✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी हुच्चभ्रू

अ — अन्या दातार, Sun, 01/22/2012 - 14:05
विकी वरची माहिती भाषांतरित करून मेगाबायटी प्रतिसाद देणार मीही हुच्चभ्रू होणार ||१|| धागे हायजॅक करून गोंधळ मी घालणार मीही हुच्चभ्रू होणार ||२|| राजकीय-धार्मिक मुद्यांनाच हात मी लावणार मीही हुच्चभ्रू होणार ||३|| ललित लेखनाला फाट्यावर मारणार मीही हुच्चभ्रू होणार ||४|| इतर धाग्यांना तुच्छ मी मानणार मीही हुच्चभ्रू होणार ||५|| मराठी संस्थळावर इंग्रजी प्रतिसाद मी देणार मीही हुच्चभ्रू होणार ||६|| संस्थळांवर लॉगिन न करता वाचनमात्र मी राहणार मीही हुच्चभ्रू होणार ||७||

प्रतिक्रिया द्या
3147 वाचन

💬 प्रतिसाद (17)

हा हा.

दादा कोंडके
Sun, 01/22/2012 - 14:24 नवीन
मजा आली. काही भर घालतो. :) काय लिहिलंय त्यापेक्षा, कोणी लिहिलय ते बघणार, मीही हुच्चभ्रू होणार||८||
  • Log in or register to post comments

१ नं..... काव्यास आणि

पक पक पक
Sun, 01/22/2012 - 18:05 नवीन
१ नं..... काव्यास आणि काव्यपुर्तीस देखिल ___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/22/2012 - 14:28 नवीन
चालू दे..... !!! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

काय हो हुच्चभ्रू!

पैसा
Sun, 01/22/2012 - 14:39 नवीन
आणि एक र्‍हायलं, प्रतिसादांमधे 'अव्यक्त जाणीवा, नेणीवेची पातळी, संपृक्त, व्यवच्छेदक' असले जडजंबाल शब्द वापरा, भले त्याचा अर्थ तुम्हाला पण कळला नाही तरी चालेल; की झालातच तुम्ही हुच्चभ्रू.
  • Log in or register to post comments

सहमत आहे.... येक्दम खरं

पक पक पक
Sun, 01/22/2012 - 18:08 नवीन
सहमत आहे.... येक्दम खरं बोललात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हा हा हा !! फक्कड माझा लई

सुहास..
Sun, 01/22/2012 - 14:47 नवीन
हा हा हा !! फक्कड माझा लई मेगाबायटी प्रतिसाद इथे अपेक्षित असेल काही लोकांना ;) त्यापेक्षा खव मधे एक जुनी लिंक देतो रे अन्या
  • Log in or register to post comments

वा अन्या भौ...अगदी मोजुन

अत्रुप्त आत्मा
Sun, 01/22/2012 - 15:07 नवीन
वा अन्या भौ...अगदी मोजुन मारल्या हायती,पन दादा कोंडक्याची भर जोरदार दनका देनारि हाय...!
  • Log in or register to post comments

अपु-या अन जुन्या पुराण्या

५० फक्त
Sun, 01/22/2012 - 15:16 नवीन
अपु-या अन जुन्या पुराण्या माहितीवर आधारीत कविता आहे. हल्लीचे हुच्च्भ्रु असे नसतात, किंबहुना हल्ली असे प्रकार करुन हुच्चभ्रु होता येत नाही, त्यासाठी , जाउदे उगा फुकट सल्ले का द्या ? तात्पुरती सही - नव्यांना प्रतिसाद. जुन्यांना वा वा, धाग्याला टिआरपी वरच्यावरी - हुच्चभ्रुपणा येता घरी.
  • Log in or register to post comments

नव्यांना प्रतिसाद. जुन्यांना

सुहास..
Sun, 01/22/2012 - 15:52 नवीन
नव्यांना प्रतिसाद. जुन्यांना वा वा, धाग्याला टिआरपी वरच्यावरी - हुच्चभ्रुपणा येता घरी. >>> टिआरपी नाय वो, ट्यार्पी >>>> तात्पुरती सही - तुमचं आमचं सेम नसतं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

ट्यार्पी ला आता मी,टिआरपी च

प्रचेतस
Sun, 01/22/2012 - 17:26 नवीन
ट्यार्पी ला आता मी, टिआरपी च म्हणत बसणार, मीही हुच्चभ्रू होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

नव्यांना प्रतिसाद. जुन्यांना

यकु
Sun, 01/22/2012 - 15:31 नवीन
नव्यांना प्रतिसाद. जुन्यांना वा वा, धाग्याला टिआरपी वरच्यावरी - हुच्चभ्रुपणा येता घरी. =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

काही गोष्टी राहिल्या असतील तर

अन्या दातार
Sun, 01/22/2012 - 15:47 नवीन
काही गोष्टी राहिल्या असतील तर दादा कोंडकेंनी केल्याप्रमाणे अ‍ॅड करा. @ ५० फक्तः ज्या गोष्टी सार्वकालिक आहेत त्यावर लिहिले आहे. नव्या गोष्टींवर एक नवी कविता करु कि! हाकानाका :D
  • Log in or register to post comments

हा हा हा ... लैच !!

सुहास झेले
Sun, 01/22/2012 - 16:24 नवीन
हा हा हा ... लैच !! _/\_
नव्यांना प्रतिसाद. जुन्यांना वा वा, धाग्याला टिआरपी वरच्यावरी - हुच्चभ्रुपणा येता घरी.
_/\_
  • Log in or register to post comments

धाग्यांना ही & हि प्रतिसाद

सूड
Sun, 01/22/2012 - 17:10 नवीन
धाग्यांना ही & हि प्रतिसाद देणार मीही हुच्चभ्रू होणार !!
  • Log in or register to post comments

--

वपाडाव
Sun, 01/22/2012 - 19:02 नवीन
मी तर इतका वेळ प्रतिसाद न देउन हुच्चभ्रुच झालो होतो असे जाता जाता णमुद करतो.....
  • Log in or register to post comments

कॉलिंग सौ. साराभाई.....त्य

किचेन
Sun, 01/22/2012 - 19:09 नवीन
कॉलिंग सौ. साराभाई.....त्य शिक्वतिल तुम्हल हुछब्रू होन काय असत.
  • Log in or register to post comments

कॉलिंग सौ. साराभाई.....त्य

किचेन
Sun, 01/22/2012 - 19:09 नवीन
कॉलिंग सौ. साराभाई.....त्य शिक्वतिल तुम्हल हुछब्रू होन काय असत.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा