✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा..

क
कॉमन मॅन यांनी
Fri, 01/27/2012 - 11:15  ·  लेख
लेख
परदेशात कसोटी चेंडुफळी सामन्यात आता आपल्यावर सलग ८ व्यांदा तोंडावर आपटण्याची वेळ आलेली आहे. तरीही आपल्या संघातल्या सचिन, द्रविड आणि लक्ष्मण आदी सो कॉल्ड धुरंधर खेळाडूंना याची जराही लाज वाटत नाही आणि ते आपणहून स्वत:ची खुर्ची रिती करत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. सचिनसारख्या गुणी खेळाडूबद्दल विशेष वाईट वाटतं. १०० व्या शतकाच्या हव्यासापायी त्याने सार्‍या देशाला का दावणीला बांधले आहे हे समजत नाही. त्याला आता इतकंच सागावंसं वाटतं की 'बाबारे, तुला आता वाटल्यास भारतरत्न देतो पण आता पैशांची आणि वैयक्तिक उच्चांकांची अधिक हाव न धरता चक्क घरी बस. सार्‍या भारताने तुझं भरपूर कौतुक केलं आहे परंतु आता तू मानाने घरी बसावंस हे बरं.. तुला संघातून काढून टाकण्यापेक्षा तू स्वत:हूनच निवृत्त व्हावंस असं वाटतं.' आणि तसं पाहताही जेव्हा एखादी व्यक्ति सर्वांना हवीहवीशी वाटत असते तेव्हाच तिने मानाने निवृत्त होण्यात खरी शान असते. अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला मिळाली. परंतु पैशांच्या आणि व्यक्तिगत उच्चांकाच्या हव्यासापायी सचिन निवृत्त होण्यास तयार नाही. तीच गत राहूल आणि लक्ष्मणची आहे. ही म्हातारी खोडं जाणार केव्हा आणि नवीन रक्ताला वाव मिळणार तरी केव्हा..?? राष्ट्रपती महोदयांना नम्र विनंती की त्यांनी आत्ताच २०१३ चा भारतरत्न पुरस्कार सचिनला जाहीर करावा म्हणजे तरी तो घरी बसेल अशी आशा करता येईल. ता क - आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सचिन केवळ १३ धावा काढून तंबूत परतला आहे!! -- काँमॅ.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
16233 वाचन

💬 प्रतिसाद (104)

प्रतिक्रिया

आमी बी काय तरी बोल्नारच !

चौकटराजा
Sun, 01/29/2012 - 05:51 नवीन
आता त्ये पल्डे नि ह्ये बरळल्ये आशी आपल्या द्येशाच्यी ष्टाईलच हाय ! आ ! आता त्येला कोन काय करनार ? आरं पॉंटिंगला बी घरी बशिवा आसं म्हणत व्होतेयेच की. मुद्दा काय हाये जो ख्याळ करतो न्ह्व्व्ह त्येला बराबर समाजतं आपुन संपलो किइ न्हाई ? नुस्त्या गप्पा काय कामाच्या ?
  • Log in or register to post comments

१००

रमताराम
Sun, 01/29/2012 - 11:19 नवीन
काही नाही. सचिनच्या नुसत्या नावावर नुसत्या धांग्याच्यापण सेंच्युरा होतात हे दाखवण्यापुरती 'शंभरी' भरवतोय.
  • Log in or register to post comments

शंभरी भरली... कॉमन मॅन यांचे अभिनंदन !!

सुहास झेले
Sun, 01/29/2012 - 11:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अरे वा चांगला निर्णय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/29/2012 - 11:43 नवीन
इंडियन वॉल ला आपली कारकिर्द शेवटच्या टप्प्यात आली आहे आणि नवीन खेळाडूंना संधी दिली पाहिजे वगैरेचा साक्षात्कार झाला आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. [संदर्भ] आता राहीला सच्याचा आणि लक्ष्मणचा प्रश्न तर बांग्लादेशाबरोबर एखादा दौरा आयोजित करुन सच्याचे महाशतक होऊ द्यावे, म्हणजे सच्या आता खूप खेळलोय असे म्हणून विश्रांती घेत राहील आणि नव्यांना संधी मिळेल. लक्ष्मनचा काही प्रश्न नाही, त्याला आता विश्रांतीच आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा