सामंत काकांचा हा लेख वाचला आणी ही कविता सुचली. विश्वातील सर्व माऊलींना ही माझी कविता समर्पित.
आई म्हणजे आत्मा आणी ईश्वर
आई म्हणजे साक्षात परमेश्वर
आई, माऊली, माता, माय
बावरलेल्या वासराची गाय
आई म्हणजे प्रेम निस्वार्थी
आई म्हणजे मांगल्याची धरती
आईच प्रेरणा,पवित्र श्रद्धा
आईच मंदीर आईच देवता
आईच्या कुशीत निजावे क्षणभर
सर्व दु:खं मिटावी पळभर
आई म्हणजे पाऊस वळवाचा
आई म्हणजे सार विश्वाचा
आई म्हणजे शिदोरी आशिर्वांची
आई म्हणजे सरीता ममतेची
आई म्हणजे शीतल चंदन
आई म्हणजे अतुट बंधन
कोटी प्रणाम माझे सर्व माऊलींना
आईचे प्रेम अखंड मिळो सर्वाना
आपला,
मराठमोळा
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5572
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
आईच्या
छान कविता
सुंदर कविता
आई माझा गुरु आई कल्पतरु.
मराठमोळा, अ
मातृदेवो भव!
मस्त रे!
आई खुप छान.
अप्रतिम
सुंदर
सुरेख