✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अक्षरलेखन - काही टिप्स

प
पाषाणभेद यांनी
Mon, 02/07/2011 - 12:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26639 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

धन्यवाद.... अतिशय उत्तम आणि

स्पा
Mon, 02/07/2011 - 13:02 नवीन
धन्यवाद.... अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण लेख...
  • Log in or register to post comments

वाव

प्रचेतस
Mon, 02/07/2011 - 13:38 नवीन
सुरेख लेख. फौंटन पेनमुळे पुण्यातील दगडूशेठ शेजारचे 'काळे ब्रदर्स'चे दुकान आठवले. बॉलपेन्स, जेलपेन्सच्या आजच्या जमान्यातही ते दुकान टिकून आहे. त्यांच्या दुकानात फौंटन पेन पाच वर्षांची ग्यारंटी मिळत असे व तिचा वापर करण्याची वेळ सहसा कधी येत नसे. इतके ते पेन चांगले असत.
  • Log in or register to post comments

मस्त लेख..... आमच्या

मनराव
Mon, 02/07/2011 - 14:59 नवीन
मस्त लेख..... आमच्या अक्षरलेखना बाद्द्लच्या पाषाणरूपी मनाला तूम्हि भेदलत.......
  • Log in or register to post comments

उत्तम लेख. चांगले अक्षर असावे

अरुण मनोहर
Mon, 02/07/2011 - 15:37 नवीन
उत्तम लेख. चांगले अक्षर असावे ह्याविषयीची कळकळ लेखनात दिसून येते. कळफलक बडविण्याच्या काळात लेखी अक्षराविषयी येवढे प्रेम असणारा माणूस विरळाच. कळफलकाची सवय लागल्यापासून माझे अक्षर देखील पार बिघडले आहे. कधी एकेकाळी खूप चांगले होते, ह्याची फक्त धूसर आठवण मनात राहीली आहे. त्यामुळे हा लेख फारच भावला.
  • Log in or register to post comments

पाभे, तुम्ही आधी का नाही भेटलात..

५० फक्त
Mon, 02/07/2011 - 15:38 नवीन
इ. ९वी मध्ये माझ्या शक्य होईल तेवढ्या सुंदर अक्षरात एका मुलीला पत्र लिहिलं होतं , ते तिनं २ मिनिटात '' छे काही वाचताच येत नाही '', म्हणुन परत दिलं होतं. - पाभे तुम्ही या आधी एक महिना तरी भेटायला हवं होतं. आता माझं अक्षर पुण्या-सोलापुरात्ल्या केमिस्ट्ना वाचता येईल एवढं सुधारलं आहे. हर्षद.
  • Log in or register to post comments

छान माहीती....

डावखुरा
Mon, 02/07/2011 - 15:41 नवीन
छान माहीती....
  • Log in or register to post comments

अक्षर आणि लेख, दोन्हीही

बिपिन कार्यकर्ते
Mon, 02/07/2011 - 15:44 नवीन
अक्षर आणि लेख, दोन्हीही आवडले. मस्तच!
  • Log in or register to post comments

लेख आवडला. छायाचित्रे दिसत

यशोधरा
Mon, 02/07/2011 - 16:05 नवीन
लेख आवडला. छायाचित्रे दिसत नाहीत, घरुन पाहीन. ह्या अगोदरही अक्षरासंबंधी लेख लिहिलेला आहेत? लिंक द्याल का?
  • Log in or register to post comments

अक्षर आणि लेख

अरुण वडुलेकर
Mon, 02/07/2011 - 16:48 नवीन
दोन्हीही आवडले. माझे मतः हस्ताक्षराचे वळण आणि सुरेखता बरेचदा लिहितेवेळीच्या तुमच्या मनःस्थितीवरही अवलंबून असते. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की, ज्या वेळी मनःस्थिती ठीक नसते त्यावेळी हस्ताक्षर हमखास बिघडते. घाईने लिहिले तर ते बिघडतेच बिघडते. हस्ताक्षर सुरेख जमले नसले तरी ते सुवाच्य असावे एवढी मात्र खबरदारी घेण्याचा प्रयत्न करावा.
  • Log in or register to post comments

वा छान!

कच्ची कैरी
Tue, 02/08/2011 - 10:37 नवीन
मस्त लेख ! खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी असते असे कुणीतरी म्हटले आहे
  • Log in or register to post comments

>>खराब अक्षर ही अर्धवट

मी ऋचा
Tue, 02/08/2011 - 12:12 नवीन
>>खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी असते असे कुणीतरी म्हटले आहे ये कण्ट्री के बापूने बोलेला हय। बाकी लेख आणि लिखाण अतिशय सुंदर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्ची कैरी

मस्त लिहिले आहे सचिन..

गणेशा
Tue, 02/08/2011 - 15:04 नवीन
मस्त लिहिले आहे सचिन.. आवडले.. छायाचित्र दिसत नाहियेत नंतर नक्की पाहिन ..
  • Log in or register to post comments

व्वा पाभे! जे अक्षर आपण

यकु
गुरुवार, 01/26/2012 - 00:42 नवीन
व्वा पाभे! जे अक्षर आपण क्षणोक्षणी वापरतो त्याबद्दल क्वचितच कुणी एवढं सुंदर सांगू शकतं. थँक्यू धाग्यावर लिंक दिल्याबद्दल. अक्षरलेखनाबद्दल एवढा विस्तृत आणि छायाचित्रांसोबतचा लेख वाचायचा सुटला होता ना. अक्षरलेखनाच्या (सुलेखन नव्हे) करामती मी पण करुन बघतो, त्यांचे फोटो टाकीन कधीतरी.
  • Log in or register to post comments

+१

वपाडाव
गुरुवार, 01/26/2012 - 03:44 नवीन
थँक्यू धाग्यावर लिंक दिल्याबद्दल. माझ्या घरातील सदस्यांचे अक्षरलेखन व सुबकता :: (उतरत्या क्रमाने) बाबा, आइ, मी व बहिण. आम्हा चौघांचेही अक्षर वाचनीय व सुरेख-१ असे आहे. तुमच्या या धाग्यामुळे एक किस्सा आठौला.... माझ्या तृतीय वर्षातील गोष्ट आहे. आम्ही आमच्या सी.आर. च्या खोलीवर कुठली तरी असाइनमेंट पुर्ण करत बसलो होतो. त्या वेळी कशावरुन तरी असा मुद्दा निघाला की कुणाची कुणाविषयी इर्ष्येची भावना आहे का? मग बरीच मंडळी एकमेकांच्या अभ्यास विषयातील ज्ञानाबद्दल बोलत होती, कुणी खेळातील पुढाकाराबद्दल, कुणी काही अन कुणी काही. तेव्हा मी त्या सी. आर. ला म्हणालो "मी तुझ्या अक्षरावर खुप जळतो." तो म्हणाला "का? इतर काही नाही का जळण्यासारखे?" मी म्हणालो, "बाकी कशातही थोड्याफार परिश्रमाने पुढे सरकता येइल, पण या वयात तुझ्यासारखे अक्षर काढणे मला होणार नाही." अन आजही मला त्याचे अक्षर अन त्यांचे वळण लक्षात आहे. वर्गातील अर्धी अधिक मुलं त्याच्याकडुन जर्नल घेउन जायची अन त्याहुन कमी माझ्याकडुन. सध्या तो मित्र माझ्या काँटॅक्ट मध्ये नाही. पन जर हे त्याला कळाले तर त्याला आनंदच होइल......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

मस्त!!

मोहनराव
गुरुवार, 01/26/2012 - 20:30 नवीन
पाभे, लेख व अक्षर दोन्हीहि आवडले. माझे ४थी पर्यंत अक्षर अतिशय खराब होते. पण खरी गोष्ट सांगतो ५ वी पासुन ते अतिशय सुधारले, इतके की शुद्धलेखनाचे बक्षीस मिळण्यापर्यंत!! नंतर इंग्रजी अक्षरसुद्धा छान होते. माझे जर्नल्स नंतरच्या बॅचसाठी राखुन ठेवले गेले. त्या आठवणींना आज तुमच्या लेखामुळे उजाळा मिळाला. आजच्या बॉलपेनपेक्षा फौंटन पेनने लिहीण्याची मजा काही औरच होती.
  • Log in or register to post comments

चांगल्या टिप्स

धनंजय
गुरुवार, 01/26/2012 - 21:22 नवीन
चांगल्या टिप्स, आणि अक्षरही.
  • Log in or register to post comments

लेख एकदम पाभे इश्टाईल, मस्तच!

दादा कोंडके
गुरुवार, 01/26/2012 - 21:31 नवीन
माझा ५ वीत पहिला क्रमांक आला होता. वार्षिक स्नेहसंमेलनात मला शाळेने एक फौंटनपेन बक्षिस दिला होता. तो गळका निघाला.
अश्या छोट्या वाक्यांमुळे वाचायला मजा आली. :) माझ्याही लहानपणी शाईपेन वापरत असू. नंतर बॉलपेननी, त्यातल्यात्यात रेनॉल्ड्सनी धुमाकूळ घातला होता! त्याचा शाईचा एक वेगळाच (हिरवा आणि निळा एकत्र केल्यावर होतो तसा) रंग छान वाटायचा. पण खूपच फि़क्कट उठायचा. शाळेत असताना पेनचा लिहिण्याबरोबरच बाकावर खेळ्ण्यासाठीही उपयोग केलाय. बाकावर पेन ठेउन कॅरम मध्ये मारतो तशी टिचकी मारून दुसर्‍याचं पेन बाकाबाहेर पाडायचं असा तो खेळ होता. त्यासाठी मुलं पेन मध्ये त्याचं "मोमेंटम" वाढवण्यासाठी रिफील बरोबरच छोटे नट-बोल्टस ही घालत असतं. त्यामुळे लिहायची आणि खेळायची पेन वेगळी असत. :) शाईपेननी लिहिताना दाब द्यावा लागत नाही आणि बॉलपेननी लिहिताना लवकर हात दुखतो असं आईचं म्हणणं असायचं. पण वर्गात पहिला येणार्‍या मुलाच बघून मी सेलो ग्रिपर पेन घेतलं आणि गेले १५ वर्षे मी तेच पेन वापरतोय. इतकं की घरीच ४-५ पेन आणि १०-१२ रिफील घेउन वर्षभराची बेगमी करून ठेवतो.
  • Log in or register to post comments

मस्त आठवणी... धन्यवाद...

वपाडाव
Fri, 01/27/2012 - 00:10 नवीन
कोंडके सायेब, मस्त उजाळा देताय आठवणींना.... मी ५वी पासुन ते १०वी पास होइस्तोवर रेनॉल्ड्स ०४५ फाइन कार्ब्युअर वाला पेन वापरत असे..... अन हो, त्यावर I N D I A ही अक्षरे कोरता येत असत... अन पुन्हा त्यातुन आपलं पेन ओळखु यावं म्हणुन रिफिल भोवती आपल्या नावाची एक चिठ्ठीही जोडत असु... याच पेनामुळे माझं अक्षर वळणदार झालं असावं असं माझं मत आहे.... हे बघा ते पेन... Image removed. पण मग १०वी नंतर सेलो पेन्सने (२००० सालानंतर) खुप धुमाकुळ घातला... व रेनॉल्ड्सचं सगळं मार्केट काबीज केलं.... मी सुद्धा आजघडीला सेलो ग्रिपरच (जुना) वापरतो... त्याचा फ्लो कंट्रोल सुरेख आहे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हा हा...

दादा कोंडके
Fri, 01/27/2012 - 00:39 नवीन
हे विसरलोच होतो. आम्ही पण हे कोरत असू. :) रेनॉल्ड्स खूपजणं वापरायची पण "जेटर" जरा श्रिमंत प्रकरण होतं. मी पण एकदा बिदरमधून घेतलेलं चार वेगवेगळ्या रंगाच्या रिफील असलेलं पेन वर्गात दाखवून भाव खाल्ला होता. अजून एक, काही जणांची पेन तोंडात घालायची सवय असायची. पेनचं झाकण अक्षरशः चघळत असत. झाकण दातांच्या व्रणांनी चेपून गेलेलं असायचं. अगदी निकडीच्या वेळी अशा मुलांचं पेन घेतलंकी कळायच की झाकण थुंकीनी भरलय! :) च्यायला खरच जुन्या आठवणींनी डोळ्यात पाणी आलय आज. गळकं शाईचं पेन टिपायला कंपासात खडू ठेवत असू, आज त्यानीच डोळे टिपले असते! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

भावलं !!

वपाडाव
Fri, 01/27/2012 - 02:08 नवीन
गळकं शाईचं पेन टिपायला कंपासात खडू ठेवत असू, आज त्यानीच डोळे टिपले असते!
मनापासुन भावलं हे वाक्य, भिडलं सुद्धा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

अहो हे तर काहीच नाही, आम्ही

पाषाणभेद
Fri, 01/27/2012 - 20:51 नवीन
अहो हे तर काहीच नाही, आम्ही त्या रेनॉल्डच्या पेनवर काही वरील REYNOLDS FINE CARBURE या अक्षरातील काही अक्षरे खोडून I LOVE U असे लिहीत असू अन पुढे.....हॅ हॅ हॅ गरजूंनी खाली दर्शविल्याप्रमाणे प्रयत्न करावा: Image removed. (टिप: R पासून I आणि पहिल्या E पासून L) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

शाळेत असताना हेवा वाटायचा तो

सूड
Fri, 01/27/2012 - 16:56 नवीन
शाळेत असताना हेवा वाटायचा तो आठवीपासून संस्कृत शिकवणार्‍या मॅडमच्या वक्तृत्त्वाचा आणि नववीला असताना इतिहास शिकवणार्‍या सरांच्या अक्षराचा. दोघांच्या या गोष्टी आपल्यात उतरवण्याच्या नादात बर्‍यापैकी प्रगती झाली. सरांनी शिकवलेली समास सोडण्याची पद्धत, लिखाणाची शिस्त यामुळे लिखाण नेटकं व्हायला फार मदत झाली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा