✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. ---

श
शशिकांत ओक यांनी
Tue, 01/17/2012 - 01:40  ·  लेख
लेख
मित्र हो, नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला. त्यातील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा.विचार करावा. खालील अभिप्राय बोलका आहे. ...श्रद्धेचे अस्तित्व मानवी जीवनात अपरिहार्य आहे. हे प्रमेय विज्ञानाच्या आधारेच सिद्ध करण्यासाठी अद्वयानंद यांनी पाश्चात्य शास्त्रज्ञ संशोधकांचा आधार घेऊन केलेला युक्तिवाद खरोखरच स्तिमित करणारा आहे. बुद्धिवादाचा तसेच विज्ञाननिष्ठेचा मक्ता आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्यांनी या पुस्तकातील युक्तिवाद आपल्या भूमिकेकडे नव्यादृष्टीने पहाण्याची निकड जाणवून देईल. या पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा.... ....... . दैनिक लोकमत -शंकर सारडा विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. --- कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. कडेगावची भानामती आणि आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बुवाबाजी कराडच्या पुर्वेस 20 किमीवर असलेल्या कडेगाव या गावी भानामतीचा विलक्षण प्रकार सुरू झाल्याची बातमी 15 मार्च 1988 च्या दै. पुढारीत प्रसिद्ध झाली.गावातील मराठी शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या मुलींच्या निघत असल्याचे व नेत्रतज्ज्ञ व इतर अधिकारी व्यक्तिंनी हा प्रकार प्रत्यक्ष जाऊन पाहून खरा असल्याची खात्री करुन घेतल्याचे व त्यांना हा प्रकार मती गुंग करणारा वाटला असल्याचे पुढे बातमीत म्हटले होते. यासंबंधी खरी परिस्थिती समजाऊन घेण्यासाठी मी ( अद्वयानंद गळतगे) 18 एप्रिलला गेलो. संबंधितांच्या मुलाखतीवर आधारित पुढील माहिती मला आढळून आली.... या प्रकरणातील काही शीर्षके
  • सुरवात कोठे झाली?
    • मुलींवर दमबाजी
    गावकऱ्यांचा आलेला खुलासा - वस्तुस्थिती नेमकी काय?
    • दाभोळकरांनी दिलेले खोटे आश्वासनli>
    गावकऱ्यांचा मुख्य प्रश्न
    • विज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचे अवैज्ञानिक संशोधन
    समितीची पोकळ कारणे
    • अंधश्रद्ध कोण? गावकरी की समितीचे लोक?
    कडेगावचा प्रकार भानामतीचाच
      • गावकरी समितीच्या लोकांवर का रागावले?
      संपुर्ण प्रकरण इथे वाचा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
संदर्भ
माहिती

प्रतिक्रिया द्या
35370 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

लिन्कवर दिलेला लेख वाचला. लेख

अरुण मनोहर
Tue, 01/17/2012 - 07:30 नवीन
लिन्कवर दिलेला लेख वाचला. लेख मुळीच पटण्यासारखा नाही. अनिसला बदनाम करण्याचे राजकारण ह्यामगे असावे असे वाटत आहे.
  • Log in or register to post comments

सहमत...

कॉमन मॅन
Tue, 01/17/2012 - 11:55 नवीन
सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

दै. लोकमतला टोकीच्या भानामतीवरून पाठवलेले पत्र

शशिकांत ओक
Fri, 11/14/2014 - 02:14 नवीन
मित्रांनो, भानामती हा नेहमीच विचित्र व अघटित प्रकार म्हणून अंनिसच्या साठी आव्हानाचा भाग आहे. त्यात दरवेळी यांचा यशस्वीपणे पर्दापाश केल्याचा दावा केला जातो. पुर्वीपासून असे दावे केले गेले आहेत त्यावर पुस्तके लिहिली गेली आहेत. सत्यशोधनाला आडकाठी नसावी. मात्र ते करताना सत्याऐवजी वैचारिक मते आधी ठरवून त्याला साजेल असे सत्य मांडण्याचा प्रयत्न केला जाऊ नये इतकी माफक अपेक्षा.म्हणून अगदी नुकत्याच घडलेल्या एका केसची बातमी वाचनात आल्यावर वर मला सुचलेले काही विचार, दै लोकमतला वा.प.मधे लिहिले. त्याची कितपत दखल घेतली जाईल कल्पना नाही. शिवाय, इथे पुर्वी अशाच एका भानामतीच्या घटनांवर चर्चा झाली असल्याने या धाग्याला संपादकीय कात्री लागू नये अशी अपेक्षा. अनेक नवे वाचक आजकाल पाहतो त्यांना पुन्ःप्रत्ययाचा आनद मिळावा व काही विचारांना उजाळा मिळावा म्हणून हे पत्र सादर देत आहे. पेपर मधील बातमी

'भानामती'मागे सावत्र मुलांचा हात!

8.11.2014 लोकमत. Image removed. प्रयोगानंतर अंनिस टीमने गावकऱ्यांशी बोलून सर्व शंकांचे निरसन केले. विनोद जाधव■ लासूर स्टेशन (औरंगाबाद) घर बंद असताना घाण पडणे, अचानक कपड्यांना आग लागणे हा सर्व प्रकार त्यांचीच सावत्र दोन मुले करायची, अशी माहिती 'लोकमत स्टिंग ऑपरेशन'मधून शुक्रवारी उघड झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)च्या सहकार्याने 'लोकमत'ने हे कथित भानामतीचे 'भूत' उतरविले. गंगापूर तालुक्यातील टोकी गाव एका अनामिक भीतीने काही दिवसांपासून हादरून गेले होते. घर बंद, तरीही घरात घाण येणे, अंगावरील तसेच घरातील कपड्यांनी पेट घेणे, घरातच फटाका फुटणे, अशा घटना घडत असल्याने कथित भानामतीचे भूत गावकर्यां च्या मानगुटीवर बसले होते. सखाहरी शेजवळ यांच्या घरातील या विचित्र प्रकारांमुळे संपूर्ण गाव दीड महिना त्रस्त होते. याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने ५ नोव्हेंबर रोजी पसिद्ध केले होते. बातमी प्रसिद्ध करून न थांबता 'लोकमत'ने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथकासह टोकी गावातील शेजवळ यांच्या घरात शुक्रवारी 'स्टिंग ऑपरेशन' करून भानामतीच्या नावाखाली चालणार्याी घटनेचा पर्दाफाश केला. मांत्रिक म्हणून केली एन्ट्री अंनिसच्या टीमने शेजवळ यांच्या घरात मांत्रिक म्हणून एन्ट्री केली. त्यांनी सुरुवातीला घरात कलशावर नारळ ठेवून पूजा मांडली. निर्मला सखाहरी शेजवळ यांना पाणी आणण्यास सांगितले. त्यांनी सर्वांना पाणी प्यायला दिले. ग्लासातील शिल्लक पाणी कलशावर ठेवलेल्या नारळावर टाकल्यानंतर नारळाने पेट घेतला. नारळावर सोडियम मेटल टाकलेले होते. (सोडियम मेटल हे नेहमी रॉकेलमध्ये ठेवतात. ते पाण्याच्या संपर्कात आले, की पेट घेते.) हाताच्या बोटांना सॅक्रिन लावले होते. ती बोटे पाण्यात मिसळल्याने पाणी गोड झाले. हेच पाणी सर्वांना पुन्हा प्यायला दिल्यावर त्यांना ते गोड लागले. अंनिसचा हा प्रयोग सर्वांना पटला. हे पाणी गोड लागल्यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण होणार, असेही त्यांना पटवून देण्यात आले. पहिला 'मांत्रिक' प्रयोग यशस्वी झाल्यावर एकाला बोलावून अंनिसच्या टीमने इन कॅमेरा चौकशी केली. यातून त्यांच्या नात्याचे दोर बाहेर पडले. सखाहरी शेजवळ यांच्या पहिल्या पत्नी हयात नाहीत. त्यांचीच ही ११ व १२ वर्षीय दोन मुले आहेत. निर्मला ही या मुलांची सावत्र आई. शेजवळ यांच्या घरात घडणार्याी विचित्र घटनांमागे हेच नाते कारणीभूत असल्याचे या स्टिंगदरम्यान उघड झाले. आपल्या आईला घाबरविण्यासाठी आकाश आणि लखन ही मुलेच हा सर्व प्रकार करीत होती. शहाजी भोसले यांनी या दोन्ही मुलांची वडिलांसमोर चौकशी केली तेव्हा हे सारे उघड झाले. या ऑपरेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शहाजी भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. अजित खोसरे, सदस्य गीता कोल्हटकर, सोनालिका नागभिडे, अतुल बडवे, गणेश लोखंडे हे सहभागी झाले होते. माझे पत्र पर्दा फाश केल्याचा आव... वरील बातमी माझ्या वाचनात आली व त्यातील मजकुरावरून अंनिसचा खोटेपणा लक्षात आला. व अंनिचे काम धूमधडाक्यात चालू आहे असा आभास निर्माण करायला लोकमतने यात प्रमुख भूमिका घेतल्याचे साभिनाम उद्धृत केल्याने काही खुलासे आपल्या वार्ताहराकडून अपेक्षित... 1. अंनिस वाले मांत्रिकांचे सोग घेऊन संबंधितांना गंगापुर तालुक्यातील टोकी खेड्यात घडलेल्या घटनांच्या सत्यतेला जनतेसमोर आणायच्या उद्देशाने ग्रामस्थांना व संबंधितांना भेटले. म्हणजे मांत्रिक बनलेल्या शहाजी भोसल्यांनी सखाहरी व त्यांच्या पत्नी निर्मला शेजवल यांना विश्वासात घेऊन काही नेहमीचेच हातचलाखीचे प्रयोग करून कसे बनवता येते याचे प्रात्यक्षिक दाखवले. व त्यांचा विश्वास संपादला. मात्र ते करताना त्यानी भानामती म्हणून घडणाऱ्या घटना उदा. विष्ठा पडणे, अचानक कप़डे जळणे आदि घटना कशा होतात किंवा त्यांना प्रत्यक्षात करावे लागले तर काय काय हात चलाखी करावी लागते याचे प्रात्यक्षिक वा स्पष्टीकरण सादर करून दाखवले असे बातमीत म्हटलेले नाही. 2. या प्रकरणात त्यांचीच दोन (सावत्र) मुले सामील असल्याचे त्या मुलांना वेगवेगळे बोलावून त्यांच्यावर मानसिक वा शारीरिक दबाव आणून तसे कबूल करायला लावले की हे कृत्य ते करत आहेत... कदाचित ते त्यांनी लेखीही नोंदवले असेल. पण त्याला प्रत्यक्षात काही महत्व नाही. कारण भानामतीच्या केसेसमधे या वयातील मुले माध्यम म्हणून उपयोगात आणली जातात. असा पुर्वानुभ आहे. 3. भानामतीत घडणाऱ्या घटना ह्या ज्या व्यक्तींच्या अवती भवती घडतात म्हणून साहजिक त्यांच्या वर आळ यावा असे भानामती करणाऱ्या शक्तीचा होरा असतो. ते बदनाम होतात. मार वा अन्य यातना व बोलणी ही खायला लागतात. ( जसे 1988च्या सुमारास कराडपासून जवळच्या कडेगावमधे अचानक काही मुलींच्या डोळ्यातून खडे येणाऱ्या घटनेच्या संदर्भात ती भानामती त्या शाळकरी मुलीं करत असा त्यांच्या वर तसा आळ येत असे.) 4. अशी मुले वा माध्यमे आपली बाजू कितीही समजाऊन सांगू लागली तरी ती प्रत्यक्षातील घटनांमुळे मान्य होण्यासारखी नसल्याने प्रथम दर्शनी तेच या मागचे हात वा आरोपी दिसतात. काही वेळा मात्र त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना हे कृत्य ह्या मुली- मुले करत नाहीत अशी खात्री असल्याने अनेकदा त्या मुलांवर मारहाणीचा वा तेच हे करत आहेत याचा ठपका ठेवला जात नाही. (जसे कडेगावच्या केसमधे मुलींचे पालक अंनिस वाल्यांनी या मुलांना अभ्यास वा घरकाम टाळायचा होता म्हणून त्या अशी युक्ती करत होत्या असे दणकून म्हटले तरी मानायला तयार नव्हते. कारण त्यांना त्यांच्या मुला-मुलींच्या वागणुकीचा प्रत्यय दररोज येत होता. तसे गावकऱ्यांनी अंनिसवाल्यांना प्रत्यक्षात म्हटले व नंतर वर्तमान पत्रातून लेखी निवेदन देऊन सिद्ध केले). 5. अशा लहान वयातील मुलांनी काही कारणाने रागावून जाऊन बदला म्हणून आपल्याच घरातील कपड्यांना आगी लावून आईवडिलांच्या विरुद्ध भीती व आतंकी कृत्ये करून घाबरवायसाठी केले होते असे घटकाभर मानले तर घरातील कपडे कसे पेटवायचे, प्राण्याची वा मानवाची विष्ठा आधीच कशी गोळा ठेवायची व ऐन वेळी एकदम प्रकट करायची आदी कृत्यांची पूर्व तयारी त्यांना किती व कशी करावी लागली असेल याचा कोणालाही अंदाज करता येईल. मुलांना कपडे पेटवायचे असतील तर अंनिसनें केलेल्या प्रात्यक्षिकाप्रमाणे कपडे,साड्या, चादरी वा अन्य कापडी सामान सोडियम मेटल मिसळलेल्या रॉकेलमधे आधी बुचकळून ठेवावे लागेल व ऐन वेळी ते पाण्याटाकून किंवा कपड्यांवर पाणी टाकून अचानक जाळ करावा लागेल. आता अंनिसवाल्यांना ते सोडियम मेंटल बाजारात कुठे मिळते, काय किंमत, जर असे महिनाभर करामती घडवायच्या तर किती किलो आणावे याची खूप माहिती असेल. पण या मुलांना ते नाव, त्याचे गुणधर्म, ते कुठे मिळतात व त्याला लागणारा पैसे कसा मिळवता येईल याचा खटाटोप करावा लागेल. सारासार विचार केला तर अशी तयारी करायला त्या मुलांना टोकी खेड्यातून शहरात येऊन माल खरेदी करून परत जाऊन, कसे कसे घडवले त्याचे प्रात्यक्षिक त्या आरोपी मुलांकडून अंनिसने केले असेलच किंवा निदान अंनिसच्या निष्णात मांत्रिकाने तरी अगदी सहजासहजी करून दाखवून आईवडिलांना व अन्य प्रतिष्ठित ग्रामस्थांसमोर करून वाहवाही मिळवली असेलच. मात्र तसे केल्याचा बातमी उल्लेख का नाही हे गूढ आहे. असे मानू या की समजा त्या शाळकरी व्रात्य मुलांना भानामती करायला सुरसुरी आली तर काय तजवीज करावी लागेल ? अंनिस जसे हातचलाखीचे प्रयोग करताना लागणारे सामान आधी खरेदी करून मग सर्व तयारीने भांडाफोड करायला गावात जाते तसे पण उघडपणे न जाता चोरून किंवा गावकऱ्यांच्या नकळत मागवायला किवा त्यांना परगावी जाऊन खरेदी करायला त्या मुलांना लागेल विष्ठेसाठी पायखान्यातील आडजागी चोरून जाऊन पिशवीतून साठवून ठेवावी लागेल. या सामानातील काही पदार्थांचा उग्र वा घाण वास तो पसरवायच्या आधी अशा रितीने बंद करून ठेवला पाहिजे की त्याची अजिबात कुणकुण वा गंध आला नाही पाहिजे. आता वरील मुलांच्या वयोगटाचा विचार करता अशी धमक त्यांच्यात अचानक कशी निर्माण झाली असेल याचा खुलासा अंनिसवाल्यांनी केला असेल. तो काय होता ते बातमीत प्रकर्षाने नमूद केले जायला हवे ते नेमके वाचायला मिळत नाही. म्हणूनही अशी अघोरी कृत्ये या वयोगटातील मुलांकडून घडतील का असे सामान्यतः विचारांती वाटत नाही. आतंकवादी कारवाया करायला प्रवृत्त विदेशी तरुणांना देखील दहशतीची कृत्ये करायला मोठी यंत्रणा मदत करत असते, नव्हे मागे लागून करवून घेते. असे आपल्याला बातम्यातून वाचायला वा पहायला मिळते. इथे मात्र असा आतंकी प्रकार करायला कोणाची मदत नसताना गुपचुप या शाळकरी मुलांना शक्य कसे व्हावे यावर विचार व्हायला पाहिजे. त्या दोन मुलांनी ती कृत्ये केली असे जाहीर करायच्या शिवाय अशी कोणती यंत्रणा त्यांच्या मागे उभी होती याचा कसून तपास लागेपर्यंत या प्रकरणाचा शेवट झाला असे मानले जाऊ नये. असो. 6. एक जागृत वाचक म्हणून या विषयातील सखोल माहिती व स्पष्टीकरण आपल्या प्रतिष्ठित पेपर मधे मोठ्या मथळ्यात सादर जावे ही विनंती केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

एकदा कुत्रा पिसाळलेला आहे असे

आनन्दा
Fri, 11/14/2014 - 10:10 नवीन
एकदा कुत्रा पिसाळलेला आहे असे म्हटले की ते सिद्ध करणे सोपे असते. व्यक्तिशः माझी वय ११-१२ च्या काळातली समज पाहता अश्या प्रकारचे प्रयोग ११-१२ वर्षाची मुलं करतील असे मला वाटत नाही. बाकी या सगळ्यातून त्या मुलांचे उर्वरित आयुष्य अधिक खडतर जाणार याची मात्र खात्री पटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

विवेकवादी विचारणा

शशिकांत ओक
Fri, 11/14/2014 - 11:03 नवीन
मित्रा,खरेेआहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

अश्या प्रकारचे प्रयोग ११-१२

प्रकाश घाटपांडे
Sun, 11/16/2014 - 21:01 नवीन
अश्या प्रकारचे प्रयोग ११-१२ वर्षाची मुलं करतील असे मला वाटत नाही.
११-१२ वर्षांची मुल चलाख असू शकतात. केस मधे अन्य बाजूही असू शकते.बातमीत सगळच येईल अस नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

खरे आहे...

शशिकांत ओक
Sun, 11/16/2014 - 21:30 नवीन
मित्रा, आपण अंनिस चळवळीला सहानुभूति दर्शवणारे आहात. आपले म्हणणे मला मान्य आहे की 11-12 वर्षांची मुलेच काय त्याहून ही कमी वयाची मुले देखील खोडकर, व्रात्य मुले असतात. त्यांनी ते काम केले आहे असे मानूनच वरील लिखाण केले आहे. जर अशा व्रात्य व खुनशी मुलांना असे भानामती सदृष्य कृत्य करायचे असेल तर काय काय तयारी करावी लागेल याचा अंदाज घेतला तर प्रात्यक्षिक करणाऱ्या महाभागांनी ते कसे केले असेल याची माहिती तेथील गावकऱ्यांना आवर्जून दिली असेल. शिवाय त्यांनी त्या मुलांकडून जिथून जिथून आग लावायला लागणारे साहित्य मिळवले व विष्ठा गोळा करायला जावे लागले त्या त्या ठिकाणी जायला लावून ते कसे घडवण्याचे प्रात्यक्षिक करवून घेतले असेल वगैरे गोष्टी ह्या त्या दुसऱ्या बाजू असव्यात असे वाटते. यावर आपले काय मत आहे ते कळले तर बरे. आपल्या घसटीतील तज्ज्ञ अंनिस मंडळींकडून यावर प्रकाश पाडायला विनंती आपण करावी ही मी आपल्याला विनंती करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

लंगडे मत प्रदर्शन ... असू शकते...

शशिकांत ओक
Sat, 11/22/2014 - 00:53 नवीन
मित्रा,
असू शकतात. केस मधे अन्य बाजूही .असू शकतेबातमीत सगळच येईल अस नाही>
जर त्या बातमीतील मजकुरातून घटनेची सत्य माहिती दिली गेली नसेल तर त्या बाबत मी मांडलेल्ल्या मुद्यांवर विचार केला गेला नव्हता किंवा करून ही काही सिद्ध करता येत नाही याची खात्री झाल्याने त्या बाबी झाकून ठेवल्या गेल्या आहेत. दोन्ही तऱ्हेने "असू शकते" असे नुसते पकाकांनी म्हणणे अंनिस साठी गैर नाही काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

असू शकते म्हणजे खरा

प्रकाश घाटपांडे
Sat, 11/22/2014 - 18:32 नवीन
असू शकते म्हणजे खरा शास्त्रज्ञ नकारज्ञ नसतो ( या ठिकाणी चिकित्सा करु पहाणारा) असे मला म्हणायचे आहे. त्यामुळे अन्य काही शक्यता आहेत का हे तपासणे गैर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

भानामती असे काही नसते म्हणणारी अंनिस सकारज्ञ चिकित्सक आहे...?

शशिकांत ओक
Sun, 11/23/2014 - 01:30 नवीन
मित्रा, ज्यांनी समाजजीवनातून अंधश्रद्धांचे निर्मूलन व्हावे असा वसा घेतला आहे त्यांच्या लेखी आपल्या सुखीजीवनातील आरामाची जिंदगी महत्वाची नसून, खऱ्या अर्थाने समाजमनाला ढवळून काढायला खचता खायचे आनंदाने स्वीकारले आहे. ते करताना भले आपल्या जिवाला बरे वाईट-झाले तरी त्याची तमा ना बाळगता काम करीन असे म्हणणाऱ्यांच्या कडूनच भानामतीच्या सारख्या पॅरा नॉर्मल घटनातील सत्यता शोधली जाईल. म्हणून हातचलाखीचे प्रयोगकरून पुढे मूळ मुद्याला हात त्यांनी घालावा असे मी लोकमतच्या माध्यमातून सुचवले आहे. आजच्या झी न्यूजमधे रात्री ८.३० नंतर तासाभराच्या कार्यक्रमात मेरठ कँट मधील एका सूनसान घरात जाऊन "पॅरा नॉर्मलवर काम करणाऱ्या भारतीय संस्थेने विविध आधुनिक उपकरणांच्या मदतीने त्या वास्तूत काहीतरी अ‍ॅबनॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी असल्याचे म्हटले आहे. हा शोध घ्यायला अमेरिकेतील एका तज्ज्ञाला पाचारण करून त्याने ही ते मान्य केल्याचे म्हटले गेले... एका बाजूला या कार्यक्रमातून भूत वगैरे सब झूठ आहे, तसे काही नसते. वगैरे म्हटले जात होते. ( असे कार्यक्रम आधी ही पाहण्यात आले होते त्यानंतर रॅशनॅलिस्टांनी त्यांच्या पॅरा नॉर्मल कामगिरीला खिल्ली उडवून, नाटके करतात लेकाचे, पॅरा नॉर्मल असे काहींनी नवे खूळ काढले आहे असे हिणवल्याचे वाचले व पाहिले होते आपण काही करायचे नाही व इतरांनी काही केले तर त्याला नाके मुरडायची, असे किती दिवस हे बुद्धिवादी करणार... म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असा सल्ला अनेक देतात) पुर्वीपासून अशा अतार्किक घटनांना आपण सुटसुटीत 'भूत' अशी संज्ञा दिली आहे. त्यात कल्पना, सांगोवांगी, गाव गप्पा, अनेकांच्या मनातील भितीचेी विविध रुपे, चित्रकारांनी व सिनेमावाल्यांनी साकार करून आपापल्या परीने त्यात भर घालत भूत कसे असते किंवा असावे असे तर्क वितर्क करून एक असे भीषण रुप ढोबळ मानाने निर्माण झाले असे म्हटले गेले तर ते अधिक तार्किक नाही काय? अतार्किक घटनांना वा भूत ही संज्ञा दिलेल्याला उद्देशून इंडिया पॅरानार्मल सोसायटीचे तज्ज्ञ त्यांच्या वैज्ञानिक भाषेत अनएक्सप्लेन्ड फिऩॉमिनल म्हणजेच सध्याच्या विज्ञानाला न सुटलेले कोडे आहे असे म्हणत होते. ज्याचे सध्याच्या विज्ञानाला ठामपणे उत्तर देता येत नाही. घोस्ट हंटर संस्थेने अमेरिकेत जे काम करतात ते ही अमेरिकेतून आले होते. आपण कदाचित इथल्या अनेकांनी पाहिले असेल. माझ्या उल्लेखात काही त्रुटी आढळल्यास त्या जरूर सुचवाव्यात कारण मी हा कार्यक्रम घरच्या अन्य सदस्यांच्या आवडींचा मान राखून पाहिला होता. आम्हाला सगळे विज्ञान कळले आहे आता माहिती करायसारखे काही उरलेले नाही असा दंभ करून आपण निसर्गाच्या अनेक चमत्कृतींना "असे असू शकत नाही" असे लेबल लाऊन आपली आपण तरफदारी करण्या ऐवजी खरेच काय आहे याचा शोध विनम्रपणे घेत राहावे असे माझ्या आत्तापर्यंतच्या विचारानी वाटते मग ते नाडीभविष्य कथन ही का असेना... माझ्या विचारांवर प्रा. अद्वयानंद गळतगे यांच्या विज्ञानवादी व सत्यशोधकाच्या वृत्तीचा प्रभाव आहे.सत्य कि तत्व यावर बाजू घ्यायची वेळ आली तर मी सत्याच्या बाजून उभा राहीन. माझ्या तत्वात ते बसत नाही म्हणून मी सत्याला अव्हेरू शकत नाही... असे त्यांचे म्हणणे कोणाही विचारी व्यक्तीला समजण्यासारखे आहे. म्हणून कदाचित बुद्धिवादीलोकांच्या हटवादी भूमिकेला त्यांचा कडाडून विरोध आहे. हे ओघाने आलेच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो

शशिकांत ओक
Tue, 11/25/2014 - 21:45 नवीन
अन्य एके ठिकाणी आपण या घोषवाक्याचा अर्थ समजावून दिलेला वाचला.
खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो. खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टीला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. मलाही वरील विचार मान्य. या धाग्याच्या संदर्भात अरविंद कोल्हटकरांनी सर्व शक्यतांचा विचार करावा यासाठी दार किलकिले करून नाही तर सताड ठेवून पहावे असे सुचवले आहे. वैचारिक किलकिल्या दरवाज्याने सर्व बाजूंचा विचार कारयला आडकाठी होऊ नये म्हणून तशी विनम्र विनंती होती. त्यात तरी प्रत्यावाद नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

एक तर 1988 ची घटना आहे

गवि
Tue, 01/17/2012 - 07:51 नवीन
एक तर 1988 ची घटना आहे ही ..म्हणजे तेवीस वर्षं होऊन गेली. त्यात अंनिसवाले समजा चूक आहेत. पण तुम्हालाही ही "भानामती"च आहे असं वाटतं..? धन्य..
  • Log in or register to post comments

नक्की काय?

पुण्याचे वटवाघूळ
Tue, 01/17/2012 - 08:05 नवीन
गावातील मराठी शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या मुलींच्या निघत असल्याचे व नेत्रतज्ज्ञ व इतर अधिकारी व्यक्तिंनी हा प्रकार प्रत्यक्ष जाऊन पाहून खरा असल्याची खात्री करुन घेतल्याचे व त्यांना हा प्रकार मती गुंग करणारा वाटला असल्याचे पुढे बातमीत म्हटले होते.
डोळ्यातून नक्की काय निघत असल्याचे? (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ
  • Log in or register to post comments

त्या लेखात वर्णन केलेला

धन्या
Tue, 01/17/2012 - 10:32 नवीन
त्या लेखात वर्णन केलेला मंतरलेला आणि तांबडया फडक्यात बांधलेला नारळ कुठे मिळतो? आणि काका अजून एक समस्या आहे माझी. कदाचित तुम्ही सोडवू शकाल असे वाटते. माझा लेनोवो कंपनीचा आयडीयापॅड ४५० हा मेक असलेला लॅपटॉप पंधरा वीस मिनिटे वापरल्यानंतर खुप गरम होतो आणि लगेच बंद पडतो. कुणालातरी माझा तो नारींगी रंगाचा सुंदर लॅपटॉप पाहवला न गेल्याने माझ्या लॅपटॉपवर भानामती केली आहे असे मला राहून राहून वाटतंय. (मागच्या जंबो कट्टयाच्या एक दिवशी आम्ही लोहगड ट्रेकला गेलो तेव्हा आधीच्या रात्री किसन शिंदे आणि वपाडाव पर्भणीकर माझ्याकडे रात्री वस्तीला होते तेव्हा त्यांना मी लॅपटॉप पाहायला दिला होता. मला तर त्या दोघांचीच शंका येत आहे. ) तुमच्या ओळखीत कुणी ईलेक्ट्रॉनिक वस्तूंवर केलेली भानामती उतरणारा/काढून टाकणारा आहे का?
  • Log in or register to post comments

बद्दू नॉर्मल छे..?

मोदक
Tue, 01/17/2012 - 11:01 नवीन
नारींगी रंगाचा सुंदर लॅपटॉप.. धन्या तुझा लॅपटॉप नारींगी रंगाचा..?? बद्दू नॉर्मल छे..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

बद्दू नॉर्मल छे..? ऑरेंज

धन्या
Tue, 01/17/2012 - 11:35 नवीन
बद्दू नॉर्मल छे..?
ऑरेंज कलरचा आहे रे. कदाचित तो नारींगी शब्द चुकीचा वापरला असेल मी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अगगागा !!!!!!

इरसाल
Tue, 01/17/2012 - 11:56 नवीन
धन्या........:d नारिंगी म्हणजे ते डंब एंड डंबरचं जिम क्यारी का काय ते बगा दिसू ऱ्हायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

नारिंगी म्हणजे ते डंब एंड

धन्या
Tue, 01/17/2012 - 12:36 नवीन
नारिंगी म्हणजे ते डंब एंड डंबरचं जिम क्यारी का काय ते बगा दिसू ऱ्हायला.
इरसाल साहेब. झेपलं नाही हो. आम्हाला इंग्रजी चित्रपट झेपत नाहीतआम्ही त्यामुळे सहसा पाहतही नाही. आम्ही फक्त अमेरिकन बर्गर* खाल्लेत. जंक फुड** असल्यामुळे ते चव न कळताही आवडले ;) * आणि ** हे तुम्हाला कळेलच. न कळल्यास वव्यनि करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

हे बघा. आन्तर्जाल साभार

इरसाल
Tue, 01/17/2012 - 14:36 नवीन
हे बघा. Image removed. आन्तर्जाल साभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

नारींगी रंगाचा सुंदर लॅपटॉप

अरुण मनोहर
Tue, 01/17/2012 - 11:20 नवीन
नारींगी रंगाचा सुंदर लॅपटॉप >>> नारींगी रंगाची सुंदर लॅपटॉप असेल. अशी दुसर्‍याला पहायला दिल्यावर आणखी काय अपेक्षित असणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

नारींगी रंगाची सुंदर लॅपटॉप

धन्या
Tue, 01/17/2012 - 11:46 नवीन
नारींगी रंगाची सुंदर लॅपटॉप असेल. अशी दुसर्‍याला पहायला दिल्यावर आणखी काय अपेक्षित असणार?
दुसर्‍याला पाहायला देता येतील अशा गोष्टी मी एक्स्टर्नल हार्ड डीस्क मध्ये ठेवतो. हार्ड डीस्क कुणाला दयायची आणि कुणाला नाही हे आपल्याला ठरवता येते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

एक्स्टर्नल हार्ड डीस्क पेक्षा

पाषाणभेद
Tue, 01/17/2012 - 23:48 नवीन
एक्स्टर्नल हार्ड डीस्क पेक्षा युएस्बी ड्राईव्ह चांगला हाताळता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

त्या नारिंगी रंगाच्या

प्रचेतस
Tue, 01/17/2012 - 11:28 नवीन
त्या नारिंगी रंगाच्या लॅपटॉपमधलं नेमकं काय दाखवलंस रे त्या दोघांना की अशी भानामती झाली मग. हेम्याचंच भूत कुठून तरी आत शिरलं असावं असं राहून राहून वाटतय, नाही का हो ५० राव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

त्या नारिंगी रंगाच्या

धन्या
Tue, 01/17/2012 - 11:50 नवीन
त्या नारिंगी रंगाच्या लॅपटॉपमधलं नेमकं काय दाखवलंस रे त्या दोघांना की अशी भानामती झाली मग.
त्या नारिंगी रंगाच्या लॅपटॉपमधलं मी नेमकं काय दाखवलं यापेक्षा त्यांनी त्या नारिंगी रंगाच्या लॅपटॉपमध्ये काय पाहीलं हे तू किस्नालाच विचार. ;) उगाच माझ्यावर दोषारोप व्हायला नकोत की पूर्वग्रहदुषित नजरेने मला जे हवं ते मी किस्नाला दमबाजी करुन वदवून घेतलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कॉलिंग किस्ना..कॉलिंग

प्रचेतस
Tue, 01/17/2012 - 12:03 नवीन
कॉलिंग किस्ना..कॉलिंग किस्ना.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

शोधा म्हणजे सापडेल

शशिकांत ओक
Tue, 01/17/2012 - 12:00 नवीन
धनाजी राव
भानामती उतरणारा/काढून टाकणारा आहे का?
इच्छा तेथे मार्ग .... या चालीवर... गळतगे म्हणतात तशी भानामती असेल तर नजर लागते असे मानावे लागेल तर मग नजर लागली की दृष्ट काढतात. मिठ-मोहोऱ्या घेऊन पहा काही फरक पडतोय का ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

गळतगे म्हणतात तशी भानामती

धन्या
Tue, 01/17/2012 - 12:14 नवीन
गळतगे म्हणतात तशी भानामती असेल तर नजर लागते असे मानावे लागेल तर मग नजर लागली की दृष्ट काढतात. ____________/\_______________ काका धन्य आहात तुम्ही. तुम्हीच इथे त्या लेखाची जाहीरात करताय आणि तुम्हीच नेस्टेड इफ एल्स सारखं बोलताय. हे म्हणजे "मी नाही त्यातली आणि लो वेस्ट घातली" असा प्रकार आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

हेच म्हणणार होतो. नाडीवर

गवि
Tue, 01/17/2012 - 12:25 नवीन
हेच म्हणणार होतो. नाडीवर श्रद्धा असणं मतभेद असूनही समजून गेलं. तो अभ्यासविषय असेलही म्हणून. ..नंतर बाबा, गुरु, हेही समजलं. व्यक्तिगत गुरु कोणी असू शकतील असं समजून. .. आता भानामती.. आता मात्र मला असं नक्की वाटायला लागलंय की जेन्युईन मतापेक्षा किंवा ठोस मुद्द्यापेक्षा केवळ सेन्सेशनल आणि खमंग चर्चेसाठी काका विषय काढत आहेत. म्हणजे एका विषयाला धरुन नसून निव्वळ ज्या विषयांना अंधश्रद्धा समजलं जातं तो सगळा स्पेक्ट्रम जणू कव्हर करायचा आणि सपोर्ट करायचा असा उपक्रम वाटतो. आता नारायण नागबळी, मूठकरणी, वशीकरण.. आने दो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

एक निरीक्षण

मूकवाचक
Tue, 01/17/2012 - 12:36 नवीन
म्हणजे एका विषयाला धरुन नसून निव्वळ ज्या विषयांना अंधश्रद्धा समजलं जातं तो सगळा स्पेक्ट्रम जणू कव्हर करायचा आणि सपोर्ट करायचा असा उपक्रम वाटतो. - हे उपक्रम या विचारप्रणालिचे 'व्यवच्छेदक लक्षण' की काय म्हणतात ते असावे. एका विषयाला धरुन नसून निव्वळ ज्या विषयांना श्रद्धा समजलं जातं तो सगळा स्पेक्ट्रम जणू कव्हर करायचा आणि इनव्हॅलिडेट करायचा असाही एखादा उपक्रम असतोच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

एका विषयाला धरुन नसून निव्वळ

धन्या
Tue, 01/17/2012 - 12:49 नवीन
एका विषयाला धरुन नसून निव्वळ ज्या विषयांना श्रद्धा समजलं जातं तो सगळा स्पेक्ट्रम जणू कव्हर करायचा आणि इनव्हॅलिडेट करायचा असाही एखादा उपक्रम असतोच. असो.
यू सेड इट सर. :) दोन्ही विचारधारांची माणसे एकदम टोकाला जाऊन बोलतात. एकमेकांचे म्हणणे खोडून काढायचं एव्हढाच त्यांचा उद्देश असतो. कुठेतरी समतो साधला जावा असे कुणालाच वाटत नाही. अर्थात हे आमचं मत श्रद्धेच्या संदर्भात आहे. भानामतीसारख्या अंधश्रद्धेबद्दल नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

एका विषयाला धरुन नसून निव्वळ

गवि
Tue, 01/17/2012 - 12:51 नवीन
एका विषयाला धरुन नसून निव्वळ ज्या विषयांना श्रद्धा समजलं जातं तो सगळा स्पेक्ट्रम जणू कव्हर करायचा आणि इनव्हॅलिडेट करायचा असाही एखादा उपक्रम असतोच.
चोक्कस..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

गवि, मला वाटतं की हे सर्व

पक्या
Tue, 01/17/2012 - 12:45 नवीन
गवि, मला वाटतं की हे सर्व अंधश्रध्दा आहे हे सिध्द करण्यासाठी अनिसवाले योग्य त्या शास्त्रीय कसोट्या न वापरता बळजबरीचा वापर करतात हे सांगण्याचा लेखकाचा उद्देश आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ते पटलं हो.. अंनिसचं चुकत

गवि
Tue, 01/17/2012 - 12:49 नवीन
ते पटलं हो.. अंनिसचं चुकत असेल हे मान्यच केलंय पहिल्याच प्रतिसादात. अंनिसची काहीही लागेबांधे नसल्याने हे मान्य करायला काहीच अडचण नाही. पण त्यासाठी आणि त्यासोबत "ही भानामतीच आहे" असं स्पष्ट मत व्यक्त करणार्‍या त्या जुन्या लेखाची पाठराखणही होतेय ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

तस काही वाटत नाहिये. ती

पक्या
Tue, 01/17/2012 - 13:09 नवीन
तस काही वाटत नाहिये. ती भानामती आहे अस सिध्द झालय असं लेखकाने म्हटलेले दिसत नाहीये असं वाटतय. किंवा मी लेख घाईत वाचल्याने मला तसं वाटलं की काय माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

होय होय होय....बरोबर

मालोजीराव
Wed, 01/18/2012 - 19:03 नवीन
होय होय होय....बरोबर आहे...भानामतीसाठी लागणारं लिंबू किसन कडे नव्हत त्यामुळे त्यानी ते "बनियान ट्री" मधून घेतलेला मी पाहिलंय !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ही भानामती पाकिस्तानातपण झाली

इरसाल
Tue, 01/17/2012 - 10:35 नवीन
ही भानामती पाकिस्तानातपण झाली आहे. http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=otyeV-c0Kns
  • Log in or register to post comments

इरसाल - धन्यवाद

शशिकांत ओक
Tue, 01/17/2012 - 12:33 नवीन
मित्र हो, प्राचार्य गळतगे सरांनी, कडेगावच्या प्रकरणात उल्लेख केल्याशी जुळणारा 'वाकिया' पाकिस्तानातही घडलेला असल्याचे 'मिसळपाव' मुळे कळले. इरसाल, आपण मुलीच्या डोळ्यातून खडे निघायची घटना व निघालेले खडे वगैरे दाखवणारी घटना पाकिस्तानातील त्याची व्हीडिओ फिल्मची लिक देऊन कळवली आहेत. धन्यवाद. त्यातील निवेदक म्हणतो की स्थानिक लोक हा प्रकार जिंन्न किंवा भूत करत आहे असे मानतायत असे म्हटले जात आहे. पण तेथील अंनिस चे काय म्हणणे आहे ते मात्र कळलेले नाही. भानामतीवर विश्वास ठेवायचा का नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण खरी कसोटी मिळणारे पुरावे तपासणे गरजेचे आहे. त्यातून पळवाट काढता कामा नये असे गळतगे म्हणत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

या लेखामागचा नेमका उद्देश

मराठमोळा
Tue, 01/17/2012 - 10:48 नवीन
या लेखामागचा नेमका उद्देश कळला नाही. ओकसाहेब, तुम्ही 'ईंडीया टीवी' चॅनेलसाठी काम करता का?
  • Log in or register to post comments

संपुर्ण प्रकरण इथे

मराठी_माणूस
Tue, 01/17/2012 - 11:05 नवीन
संपुर्ण प्रकरण इथे वाचा.
तिथे जाउन पाहीले, काहीच दिसत नाही
  • Log in or register to post comments

दुव्यात दुवा शोधून पहावा

अरुण मनोहर
Tue, 01/17/2012 - 11:15 नवीन
त्याच्या आतमधे आणखी एक दुवा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

तिथेही पाहीले, फक्त रिकामे

मराठी_माणूस
Tue, 01/17/2012 - 11:34 नवीन
तिथेही पाहीले, फक्त रिकामे चौकोन दिसतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

मला व्यवस्थित दिसते आहे.

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 01/17/2012 - 11:52 नवीन
मला व्यवस्थित दिसते आहे. तुमच्या कळफलकातून खडे निघताहेत का ते बघा आधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

त्या दुव्यावर कुणीतरी भानामती

धन्या
Tue, 01/17/2012 - 11:52 नवीन
त्या दुव्यावर कुणीतरी भानामती केली असेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

अंधश्रद्धेला खतपाणी

कॉमन मॅन
Tue, 01/17/2012 - 11:57 नवीन
अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या अशा भंपक धाग्यांना येथे प्रकाशित करू नये अशी मिसळपाव व्यवस्थापनाला कळकळीची विनंती..
  • Log in or register to post comments

शास्त्राला सगळं काही उमजले नसले

चौकस२१२
Mon, 10/07/2019 - 07:15 नवीन
सहमत .. शास्त्राला सगळं काही उमजले नसले आणि अनिस या संस्थेची कार्याची पद्धती कधी कधी चुकीची किंवा एकांगी वाटत असली तरी ,,माझ्या पृथ्वीवर त्यांचे योग्य कार्य हे स्वागतार्हच आहे ( या आधी काही प्रतिक्रियांतून मी त्यांवर टीका केली आहे, त्यांचं बद्दल आदर कमी झाला आहे ते आहेच .. त्यात बदल नाही परंतु ) निर्सगाने, किंवा देव मानीत असाल तर देवाने अप्लाय मनुष्यप्राण्याचाच जन्म दिला आहे बुद्धी दिली आहे , विचार करून चांगले आयुष्य जगावे उगाच या गोष्टींचा मागे लागू नये असे प्रामाणिक मत आहे , जरी वयक्तिक स्वातंत्र्य हे महत्वाचे असले तरी जरत या गोंष्टींमुळे समाजाचे नुकसान होत असेल तर त्याला विरोध मात्र केलंआ पाहिजे उदा भोंदू बाबा आणि अतिशय हुशार "टॉप लेवल" गुरु गिरी करणारे जेट सेट गुरु सुद्धा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमन मॅन

नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला.

सुमो
Tue, 01/17/2012 - 12:28 नवीन
कोणी केला.......???? Posted by Wg Cdr Shashikant Oak at 16:58 Email ThisBlogThis!Share to TwitterShare to Facebook Labels: अंनिस, करणी, दाभोळकर, नारळीकर, नि.र. वऱ्हाडपांडे, भानामती, वि.स. पागे .. हे त्या ब्लॉग वरून घेतले आहे... मला वाटतं इतकं पुरेसं आहे....
  • Log in or register to post comments

ब्लॉग

रामपुरी
Tue, 01/17/2012 - 23:22 नवीन
ब्लॉगच्या हिटस वाढविण्याची हि युक्ती जुनी झाली भानामतीवाले... काही दुसरी कल्पना लढवा बाकरवडीवाल्यांनंतर आता गळतग्यांचा नंबर लागला वाटतं? पुढचा नंबर ( आणि ब्लॉग) कोणाचा काढणार??? (अर्थातच लेख वाचला नाही. फालतू असणार याची खात्री आहेच)
  • Log in or register to post comments

पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा....

शशिकांत ओक
Wed, 01/18/2012 - 01:14 नवीन
मित्र हो,
बुद्धिवादाचा तसेच विज्ञाननिष्ठेचा मक्ता आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्यांनी या पुस्तकातील युक्तिवाद आपल्या भूमिकेकडे नव्यादृष्टीने पहाण्याची निकड जाणवून देईल. या पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा.... ....... . दैनिक लोकमत -शंकर सारडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

बाकीच्यांचं सोड हो का. तुमचं

धन्या
Wed, 01/18/2012 - 08:49 नवीन
बाकीच्यांचं सोड हो काका. तुमचं बोला. उगाच दोन दगडांवर पाय ठेऊन मजा बघू नका. :) जमलं तर इथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

अति होतंय!! निलाजरेपणाचा कळस

शिल्पा ब
Wed, 01/18/2012 - 06:08 नवीन
अति होतंय!! निलाजरेपणाचा कळस झाला!!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा