Skip to main content

का उमजत नाही ?

लेखक गणेशा यांनी सोमवार, 16/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : http://www.misalpav.com/node/20432 आणि डिस्क्लेमर : कृपया धाग्याला फक्त उत्तर द्यायचे म्हणुन हे लिहिलेले नाही.. आणि ते शुद्धलेखनाबद्दल ही जाताजाता माफी असावी .. ------------------- माणसाच आयुष्य अस असत, की बरेचश्या गोष्टी करायचय राहुन जातात.. आपलेच बघा ना , कॉलेजला असताना आपल्याला नाटक ही आवडत होते , फुटबॉल ही खेळायला आवडत होते.. मोठ्यांचा आदर ठेवुन होतो म्हणुन ( आणि स्व कमाई करत नसल्याने ही) त्यांनी दिलेल्या मार्गावर चालणे हे व्रत माणत होतो... पुढे जाऊन शिकल्या सवरल्यामुळे नोकरी धरलेली .. बायको.. मुले.. आणि स्वता घेतलेले घर( हप्त्यांवर) ... पण असे जगत असताना, आपले मन पुन्हा विचार करु लागते.. आपली बायको फक्त आपली कुठे आहे... ती आई आहे .. सुन आहे .. अजुन काही तरी आहे.. आपले घर म्हनजे काय .. अजुन ही बँक पैसे न भरल्यास ते जप्त करु शकेन .. आपण तरी काय .. सकाळी उठतो.. ऑफिस मधेय पाट्या टाकतो .. दिवा नाहि तर दुवा होउन जगतो .. आता वय उलटले आहे .. ३० ओलंडत आहे ... असच वाटत राहते मग.. अरे तेंव्हा नाटकात काम करत राहिलो असतो तर आपला मित्र आज जो मराठी चित्रपटाचा प्रमुख नट आहे.. तसा नक्कीच असतो .. तेंव्हा फुटबॉल मध्ये कीती चपळ खेळ होता ना माझा.. भायच्युंग भुतिया खुप मोठे नाव झाले पण नक्कीच स्टेट लेवल ला तर खेळलो असतो .. मग आपोआप खेळ खेळतानाच नोकरी.. पैसा .. पैसा जावुद्या हो .. आपण जे आहोत तसे जगलो असतो ... पण पैसा जावुद्या हो असे म्हणतच आपण भिकारी बँकेचे मॅनेजर झालोय ... आता काय उरले आहे ? -------------------------- आता काय उरल आहे ? असे म्हणत ही रोजच्याच पाट्या टाकणे जे आपल्या मनाच्या आनंदात कुठलीही भर टाकत नसेन, तर मग आता तुम्ही फक्त तश्याच पाट्या टाकत असाल तर तुम्ही उद्या मेला काय किंवा आज .. तुम्ही जीवनाचा आनंद शुन्य घेतला हेच उत्तर आहे .. माणसाने असा विचार केला पाहिजे की जावुद्या ३० वर्षे गेलेत जे जे आत शक्य आहे ते ते तर आनंदा साठी करुयात ... उगाच हे राहिले ते राहिले असे म्हणत ते पुन्हा न करणे .. आणि इतर ही असेच जगतात.. हेच म्हणजे जीवन असे चित्र उगाच निर्माण करणे म्हणजे निराशावादाची परिसिमा वाटते... माणुस असाच असतो.. आपण दु:खी, कष्टी असलो की इतर आपल्या जवळचे ही असेच असले की त्याला उगाच आधार वाटतो .. कसला ते माहित नाहि.. कदाचीत आपल्यासारखे जग आहे, आपण पण सगळ्यांसारखेच आहोत असले उगाच मनाला समजवले जाते .. पण आनंदासाठी जगले पाहिजे .. नोकरी करताना ही .. मला माझे छंद जोपासता येतील .. नाही प्रतिथयश्न दिगदर्शक तरी माझ्या आनंदा साठी मला लिखान करता येणे तर शक्य आहे .. फुटबॉल खेळणे जावुद्या हो .. आता शरीर कुठे माणनार आहे.. ? अहो पण मन तर चिरतारुण्याचे वरदान लाभलेले आहे ना.. करा ना काही तरी .. कोणाला तरी फुटबॉल चे धडे द्या.. काही तरी वेगळे करा..फुटबॉल तयार करणारा तरी कुठे स्वता त्याला किक मारत असेन .. करा काही तरी करा .. रोजच्या जीवनात खरेच वेळ मिळत नाही.. मान्य .. पण वेळ काढण्यासाठी प्रयत्न करणे खरेच आपल्या हातात नाहि का ? मला वाचन खुप आवडते म्हणायचे आणि वेळच मिळत नाही लग्न झाल्यापासुन .. आणि मग आपल्या बायका कश्या .. आपल्या घरचे कसे ह्यावर चर्चा ठोकायच्या .. पण नेट वर/व्यर्थ जे २ तास आपण घालवतो ( वाया) त्यातील १ तास तरी आपण वाचनाला देवु शकतो ना.. तसा प्रयत्न तरी का नको करायला... जे झाले ते झाले.. पाट्या टाकणे हेच नशिब मानुन पाट्याच टाकणे हे स्विकारार्ह्य नक्कीच नाही.. नशिब बदलावा.. आणि जीवनात असे असंख्य मार्ग असतात ते ओळखा .. मुक्त .. स्वच्छंदी.. निदान असे जगता येत नसले तर निदान मनाला तरी तसे राहुद्या .. इतक्या लवकर ही प्रौढ होउ नका की सर्व काही त्याग करुन आता वाट एकाच घटकेची असे वाटावे.. काय असते , ३० ही निट न उलटलेले आपण , सर्व त्याग करुन तोची एक रखवाल दार असे मध्येच म्हणुन सर्व मटेरीअलॅस्टीक आहे.. मला सर्वांपलिकडे जायचे आहे असे बोलणे ही वयाला शोभण्यासारखे नसते ... ज्या त्या वयात त्या त्या वयाप्रमाणे जगा.. एक वाक्य आठवते आहे व.पुं. चे : "पाणी म्हणजे H2O , येथेच जग थांबले आहे.. तहान लागली की माणसाने पाणी प्यावे.. पृथ्थकरण करावयाचे ते पाण्याचे , तहानेचे नाही. तहान लागली की पाणी प्यावे .. बस्स" आपल्याला जे हवे आहे.. आणि जे करुन आपल्या आनंद मिळतो आहे ते करत रहायचे.. भौतिकतेवर अनुसरुन मनाला चार भिंतीत आपण का कोंडुन ठेवत आहोत ..? आम्ही कॉलेज ला असताना म्हनायचो. अरे हा इंजिनियरींग ला आहे.. पण काय नाय उद्या इलेक्शन ला उभा राहणार आहे.. उगाच एक जागा अडवली इंजिनियरींग ची.. किंवा पुढे जावुन त्या शिक्षणाचा उपयोग कोणी करत नसेन तरी तसेच म्हणायचो .. म्हणुन म्हणतो आज तुम्ही ३० + आहात.. बर्याच गोष्टी करायच्या राहिल्यात .. उद्या ६० + झालात आणि हीच स्थीती कायम असली तर आयुष्यभर काहीच वेगळे केले नाही म्हणुन प्रुथ्वीवरील एक जागा व्यर्थ घालावली .. असे वाटुन मरणे येईपर्यंत थांबु नका .. उठा .. एका आनंदाची सुरुवात होत आहे.. त्याचे रोपटे आजच मनात रुजवुन ठेवा .. फळे उद्या येवोत न येवोत .. निदान आज वाटचाल तरी सुरुवात करा .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3208
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

चांगलं लिहिलंय.
एक वाक्य आठवते आहे व.पुं. चे : "पाणी म्हणजे H2O , येथेच जग थांबले आहे.. तहान लागली की माणसाने पाणी प्यावे.. पृथ्थकरण करावयाचे ते पाण्याचे , तहानेचे नाही. तहान लागली की पाणी प्यावे
सार.... सगळ्याचं अगदी मिडलाईफ क्रायसिसचंदेखिल!
उठा .. एका आनंदाची सुरुवात होत आहे.. त्याचे रोपटे आजच मनात रुजवुन ठेवा .. फळे उद्या येवोत न येवोत .. निदान आज वाटचाल तरी सुरुवात करा .
गणेशाज् पोझिटिव थॉट्स. आवडलं. (अ)शुद्धलेखनाबद्दल तुला माफ केलंय. :-) बाकी, फिलॉसोफिक विचार आधीपासूनच केला जातोय की गेल्या काही दिवसांचा परिपाक आहे? ;-)

In reply to by प्रास

धन्यवाद ! अवांतर :
बाकी, फिलॉसोफिक विचार आधीपासूनच केला जातोय की गेल्या काही दिवसांचा परिपाक आहे?
हसतो आहे.. पण असे नसते काही .. " बायको आली की माणसाचे आचार एक वेळ बदलत असतील, पण माणसाचे विचार बदलत असतील तर त्याची गुलामगिरी सुरु झाली आहे असे मत मांडावे वाटत आहे" just kidding

In reply to by गणेशा

" बायको आली की माणसाचे आचार एक वेळ बदलत असतील, पण माणसाचे विचार बदलत असतील तर त्याची गुलामगिरी सुरु झाली आहे असे मत मांडावे वाटत आहे"
नव्हे नव्हे! कधी कधी आपल्या जीवनात नव्याने आलेली व्यक्ती, जुन्याच विचारांना नवा दृष्टीकोन प्रदान करते, असं कुठेसं, कुणीसं, कधीसं म्हणून ठेवलंय म्हणे..... ;-)

In reply to by प्रास

अतिअवांतर :
कधी कधी आपल्या जीवनात नव्याने आलेली व्यक्ती, जुन्याच विचारांना नवा दृष्टीकोन प्रदान करते, असं कुठेसं, कुणीसं, कधीसं म्हणून ठेवलंय म्हणे.....
" दृष्टीकोन हा जोपर्यंत स्वताच्या नजरेमुळे होत नसेल तो पर्यंत तो दृष्टीकोन दृष्टीहिन असतो " - गणेशा --- बाकी असे अवांतर - अवांतर आपण खेळलो तर मिपा मंडळी खरडफळ्याच्या रस्ता दाखवतील

गणेशा सकारात्मक दृष्टीकोन आवडला. कधीतरी आयुष्यात सगळंच बेचव वाटायला लागतं, अशा वेळी तोल सावरायला मदत करणार्‍या अशाच छोट्या छोट्या गोष्टी असतात. एखाद्या सुहृदाबरोबर केलेल्या गप्पा, एखादी शांत संध्याकाळ, मांजरीच्या पिलांचा खेळ, पावसाची एखादी सर, अशा साध्या साध्या गोष्टीत आनंद शोधायला आपण विसरतो, तेव्हाच आयुष्याचा अर्थ उमजेनासा होतो. मीही जेव्हा जेव्हा विसरेन तेव्हा अशीच आठवण करून दे!

In reply to by पैसा

सुंदर प्रतिसाद ! आज बरेच काहीपण लिहावेसे वाटत आहे त्यामुळे लिहितो.. बरेच दिवस झाले लिखान बंद असल्याने असे वाटते आहे बहुतेक.
एखाद्या सुहृदाबरोबर केलेल्या गप्पा, एखादी शांत संध्याकाळ, मांजरीच्या पिलांचा खेळ, पावसाची एखादी सर, अशा साध्या साध्या गोष्टीत आयुष्याचा अर्थ उमजतो.
छान वाटले हे वाचुन... माणुस असाच असतो ,, त्याला मिळालेल्या उदंड आयुष्यात अश्या बर्याच गोष्टी असतात की त्याने मन तजेलदार राहते.. पण कधी कधी तो ह्यास विसरतो .. "विस्मरण हे काळाचे असावे घटनेंचे नसावे " संध्याकाळचे मोहक रुप रोज नविन निर्मिती आपल्या समोर ठेवते ... रोज पुसल्या जाणार्‍या क्षितिजाच्या या मोहक रांगोळीला तितक्याच तन्मयतेने पुन्हा साकारले जाते ... आणि ही कला असते निसर्गाची .. निसर्ग हाच जर मानवाचा सोबती झाला तर एक निखळ मैत्रीचा अनुबंध प्रस्थापित होत राहतो.. प्रेमिकांना पावसाची सर आवडते .. त्याचे कारण हेच आहे. गच्च मिठीतले आपलेपण घेवुन येणारी सर मनास तोच तजेला देवुन जाते .. कृतीम शरीरावरचे आणि मनावरचे लेप ती सर कधीच उतरवुन एकवटुन जाते .. हाच निसर्ग आपल्या आशादायी मनाचा उगमदाता असतो .. आशादायी असणे हिच नवनिर्मितीची पहिली पायरी असावी असे वाटते.

गणेशा, बा विडंबकांना घाबरुन तु कविता लिहिणे सोडलेस की काय अशी भिती वाटायला लागली आहे मला ? पुढे जाऊन शिकल्या सवरल्यामुळे नोकरी धरलेली .. बायको.. मुले.. आणि स्वता घेतलेले घर( हप्त्यांवर) ... - बोलला नाहीस कधी याबद्दल ? असो, उद्या ६० + झालात आणि हीच स्थीती कायम असली तर आयुष्यभर काहीच वेगळे केले नाही म्हणुन प्रुथ्वीवरील एक जागा व्यर्थ घालावली .- ह्याचा अर्थ समजावुन सांगाल का? तुम्ही वेगळे काही केले नाही म्हणुन पृथ्वीवरची एक जागा व्यर्थ कशी गेली ते ? तुम्ही सगळ्या सरळ रेषा मारल्या म्हणुन तर वाकड्या रेषा मारणा-यांचं वेगळेपण लक्षात येतंय ना, आता बघ, इथं सग़ळेच उठुन गेले असते नर्मदा परिक्रमा करायला तर आ०चं कौतुक वाटलं असतं कुणाला, नाही. पण सगळ्यांनी परिक्रमा केली नाही म्हणुन ते काही व्यर्थ ठरत नाहीत. आणि अजुन एक, शुद्धलेखनाबद्दल माफी मागुन अशुद्धलेखन करण्यापेक्षा शुद्धच लिहित जा ना. उगा सॉरी म्हणुन थप्पड मारण्यात काय अर्थ आहे.

In reply to by ५० फक्त

उत्तरे कुठल्या प्रश्नाला देवू हेच कळत नाही .. एक मात्र आहे, शुद्धलेखन खरेच चांगले नाही, आणि सुधरावयाचे आहे , नाहि सुधारवयाचा प्रयत्न चालु आहे, पण इंग्रजी ही सुधारवत आहे त्यामुळे प्राधान्य त्यास... ------ राहता राहिला प्रश्न आडव्या उभ्या रेषांचा ६० + मध्ये काहीच केले नाहि तर जागा व्यर्थ जात नाहि का ? प्रथम घरापासुन सुरुवात केली की आपण घरच्यांच्या आनंदासाठी शुन्य % जगलो .. म्हणजे व्यर्थ ठरलो.. सहाजिकच समाजासाठी पण तसेच .. या अर्थी ते व्यर्थ जगणे आहे.. येथे कोठे ही असे म्हणने नाही की तुम्ही मुद्दामुन जन्म घेतला.. जन्म आपल्या हातात नाही.. पण आनंदमयी जगणे आपल्या हातात आहे तेच जगुया ...
इथं सग़ळेच उठुन गेले असते नर्मदा परिक्रमा करायला तर आ०चं कौतुक वाटलं असतं कुणाला, नाही. पण सगळ्यांनी परिक्रमा केली नाही म्हणुन ते काही व्यर्थ ठरत नाहीत.
प्रत्येकाच्या आनंद मिळवण्याच्या गोष्टी वेगळ्या असत्या.. रोजच्या पाट्ट्याला कंटाळुन कोणी असे परिक्रमण करत ही असेन .. माझे विचाराल तर मला आताच्या वयात असल्या गोष्टीत आनंद वाटत नाही .. आणि म्हणुन कौतुक ही वाटत नाही ... आपले आयुष्य कसे आहे समजवुन घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा आयुष्यात येणार्या प्रत्येक लोकांना समजुन घेवुन त्यांच्या सुख दु:खाशी एकरुप होऊन जगणे म्हणजे हे असले मिडलएज क्रायसीस का काय त्या पासुन आपोआप दूर जाणे होय.. आपल्याच मनाशी खेळ करत आपल्याच आयुष्याल दोष देणे म्हणजे आडव्या रेषा मारुन अभिमान बाळगण्यात नक्कीच काही अर्थ नाही .. मान्य तुमचे जगणे आडव्या रेषांनी भरलेले असेन पण ते सावरण्याचे कष्ट करण्या पेक्षा रडणेच जर योग्य वाटत असेन आणि फक्त दूसर्याचे कौतुक करुन स्वता वाटेल तसे न करता जगणे म्हणजे स्वताचे व्यर्थ जगणे होय ..

In reply to by मी-सौरभ

का ओ, मॉनिटर पडला का काय टेबलावरुन ? आणि तुम्हाला तर मोठा ब्रेक मिळणार आहे असं ऐकलंय आता अजुन एक ब्रेक कशाला ?

वेळ नाही आता वय झालंय असं म्हणणं हे खोटं असतं . सगळ्या गोष्टी एकदमच कुणीही करु शकत नाही पण , ज्या काही गोष्टी आवडतात जास्त नाही एक दोनच त्या साठीही वेळ न मिळणे अशक्य आहे . वेळ नाही ह्याचा सरळ अर्थ मनापसुन तीव्र इच्छा नाही असाच होतो . छान लेख . पु. ले. शु .