राजगड संवर्धन मोहीम २०१२
रामराम मंडळी,
राजगड! श्री शिवछत्रपतिंची प्रथम राजधानी! नावाप्रमाणेच असलेल्या ह्या राजगडाची आज अवस्था मोठी वाईट आहे. पडझड, रानगवत, पर्यटकांनी केलेला कचरा अशा निरनिराळ्या अडचणींनी हा गड आपलं मुळचं वैभव हरवून बसला आहे. गडाची देखभाल तसेच दुरुस्ती करुन हा सांस्कृतिक ठेवा जतन करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
काही दुर्गप्रेमी..खरेतर गड-किल्लेवेड्या मित्रांनी एकत्र येऊन अशाच निरनिराळ्या गड-किल्ल्यांची, लेण्यांची गुहांची दुरवस्था न पहावून ह्या ऐतिहासिक ठेव्यांचे संगोपनाचे शक्य तितके वैयक्तिक प्रयत्न सुरु केले. वैयक्तिक पातळीवर सुरु झालेल्या ह्या प्रयत्नांचे रुपांतर कामे आणि समविचारी लोक वाढत गेल्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेत झाले. हीच ती 'श्री शिवदुर्ग संवर्धन' संस्था.
श्री शिवदुर्ग संवर्धन वेळोवेळी निरनिराळ्या गडांवर साफसफाई, डागडुजीचे काम करत असते. ह्यातीलच एक उपक्रम येत्या शिवजयंतीच्या काळात पहिल्या राजधानीच्या - राजगडाच्या संवर्धनाचा आहे. त्याबद्दलची माहती मिपाकरांना द्यावी म्हणुन हा लेखनप्रपंच.
----------------------
राजगड संवर्धन मोहीम २०१२
शिवदुर्ग संवर्धन ही ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचे काम करणारी नोंदणीकृत स्वयंसेवी संथा आहे. सध्या आम्ही राजगड,तुंग,तिकोना,रोहीडा आणि रायरेश्वर या किल्ल्यांवर पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परवानगीने आणि देखरेखीखाली काम करत आहोत. राजगडाच्या संवर्धनासाठी आम्ही २०१० पासून कार्यरत आहोत.या अंतर्गत आम्ही राजगडाच्या बालेकिल्ला तसेच पालीगाव ते पाली दरवाजा या मार्गाच्या संवर्धनाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
या कामाचा विस्तार आणि गरज लक्षात घेऊन आम्ही राजगड संवर्धनाची महत्वाकांक्षीमोहीम हाती घेतली आहे आणि यासाठी आपल्या मदतीची तसेच सहभागाची गरज आहे. राजगड संवर्धन मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन आम्ही आपल्याला करत आहोत. ही मोहीम शनिवार १८/०२/२०१२ तेसोमवार २०/०२/२०१२ या तीन दिवसात राबवली जाईल.
उद्देश व कामाचे स्वरुप :-
संजीवनी माची : संजीवनी माची वरील चिलखती तटबंदी हा बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे.सध्या या दुहेरी तटबंदीवर रानटी झाडे तसेच वेली वाढलेल्या आहेत व दुहेरी तटबंदीतील मधल्या जागेत दगड व माती साचून मार्ग बंद झालेला आहे. मोहीमेअंतर्गत आपण या तटबंदीच्या संवर्धनाचे काम हाती घेणार आहोत.
पद्मावती माची :- नैसर्गिक कारणांमुळे तसेच उपद्रवी पर्यटकांच्यामुळे पद्मावती माची व त्यावरील पाण्याच्या टाक्या अत्यंत वाईट परिस्थितीत आहेत. या माचीच्या स्वच्छता व संवर्धनाचे काम आपण पार पाडणार आहोत.
सहभाग व नोंदणी :-
या मोहीमेत आपण १८ ते२० फेब्रुवारी किंवा यापैकी कोणत्याही दिवशी आपल्या सोयीनुसार सहभागी होऊ शकता. स्वयंसेवकांनी नावनोंदणी दि.१६ फेब्रुवारी २०१२ पूर्वी करणे आवश्यक आहे. नोंदणी शुल्क रु. १००/- राहील. मोहीमेदरम्यान आपल्या भोजन व निवासाची सोय संथेमार्फत करण्यात येईल.
नोंदणीसाठी संपर्क :
info@shrishivdurgasamvardhan.org यावरती इ-पत्र पाठवा, अथवा खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
९८२३१६७०७८ - कोथरुड /९४२२३०५२७९ - हडपसर व नगर रोड / ९८५०५२००५८ - शनिवारपेठ /
९४०४९६३९७३ पिंपरी चिंचवड / ९८२३४५७०६० सिंहगड रोड.
ऐच्छिक देणगी :-
कामाचे स्वरुप तसेच आवाका पाहता, श्रमदानासोबतच ह्या प्रकल्पाला आर्थिक मदतीचेही पाठबळ मिळाल्यास कार्य उत्तमरित्या पार पडेल. ज्यांना श्रमदान करण्यासाठी येणे काही कारणांनी शक्य नाही, परंतु ह्या मोहिमेला हातभार लावण्याची इच्छा आहे, ते संस्थेला कार्याकरिता देणगी देऊ शकतात.
श्री शिवदुर्ग संवर्धन. पुणे ह्यांच्या राजगड संवर्धन मोहिमेची विस्तृत माहिती , वेळापत्रक आणि देणगीसाठी लागणारी माहिती ह्या दुव्यावर मिळेल.
----------------------
मित्रांनो,
एक शनिवार-रविवार श्रीशिवबाराजे आन् राजगडाला देऊया! जास्तीत जास्त हात ह्या कामासाठी झटावेत. ज्यांना गडावर येणे शक्य नाही, त्यांनी आर्थिक हातभार लावावा आणि ही मोहिम यशस्वी करण्यात सिहाचा वाटा उचलावा अशी मी सर्वांना विनंती करतो.
भेटूच राजगडावर.
तोवर, जय भवानी!
----------------------------------------------------------------------------------------
टीपः सदर प्रकल्प तसेच सदर संस्था ह्यांच्या आर्थिक व्यवहारांशी मिसळपाव.कॉम, मिसळपाव.कॉम व्यवस्थापन ह्यांचा कोणताही संबंध नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अतिशय कौतुकास्पद आणि स्तुत्य
+ १ हेच म्हणते शुभेच्छा
कष्ट कराय नगु वाटत असंन तर
धन्यवाद...
शुभेच्छा!
शनिवार रविवार येण्याचे ठरवत
दोन्ही दिवस मोकळा असल्याने मी
यप्प... म्या बी येतोय
+१
शुभेच्छा. येण्याचे ठरवत आहे.
मी २० तारखेला पण सुट्टी काढुन
गडांचा राजा, राजांचा गड
शुभेच्छा..!!
सर्व गडप्रेमी संवर्धकांना
स्तुत्य उपक्रमास माझ्याही
गडावर भेटूच !
उत्तम!
अतिशय स्तुत्य प्रकल्प ... हे
अतिशय कौतुकास्पद आहे हे..अशा
कदाचित कल्पना उत्तम आहे. पण
संवर्धन
प्रथम, अतिशय स्तुत्य उपक्रम.
गवि .. वर वर जरी हे योग्य
तुझ्या मताला विरोध
@ गवि : रायगड रोपवे जोगांकडे
.
उपक्रमास शुभेच्छा!
उपक्रमाला शुभेच्छा!
छानच प्रकल्प.
उत्तम प्रकल्पाला शुभेच्छा
वाईट वाटले. इथे शुभेच्छा
अनेक शुभेच्छा...!
शुभेच्छा!
अतिशय चांगला आणि उत्तम
चे.पु.वर सापडलेला एक छान फोटो.
छान उपक्रम
धन्यवाद मंडळी,
मोहिम फत्ते !