✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

करंssट-मिसळ(४४० व्होल्ट)

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Wed, 02/01/2012 - 13:38  ·  लेख
लेख
बरेच दिवस लिहिन..लिहिन म्हणत होतो,,,सौरभनी काल आमच्या या करंट मिसळची अठवण करुन दिली ,आणी आज मुहुर्त लागला...तर ठाकाण कोणतं..? अमच्या(च)मंगला टॉकिज बाहेर वॉल्सवॅगेनचं शोरुम हाय ना त्येच्या भायेर...अगदी रोडटच.हे आमचे करंट मिसळचे जन्मदाते मामा आणी त्यांची त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच मिसळची गाडी ओपनींगची येळ मंजी सामान्यपणे म्युन्सिपाल्टीतले,पिएमटितले (आणी पी-एम.टि.तले) चाकरमानी, सक्काळी सक्काळी ७ते९ यादरम्यान कामाला भायेर पडतात त्या येळची. गाडीचा लवाजमा लागे लागे पर्यंत खाणार्‍यांची पण लाइन लागते.या मिसळला आंम्ही करंट मिसळ का म्हणतो? याचं इंगित जेवढं मिसळच्या तर्रीत आहे,तेवढच ते खाणार्‍या अट्टल गिर्‍हाइकातही आहे...सामान्य भूक भागवणारे जसे इथे येतात,तसे पट्टीचे मसालेदार डोक्यात करंट येइपर्यंत तिखट खाणारेपण इथेच येतात.सायकलवर टांग मारुन कामाला पळणारे-घरुन सकाळची भाकर किंवा चपात्यांची चवड घेऊन मिसळ हानायला बी हितच येतात,तसे रातीची ओव्वर-फुल्ल झाल्याले सकाळी उतरल्यावर उतारा-काढायला किंवा परत दुपार पर्यंत टांग्यातच बसुन र्‍हायला पण इथच येतात,टांगापल्टिंच्या शब्दशास्त्रानुसार हिला कॉटरमिसळ किंवा फुल्ल-ब्याट्रीचार्जमिसळ असंही नाव आहे. ब्याट्रीचार्ज साठी काढुन ठेवलेली तर्री :-) आणी आपण फक्त दिल से खाणारे असू तरी हिची नशा त्यांच्या इतकीच अपल्यालाही झाल्याशिवाय रहात नाही..आमच्या मामांची मिसळ जर का मनापासुन अनुभवायची असेल तर फक्त एकच अट आहे.अट ही की सक्काळी ११च्या आत जायला हवे.आणी पोटात वैश्वानरानी अरोळी मारलेली असायला हवी.मिसळ खाल्यापासुन पुढिल तीनएक तास कामाचं कोणतही ओझं डोसक्यावर नको...म्हणजेच पोटाइतकच मनही रिकामं हवं.नायतर देवर्शनाला जाताना मानात दुसरे इतर भाव असले तर ते गणित फसतं, आणी देवाचं दर्शन होण्याऐवजी नुसतच देवळाचं दर्शन होतं..तसं होइल हां अजुन एक पेशालिटि हाय बरं का..! मिसळ मंजे फक्त जाळ तिखट असच इथे गणित नाहीये.सामान्या पणे मिसळ इथे आपल्याला मानवेल अशी म्हणजे तिन टाइपमधे दिली जाते. १)तर्री मिसळ२) लाइट मिसळ३) व्हाइट मिसळ हे तिन सामान्य प्रकार पण त्याशिवाय आपल्याला हवं ते काँबिनेशनही इथे घडवुन मिळतं,मंजे पोहे मिसळ,बटाटा भाजी पेशल मिसळ,किंवा आम्हाला-लागणारी फक्त फरसाण मिसळ... एरवी त्यांनी दिलेली मिसळ म्हणजे शांपल+ मटकी/मूग किंवा वाटाण्याची उसळ+फरसाण+शेव....जोडिला रोज सकालीच येणारे ताजे पाव आणी कांदा/लिंबू/तर्री-शांपल लागल तेवढं आपण(मागुन) घेतलं नाही तरी मामा वरनं विचारतात,टाकू का गरम...आणी काम करणार्‍या पोरांना हाळी देत असतात-'ए...लाइट दे रे खाली'...'मागच्या बाकाला पाव लाव'...'या तात्या...(तात्यांची रात्र ओळखत..) आजा डबल तर्री दिऊ का..?,बसा खाली वार्‍याला'' शंकराच्या देवळात जसे पुजारी आणी भक्तांचे हुंकार मंत्र अरोळ्या ऐकू येत असतात..तस आमच्या मामांच्या गाडिवरच वातावरण खरोखरीचं भक्तिमय असतं..(नाटकी गिर्‍हाइक इथे टिकत नाही,ते काही दिवसातच शेजारीच असलेल्या तसल्याच गाडीवर जातं) यात पलिकडं ती लाल गाडी दिसतीये..बघा तुंम्ही एकदा इथले मेंबर झालात की तुमची मिसळही त्यांच्या री-मेंबरमधे जाते...इथला पुलाव वडे पोहे या साइड डिशपण अगदी साध्या दिसणार्‍या पण वेगळ्या चविच्या आहेत...उसळ फरसाण मारलेले पोहे बी झ्याक..आणी गरम काढलेला वडा तितक्याच गरम शांपल बरोबर कपाळावर आणी अन्यत्र ;-) घाम येत असला तरी खाण्यात तेवढीच मज्जा. आरोग्यदायी कवि कल्पनांच्या आहारी गेलेल्यांचा हा प्रांतच नव्हे,,,त्यांनी आपलं स्वच्छ आरोग्य भुवनातच जावं ..हां,,,पण मनाचं आरोग्य बिघडलं तर मात्र त्यांनाही आमच्या मामांच्या गाडिवर कमित-कमी ६महिने यावे लागेल. कारण अमच्या दृष्टीनी पोट भरण्या इतकीच मानसिक आरोग्य फुलवणारी वाढवणारी ही जागा हाय...कारण ही मिसळ जितकी चढते,डोक्यातही जाते,अगदी केस उभे करते,डोक्यात घाम काढते...तितकीच खाऊन झाल्यावर आपल्या आवडी नुसार कडक चहा,पान,तंबाखू,शिगरेट याच्या साथिनी पुन्हा बहरते देखिल(म्हणुनच हिला कॉटर मिसळ म्हणतात ;-) ) फक्त ही मिसळ घरी आणुन खाण्याचे पातक करू नाही,पांडुरंग घरी आणत नसतात,त्याच्या भेटीलागी पंढरपुरासी जावे लागते...तसेच अमच्या मामांच्या मिसळचे आहे...पारावरच्या मारुतीसारखं बारा महिने तेराकाळ भक्तांसाठी खुलं असलेलं मिसळ मंदिर हे काही अजुन फोटो,,,विशेषतः तर्री कशी बनते त्याचे काढलेले--- १)पातेलं पाणी कडधान्य घेऊन शिजायला लागतं २)त्यात बटाट्याची वडे करायची भाजी मिसळली जाते ३)नंतर ते मिसळण आणखि पाण्यासह घालुन पातेलं टॉप-अप केलं जातं ४)अता त्याला तर्री पडनार हाय... त्यासाठी एका भांड्यात आधी खणखणीत तिखट ५)मग त्याहुन झणझणीत स्पेशल फक्त तिखटच असलेल्या मिर्च्यांचा मसाला ६)अता त्यो गरम त्येलात घोळला जातोय... ७) ही...लागली बघा तर्री.....१) २) ८)अता हे बघा ३ब्रँड-संपत आलेली व्हाइट(आमच्या लेखी बेचव..!)-तळाला गेलेला मग, दुसरा फुल्ल भरलेला पिवळसर लाइट (आमचा ब्रँड-करंटवाला),आणी मागे तिसरा कॉटरमिसळ ब्रँड ९)उसळ फरसाण पोहे १०)साधासुधा-पण बासमतीच्या तोंडात मारेल असा-पुलाव ११)हे आमचे हरहुन्नर्री आवाज देणारे मामा १२) आणी हे त्यांचे तेवढेच फिल्मी राम/लखन(मंगला टॉकिज शेजारी,राम लखन तयांचे अंतरी ;-) ) १२) आणी सगळ्यात शेवटी ही भल्याभल्यांची नशा उतरवणारी आणी चढवणारी देखिल-टॉप-अप पातेल्यातील पहिल्या तर्रीची वाटी....मिसळचं आणी आमचं जिवनतत्वही आणी जिवनसत्वही
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
साहित्यिक
समाज
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
आस्वाद
लेख
अनुभव
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
42374 वाचन

💬 प्रतिसाद (144)

प्रतिक्रिया

भन्नाट हो गुर्जी झटका लागला

स्पा
Wed, 02/01/2012 - 13:44 नवीन
भन्नाट हो गुर्जी झटका लागला ब्वा :)
  • Log in or register to post comments

लै भारी हो गुर्जी. एकदा तिथली

प्रचेतस
Wed, 02/01/2012 - 13:50 नवीन
लै भारी हो गुर्जी. एकदा तिथली मिसळ खाल्याचं पुसटसं आठवतय. चटकदार तर्री बघूनच आमची जिव्हानंदी टाळी लागलीय. जाऊ आता लवकरच मिसळ हाणायला.
  • Log in or register to post comments

____/\____ काय तर्री आहे का

यकु
Wed, 02/01/2012 - 13:53 नवीन
____/\____ काय तर्री आहे का ज्योक? तिखट आवडतं, पण त्या रक्तवर्णी तर्रीला जिभेवर घ्यायची टाप नाय होणार ब्वॉ आपली. (मिसळप्रेमी) यशवंत
  • Log in or register to post comments

पुण्यात येणार आहेस ना.

चिंतामणी
Wed, 02/01/2012 - 14:17 नवीन
त्यावेळी खाउन बघु. वरती वाचले नाहीस का??? :) :-) :smile: आपल्याला मानवेल अशी म्हणजे तिन टाइपमधे दिली जाते. १)तर्री मिसळ२) लाइट मिसळ३) व्हाइट मिसळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

२) लाइट मिसळ पुण्‍यात आल्यावर

यकु
Wed, 02/01/2012 - 15:28 नवीन
२) लाइट मिसळ पुण्‍यात आल्यावर बुक् आहेच हो चिंतुकाका ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

तुझी बुकींगची कल्पना आहे मला.

चिंतामणी
Wed, 02/01/2012 - 15:33 नवीन
:bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

जबर्या

राजघराणं
Wed, 02/01/2012 - 13:56 नवीन
ही नाय मिलनार.. पण मिळेल ती मिसळ खायला आम्ही हापिसातून बाहेर पड्त आहोत
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Wed, 02/01/2012 - 14:00 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजघराणं

लै भारी गुर्जी. भन्नाट!

मोहनराव
Wed, 02/01/2012 - 13:59 नवीन
लै भारी गुर्जी. भन्नाट!
  • Log in or register to post comments

चला तर मंग...

वपाडाव
Wed, 02/01/2012 - 14:02 नवीन
एकदा जाळ काढुन बघुच म्ह्ण्तो मी....
  • Log in or register to post comments

अन्नदाता सुखी भव !!!

गणपा
Wed, 02/01/2012 - 14:04 नवीन
अन्नदाता सुखी भव !!! :)
  • Log in or register to post comments

बाकी झणझणीत तर्रीदार मिसळ

प्रचेतस
Wed, 02/01/2012 - 14:12 नवीन
बाकी झणझणीत तर्रीदार मिसळ बनवणारे मामा मात्र एकदम सात्विक प्रवृत्तीचे दिसत आहेत. :)
  • Log in or register to post comments

@मामा मात्र एकदम सात्विक

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/01/2012 - 19:28 नवीन
@मामा मात्र एकदम सात्विक प्रवृत्तीचे दिसत आहेत. >>> तीच तर मज्जा हाय....अशी चव देणारा माणुस सात्विकच असतो,,,ते भणंग प्रवृत्तीचे कामं नोहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

++ १

अमित दळवे
Fri, 02/03/2012 - 01:54 नवीन
++ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अल्टिमेट मिसळवृत्तांत..

गवि
Wed, 02/01/2012 - 14:17 नवीन
अल्टिमेट मिसळवृत्तांत.. डीटेलवारीची दाद देत आहे...
  • Log in or register to post comments

+ १

मेघवेडा
Wed, 02/01/2012 - 14:40 नवीन
अल्टिमेट मिसळवृत्तांत.. डीटेलवारीची दाद देत आहे...
खरंय.. टाळ्याच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१११

मी-सौरभ
Wed, 02/01/2012 - 15:04 नवीन
टाळ्यांचा कडकडाट :) अशी ही मिसळगाथा ऐकलेल्या सर्व मिसळप्रेमींना ही मिसळ खाणेसाठी हार्दीक निमंत्रण....(वेळ, सोबत्=आवड आपली आपली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

+२

रमताराम
Wed, 02/01/2012 - 18:03 नवीन
ऐसाईच बोल्ताय. फटूंनी मार डाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

खल्लास......

मुक्त विहारि
Wed, 02/01/2012 - 14:37 नवीन
आत्ताच मस्त पैकी चिकन बिर्याणि आणि झिन्गा रस्सा ओरपुन आलो आणि समोर परत अशी मिसळ,,,,,,परत भारतात जायची ओढ लागली.... सिग्रेट्....तम्बाखु...मिसळ...आणि मद्य-पान... विसरायला लावतात देह-भान....
  • Log in or register to post comments

वढ ए वढ... हाण्ण्ण्ण्ण तिज्या

प्यारे१
Wed, 02/01/2012 - 14:46 नवीन
वढ ए वढ... हाण्ण्ण्ण्ण तिज्या मारी. ;) खंग्री तर्री नि मिसळ. भटजी , मानलं आपल्याला. आत्ताच जेवलेलो हो... परत भूक लागली की!
  • Log in or register to post comments

आयचा घोव...

सुहास झेले
Wed, 02/01/2012 - 15:10 नवीन
भन्नाट एकदम ... काय बोलू? बोलती बंद ;) आता निव्वळ ह्या मिसळीसाठी पुणे दौरा करावा म्हणतो.... :) :)
  • Log in or register to post comments

ह्या मिसळीसाठी पुणे दौरा

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/01/2012 - 19:39 नवीन
ह्या मिसळीसाठी पुणे दौरा करावा म्हणतो.. >>> याच... याच(साठी) केला,लेखा अट्टाहास, तो योग खास,मामा मिसळीचा... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

मस्त ओळख!

नगरीनिरंजन
Wed, 02/01/2012 - 15:17 नवीन
काय टिपायचं आणि काय सांगायचं ते जमलेलं आहे!
  • Log in or register to post comments

+१

मनराव
Wed, 02/01/2012 - 15:21 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

एकदम भारीच!!

Maharani
Wed, 02/01/2012 - 15:24 नवीन
एकदम भारीच!!
  • Log in or register to post comments

जबरी.. हायला मला कितीतरी जवळ

पिंगू
Wed, 02/01/2012 - 15:50 नवीन
जबरी.. हायला मला कितीतरी जवळ आहे मंगला टॉकिज. आता उद्याच जाऊन हाणतो.. - पिंगू
  • Log in or register to post comments

हाणलीत का?

मी-सौरभ
गुरुवार, 02/02/2012 - 10:51 नवीन
कसं वाटतयं आता??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

मज्जा आहे की पिंगु शेठ कॉल

सुहास..
Wed, 02/01/2012 - 16:04 नवीन
मज्जा आहे की ;) पिंगु शेठ कॉल टाका च !!
  • Log in or register to post comments

पिंगु शेठ कॉल टाका च !! >>>

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/01/2012 - 19:32 नवीन
पिंगु शेठ कॉल टाका च !! >>> उद्या सक्काळी ९वाजेपर्यंत मी तिथे असणारच आहे...त्यांना दाखवायचय ना...हे मिसळायण.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

कडक.

प्रभाकर पेठकर
Wed, 02/01/2012 - 16:17 नवीन
कडक मिसळवृत्तांत्त. येतोच आता आस्वादायला. मस्त, चमचमीत तपशीलांबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

गुरूजी,

प्रास
Wed, 02/01/2012 - 17:02 नवीन
फोटो पाहून नि तुम्ही केलेलं वर्णन वाचून आमचा Image removed. स्विकार करा.....
  • Log in or register to post comments

स्विकार करा..... स्विकारला

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/01/2012 - 19:35 नवीन
स्विकार करा..... Image removed. स्विकारला हो भाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

भारी!

पैसा
Wed, 02/01/2012 - 18:12 नवीन
तर्रीचा रंग पाहून अंमळ टरकीफाय झाले आहे!
  • Log in or register to post comments

तर्रीचा रंग, मिसळीचे फोटो,

स्वाती२
Wed, 02/01/2012 - 20:48 नवीन
तर्रीचा रंग, मिसळीचे फोटो, वर्णन सगळेच एकदम सही आहे!
  • Log in or register to post comments

तर्रीदार मिसळ.... उद्याच

मराठमोळा
Wed, 02/01/2012 - 20:53 नवीन
तर्रीदार मिसळ.... उद्याच सकाळीच जाऊनच खाणारच.. :) धन्स Unsatisfied Soul.. ;)
  • Log in or register to post comments

बापरे! काय ही

रेवती
Wed, 02/01/2012 - 20:56 नवीन
बापरे! काय ही मिसळभक्ती! वर्णन अगदी तर्रीदार झाले आहे.
  • Log in or register to post comments

एंटर द ड्रॅगन मिसळ :-)

मराठे
Wed, 02/01/2012 - 22:30 नवीन
खत्तरनाक मिसळ दिसतेय. मिसळ खाणार्‍याला नाकातोंडातून आग ओकणारा ड्रॅगन बनवणार बहुतेक. शिवाय
मिसळ घरी आणुन खाण्याचे पातक करू नाही,पांडुरंग घरी आणत नसतात,त्याच्या भेटीलागी पंढरपुरासी जावे लागते.
हे ही तितकंच खरंय.
  • Log in or register to post comments

हा हा हा!!!

धमाल मुलगा
Tue, 02/07/2012 - 16:51 नवीन
प्र्याक्टिकली बोलायचं झालं तर 'एंटर' न म्हणता 'एक्झिट द ड्रॅगन' म्हणावं लागेल ज्यांना झेपणार नाही त्यांच्यासाठी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

हाथ मारता है लाथ मारता

पाषाणभेद
Wed, 02/01/2012 - 22:35 नवीन
हाथ मारता है लाथ मारता है लडका अत्रूप्त ये साला करंssट मारता है मामाची मिसळ खाउन झनझनाट!
  • Log in or register to post comments

चला धागा काढल्याचं सार्थक

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/02/2012 - 00:24 नवीन
चला धागा काढल्याचं सार्थक झालं,,,अनेकजण मिसळ चाखुन गेले. Image removed. तरिही सोकाजीराव, धनाजीराव,सूड,गणेशा पन्नासराव(ज्यांची अमची ओळखच मुळी मामांच्या गाडिवर भेटुन झाली...)आनी आमचे किसनद्येव--- ते का कुणास ठाऊक आले नाहीत... :-( एरवी मीच माझ्या धाग्यावर अशी प्रतिक्रीया देण्याचे कारण नाही. परंतू मिसळ हे आमुचे देवाघरचे देणे त्यामुळे ते जितक्या जमेल तितक्या आप्तांसह खाणे हा धर्म,,, त्यामुळे अठवण झाली शिवाय हे सगळे खादाड कंपूचे सदस्य----स्वारी---मेंबर...मग होणारच अठवण... Image removed.
  • Log in or register to post comments

म्हणजे....!!

अन्नू
गुरुवार, 02/02/2012 - 19:18 नवीन
आता तुंम्ही पण! काका- मामा- नाना- दादा- भाई- आत्या- मामी- काकी- मावशी- वहीनी- ताई- माई- आक्का.. मला वाचवा...................................
  • Log in or register to post comments

मांगल्या टायमले

अमित दळवे
Fri, 02/03/2012 - 02:34 नवीन
जवा पुण्यात आलो होतो तवा सकाळ-संध्याकाळ निरा मिसळपाव हाणली होती राजेहो... आता वर्‍हाडी ठेच्या वानी तीखटजाळ हाय म्हणता तर जा लागल ना ब्वा.
  • Log in or register to post comments

नुकतीच जेऊन बसलीये ,तरी तुमचे

किचेन
Fri, 02/03/2012 - 23:01 नवीन
नुकतीच जेऊन बसलीये ,तरी तुमचे हे मिसळीचे फोटो पाहून भूक लागली राव.
  • Log in or register to post comments

मिसळपुराण आवडले!

चतुरंग
Sat, 02/04/2012 - 01:12 नवीन
तर्रीदार चित्रे बघून पुढच्या टायमाला ही मिसळ चापायचा विचार पक्का झालाय! (मिसळप्रेमी)रंगा
  • Log in or register to post comments

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

विसोबा खेचर
Sat, 02/04/2012 - 11:24 नवीन
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

तर्रीदार मिसळीचा वृतांत आवडला

जाई.
Sat, 02/04/2012 - 11:31 नवीन
तर्रीदार मिसळीचा वृतांत आवडला
  • Log in or register to post comments

जबरदस्त अमोल केळकर

अमोल केळकर
Sat, 02/04/2012 - 13:41 नवीन
जबरदस्त अमोल केळकर
  • Log in or register to post comments

हाण्ण तिच्यायला!!!

धमाल मुलगा
Sat, 02/04/2012 - 14:34 नवीन
काय तिच्यायला ते फोटू म्हणायचं का काय म्हणायचं द्येवा.... ती तरी बघूनच इथं बसल्याबसल्या आमची अवस्था इठूरायाच्या दर्शनला तळमळणार्‍या पुंडलिकागत झाली वो... भटजीबुवा अत्तरवाले, च्यामायला, चलाच आता. मामांकडं पैल्या धारेची लालभडक कॉटरमिसळ खाल्याबिगर आमच्या पिंडाला कावळा शिवायचा न्हाईच खरं. ठरवा बॉ कधी जायाचं त्ये. :)
  • Log in or register to post comments

ठरवा बॉ कधी जायाचं त्ये. >>>

अत्रुप्त आत्मा
Sat, 02/04/2012 - 20:28 नवीन
ठरवा बॉ कधी जायाचं त्ये. >>> ह्हा ह्हा ह्हा....ध.मु. तुमचा प्रतिसाद वाचल्यावर मला एकच म्हणावसं वाटतं,,, धम्माल मुलगा=मामांची मिसळ मामांची मिसळ=धम्माल मुलगा मामांकडे मिसळीला हवं तेंव्हा जाऊ... फक्त आधी कळवा...म्हणजे तर्री कडक असतानाचा टाइम गाठता येइल... अवांतर-तुमच आमच जमणार बघा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

...

मी-सौरभ
Tue, 02/07/2012 - 11:19 नवीन
अवांतर-तुमच आमच जमणार बघा
क्काय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा