प्रेरणा : http://www.misalpav.com/node/20432
आणि डिस्क्लेमर : कृपया धाग्याला फक्त उत्तर द्यायचे म्हणुन हे लिहिलेले नाही.. आणि ते शुद्धलेखनाबद्दल ही जाताजाता माफी असावी ..
-------------------
माणसाच आयुष्य अस असत, की बरेचश्या गोष्टी करायचय राहुन जातात.. आपलेच बघा ना , कॉलेजला असताना आपल्याला नाटक ही आवडत होते , फुटबॉल ही खेळायला आवडत होते.. मोठ्यांचा आदर ठेवुन होतो म्हणुन ( आणि स्व कमाई करत नसल्याने ही) त्यांनी दिलेल्या मार्गावर चालणे हे व्रत माणत होतो...
पुढे जाऊन शिकल्या सवरल्यामुळे नोकरी धरलेली .. बायको.. मुले.. आणि स्वता घेतलेले घर( हप्त्यांवर) ...
पण असे जगत असताना, आपले मन पुन्हा विचार करु लागते..
आपली बायको फक्त आपली कुठे आहे... ती आई आहे .. सुन आहे .. अजुन काही तरी आहे..
आपले घर म्हनजे काय .. अजुन ही बँक पैसे न भरल्यास ते जप्त करु शकेन ..
आपण तरी काय .. सकाळी उठतो.. ऑफिस मधेय पाट्या टाकतो .. दिवा नाहि तर दुवा होउन जगतो ..
आता वय उलटले आहे .. ३० ओलंडत आहे ...
असच वाटत राहते मग.. अरे तेंव्हा नाटकात काम करत राहिलो असतो तर आपला मित्र आज जो मराठी चित्रपटाचा प्रमुख नट आहे.. तसा नक्कीच असतो ..
तेंव्हा फुटबॉल मध्ये कीती चपळ खेळ होता ना माझा.. भायच्युंग भुतिया खुप मोठे नाव झाले पण नक्कीच स्टेट लेवल ला तर खेळलो असतो .. मग आपोआप खेळ खेळतानाच नोकरी.. पैसा ..
पैसा जावुद्या हो .. आपण जे आहोत तसे जगलो असतो ... पण पैसा जावुद्या हो असे म्हणतच आपण भिकारी बँकेचे मॅनेजर झालोय ...
आता काय उरले आहे ?
--------------------------
आता काय उरल आहे ? असे म्हणत ही रोजच्याच पाट्या टाकणे जे आपल्या मनाच्या आनंदात कुठलीही भर टाकत नसेन, तर मग आता तुम्ही फक्त तश्याच पाट्या टाकत असाल तर तुम्ही उद्या मेला काय किंवा आज .. तुम्ही जीवनाचा आनंद शुन्य घेतला हेच उत्तर आहे ..
माणसाने असा विचार केला पाहिजे की जावुद्या ३० वर्षे गेलेत जे जे आत शक्य आहे ते ते तर आनंदा साठी करुयात ...
उगाच हे राहिले ते राहिले असे म्हणत ते पुन्हा न करणे .. आणि इतर ही असेच जगतात.. हेच म्हणजे जीवन असे चित्र उगाच निर्माण करणे म्हणजे निराशावादाची परिसिमा वाटते...
माणुस असाच असतो.. आपण दु:खी, कष्टी असलो की इतर आपल्या जवळचे ही असेच असले की त्याला उगाच आधार वाटतो .. कसला ते माहित नाहि.. कदाचीत आपल्यासारखे जग आहे, आपण पण सगळ्यांसारखेच आहोत असले उगाच मनाला समजवले जाते ..
पण आनंदासाठी जगले पाहिजे ..
नोकरी करताना ही .. मला माझे छंद जोपासता येतील .. नाही प्रतिथयश्न दिगदर्शक तरी माझ्या आनंदा साठी मला लिखान करता येणे तर शक्य आहे ..
फुटबॉल खेळणे जावुद्या हो .. आता शरीर कुठे माणनार आहे.. ? अहो पण मन तर चिरतारुण्याचे वरदान लाभलेले आहे ना.. करा ना काही तरी .. कोणाला तरी फुटबॉल चे धडे द्या.. काही तरी वेगळे करा..फुटबॉल तयार करणारा तरी कुठे स्वता त्याला किक मारत असेन .. करा काही तरी करा ..
रोजच्या जीवनात खरेच वेळ मिळत नाही.. मान्य .. पण वेळ काढण्यासाठी प्रयत्न करणे खरेच आपल्या हातात नाहि का ?
मला वाचन खुप आवडते म्हणायचे आणि वेळच मिळत नाही लग्न झाल्यापासुन .. आणि मग आपल्या बायका कश्या .. आपल्या घरचे कसे ह्यावर चर्चा ठोकायच्या ..
पण नेट वर/व्यर्थ जे २ तास आपण घालवतो ( वाया) त्यातील १ तास तरी आपण वाचनाला देवु शकतो ना.. तसा प्रयत्न तरी का नको करायला...
जे झाले ते झाले.. पाट्या टाकणे हेच नशिब मानुन पाट्याच टाकणे हे स्विकारार्ह्य नक्कीच नाही.. नशिब बदलावा..
आणि जीवनात असे असंख्य मार्ग असतात ते ओळखा ..
मुक्त .. स्वच्छंदी.. निदान असे जगता येत नसले तर निदान मनाला तरी तसे राहुद्या ..
इतक्या लवकर ही प्रौढ होउ नका की सर्व काही त्याग करुन आता वाट एकाच घटकेची असे वाटावे..
काय असते , ३० ही निट न उलटलेले आपण , सर्व त्याग करुन तोची एक रखवाल दार असे मध्येच म्हणुन सर्व मटेरीअलॅस्टीक आहे.. मला सर्वांपलिकडे जायचे आहे असे बोलणे ही वयाला शोभण्यासारखे नसते ...
ज्या त्या वयात त्या त्या वयाप्रमाणे जगा..
एक वाक्य आठवते आहे व.पुं. चे : "पाणी म्हणजे H2O , येथेच जग थांबले आहे.. तहान लागली की माणसाने पाणी प्यावे..
पृथ्थकरण करावयाचे ते पाण्याचे , तहानेचे नाही. तहान लागली की पाणी प्यावे .. बस्स"
आपल्याला जे हवे आहे.. आणि जे करुन आपल्या आनंद मिळतो आहे ते करत रहायचे.. भौतिकतेवर अनुसरुन मनाला चार भिंतीत आपण का कोंडुन ठेवत आहोत ..?
आम्ही कॉलेज ला असताना म्हनायचो. अरे हा इंजिनियरींग ला आहे.. पण काय नाय उद्या इलेक्शन ला उभा राहणार आहे.. उगाच एक जागा अडवली इंजिनियरींग ची.. किंवा पुढे जावुन त्या शिक्षणाचा उपयोग कोणी करत नसेन तरी तसेच म्हणायचो ..
म्हणुन म्हणतो
आज तुम्ही ३० + आहात.. बर्याच गोष्टी करायच्या राहिल्यात .. उद्या ६० + झालात आणि हीच स्थीती कायम असली तर आयुष्यभर काहीच वेगळे केले नाही म्हणुन प्रुथ्वीवरील एक जागा व्यर्थ घालावली .. असे वाटुन मरणे येईपर्यंत थांबु नका ..
उठा .. एका आनंदाची सुरुवात होत आहे.. त्याचे रोपटे आजच मनात रुजवुन ठेवा .. फळे उद्या येवोत न येवोत .. निदान आज वाटचाल तरी सुरुवात करा .
वाचने
3208
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणेशा,
धन्यवाद ! अवांतर : बाकी,
In reply to गणेशा, by प्रास
भाऊसाहेब,
In reply to धन्यवाद ! अवांतर : बाकी, by गणेशा
अतिअवांतर : कधी कधी आपल्या
In reply to भाऊसाहेब, by प्रास
छान लिहिलंस
सुंदर प्रतिसाद ! आज बरेच
In reply to छान लिहिलंस by पैसा
गणेशा, बा विडंबकांना घाबरुन
उत्तरे कुठल्या प्रश्नाला देवू
In reply to गणेशा, बा विडंबकांना घाबरुन by ५० फक्त
लैच जड धागा आहे
का ओ, मॉनिटर पडला का काय
In reply to लैच जड धागा आहे by मी-सौरभ
गणेशा लेख खुप आवडला .