✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. ---

श
शशिकांत ओक यांनी
Tue, 01/17/2012 - 01:40  ·  लेख
लेख
मित्र हो, नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला. त्यातील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा.विचार करावा. खालील अभिप्राय बोलका आहे. ...श्रद्धेचे अस्तित्व मानवी जीवनात अपरिहार्य आहे. हे प्रमेय विज्ञानाच्या आधारेच सिद्ध करण्यासाठी अद्वयानंद यांनी पाश्चात्य शास्त्रज्ञ संशोधकांचा आधार घेऊन केलेला युक्तिवाद खरोखरच स्तिमित करणारा आहे. बुद्धिवादाचा तसेच विज्ञाननिष्ठेचा मक्ता आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्यांनी या पुस्तकातील युक्तिवाद आपल्या भूमिकेकडे नव्यादृष्टीने पहाण्याची निकड जाणवून देईल. या पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा.... ....... . दैनिक लोकमत -शंकर सारडा विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. --- कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. कडेगावची भानामती आणि आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बुवाबाजी कराडच्या पुर्वेस 20 किमीवर असलेल्या कडेगाव या गावी भानामतीचा विलक्षण प्रकार सुरू झाल्याची बातमी 15 मार्च 1988 च्या दै. पुढारीत प्रसिद्ध झाली.गावातील मराठी शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या मुलींच्या निघत असल्याचे व नेत्रतज्ज्ञ व इतर अधिकारी व्यक्तिंनी हा प्रकार प्रत्यक्ष जाऊन पाहून खरा असल्याची खात्री करुन घेतल्याचे व त्यांना हा प्रकार मती गुंग करणारा वाटला असल्याचे पुढे बातमीत म्हटले होते. यासंबंधी खरी परिस्थिती समजाऊन घेण्यासाठी मी ( अद्वयानंद गळतगे) 18 एप्रिलला गेलो. संबंधितांच्या मुलाखतीवर आधारित पुढील माहिती मला आढळून आली.... या प्रकरणातील काही शीर्षके
  • सुरवात कोठे झाली?
    • मुलींवर दमबाजी
    गावकऱ्यांचा आलेला खुलासा - वस्तुस्थिती नेमकी काय?
    • दाभोळकरांनी दिलेले खोटे आश्वासनli>
    गावकऱ्यांचा मुख्य प्रश्न
    • विज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचे अवैज्ञानिक संशोधन
    समितीची पोकळ कारणे
    • अंधश्रद्ध कोण? गावकरी की समितीचे लोक?
    कडेगावचा प्रकार भानामतीचाच
      • गावकरी समितीच्या लोकांवर का रागावले?
      संपुर्ण प्रकरण इथे वाचा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
संदर्भ
माहिती

प्रतिक्रिया द्या
35371 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

ओक-काय हो ही प्रकरण

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/18/2012 - 09:39 नवीन
ओक-काय हो ही प्रकरण मांडण्याची पद्धत तुमची... ? लोकांचा गोंधळ उडवुन द्यायचा हा एक डाव आहे. अं.नि.स.च्या काम करण्याच्या पद्धतीतल्या चुका प्रबोधनवादी विचार मानणारे अनेकजण दाखवून देत असतात...(मी ही दाखवू शकतो..)पण आपण ज्या पद्धतीने अंनि.स.वर इथे परस्पर चिखलफेक करण्याचा प्रकार करत आहात,,,हे पाहिल्यावर तुमच्या विषयी किवही कराविशी वाटत नाही,,,ठिक आहे,तुमच्या संपूर्ण प्रकरणाचा इत्यर्थ...अंनि.स. ही समाजाची दिशाभूल करणारी संघटना आहे,असा मी या प्रकरणापुर्ता घेतो.(का यालाही तुमची हरकत आहे..?) पण यामुळे मला भानामतीच्या नावाखाली चालणारा गाढवपणा/मूर्खपणा नैसर्गिक आहे,असं कधिही मानता येणार नाही.(तो तसा तुंम्ही स्वतः मानता काय..? हेही सांगा कधितरी..!) तुंम्हा धर्मवादाचा/परंपरावादाचा/मानवी मनाच्या श्रद्धा या सवयीचा--- चलाख उपयोग करुन घेणार्‍या सर्व लबाडांना-माझ्यासारखा माणुस अनेकदा अं.नि.स.च्या जाहिर आव्हानांचा तितक्याच जाहिरपणे स्विकार करा आणी हरवा त्यांना...असं प्रतिआव्हान देत असतो... संपादित. कृपया इतर सदस्यांवर व्यक्तिगत टिपण्या करू नयेत. संपादक मंडळ.
  • Log in or register to post comments

भटजीबुवा तुमची अ‍ॅक्टिवा

किसन शिंदे
Wed, 01/18/2012 - 09:54 नवीन
भटजीबुवा तुमची अ‍ॅक्टिवा फुल्ल स्पीडने पळतेय कि ओ... :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@भटजीबुवा तुमची अ‍ॅक्टिवा

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/18/2012 - 11:27 नवीन
@भटजीबुवा तुमची अ‍ॅक्टिवा फुल्ल स्पीडने पळतेय कि ओ... :- >>>Image removed. कारण तिच्यात भारत-पेट्रोलियमचे पेट्रोल भरलेले आहे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

संपादित.कृपया इतर सदस्यांवर

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/18/2012 - 21:56 नवीन
@संपादित. कृपया इतर सदस्यांवर व्यक्तिगत टिपण्या करू नयेत. संपादक मंडळ. भावनेच्या भरात काही वावगं लिहुन गेलेलो आहे,,, हे जाणवल्यामुळे क्षमस्व :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

खंडन वा मंडन करायची माझी भुमिका नाही.

शशिकांत ओक
Wed, 01/18/2012 - 14:13 नवीन
मित्र हो, आपले विचार मला समजले. भानामती व अन्य काही प्रकरणातील कथने पुढील पोस्टमधे वाचकांच्या माथी मारायचा माझा डाव आहे, असे नाही. मला गळतग्यांच्या प्रखर विज्ञानवादी विचारसरणीचा आदर आहे. त्याच्या निर्भीड लेखनातून वाद निर्माण होणार हे अपेक्षित आहे. म्हणून मी त्यांची असे लेखन करायच्या मागची भूमिका काय हे सादर करत आहे. अं नि व्हायला हवे यात दुमत असाचये कारण नाही असे मी व प्रा. गळतगे मानतो. तेंव्हा दाभोलकर आणि अन्य अंनिवादीचे कार्य चांगले किंवा वाईट आहे असे तागडीत तोलायला मी लेखन सादर केलेले नाही. खेडूत यांनी मांडलेले विचार - त्याचे खंडन वा मंडन करायची माझी भुमिका नाही. कारण माझा त्या करिताचा भानामतीचा वा अन्य प्रकरणातील घटनांचा अभ्यास नाही. म्हणून त्याच्या प्रश्नांना मी बगल देत आहे असेही नव्हे. प्रा. गळतगे कर्नाटक राज्यात निपाणी पासून २३ किमी दूर त्यांच्या शेतात - भोज नामक खेड्य़ात राहातात. त्यांचा मिपाशी थेट संपर्क होत नाही. त्यांना कॉम्युटरवरील लेखन इतरांकडून समजून घ्यावे लागते. तसे असले तरी प्रा. गळतगे यांनी इथे मांडलेल्या विचारांवर लेखन करून प्रकाश टाकला तर तो मी जरूर सादर करेन. त्यांचे वय (८१) व तब्बेत यामुळे ते केंव्हा घडेल त्याबद्दल मी सध्या काही आश्वासन देऊ शकत नाही मात्र त्यांच्यापर्यंत विचार पोहोचण्यासाठी जरूर प्रयत्न करीन. याची खात्री बाळगा.
  • Log in or register to post comments

यात नविन ते काय? मित्र

शशिकांत ओक
Sat, 01/21/2012 - 00:33 नवीन
यात नविन ते काय? मित्र हो, कडेगावच्या शाळकरी मुलींच्या डोळ्यातून खडे येऊ लागल्याची भानामतीची केस विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन या पुस्तकात प्रकरण एक वर दिलेली आहे. त्यासंबंधी गळतग्यांच्या ब्लॉगवरील विचार मिसळपाव सादर झाल्यावर शेकड्याने प्रतिक्रिया आल्या. गळतग्यांचे पुस्तक एकदम डोळ्यासमोर आले. त्यातील ते प्रकरण जगाच्या कानाकोपऱ्यातील अनेक सदस्यांनी धुंडाळून वाचले. असे ब्लॉगच्या व्हिजिट्समधून निदर्शनास आले. त्यावर ‘कडेगावची भानामती दुसरी बाजू’ असा धागा उघडला गेला व त्यात ‘खेडूत’ यांनी ते त्याच गावातील रहिवासी असल्याचे नमूद करून अंनिसच्या कारवाईचे समर्थन करणारे विचार सादर केले. त्यानंतर ‘अतृप्त आत्मा’ने डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी प्रत्यक्ष संवाद करून त्यांच्या पुस्तकातील याच प्रकरणात काय म्हटले आहे ते सादर केले. त्यामुळे अनेकांना ती बाजू कळली. आणि आता ओक या धाग्याला कसे उत्तर देणार अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. नेहमी प्रमाणे ते पळ काढणार असा संकेतही दिला. त्याला अनुलक्षुन सोबतचे लिखाण सादर करत आहे. अतृप्त आत्म्या यांनी कष्टपुर्वक लेखन कार्य करून डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पुस्तकातील मजकूर सादर करून दुसरी बाजू मांडली. त्याबद्दल त्यांचे आभार. असे दिसते की श्री. गळतग्यांच्या पुस्तकातील प्रकरणातून ते डॉ. नरेंद्र दाभोलकराच्या म्हणण्याला आक्षेप घेतलेला वाटत नाहीत. कारण गळतगेही तेच म्हणताना दिसतात. 'प्रत्येक मुलीशी एकटी करून तिच्याशी अंनिसचे लोक लाडीगोडीने वा धाक दाखवून त्या सर्व मुलींच्याकडून त्या घटनेला आम्हीच जबाबदार होतो कारण घरच्या कष्टाच्या कामांना आम्हाला जुंपले जाई. तो जाच नको म्हणून ही शक्कल आम्ही काढली होती. असे वदवून घेतले होते.' प्रश्न होता तो गळतग्यांनी या कथनाच्यापुढे जाऊन कडेगावच्या ग्रामस्थांनी दै. पुढारीतील दि 23 मार्चच्या अंकात वाचकांच्या पत्रव्यवहारातील पत्र. ज्याचे शीर्षकच “वस्तुस्थिती नेमकी काय?” असे आहे ते सादर केले.आणि ज्या पत्राला गुलाबराव देशमुख, डॉ. अशोक काळे, दत्तात्रय कुलकर्णी (मुख्याध्यापक – मुलींची शाळा, कडेगाव.) आदि तेथील जेष्ठ ग्रामस्थांनी दि. 16मार्चच्या दै. पुढारी पेपरमधे अंनिसने प्रसिद्ध केलेल्या प्रचाराच्या मजकुराला उद्देशून लिहिले गेलेल्या खुलाशा बाबत, त्या पत्रात जे वस्तूस्थिती काय म्हणून जे म्हटले आहे,की ‘अंनिस व विज्ञान प्रबोधिनीने लोक आले आणि त्यांनी बळजबरीने मुलींच्याकडून लिहून घेतले, फोटो काढले, मात्र मुली जर डोळ्यात आपणहून खडे घालत असतील तर त्यांच्याप्रमाणे समितीच्या लोकांनी त्यांच्या (आपल्या) डोळ्यात असेच खडे घालून (व मग ते काढून) दाखवण्याचा प्रयोग गावकऱ्यांसमोर का केला नाही?, ग्रामसभेत मुलींनी खडे डोळ्यात घालून ते काढून दाखवण्याचा प्रकार झाला नाही आणि अद्यापि डोळ्यातून खडे यायचे बंद झालेले नाही”. ग्रामसभेत तेथील जिल्हा परिषदचे सदस्य श्री. डांगे यांच्या मुलीच्याही डोळ्यातून खडे येत होते. गावाची अब्रू जाईल असा विचार करणाऱ्या सूज्ञ मंडळींनी त्यांची व इतरांची समजूत घातल्याने त्यांनी आपला राग आवरला व सभा कशीबशी संपली. आदि. जे लेखन प्रस्तूत केले आहे त्याचा. ते छापून आलेले पत्र काही गळतग्यांनी लिहिलेले नव्हते. आता प्रश्न आहे तो अंनिसच्या या मान्यवरांनी त्यावर काही प्रतिक्रिया नोंदवली काय त्याचा. काय विचाराने त्यांनी त्या प्रकाशित पत्रावर काही भाष्य केले किंवा नाही. नसेल तर का नाही? कारण डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी त्या प्रकरणाच्या नंतर काही काळाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात त्यांना उद्देशून केलेल्या सार्वजनिक पत्रातील त्या विधानांवर अंनिसतर्फे खुलासा करायची जबाबदारी त्यांच्यावर येते. ती त्यांनी पार पाडली का किंवा नाही हे महत्वाचे आहे. विशेषतः दै. पुढारीतील स्थानिक घटनेवर ताबडतोब छापलेल्या गेलेल्या प्रतिक्रियेच्या लेखनावर ‘आम्हाला ते लिखाण माहित नव्हते’ असे त्यांना म्हणता येणार नाही असे वाटते. असो, खेडूत म्हणतात की ते त्या गावचे रहिवासी आहे आणि प्रत्यक्ष नसेल पण त्यानंतर गावात काय बोलले गेले याचे ते साक्षी आहे. त्यांनी आपले त्यावेळचे मत नोंदवले. छान आहे. पण त्याच गावात वा पेठेत ते राहात होते म्हणून त्यांचे मत ग्राह्य व्हावे असे नाही. अगदी आत्तासुद्धा त्याच शहरात, गावात राहून देखील एखादी घटना पेपरमधून कळली तेंव्हा माहिती झाली असे अनेकवेळा होते. त्यामुळे प्रत्यक्षात काय घडले याची नोंद होतेच असे नाही. हे आपण प्रत्यक्ष अनुभवतो. याचा अर्थ मला खेडूत ना खोट्यात पाडायचे नाही. पण सामान्यतः पेपर मधील लेखन अंनिस पुरक केलेले असते. त्यामुळे ते सत्यच असणार असा ग्रह होतो. गळतगे यांचा रोख अशा छापील कथनामागील सत्यता काय आहे हे शोधायचा आहे. म्हणून अंनिसच्या लेखनात छापील सत्य व घडलेले सत्य असा फरक पडणार. त्यामुळे गळतगे यांच्यासारखे कोणीही सत्याग्रही राहूनही केलेल्या त्यांच्या लेखनावर प्रत्येकदा प्रश्न चिन्ह ठोकले जाणार हे गृहित आहे. तरीही त्यांनी त्यांना अनुभवायला आलेले जे सत्य आहे ते मांडण्याचे साहस प्रत्येक प्रकरणात केले आहे. ते पुढील प्रकरणातील नोंदीवरून लक्षात येईल. अंनिसचे विचार ऐकून ऐकून ज्यांची मते टोकाची झाली आहेत त्यांना असे विरोधी लिखाण आले की प्रतिक्रिया रागावलेल्या येणार हे ओघाने येते. आता यापुढील विविध प्रकरणात देखील असेच दिसेल की त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या काही विरोधी प्रतिसादांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून काही प्रतिउत्तर त्यांच्या पुस्तकात नमूद आहेत किंवा नाहीत. नाही तर अंनिसला सोईचे तेवढे सादर करून त्याला सत्यकथन म्हणायचे असे होणार नाही काय? मिपावरील काहीं प्रतिसादातून भानामतीत सांगितल्या जाणाऱ्या विचित्र व बीभत्स घटना घडलेल्याच नसतात किंवा घडत नाहीत असे मत नोंदवले गेले आहे. त्या खऱ्याच असतात किंवा नाही यावर अंनिसचे काय मत आहे? उदा. या प्रकरणातील कोवळ्या मुलींच्या डोळ्यातून खडे येत होते, का येत नसताना ही ते येत आहेत असे खोटेच सांगितले जात होते याची शहानिशा करावी. सध्या इतकेच.
  • Log in or register to post comments

हा प्रकार हातचलाखीचाच असणार"

शशिकांत ओक
गुरुवार, 02/16/2012 - 02:46 नवीन
मित्र हो, एके ठिकाणी एक मित्र म्हणतात,
डोळ्यातून खडे बाहेर येणे हा १०१ टक्के हातचलाखीचाच प्रकार असणार. यात भानामती, जादूटोणा, देवीचा कोप इ. चा काहीही संबंध नाही.
मित्रा, आपले मत की "हा प्रकार हातचलाखीचाच असणार" तर्काने निर्माण केलेले आहे. गावकऱयांनी दै. पुढारीला लिहिलेल्या आपल्या पत्रात म्हटले आहे की जर त्या शाळकरी मुली(एक नव्हे दहा) असे हातचलाखीचे प्रकार लीलया करत होत्या तर अशा या प्रकरणातील भांडाफोडमधे पारंगत असलेल्या अंनिसवाल्या लोकांनी त्याच्याप्रमाणे तशीच हातचलाखी करून डोळ्यात खडे घालून व नंतर ते काढून दाखवावेत. त्यांनी तसे प्रयोग करून दाखवले नाहीत. ही गावकऱ्यांची प्रमुख तक्रार होती. या विधानावर विचार करावा.
  • Log in or register to post comments

भानामती

प्रसाद गोडबोले
Fri, 11/28/2014 - 14:57 नवीन
भानामती आणि इतर काळ्याजादु कशा कराव्यात ह्यावर स्खोल आणि शास्त्रीय माही देणारे पुस्तक कोठे मिळेल ? अभिनव गुप्त ह्याचे एक पुस्तक प्रसिध्द आहे पण ते नेटवर उपलब्द नाहीये . कोठे मिळेल ? बाकी आपल्याला काळी जादु येते हे लोकांना कसे पटवुन द्यायचे ? म्हणजे मला चेटुक आणि वेताळ वश आहेत असं गेली ३ वर्ष मी लोकांना सांगतोय पण कोणी विश्वासच ठेवायला तयार नाहीत , लोकांना कन्विन्स करवण्यासाठी एखादी विद्या आहे का ;)
  • Log in or register to post comments

काळ्या जादूचा प्रभाव कसा पटवून देऊ?

शशिकांत ओक
Sun, 10/06/2019 - 12:32 नवीन
भानामती आणि इतर काळ्याजादु कशा कराव्यात ह्यावर स्खोल आणि शास्त्रीय माही देणारे पुस्तक कोठे मिळेल ? अभिनव गुप्त ह्याचे एक पुस्तक प्रसिध्द आहे पण ते नेटवर उपलब्द नाहीये . कोठे मिळेल ? बाकी आपल्याला काळी जादु येते हे लोकांना कसे पटवुन द्यायचे ? म्हणजे मला चेटुक आणि वेताळ वश आहेत असं गेली ३ वर्ष मी लोकांना सांगतोय पण कोणी विश्वासच ठेवायला तयार नाहीत , लोकांना कन्विन्स करवण्यासाठी एखादी विद्या आहे का ;)

लोक म्हणतील ओकांनी पुन्हा काय म्हणून हे लफडे उकरून काढलयं? आश्चर्य असे की मी हा धागा विसरून गेलो होतो. दिवाळी अंकासाठी रसग्रहणात्मक काही सादर करावे म्हणून कॉम्प उघडला व मिपा उघडले ते नेमके हा धागा उपटला... कोणा मार्कस ऑलेरियस यांची विचारणा दिसली आता हे महाशय मिपावर सक्रीय आहेत कि नाही माहित नाही... पण त्यांच्या विचारणेचे कौतुक वाटले... लोकांना कन्व्हिंस कसे करावे हा पेच त्यांना पडला आहे... अहो सोप्प आहे... ज्यांनी ज्यांनी या धाग्यावर नकारात्मक विचार करून मत प्रदर्शन केले आहे त्यांच्यावर प्रयोग करून मग त्यांना कसा 'अनुभव' आला याची माहिती सादर करायला भाग पाडायचे काम काळ्याविद्येला सांगावे... म्हणजे तुम्हालाही सराव घडेल व इथल्या लोकांना त्याची प्रचिती आल्याचे समाधान वाटेल...

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अभिनव गुप्त

शशिकांत ओक
Sat, 12/06/2014 - 01:06 नवीन
मित्रा, लेखकाचे नावच जर गुप्त तर ते पुस्तक ही असेत पटकन न सापडणारे असावे...
चेटुक आणि वेताळ वश आहेत असं गेली ३ वर्ष मी लोकांना सांगतोय पण कोणी विश्वासच ठेवायला तयार नाहीत, लोकांना कन्विन्स करवण्यासाठी एखादी विद्या आहे का
लोकांना समजावण्याचे प्रयत्न अंनिसचे प्रवीण कार्यकर्ते विविध हातचलाखी विद्येचे प्रयोग करून करून इतकी वर्षे तेच करून राहिलेत की पण ज्यांच्यावर तशी जीव घेणी वेळ येते ते कोणी मानायला तयार होत नाहीत...
  • Log in or register to post comments

भानामति आणि 'चेटूक' हे एकच का ? की वेगळाले ?

चित्रगुप्त
Sun, 10/06/2019 - 14:45 नवीन
भानामती हा प्रकार भारताखेरीज अन्य देशांमधे आढळतो का ? असल्यास त्याला काय काय नावे आहेत वगैरे विशद करावे. भानामति आणि 'चेटूक' हे एकच का? की वेगळाले ?
  • Log in or register to post comments

अफ्रिकन जुजु नामक एक प्रकरण आहे ब्वाना

जॉनविक्क
Sun, 10/06/2019 - 23:12 नवीन
परंतु यावर विजयजी देवधर अधिकारवाणीने बोलू शकतील मि नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

लोकभ्रम

प्रकाश घाटपांडे
Mon, 10/07/2019 - 13:15 नवीन
लोकभ्रम हे कोणत्याही काळात असतात. वाचा
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा