Skip to main content

मी हुच्चभ्रू

लेखक अन्या दातार यांनी रविवार, 22/01/2012 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
विकी वरची माहिती भाषांतरित करून मेगाबायटी प्रतिसाद देणार मीही हुच्चभ्रू होणार ||१|| धागे हायजॅक करून गोंधळ मी घालणार मीही हुच्चभ्रू होणार ||२|| राजकीय-धार्मिक मुद्यांनाच हात मी लावणार मीही हुच्चभ्रू होणार ||३|| ललित लेखनाला फाट्यावर मारणार मीही हुच्चभ्रू होणार ||४|| इतर धाग्यांना तुच्छ मी मानणार मीही हुच्चभ्रू होणार ||५|| मराठी संस्थळावर इंग्रजी प्रतिसाद मी देणार मीही हुच्चभ्रू होणार ||६|| संस्थळांवर लॉगिन न करता वाचनमात्र मी राहणार मीही हुच्चभ्रू होणार ||७||
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3160
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

मजा आली. काही भर घालतो. :) काय लिहिलंय त्यापेक्षा, कोणी लिहिलय ते बघणार, मीही हुच्चभ्रू होणार||८||

चालू दे..... !!! :) -दिलीप बिरुटे

आणि एक र्‍हायलं, प्रतिसादांमधे 'अव्यक्त जाणीवा, नेणीवेची पातळी, संपृक्त, व्यवच्छेदक' असले जडजंबाल शब्द वापरा, भले त्याचा अर्थ तुम्हाला पण कळला नाही तरी चालेल; की झालातच तुम्ही हुच्चभ्रू.

हा हा हा !! फक्कड माझा लई मेगाबायटी प्रतिसाद इथे अपेक्षित असेल काही लोकांना ;) त्यापेक्षा खव मधे एक जुनी लिंक देतो रे अन्या

वा अन्या भौ...अगदी मोजुन मारल्या हायती,पन दादा कोंडक्याची भर जोरदार दनका देनारि हाय...!

अपु-या अन जुन्या पुराण्या माहितीवर आधारीत कविता आहे. हल्लीचे हुच्च्भ्रु असे नसतात, किंबहुना हल्ली असे प्रकार करुन हुच्चभ्रु होता येत नाही, त्यासाठी , जाउदे उगा फुकट सल्ले का द्या ? तात्पुरती सही - नव्यांना प्रतिसाद. जुन्यांना वा वा, धाग्याला टिआरपी वरच्यावरी - हुच्चभ्रुपणा येता घरी.

In reply to by ५० फक्त

नव्यांना प्रतिसाद. जुन्यांना वा वा, धाग्याला टिआरपी वरच्यावरी - हुच्चभ्रुपणा येता घरी. >>> टिआरपी नाय वो, ट्यार्पी >>>> तात्पुरती सही - तुमचं आमचं सेम नसतं !!

काही गोष्टी राहिल्या असतील तर दादा कोंडकेंनी केल्याप्रमाणे अ‍ॅड करा. @ ५० फक्तः ज्या गोष्टी सार्वकालिक आहेत त्यावर लिहिले आहे. नव्या गोष्टींवर एक नवी कविता करु कि! हाकानाका :D

हा हा हा ... लैच !! _/\_
नव्यांना प्रतिसाद. जुन्यांना वा वा, धाग्याला टिआरपी वरच्यावरी - हुच्चभ्रुपणा येता घरी.
_/\_

मी तर इतका वेळ प्रतिसाद न देउन हुच्चभ्रुच झालो होतो असे जाता जाता णमुद करतो.....