''ऐकव ना रे तुझी जुनी ती कविता''
म्हणते सखी मला, अन् हळूच हसते ।
तळहातांवर चेहरा घेउन,
उत्सुकतेने समोर बसते ।
समजत नाही काय करावे,
जुनीच कविता मांडावी? की स्वस्थ बसावे-
-समोरची वाचावी कविता?
वाचू देते खुशाल तीही,
केवळ माझ्या कवितेकरता ।
क्षणाक्षणाला अधिरा होतो रंग तिचा,
मी बुडू लागतो तिच्यात, तेव्हा
पुनश्च हसते, अन् उंचावुन भुवया म्हणते,
विसरलास का रे कविता ती?
उत्तर देण्याइतके नसते भान मला,
मी तिलाच केवळ पाहत बसतो,
बऱ्याचशा माझ्या कवितांचा
जन्माचा क्षण असाच असतो !!
- चैतन्य
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
3893
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
उत्तर देण्याइतके नसते भान
वाह..
छान
+१
In reply to छान by मिसळलेला काव्यप्रेमी
सुंदर कविता
छान.
वा!
वाह !!
मस्त...!!!
मस्त रे चैतन्य.
खुप छान !!!
सु रे ख...
छान रे चैतन्य! इतके दिवस कुठे
+१
In reply to छान रे चैतन्य! इतके दिवस कुठे by मेघवेडा
+२
In reply to +१ by पैसा
+३
In reply to +२ by प्यारे१
सुंदर. . छान वाटलं वाचून ....
कविता छान आहे.
मस्त.. आवडली कविता. --टुकुल
उत्तर देण्याइतके नसते भान
छानच
छान रे!
धन्यवाद
ही सुंदर कविता वर आणते आहे.
सुन्दर..
खासच आहे कविता!