Skip to main content

ऐकव ना रे तुझी जुनी ती कविता...

Published on गुरुवार, 02/02/2012
''ऐकव ना रे तुझी जुनी ती कविता'' म्हणते सखी मला, अन् हळूच हसते । तळहातांवर चेहरा घेउन, उत्सुकतेने समोर बसते । समजत नाही काय करावे, जुनीच कविता मांडावी? की स्वस्थ बसावे- -समोरची वाचावी कविता? वाचू देते खुशाल तीही, केवळ माझ्या कवितेकरता । क्षणाक्षणाला अधिरा होतो रंग तिचा, मी बुडू लागतो तिच्यात, तेव्हा पुनश्च हसते, अन् उंचावुन भुवया म्हणते, विसरलास का रे कविता ती? उत्तर देण्याइतके नसते भान मला, मी तिलाच केवळ पाहत बसतो, बऱ्याचशा माझ्या कवितांचा जन्माचा क्षण असाच असतो !! - चैतन्य
लेखनविषय:

वाचन संख्या 3893
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

मस्त कविता. कविता वाचताना मिपाकर कवि गणेशा डोळ्यांसमोर तरळून गेले.

उत्तर देण्याइतके नसते भान मला, मी तिलाच केवळ पाहत बसतो, बऱ्याचशा माझ्या कवितांचा जन्माचा क्षण असाच असतो !!....बाकी कविता ठिकठाक...पण शेवट म्हणजे मात्र शेवटच झालाय..मस्त जमलाय

छान जमलीये.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

असेच म्हणतो. (जिलब्यापाडू नवकविन्च्या आयुष्यात असे काव्यनिर्मितीचे सुरेख क्षण लवकरच येवोत यासाठी शुभेच्छा)

छान.

वा!

उत्तर देण्याइतके नसते भान मला, मी तिलाच केवळ पाहत बसतो, बऱ्याचशा माझ्या कवितांचा जन्माचा क्षण असाच असतो !!
वाह !!

In reply to by पैसा

मनमेघ... ऐसेच लिखते रहो....!

In reply to by प्यारे१

+३

तळहातांवर चेहरा घेउन, उत्सुकतेने समोर बसते
या वरून खूप लहान असताना वाचलेली एक गोष्ट आठवली. त्यात एक म्हातारी चेटकीण स्वतःचं डोकं मांडीवर ठेउन डोक्यातल्या उवा काढत बसलेली असते. पुढे खूप दिवस ही म्हातारी नंतर स्वप्नात येत असे. आणि नंतर असा प्रश्न पडला होता की डोळे तर त्या डोक्यालाच असणार मग ती उवा कशी शोधणार? :)

उत्तर देण्याइतके नसते भान मला, मी तिलाच केवळ पाहत बसतो, बऱ्याचशा माझ्या कवितांचा जन्माचा क्षण असाच असतो !! मस्त

आवडली कविता! शेवटचे कडवे खूप सुंदर.. :) राघव

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार. -चैतन्य.