"आई"
दहावी ला असताना आंम्हाला फकीरराव शिंदे यांची 'आई' ही कविता होती. शाळेत असताना आमच्या सर्वात जास्त आवडत्या कवितांमधीलच ही एक कविता! फ.मु. शिंदेंनी आपल्या प्रभावि अन् नेमक्या शब्दांत आई या शब्दाचा व्यापक अर्थ पटवुन दिला होता. तो खरोखरच हृदयाला स्पर्श करणारा होता.
अशीच एक 'आई' या शिर्षकाची कविता याअगोदरच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये होती, काळाच्या ओघाने ती विस्मरणात गेली होती, पण फ.मु. च्या कवितेने- त्या कवितेची आठवण पुन्हा ताजी केली. 'यशवंत' यांची होती ती कविता! फ.मु.ची कविता जेथे हृदयस्पर्शी होती तिथेच यशवंत यांची कविता मनाच्या खोल गर्तेत सलणारी, हृदयाला चटका देणारी होती. त्यावेळी यशवंत यांच्या कवितेने आमच्या डोळ्यांतुन पाणी आणले होते, आजही ती वाचायला घेतली की डोळ्यांच्या कडा आपोआप ओल्या होतात. या दोंन्ही कविता आजही आमच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत.
आज इतक्या वर्षांनी मला यशवंत यांची आई कविता एका जुन्या पेपरात भेटली आणि ती इथे मिपा वर तुमच्यासोबत मला ती शेअर कराविशी वाटली.
संपुर्ण कविताच क्लास
पुन्हा वाचली ,, निशब्द करणारी
आम्हालाही होती.
आई सारखे दैवत सार्र्या जगतावर नाही
कविता एकदम छान.. इथे
कवी यशवंतांची कविता सुरेखच
धन्यवाद!
आई