [ उदा. हिंदुस्थानातील स्मार्टफोनची जवळपास ९७% बाजारपेठ ही अँड्रोइड ओएसवर आहे म्हणजेच गुगल ही इकोसिस्टिम पूर्णपणे नियंत्रित करते. ] या ३ पिढ्यांच्या काळात भारतीय आयटी कंपन्यांनी बक्कळ नफा मिळवला आहे परंतु या क्षेत्रात असुन त्यांनी राष्ट्रासाठी तसेच येणार्‍या आयटी जनरेशनसाठी त्यांनी विचार केला नाही. @ बिरुटेसर 'बक्कळ पैसा जास्त डोके न लावता' असं आयटीत आहे म्हणे. आयटी हा महासागर आहे, फक्त प्रोग्रॅमिंग म्हणजे आयटी नाही आणि प्रोग्रॅमिंग करायला देखील डोक लागतच ! आयटीतील सर्वात क्रिटिकल भाग म्हणजे ट्रबल शुटिंग आणि सपोर्ट वर्क ! ट्रबल शुटिंग म्हणजे माहित नसलेल्या आणि अचानक उप्तन्न झालेल्या समस्येवर / त्रुटी वर कमीत कमी वेळेत अचूक सोल्युशन देणे. या सोल्युशन देण्यावर क्लायंटचा बिझनेस इंपॅक्ट अवलंबुन असतो... सोल्युशन देण्यास जितका उशिर तितका क्लायंटला तोटा अधिक त्यामुळे क्लायंट कडुन ट्रबल शुटिंग आणि सपोर्ट वर्क वर सर्वात अधिक दबाव निर्माण केला जातो आणि कंपनीच्या टिमकडुन अर्थातच टिमवर. ट्रबल शुटिंग करणारा कन्सल्टंट हा मल्टिटास्किंग करतो, म्हणजे एकाच वेळी तो, चॅटवर क्यायंटशी, त्याच्या मॅनेजरशी बोलत असतो, फोनवर कॉल घेत असतो, मेल ला रिप्लाय देत असतो आणि मुख्य म्हणजे ज्या सिस्टिम मध्ये इश्यू निर्माण झालेला असतो त्या सिस्टिम चे ट्रबल शुटिंग देखील करत असतो... हे सर्व करताना तो प्रचंड ताणात असतो, हे सर्व करताना तो त्याच्या मेंदूवर प्रचंड ताण देतो ज्याच्या परिणाम स्वरुप इश्यू चे सोल्यूशन मिळवले जाते. [ हे काम २४ x ७ चालते. ] शिफ्ट मध्ये काम करणारे कर्मचारी यात सगळ्यात जास्त भरडले जातात कारण ते शरिराच्या नैसर्गिक वेळेच्या विरुद्ध काम करतात. याचे परिणाम हे पुढे आयुष्यभर सहन देखील करावे लागतात / लागू शकतात. साधारण ट्रबल शुटिंग आणि सपोर्ट वर्क करणारा व्यक्ती मल्टिटास्किंग मध्ये चँपियन झालेला असतो... मल्टिटास्किंग म्हणजे अनेक ठिकाणी एकाच वेळी लक्ष देउन काम करणे याचा दुसरा अर्थ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी करणे ! थोडक्यात तुम्ही डिस्ट्रॅक्शन प्रॅक्टिस करता, रोज, अनेक महिने , अनेक वर्ष ! जी गोष्ट तुम्ही रोज प्रॅक्टिस करता त्यात तुम्ही तरबेज बनता हा गुणधर्म आहे, त्यामुळे साधारण १०+ वर्ष मध्ये या प्रोफाइल मध्ये घालवलेली लोक त्यांची लक्ष केंद्रीत करायची क्षमताच गमावून बसतात आणि नविन तंत्रज्ञान शिकण्यास ते असमर्थ ठरतात.अश्या अनेक गोष्टी आयटीच्या महासागरात आहेत, प्रत्येकाचे अनुभव हे वेगळे असतात. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tera Ghata | Gajendra Verma Ft. Karishma Sharma | Vikram Singh | Official Video
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा