✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा..

क
कॉमन मॅन यांनी
Fri, 01/27/2012 - 11:15  ·  लेख
लेख
परदेशात कसोटी चेंडुफळी सामन्यात आता आपल्यावर सलग ८ व्यांदा तोंडावर आपटण्याची वेळ आलेली आहे. तरीही आपल्या संघातल्या सचिन, द्रविड आणि लक्ष्मण आदी सो कॉल्ड धुरंधर खेळाडूंना याची जराही लाज वाटत नाही आणि ते आपणहून स्वत:ची खुर्ची रिती करत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. सचिनसारख्या गुणी खेळाडूबद्दल विशेष वाईट वाटतं. १०० व्या शतकाच्या हव्यासापायी त्याने सार्‍या देशाला का दावणीला बांधले आहे हे समजत नाही. त्याला आता इतकंच सागावंसं वाटतं की 'बाबारे, तुला आता वाटल्यास भारतरत्न देतो पण आता पैशांची आणि वैयक्तिक उच्चांकांची अधिक हाव न धरता चक्क घरी बस. सार्‍या भारताने तुझं भरपूर कौतुक केलं आहे परंतु आता तू मानाने घरी बसावंस हे बरं.. तुला संघातून काढून टाकण्यापेक्षा तू स्वत:हूनच निवृत्त व्हावंस असं वाटतं.' आणि तसं पाहताही जेव्हा एखादी व्यक्ति सर्वांना हवीहवीशी वाटत असते तेव्हाच तिने मानाने निवृत्त होण्यात खरी शान असते. अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला मिळाली. परंतु पैशांच्या आणि व्यक्तिगत उच्चांकाच्या हव्यासापायी सचिन निवृत्त होण्यास तयार नाही. तीच गत राहूल आणि लक्ष्मणची आहे. ही म्हातारी खोडं जाणार केव्हा आणि नवीन रक्ताला वाव मिळणार तरी केव्हा..?? राष्ट्रपती महोदयांना नम्र विनंती की त्यांनी आत्ताच २०१३ चा भारतरत्न पुरस्कार सचिनला जाहीर करावा म्हणजे तरी तो घरी बसेल अशी आशा करता येईल. ता क - आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सचिन केवळ १३ धावा काढून तंबूत परतला आहे!! -- काँमॅ.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
16233 वाचन

💬 प्रतिसाद (104)

प्रतिक्रिया

कॉमन मॅन हे चेसुगु आहेत काय?

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/27/2012 - 15:58 नवीन
कॉमन मॅन हे चेसुगु आहेत काय? अगं बाबो... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

उपप्रतिसाद

कपिलमुनी
Fri, 01/27/2012 - 16:48 नवीन
अजुन प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद ,उपउपप्रतिसाद ,उपउपउपप्रतिसाद नाहीत दिले ..त्यामुळे चेसुगुंची शक्यता वाटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

छ्‍या: ! ते चेसुगु असलेच तर

यकु
Fri, 01/27/2012 - 17:06 नवीन
छ्‍या: ! ते चेसुगु असलेच तर या अवतारात त्या स्टायलीत कशाला उपउपउपप्रतिसाद देतील? तसे उप, उपप्रतिसाद दिले असते तर इथल्या कुटिलमुनींच्या ;-) चाणाक्ष नजरेतून ते सुटले असते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

कुटिलमुनीं>>

मोहनराव
Fri, 01/27/2012 - 17:08 नवीन
कुटिलमुनीं>> हहपुवा!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

गप्प

मेघवेडा
Fri, 01/27/2012 - 14:22 नवीन
गप्प राहायचं ठरवलं आहे. तीन पत्ते.
  • Log in or register to post comments

याच म्हातार्‍या लोकांनी

मोहनराव
Fri, 01/27/2012 - 14:40 नवीन
याच म्हातार्‍या लोकांनी जेव्हा सामने जिंकुन दिले तेव्हा डोक्यावर घेउन नाचला होतात ना, मग त्यांच्या इच्छेप्रमाणं त्यांना खेळुद्या की त्यांना वाटतंय तोपर्यंत. निदान नवीन लोकांपेक्षा तरी ते बरे म्हणायचे!! घरी बसुन टिका करत बसणे सगळ्यात सोपी गोष्ट आहे व ती करत बसणे सगळ्यात आवडता उद्योग असतो आपल्या लोकांचा!!
  • Log in or register to post comments

हे पहा

रमताराम
Fri, 01/27/2012 - 15:04 नवीन
जरा इथे पहा बरं. जो वर्ल्ड-कप नुकताच जिंकला म्हणून यंग ब्रिगेड वगैरेचे कौतुक झाले त्यात भारताकडून सर्वाधिक धावा कोणाच्या नि सर्वाधिक बळी कोणी घेतले आहेत ते बघा बरं जरा. वर आम्ही स्पिनर्सबद्दल जो एक मुद्दा मांडला तो ही इथे तपासून पाहता येईल. आपल्याच भूमीवर खेळत असून जहीर, मुनाफ आणि तीनच सामने खेळलेला नेहरा (तीन बळी) या वेगवान गोलंदाजांनी इतर सार्‍या स्पिनर्सच्या (ज्या युवराज हा पार्टटाईम गोलंदाज सर्वाधिक बळी घेऊन गेलाय.) एकुण बळींपेक्षा अधिक बळी मिळवले आहेत. टाईम्स हॅव चेन्जड. बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करणारा तो एक म्हाताराच आहे. 'ही माझी स्टाईल आहे मी असाच खेळणार' निर्लज्जपणे म्हणत पाच-दहा षटकातच तिसर्‍या फलंदाजाला मैदानावर यायला भाग पाडणारा, खालच्या फलंदाजांना नव्या चेंडूचा सामना करायला लावणारा आणि तरीही स्वतःला आघाडीचा फलंदाज म्हणवून घेणारा कधी बदलणार?'
  • Log in or register to post comments

कुल डौन आजोबा... आपलीच तब्येत

गणपा
Fri, 01/27/2012 - 15:49 नवीन
कुल डौन आजोबा... आपलीच तब्येत बिघडायची अश्याने. कुणी सुर्यावर थुंकायचा प्रयत्न केला तर काय होते ठौक आहे ना. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

>>>>> यंग ब्रिगेड वगैरेचे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/27/2012 - 17:02 नवीन
>>>>> यंग ब्रिगेड वगैरेचे कौतुक झाले... झालं गेलं कौतुक मान्य आहे. पण, नै म्हणजे अजून किती वर्ष सलगपणे ही मंडळी खेळली पाहिजे असे आपल्याला वाटते ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

+१००

५० फक्त
Fri, 01/27/2012 - 17:33 नवीन
'नै म्हणजे अजून किती वर्ष सलगपणे ही मंडळी खेळली पाहिजे असे आपल्याला वाटते ? ' सर अतिशय महत्वाचा प्रश्न जो विचारणा-यांना नीट विचारता येत नाहीये आणि उत्तर देणा-यांना याचं उत्तर देता येणार नाहीये, इथं मला वाटतं जयंत सरांची स्वाक्षरी आहे ना तसा प्रकार आहे - मी गप्प बसतो त्यांची अडचण होउ नये म्हणुन. खरंतर, क्रिडा क्षेत्रात अन राजकारणात निवृत्तीसाठी वय / विक्रम / सहभाग वगैरे असे नियम केले पाहिजेत. या बाबतीत कुंबळे अन सौरव हुशार निघाले, वेळच्या वेळी बाहेर पडुन / पाडले जाउन आज आहेत त्या स्थितीत बरे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिंता कशाला

रमताराम
Fri, 01/27/2012 - 17:34 नवीन
त्याची चिंता मला कशाला. मला अजून तरी बीशीशीआयने निवड समितीत घेण्याची आफर दिलेली नाही. तोवर कशाला बाजारात तुरी.... अवांतरः या प्रश्नाचा कौल बनवायची आय्ड्या कशी वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नशीब आमचं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/27/2012 - 18:30 नवीन
>>>>> मला अजून तरी बीशीशीआयने निवड समितीत घेण्याची आफर दिलेली नाही. आपण निवड समितीत असता तर सचिन, द्रविड आणि लक्ष्मणच्या फलंदाजीचा विदा वर्षानुवर्ष दाखवून सन्मानीय क्रिकेटपटूंना (क्रिकेटच्या देवांना) ते पन्नाशी-साठीचे झाले असते (पायाची हालचाल करतांना त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या) तरी त्यांना खेळवले असते त्याच बरोबर अपयशाचं खापर फोडायला खेळपट्ट्या असणारच होत्या तेव्हा नशीब आम्हा क्रिकेट रसिकांचं की आपल्याला निवड समितीची ऑफर नाही. ;) अवांतरः या प्रश्नाचा कौल बनवायची आय्ड्या कशी वाटते? आय्ड्या उतनी बुरी नही. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

+१००, मग नाहि तर काय ,बरं ते

५० फक्त
Fri, 01/27/2012 - 22:40 नवीन
+१००, मग नाहि तर काय ,बरं ते जाउ दे, एक सामान्य क्रिकेट चाहता म्हणुन, विशिष्ट खेळाडुचा चाहता म्हणुन नव्हे, बिरुटे सरांच्या प्रश्नाचं उत्तर द्या की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तर दिलंय की

रमताराम
Fri, 01/27/2012 - 23:19 नवीन
याच धाग्यात. वाचायची तसदी घेतली तर मिळेलही. वर मूळ प्रतिसादात क्रिक-इन्फोचा दुवा आहे. चार महिन्यापूर्वीची विश्वचषकातील दोन शतके, दोन अर्धशतकांसह भारतातर्फे सर्वाधिक धावांची कामगिरी आज संघात असण्यासाठी पुरेशी नसेल तर काय फक्त कालच्या कामगिरीचा निकष लावायचा काय? आणि आम्ही तुलनात्मकदृष्ट्या उरलेल्या आठ खेळाडूंच्या कामगिरीबद्दल - काही विशिष्ट खेळाडूंबद्दलही - हजार प्रश्न आमच्या एकाहुन अधिक प्रतिसादांतून विचारले आहेत त्याचे उत्तर देण्याचे तुम्ही, महामहीं बिरुटेसर किंवा धागामास्तर कधी मनावर घेणार? की उत्तरे देण्याची जबाबदारी फक्त आमच्यावर आहे नि तुम्हाला काय टीका करण्याचे अधिकार थोरल्या महाराजांनी लिहून दिलेत? ठीक आहे. हे आमचे उत्तर. जर वर्षातून चार शतके, पाच-सहा वेळा नव्वदीत बाद होणारा खेळाडू असेल जो पंचेचाळीसच्या पेक्षा अधिक वार्षिक सरासरी प्रत्येक वर्षी (लॉन्ग-टर्म अ‍ॅवरेजही नव्हे, त्या त्या वर्षीची सरासरी) तर तो पन्नासच काय शंभर वर्षाचा असला तरी तीसच्या सरासरीने खेळणार्‍या तथाकथित तरूण खेळाडूपेक्षा लाखपटीने परवडला. खेळता येत नाही बोंबलायला तर तारूण्य काय मखरात सजवायचंय? का आज या, उद्या त्या हिरविणीबरोबर गॉसिप म्यागेजिन्स मधून मिरवायचंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अहो आम्हाला कळेल अशा शब्दांत

मेघवेडा
Fri, 01/27/2012 - 23:22 नवीन
अहो आम्हाला कळेल अशा शब्दांत लिहा वो काहीतरी. हे सगळं आम्हाला कळत नाही. आम्ही फक्त फेल गेल्यावर आरोप करणं जाणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

गप्प बस रे मेव्या. चार मोठी

गणपा
Fri, 01/27/2012 - 23:30 नवीन
गप्प बस रे मेव्या. चार मोठी माणसं चरचा करत असताना लहानग्यांनी मध्ये मध्ये लुडबुड करु ने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

''चार महिन्यापूर्वीची

५० फक्त
Fri, 01/27/2012 - 23:47 नवीन
''चार महिन्यापूर्वीची विश्वचषकातील दोन शतके, दोन अर्धशतकांसह भारतातर्फे सर्वाधिक धावांची कामगिरी आज संघात असण्यासाठी पुरेशी नसेल तर काय फक्त कालच्या कामगिरीचा निकष लावायचा काय? - पण ही कामगिरी भारतातल्या मठ्ठ विकेटवरची झाली, गेल्या महिन्याभरात काय झालंय ऑस्ट्रेलियात ? आख्ख्या विश्वचषकात जेवढ्या धावा काढल्या तेवढ्या तरी निघाल्यात का ? ज्या द्रविडच्या स्टंम्पला महिनोनमहिने बॉल लागत नसे तो चार पाच वेळा बोल्ड होतो हा फक्त योगायोगच मानायचा का ? रात गयी बात गयी, जर प्रत्येक मॅच नविन असेल तर प्रत्येक मॅच मधलं हरणं आणि जिंकणं हे सुद्धा नवीनच असतं, आणि त्याचा तेवढाच आनंद किंवा दुख: होतं, आता हे तर मॅच मागुन मॅच हरणं चाललंय आणि ते सुद्धा कोणताही विरोध न दाखवता मग तो सहवाग सचिन द्रविड नाहीतर लक्ष्मण, एखादा दोन दिवस टिकतील पिचवर नाहीच, थोडा टिकेल असं वाटलं की घातलीच बॅच आसाऑस्टं मध्ये. हेच करायचं असेल तर या सगळ्यांनाच टिम ए ला नॅशनल टिम म्हणुन पाठवायचा एक प्रयोग करुन पाहायला काय हरकत आहे. ज्या पिचवर ऑस्ट्रेलियन सहाशे रन काढतात तिथं आपल्याला चारशे करता येउ नयेत, या सगळ्या थोर खेळाडुंचा थोरपणा यातच आहे की त्यांनी बाजुला सरकुन मोकळं व्हावं, पुढं नंतर येणारे सांभाळतील नाहीतर रसातळाला नेतील, काही क्रिकेटवाचुन देशाचं अडलेलं नाहीये, मिळतात का ऑलिंपिक मध्ये पदकं, नाही, मग काही अडलंय का त्यामुळ ? उगा आपण बाजुला सरकलो तर भारतीय क्रिकेट बुडेल असा फार्स कशाला करायचा ? ठीक आहे. हे आमचे उत्तर. जर वर्षातून चार शतके, पाच-सहा वेळा नव्वदीत बाद होणारा खेळाडू असेल जो पंचेचाळीसच्या पेक्षा अधिक वार्षिक सरासरी प्रत्येक वर्षी (लॉन्ग-टर्म अ‍ॅवरेजही नव्हे, त्या त्या वर्षीची सरासरी) तर तो पन्नासच काय शंभर वर्षाचा असला तरी तीसच्या सरासरीने खेळणार्‍या तथाकथित तरूण खेळाडूपेक्षा लाखपटीने परवडला. खेळता येत नाही बोंबलायला तर तारूण्य काय मखरात सजवायचंय? का आज या, उद्या त्या हिरविणीबरोबर गॉसिप म्यागेजिन्स मधून मिरवायचंय? - भावना बाजुला ठेवुया जरा, पण सध्या जेवढं क्रिकेट खेळलं जात आहे, ते पाहता पन्नास पर्यंत सचिन काय कोणालाच खेळणं शक्य नाही, त्यामुळं ही तुलना जरा गैर वाटते. आणि हिरविणी बरोबर मिरवण हे काय नविन आहे का, ती तर परंपराच आहे आपल्याकडं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

भारतातल्या मठ्ठ विकेटवरची

मेघवेडा
Sat, 01/28/2012 - 00:25 नवीन
भारतातल्या मठ्ठ विकेटवरची कामगिरी? जिथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही टेस्ट्स शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या विकेटपर्यंत लढल्या गेल्या त्या विकेट्सना मठ्ठ म्हणायचं? जिथं फास्ट बोलर्स विकेट्स काढून जातात त्या विकेट्सना मठ्ठ म्हणायचं? नाही, म्हणजे मग स्पोर्टिंग विकेट म्हणजे तरी काय तुमच्या दृष्टीनं? तुमचा प्रतिसाद हा अ‍ॅन्टि त्रिमूर्ती नसून अ‍ॅन्टि क्रिकेटच वाटतो आहे! (तुमचे पूर्वीचे काही प्रतिसादही - या धाग्यावर नव्हे, जुन्या धाग्यांवर - याचीच ग्वाही देतात.) चर्चा त्रिमूर्तींबद्दल चालली आहे तिथं क्रिकेटवर - मुळावरच - घाव घालू नका. तुम्ही म्हणता ज्या द्रविडच्या स्टंम्पला महिनोनमहिने बॉल लागत नसे तो चार पाच वेळा बोल्ड होतो हा फक्त योगायोगच मानायचा का ?! बरं, झाला तो बोल्ड. काय बिघडलं? तेवढ्या पाच इनिंग्स बघता, त्याआधीच्या २८० इनिंग्ज बर्‍या विसरता सोयीस्करपणे! राहुलनं किती सेंचुरीज मारल्या आणि किती रन्स केले २०११ मध्ये याचं गणित मांडलंय? आणि आख्ख्या विश्वचषकात जेवढ्या धावा काढल्या तेवढ्या नाही निघाल्या या सीरीजमध्ये पण यालाही पूर्ण संघच जबाबदार नाही काय? सगळंच नेहमी गोग्गोड नसतं की हो आयुष्य! यश आहे तसं अपयशही येणारच! पण 'सीनियर्स म्हातारे झाले' ही पराभवाची कारणमीमांसा ठरूच शकत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. 'आपण बाजूला झालो तर भारतीय क्रिकेट बुडेल' असा फार्स कुणी केलाय हो आणि? हे बरे मनाचे श्लोक! वर्ल्ड कप जिंकला, टेस्ट्समध्ये पहिलं रँकिंग मिळालं तेव्हा हेच सगळे सीनियर्स गळ्यांतले ताईत झाले होते आमच्या! या पराभवामागं कोच हाही एक महत्त्वाचा फॅक्टर आहे! ज्याला धोनीचं धूर्त, कुशल नेतृत्व वगैरे म्हणून गौरवण्यात आलं (तो चांगला कर्णधार आहेच, वाद नाही) ते गॅरी कर्स्टनच्या 'परफेक्ट प्लान्स' चं कुशल एक्झिक्युशन होतं! डंकन फ्लेचरकडं तसे ट्रम्प्स नसावेत! Seniors cannot become old and useless in just 2 series, they would have faded gradually. १९७१ मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सीरिज जिंकल्यावर वाडेकरचा उदो उदो करणार्‍यांनीच पुढे १९७४ मध्ये इंग्लंडमध्ये सीरिज हरून आल्यावर त्याला चपलांचे हार घातले हे आठवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

' तुमचा प्रतिसाद हा अ‍ॅन्टि

५० फक्त
Sat, 01/28/2012 - 01:04 नवीन
' तुमचा प्रतिसाद हा अ‍ॅन्टि त्रिमूर्ती नसून अ‍ॅन्टि क्रिकेटच वाटतो आहे!' - शंभर टक्के कारण तेच अति होतंय आणि अति तिंथं माती होते आहे त्यामु़ळं, या त्रिमुर्ती बद्दल बोलतच नाहीये, कारण मग ती व्यक्तीपुजा होते तो सांधिक खेळ राहातच नाही, क्रिकेट या तिघांपेक्षा फार मोठं आहे, पण आपला मिडिया आणि आपण सगळेच उगाचच वैयक्तिक खेळाडुंना खेळापेक्षा मोठं करत आहे. 'सीनियर्स म्हातारे झाले' ही पराभवाची कारणमीमांसा ठरूच शकत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. '' - हे सुद्धा मान्य, पण सिनियर्सनी जो सिनियरपणा (पक्षी प्रौढत्व) दाखवायला हवा तो दाखवला जात नाही किंवा गेला नाही याबद्दल वाईट वाटतंय. 'तेवढ्या पाच इनिंग्स बघता, त्याआधीच्या २८० इनिंग्ज बर्‍या विसरता सोयीस्करपणे! ' - छे विसरत नाहीये, पण नवीन पराभवाच्या जखमा जुन्या आठवणींच्या मलमांनी भरुन काढता येत नाहीत, आणि ते देखील चार चार पराभव पाठोपाठ. एका पराभवाचा वचपा काढला जातो, किंवा सुड घेतला जातो तेंव्हाच ती जखम भरली जाते. खेळ मग तो फुटबॉल असो, क्रिकेट असो किंवा बुद्धिबळ हे सगळे युद्धाचा बेस असलेल्या सांघिक किंवा वैयक्तिक कृति आहेत. सभ्य आणि सर्वमान्य प्रकार आहेत हे युद्धाचे, आणि युद्ध म्हणलं की विजय आणि पराभव आलेच, आणि त्यात विजेत्यांची वाढलेली मग्रुरी आणि आणि त्यातुन पराभुतांनी घेतलेली सुड उगवण्याची तयारी ही आलीच, जर हे होणारच नसेल तर कशाला पाहिजेत ही नाटकं. बेंगलोरातच बहुतेक प्रसादनं काढलेली सोहेलची विकेट आणि झिदाननं मारलेली धडक ही याचीच रॉ उदाहरणं आहेत. 'आणि आख्ख्या विश्वचषकात जेवढ्या धावा काढल्या तेवढ्या नाही निघाल्या या सीरीजमध्ये पण यालाही पूर्ण संघच जबाबदार नाही काय? ' - याला मुख्यत्वे जबाबदार ६-७ फलंदाजच,धावा काढणे हे त्यांचंच काम आहे, गोलंदाजांचं नाही, उलट ते तर भरुभरुन धावा देउन आपल्या फलंदाजांना संधी देत आहेत आपले कौशल्य दाखवण्याची. Seniors cannot become old and useless in just 2 series, they would have faded gradually. - but what about old seniors and new seniors, who are actually either fading or have faded, even then not only refuse to accept the fact but also refuse to play well for the country, but will play well for the money in IPL. '१९७१ मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सीरिज जिंकल्यावर वाडेकरचा उदो उदो करणार्‍यांनीच पुढे १९७४ मध्ये इंग्लंडमध्ये सीरिज हरून आल्यावर त्याला चपलांचे हार घातले हे आठवलं.' - history repeats itself, nothing new in it. आणि ज्यांनी हे केलं ते आपलेच काका-मामा होते, कोणी वेगळे नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

काही विशिष्ट खेळाडूंबद्दलही -

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/28/2012 - 12:57 नवीन
काही विशिष्ट खेळाडूंबद्दलही - हजार प्रश्न आमच्या एकाहुन अधिक प्रतिसादांतून विचारले आहेत त्याचे उत्तर देण्याचे तुम्ही, महामहीं बिरुटेसर किंवा धागामास्तर कधी मनावर घेणार? की उत्तरे देण्याची जबाबदारी फक्त आमच्यावर आहे नि तुम्हाला काय टीका करण्याचे अधिकार थोरल्या महाराजांनी लिहून दिलेत? प्रश्न काही विशिष्ट खेळाडूंबद्दलचा नाही. प्रश्न आहे, सच्या, द्र्वीड आणि लक्ष्मणचा. मान्य की संघात तिघांशिवाय खेळाडू आहेत. परंतु मूळ धागामास्तर आणि महामहिमांचा प्रश्न असा आहे की, किती दिवस या सिनियर्संना खेळवणार ? आणि आपले सर्व प्रतिसाद वाचूनही, नुसतं वाचूनही नव्हेच तर आपल्याला नेमकं काय म्हणायचं असाव अशा अंदाजानेही आपले प्रतिसाद डोळ्यात तेल घालूनही वाचल्यानंतर मूळ प्रश्नांचं उत्तर देण्याऐवजी इतर फलंदाजाची तुलना, त्यांच्या जवाबदार्‍या, भारतीय गोलंदाजी, पाटा खेळपट्ट्या, वेगवान गोलंदाजांचा अभाव, भूतकाळातील स्पीनर्सच्या वर्तमान काळातील गोलंदाजांशी तुलना करणे यापेक्षा आपले प्रतिसाद सरळ प्रश्नांच्या उत्तराकडे पाठ फिरवतांना दिसतात असा एक सामान्य वाचक म्हणून आमचा समज झाला आहे. अर्थात आपण सर्वच प्रश्नाची उत्तरे मोठी अभ्यास करुन दिला आहे, असा आपल्या समजाचा आम्हाला आदर आहेच. अर्थात अशा उतरांचे आम्हाला काही नवलही नाही. देवांचे अपयश झाकण्यासाठी अशा सारवा-सारवीची गरज ' देवांच्या पडत्या काळात' भूतकाळातील विदाची शिदोरी बांधून चाललेली वकिली अनेक करत आहेत. तेव्हा त्यात काही नवे नाही. बाकी, आपल्याही प्रतिसादात नवीन,अद्भूत , अनपेक्षित, अशी माहिती सांगणारा प्रतिसाद आपला आहे, असे आम्हाला वाटत नाही. बाकी, असे सांगण्याचा अधिकार कोणा थोरल्या महाराजांनी दिला नसला तरी धागाकर्त्याच्या चर्चा-संवादात सहभागी होण्याचे स्वातंत्र्य आपल्यासोबत आम्हालाही आहेच. कधीतरी सिनियर्सलाही वगळावे लागेल. कधी वगळायचं याचं उत्तर कधी तरी आपणाला नव्हे तर काळालाही द्यावेच लागणार आहे. पण, यापेक्षा उत्तम काळ कोणता किंवा येणार आहे, हे खेळाडूंला ठरवावेच लागणार आहे, तो पर्यंत नसती वकिली आम्हालाही झेलावी लागणारच आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
Sat, 01/28/2012 - 14:40 नवीन
काही काही प्रतिक्रिया वाचून खरंच मौज वाटली. सचिन, राहूल आणि लक्ष्मण हे संघावरती भार झालेले असून, ते फॉर्म मध्ये नसताना देखील केवळ वरिष्ठ म्हणून त्यांना सहन करावे लागत आहे असा काहीसा सुर ह्या प्रतिक्रियांमध्ये दिसला. पण मुळात परिस्थीती अशी आहे का ? क्रिकेटकडे खेळ म्हणून बघणे हा झाला आपला सामान्य रसीकांचा दृष्टीकोन. मात्र बोर्ड आणि आयसीसी चे मुख्य उद्देश म्हणजे गर्दी आणि पैसा. आता गर्दी आणि पैसा हे गणित जुळवायचे तर ज्यांना दर्शकांनी देवतुल्य बनवले आहे आणि ज्यांना खेळताना बघण्यासाठी दर्शक खिसे रिकामे करायला तयार आहेत, त्या खेळाडूंना खेळवणे भागच आहे ना ? आज निव्वळ सचिन संघात नाही म्हणून मॅच न बघणारे अनेक लोक मला माहिती आहेत. हे खेळाडू खेळत नसून त्यांना खेळवले जात आहे हे आपल्या लक्षात कधी येणार ? सर्व संघानी आंतरराष्ट्रीय दौर्‍यात आपला तुल्यबळ संघच पाठवायला हवा, हा आयसीसीचा पहिला नियम आहे. त्यामुळे तर काही काळापूर्वी दुबळा संघ सचिनच्या हाताखाली राष्ट्रकुलला आणि तुल्यबळ संघ ट्राय सिरीज खेळायला रवाना झाला होता. गंमतीचे उदाहरण सांगतो. गेल्या २ वर्षात आगरकर, झहिर खान पासून अनेक भारतीय संघात खेळणारे किंवा पदार्पण करणारे खेळाडू पुण्यात विविध सामन्यांसाठी येऊन गेले. आगरकर रणजीसाठी तर झहिर बहूदा ऑईल कंपन्यांच्या सामन्यासाठी येऊन गेला. ह्या खेळाडूंना बघायला ५० प्रेक्षक देखील हजर नव्हते. आणि जेंव्हा सचिनचा मुलगा अर्जुन शालेय सामन्यासांठी पुण्यात आला तेंव्हा त्याला बघायला २५० च्या वर लोकांची गर्दी. ह्याला म्हणतात नाममहात्म्य. उद्या कोहलीच्या कर्णधारपदाखीला त्रिमुर्ती,सेहवाग, धोनी ह्यांना वगळून संघ पाठवला तर किती लोक पहाटे उठून सामना बघतील ? किती प्रेक्षक मैदानात हजेरी लावतील ? आणि मुख्य म्हणजे ह्या संघाच्या सामन्यांना कोण प्रायोजक आपले पैसे लावेल ? दोन वर्षापूर्वीच्या आयपीएलला सचिन शेवटी एकदाचा फिट घोषीत होऊन खेळायला येईपर्यंत मुंबई इंडियन्सच्या सामन्यांना काय गर्दी होत होती ? सचिन आल्यावर तिच गर्दी किती वाढली ? प्रत्यक्ष तुम्हीच घेतलेला हा अनुभव आहेत. शेवटी रेस मध्ये भाग घ्यायचा का नाही हे घोडा ठरवू शकत नाही हेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रेस मध्ये भाग घ्यायचा का नाही हे घोडा ठरवू शकत नाही हेच खरे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/29/2012 - 08:55 नवीन
आयसीसी चे मुख्य उद्देश म्हणजे गर्दी आणि पैसा. आता गर्दी आणि पैसा हे गणित जुळवायचे तर ज्यांना दर्शकांनी देवतुल्य बनवले आहे आणि ज्यांना खेळताना बघण्यासाठी दर्शक खिसे रिकामे करायला तयार आहेत, त्या खेळाडूंना खेळवणे भागच आहे ना ? मुद्यात दम आहे. ठाण्याला, युवीची फलंदाजी आणि युवीला जवळून बघायला मिळावे म्हणून ऐववेळी आयपीएलच्या तिकिटासाठी केलेला खटाटोप आणि धावपळ आठवली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

घरी बसवा

कपिलमुनी
Fri, 01/27/2012 - 15:34 नवीन
सेंच्युरी नाही म्हणून सचिनला घरी बसवा ... महाराष्ट्राची प्रगती नाही म्हणून सी एम ना घरी बसवा.. जनलोकपाल नाही म्हणून अण्णांना म्हणून घरी बसवा.. ( मंदाकिनी , भन्नाट पूर्ण न के ल्याबद्दल परा ला घरी बसवा) बादवे मिपा वर अजुन कोणा़ कोणाला घरी बसवता येइल ?
  • Log in or register to post comments

बादवे मिपा वर अजुन कोणा़

मोहनराव
Fri, 01/27/2012 - 16:01 नवीन
बादवे मिपा वर अजुन कोणा़ कोणाला घरी बसवता येइल ?>>> तु कंपनीत असताना मिसळपाव उघडुन बसतोस, तुलाही घरी बसवता येईल! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

१२०

चिरोटा
Fri, 01/27/2012 - 15:43 नवीन
१२० कोटींतल्या ११ना , २ कोटींतल्या ११ कडून हरताना पाहून एक मिपाकर म्हणून मान शरमेने खाली गेली.
  • Log in or register to post comments

ते कसेही खेळोत..पण हा धागा

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/27/2012 - 16:06 नवीन
ते कसेही खेळोत..पण हा धागा शं-भर मारणार हे नक्की ;-) Image removed.
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/27/2012 - 16:58 नवीन
सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा.. हम्म, सहमत आहे. आवडता विषय काथ्याकुटायला घेतल्याबद्दल आभारी. -दिलीप बिरुटे (ऑष्ट्रेलियात चव गेल्याने नाराज असलेला)
  • Log in or register to post comments

फाट्यावर...

असुर
Fri, 01/27/2012 - 17:21 नवीन
चवकशीच्या कुठल्या अ‍ॅक्टान्वये हा धागा काढला आहे हे धाग्याच्या सुरुवातीलाच (किंवा मध्ये, किंवा शेवटी, किंवा कुठेही) स्पष्ट न केल्याने सदर धाग्याला फाट्यावर मारण्यात आलेले आहे. बाकी ररा पुरेसे बोलले आहेतच. आणि त्यांच्या प्रतिसादातूनही काही कळले नसेल, तर काहीही कळण्यापलिकडे गेल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन गप्प रहायचे ठरवण्यात आले आहे. पराषेटना 'डायरीदान' या नावाने लेखमाला सुरु करण्याची विनंती! --असुर
  • Log in or register to post comments

सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा..

समंजस
Fri, 01/27/2012 - 18:57 नवीन
---- मुळीच घरी बसवू नये. क्रिकेट सारख्या मोठया खेळात हरण्याच्या अश्या छोट्या छोट्या घटना होतच असतात. त्याचं काय मोठं मनाला लावून घ्यायचं? अश्या छोट्या घटनांमुळे आपण त्यांनाच काय, कोणालाही घरी बसवू नये.
  • Log in or register to post comments

आणि तसं पाहताही जेव्हा एखादी

प्रशांत उदय मनोहर
Fri, 01/27/2012 - 19:20 नवीन
आणि तसं पाहताही जेव्हा एखादी व्यक्ति सर्वांना हवीहवीशी वाटत असते तेव्हाच तिने मानाने निवृत्त होण्यात खरी शान असते.
१०० % सहमत. उदा. सुनील, कपिल यांनी घेतलेली निवृत्ती. पण शतकांचे शतक पूर्ण होणं ही बाबही असामान्य आहे आणि ती न साधण्याइतकं सचिन "हे" झाला नाही अजून. त्यानंतर मात्र त्याने सन्मानाने निवृत्त होणेच चांगले.
अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला मिळाली.
१. सध्याचा परफ़ॉर्मन्स बघितल्यावर वरील तिघांसह इतर आठांवरही जळजळीत टीका होणं आपल्या भारतीय संस्कृतीला अनुसरून आहे. आणि काय होतं, की क्रिकेटला इतकं महत्त्व दिलं जातं आपल्याकडे, की घरात एखाद्याचा दहवा/तेरावा असेल तरी जर क्रिकेट मॅच चालू असेल तर दुःख गेलं तेल लावत.. पण क्रिकेटचा विचार सोडवत नाही. क्रिकेट या खेळाचं नाव जर विष्णु, किंवा कृष्ण किंवा तत्सम देव/देवी असतं, तर त्याबद्दलच्या विचाराने कळत-नकळत अनेक भारतीयांना मोक्ष मिळाला असता! २. सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा.
  • Log in or register to post comments

कपील?

श्रावण मोडक
Fri, 01/27/2012 - 19:23 नवीन
सुनीलसोबत कपीलचं नाव पाहून आश्चर्य वाटलं. कपीलची निवृत्ती लांबली. इतकी, की सचिनची आत्ताची कामगिरी परवडली, अशी कपीलची स्थिती झाली होती. तो हॅडलीचा विक्रम एकदाचा पार झाला आणि मग अनेकांनी हुश्श केलं होतं. निवृत्तीबाबत अलीकडच्या काळातला सर्वाधिक हुशार खेळाडू सुनीलच. अगदी अनपेक्षीतपणे त्याने निवृत्तीची घोषणा केली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत उदय मनोहर

>>>>सचिनचं शंभरावं शतक यथाकाल

यकु
Fri, 01/27/2012 - 19:32 नवीन
>>>>सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. =) ) =) ) =) ) =) ) =) ) लेखामागची परिस्थिती काय जब्बरदस्त टिपलीय. खपलो हे वाचून..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत उदय मनोहर

कॉपीराईट..?

मोदक
Fri, 01/27/2012 - 19:54 नवीन
>>>>>>>सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. बहुदा या वाक्याचा कॉपीराईट छोटा डॉन कडे आहे. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

^^^

प्रशांत उदय मनोहर
Sat, 01/28/2012 - 10:35 नवीन
आम्ही इतरांची वाक्ये चोरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

गल्ली चुकलं हो ते...

मोदक
Sun, 01/29/2012 - 01:00 नवीन
ते तर तुमचेच वाक्य आहे... उगाच चाळीमधल्या संडासासमोरच्या रांगेतला माणूस संडासाचं दार उघडायची वाट पाहतो तसे करू नका. http://www.misalpav.com/node/19879#comment-355215 आमची मेमरी थोडी गंडली असावी. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत उदय मनोहर

माय गं मेलो.............!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/27/2012 - 20:13 नवीन
सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. लबर एक. प्रशांतराव दंडवत घ्या आमचा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

उगाच मुंबईतल्या एखाद्या

५० फक्त
Fri, 01/27/2012 - 22:41 नवीन
उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. - कारण बहुधा त्याच्या हातातला टमरेल गळका असतो, आतल्यानं बाहेर यायला अजुन उशीर लावला आणि पाणि गेलं संपुन तर काय करा - दगडी बांधकाम ?
  • Log in or register to post comments

कारण बहुधा त्याच्या हातातला

प्रशांत उदय मनोहर
Sat, 01/28/2012 - 11:08 नवीन
कारण बहुधा त्याच्या हातातला टमरेल गळका असतो, आतल्यानं बाहेर यायला अजुन उशीर लावला आणि पाणि गेलं संपुन तर काय करा - दगडी बांधकाम ?
ते ठीक आहे हो! पण क्रिकेट मॅचमधल्या पराभवानंतर चर्चा करताना लोकांना स्वतःला गळका-टमरेलधारी चाळकर्‍याच्या भूमिकेत जायला का आवडतं एवढं, हा प्रश्न नेहमी पडतो मला. बाय द वे, वर जाताना जर खाल्लेलं घेऊन जाल तर कदाचित् वरच्या संडासासमोरील रांगेत उभे रहावे लागेल तुम्हाला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अनेक वर्षापासून जगातील सर्वात

निनाद मुक्काम …
Sat, 01/28/2012 - 00:16 नवीन
अनेक वर्षापासून जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळाने अती क्रिकेट भारतीय जनतेच्या आणी खेळाडूंच्या माथी मारले आहे. त्यात आय पी एल ह्या व्यावसायिक स्पर्धेची भर पडली .त्यात तर सामन्यांचा रतीब असतो. पूर्वी सचिनने २० २० देशासाठी खेळायचे टाळले होते. पण आता तोही'' दुनिया हिला देंगे'' म्हणत ह्या सर्कशीत दाखल झाला आहे. आपले खेळाडू एक तर प्रचंड थकलेले आहेत किंवा दुखापती लपवून खेळत आहेत. भारतीय संघाबद्दल म्हटले तर कुंबळे गेल्यावर एकहाती गोलंदाजीची धुरा वाहणारा एकही पर्याय उपलब्ध नाहीं आहे. जहीर दुखापतीने त्रस्त बाकीचे आयाराम ,गयाराम आहेत. क्रिकेट सामने गोलंदाज जिंकून देतात. परदेशात ८ सामने सलग हरणे कुणालाच मान्य होणार नाहीं. कणेकरांचे एक वाक्य आठवले . एकदा कपिल देव पाकिस्तान विरुद्ध हरल्यावर म्हणाला होता '' हा खेळ आहे. कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार'' त्यावर ते म्हणतात '' हे आम्हालादेखील कळते, पण हरणारा संघ नेहमी आपलाच का असतो. ता .क आता आय पी एल ५ चे बिगुल वाजले आहे. त्यात पाटा खेळपट्टीवर फटाक्यांची आतिषबाजी पहायला सज्ज होऊया.
  • Log in or register to post comments

क्रीडा मंत्रालयाने कच खाऊन

श्रीरंग
Sat, 01/28/2012 - 00:44 नवीन
क्रीडा मंत्रालयाने कच खाऊन बीसीसीआय समोर सपशेल लोटांगण घातले नसते, आणी WADA ची नियमावली बंधनकारक केली असती तर ८०% क्रिकेटपटू डोप टेस्ट मधे फेल होऊन घरीच बसले असते.
  • Log in or register to post comments

या ८०% मध्ये सचिन, द्रविड आणि लक्ष्मण आहेत का..?

मोदक
Sat, 01/28/2012 - 01:48 नवीन
या ८०% मध्ये सचिन, द्रविड आणि लक्ष्मण आहेत का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

थोडी कळ काढा

शेखर काळे
Sat, 01/28/2012 - 03:40 नवीन
आणखी काही दिवसात एक दिवसीय श्रुंखला सुरु होईल, त्यात सचिन तेन्डुलकर आपले १००वे शतक काढेल, भारत २-३ सामने जिंकेल. सर्वजण आपापल्या घरी सुखाने नांदू लागतील. हेही दिवस जातील !
  • Log in or register to post comments

@वरील सर्व वाक्पटू पंडितांना

स्पा
Sat, 01/28/2012 - 08:48 नवीन
@वरील सर्व वाक्पटू पंडितांना एक सल्ला आता सर्व काही विसरा आणि फू बै फ़ू बघा
  • Log in or register to post comments

मी किती सुखी आहे

पुण्याचे वटवाघूळ
Sat, 01/28/2012 - 10:22 नवीन
क्रिकेटमध्ये लक्ष घालणे कमी केल्यापासून डोक्याला होणारा किती ताप आणि अन्यथा फुकट गेलेला किती वेळ मी वाचवत आहे याचाच विचार करत आहे कालपासून या धाग्यावरील गरमागरम चर्चा वाचून.
  • Log in or register to post comments

छान माहितीपूर्ण चर्चा.

कॉमन मॅन
Sat, 01/28/2012 - 13:49 नवीन
छान माहितीपूर्ण चर्चा. सर्वांच्या मताचा आदर आहेच..! :) बाय द वे, आज ऑस्ट्रेलियाने ४-० अशी मालिका जिंकली आणि आपण आपला परदेशातला सलगच्या ८ व्या पराभवाचा विश्वविक्रम नोंदवला! सचिन, द्रविड आणि लक्ष्मणसह सर्व धुरंधर खेळाडूंचा विजय असो..! :)
  • Log in or register to post comments

झोपलेल्याला उठवता येतं.

गणपा
Sat, 01/28/2012 - 14:16 नवीन
झोपलेल्याला उठवता येतं. झोपेचं सोंग घेतलेल्याला नव्हे. ;) शेंचुरी मारुनच दम खाणार बघा तुम्ही. यांना घ्यारे (भारतीय संघाच्या) आत. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमन मॅन

अहो वायझेडमॅन

वेताळ
Sat, 01/28/2012 - 14:39 नवीन
क्रिकेट ११ लोकाचा खेळ आहे.तो जितका ताकतीने खेळता येतो त्याबरोबर डोक्याचावापर करुन देखिल खेळावे लागते.सचिन,द्रविड किंवा लक्ष्मण ह्यांच्यावर टिका करण्याअगोदर त्याची जागा भरुन काढणार्‍या ३ खेळाडुंची नावे तरी दे बाबा इथे.देवाने हात व मालकानी मिसळपाव उपलब्द करुन दिले म्हणुन काहीबाही लिहणे बंद कर. लेका सचिन किंवा इतराना म्हातारे म्हनण्यापेक्षा दिवसभर एकाद्या मैदानावर नुसते चालुन तरी दाखव मग तुझा तुझ्याबद्दलचा गैरसमज दुर होईल.
  • Log in or register to post comments

लेका सचिन किंवा इतराना

कॉमन मॅन
Sat, 01/28/2012 - 14:50 नवीन
लेका सचिन किंवा इतराना म्हातारे म्हनण्यापेक्षा दिवसभर एकाद्या मैदानावर नुसते चालुन तरी दाखव मग तुझा तुझ्याबद्दलचा गैरसमज दुर होईल.
आम्ही मैदानात चालण्या, न चालण्यामुळे सचिन आणि इतर खेळाडूंच्या परदेशात सलग ८ वेळा तोंडावर आपटण्याच्या नाकर्तेपणाचे समर्थन कसे होऊ शकते हे समजले नाही.
देवाने हात व मालकानी मिसळपाव उपलब्द करुन दिले म्हणुन काहीबाही लिहणे बंद कर.
मानणार नसलो तरी आपल्या मौलिक सुचनेचा आम्ही आदर करतो.. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

सचिन जर तुला आवडत नसेल तर ठिक आहे.

वेताळ
Sat, 01/28/2012 - 15:12 नवीन
पण त्याला म्हातारा किंवा त्याने घरी बसावे हे सांगण्याची आपली योग्यता आहे का ते तपासुन पहावे.सचिनने कधीच स्वःताचे गोडवे गायले नाहित किंवा कधीच कुणावर टिका केलेली नाही. त्याला प्रत्येकवेळी टारगेट करणे हे चुकीचेच आहे.त्याने किती पैसे मिळवावे हे ठरवणारे तुम्ही कोण? बरे अजुन सचिनने पैसे मिळवताना देखिल काही नियम पाळले आहेत. तो कधीच मद्याची,सिगारेट किंवा इतर प्रक्षोभक जाहिराती करुन पैसे कमावत नाही.तो फिट नसताना सहसा खेळत नाही.नावे ठेवताना जरा विचार करावा. बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments

सचिन जर तुला आवडत नसेल तर ठिक

कॉमन मॅन
Mon, 01/30/2012 - 12:23 नवीन
सचिन जर तुला आवडत नसेल तर ठिक आहे.
असे आम्ही कुठेच म्हटलेले नाही. त्याचा पूर्वीचा खेळ पाहता तो आमचा निश्चितच एक आवडता फलंदाज आहे.
पण त्याला म्हातारा किंवा त्याने घरी बसावे हे सांगण्याची आपली योग्यता आहे का ते तपासुन पहावे.
अशी योग्यता आवश्यकच आहे असे आम्ही मानत नाही. अर्थात, आपल्या मताचा आदर आहेच!
सचिनने कधीच स्वःताचे गोडवे गायले नाहित किंवा कधीच कुणावर टिका केलेली नाही.
त्याच्या व्यक्तिगत गुणांबद्दल आम्ही कुठेच शंका घेतलेली नाही.
त्याला प्रत्येकवेळी टारगेट करणे हे चुकीचेच आहे.
आम्ही त्याला आमच्या आठवणीप्रमाणे सदरहू धाग्यात प्रथमच टार्गेट केलेले आहे. 'प्रत्येकवेळी' हा शब्द वापरण्यापूर्वी आम्ही सचिनला टार्गेट केल्याची अन्य काही उदाहरणे दिलीत तर बरे होईल.
त्याने किती पैसे मिळवावे हे ठरवणारे तुम्ही कोण?
आम्ही निश्चितच कुणी नाही. परंतु आयपीएलसारख्या सामन्यांमधून स्वत:चा लिलाव करून घेण्याऐवजी देशाकरता उत्तम खेळून भरपूर पैसे अगदी अवश्य मिळवावेत असे आम्हाला केवळ सचिनच नव्हे तर भारतीय संघातल्या प्रत्येक खेळाडूबाबत वाटते.
बरे अजुन सचिनने पैसे मिळवताना देखिल काही नियम पाळले आहेत. तो कधीच मद्याची,सिगारेट किंवा इतर प्रक्षोभक जाहिराती करुन पैसे कमावत नाही.
मद्याची,सिगारेट किंवा इतर प्रक्षोभक जाहिराती करुन पैसे मिळवणे अथवा न मिळवणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे आम्हाला वाटते. सचिन जर तसे पैसे मिळवत नसेल तर तो त्याचा गुण नसून व्यक्तिगत निर्णय आहे असे आम्हाला वाटते.
तो फिट नसताना सहसा खेळत नाही.
ते अपेक्षितच आहे. किंबहुना तेच अपेक्षित आहे!
नावे ठेवताना जरा विचार करावा.
विचार करूनच नावे ठेवली आहेत. त्याच्याबद्दल आदर आहे आणि म्हणूनच त्यानं स्वत:चं अधिक हसं करून न घेता सन्मानाने घरी बसावं असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. वेताळजी, या निमित्ताने चर्चा करून आम्हाला आमचे मुद्दे मांडण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा