✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खुशाली कळवत राहा ..!!

फ — फिझा, गुरुवार, 02/02/2012 - 13:59
आता नावे पुसली गेली असतील किनाऱ्यावरची ........... आता उनेही सहन होत असतील डोंगरावरची ........... आता पावसात पक्षीही भिजत असतील झाडावरचे .............. पण .......असो....... खुशाली कळवत राहा ........ किनारे हे भांडण्यासाठी असायचे आणि समजवण्यासाठी ..... डोंगर हे फिरण्यासाठी असायचे आणि छेडण्यासाठी ..... झाडे हि सावलीसाठी असायची आणि भिजण्यासाठी ...... पण .........असो........ खुशाली कळवत राहा ........ शंख अन शिंपले देणे घेणे व्हायचे... डोळ्यातील आसवांचे येणे जाणे असायचे... उन सावलीचा खेळ खेळायचा ... हातातला हात न कधी सोडायचा ... भिजताना पाहायचे एकमेकांना .. आणि चिंब बरसणाऱ्या पावसाला ..... पण .........असो........ खुशाली कळवत राहा ........ आता आठवणी या अशाच दाटायाच्या, काहीतरी विसरण्यासाठी..... जीवन हे असेच चालायचे , कुठेतरी थांबण्यासाठी ... पत्र हे असेच लिहायचे , कधी न धाडण्यासाठी .... पण .........असो........ खुशाली कळवत राहा ........
  • खुशाली कळवत राहा ...(2)
  • खुशाली कळवत राहा ....... (३)

Book traversal links for खुशाली कळवत राहा ..!!

  • खुशाली कळवत राहा ...(2) ›

प्रतिक्रिया द्या
3138 वाचन

💬 प्रतिसाद (17)

मस्त

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 02/02/2012 - 14:07 नवीन
मस्त! मस्त!! मस्त!!!
  • Log in or register to post comments

व्वा व्वा ... आवडली

सुहास झेले
गुरुवार, 02/02/2012 - 14:18 नवीन
व्वा व्वा ... आवडली :) :)
  • Log in or register to post comments

छान

मूकवाचक
गुरुवार, 02/02/2012 - 14:30 नवीन
कविता आवडली. हे आमच्या लाडक्या नवोदित कविवर्गासाठी - आता पोटे टम्म फुगली असतील खाणार्यान्ची ...... आता हात भरून आले असतील तळणार्यान्चे ....... आता साठा सम्पत आला असेल हवाबाण हरडेचा ...... पण ...... असो ...... जिलब्या तळत रहा ....
  • Log in or register to post comments

पण ...... असो ...... जिलब्या

मोहनराव
गुरुवार, 02/02/2012 - 14:36 नवीन
पण ...... असो ...... जिलब्या तळत रहा ....
सहीच!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

... !!!

सुहास झेले
गुरुवार, 02/02/2012 - 14:36 नवीन
=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

पण ...... असो ...... जिलब्या

प्रचेतस
गुरुवार, 02/02/2012 - 14:59 नवीन
पण ...... असो ...... जिलब्या तळत रहा ...
आणि सतत पाकात बुडवत राहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

=)) =)) =))

यकु
गुरुवार, 02/02/2012 - 17:06 नवीन
=)) =)) =)) =)) विडंबनसंभाव्यता प्रचुर काव्य! आणखी थोडं लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे वा!

sneharani
गुरुवार, 02/02/2012 - 14:41 नवीन
सुंदर, मस्त कविता! :)
  • Log in or register to post comments

छान!

मेघवेडा
गुरुवार, 02/02/2012 - 15:08 नवीन
छान! :)
  • Log in or register to post comments

खुपच मस्तं कविता... अगदी

उदय के'सागर
गुरुवार, 02/02/2012 - 15:12 नवीन
खुपच मस्तं कविता... अगदी अश्शी भिडली मनाला ... छानच!
  • Log in or register to post comments

मस्त!!!

प्रीत-मोहर
गुरुवार, 02/02/2012 - 15:37 नवीन
मस्त!!! :)
  • Log in or register to post comments

कविता आवडली

जाई.
गुरुवार, 02/02/2012 - 15:51 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments

छान कविता

पैसा
गुरुवार, 02/02/2012 - 15:52 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments

सुरेख कविता !

श्यामल
गुरुवार, 02/02/2012 - 16:32 नवीन
सुरेख कविता ! आवडली.
  • Log in or register to post comments

कविता सुरेख...

वपाडाव
गुरुवार, 02/02/2012 - 17:35 नवीन
अश्याच कविता येउ द्या... अवांतर :: ह्या विडंबनकारांना आवर घातला पैजे... नको तिथे हलवाइ उभे करतात... काय चाल्लंय काय...
  • Log in or register to post comments

कविता लाजवाब

गणेशा
गुरुवार, 02/02/2012 - 23:27 नवीन
कविता लाजवाब
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

इन्दुसुता
Fri, 02/03/2012 - 00:27 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा