नृपशंभू- छत्रपती संभाजी !
छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यातील अनेक पैलूंपैकी एक म्हणजे त्यांच्यात दडलेला 'साहित्यिक' ,
त्यांच्या परमप्रतापी कारकीर्दीमुळे असेल,त्यांच्या छत्रपती असण्यानी असेल किंवा इतिहासकार,नाटककारांनी त्यांच्यावर जी गरळ ओकली त्यामुळे असेल...
त्यांच्यातला साहित्यिक फारसा लोकांपुढे आला नाही.
८-१० लाखांच्या मोगली सैन्याशी लढा देणाऱ्या या छत्रपतीने 'बुधभूषण' हा संस्कृत तर सातसतक,नखसिख आणि नायिकाभेद हे ब्रज भाषेतील ग्रंथ लिहिले.
यापैकी बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ आहे, यामध्ये राज्यव्यवस्था,शिवरायांची राजनीती,वंश,मंत्री,शासन यासंबंधीचे लेखन तर आहेच पण यातील श्लोक वाचताना पिता-पुत्र नात्यातील हळुवार भावना आणि छत्रपती वडिलांबद्दल असलेला आदरही ठिकठिकाणी प्रकट केलेला आहे.
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालीतो विळखा
करितो धर्माचा र्हास
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल
त्या शिवप्रभुंची विजयदुंदूभी गर्जूदे खास ! "
तसेच त्यांचे निष्कलंक चारित्र्य उमजून घेण्यासाठी त्यांनी राजाचे वर्तन कसे असावे यावर लिहिलेला हा श्लोक आहे , पुढे त्यांनी सात दोषांच वर्णन केलंय (वादण्ड,पारूष्य,दुरयातंच,पान,स्त्री,मृगया आणि द्यूत)
व्यसनादि च सर्वाणि भूपति: परिवर्जयेत् |
सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया: ||
शंभूमुद्रा
१३६ पदे असलेल्या नखसिख मध्ये लावण्यवतीचे केसांपासून ते नखापर्यंतचे वर्णन आहे,या काव्यमय ग्रंथामध्ये शृंगाररसाचा वापर मोठ्या खुबीने वर्णन करताना शंभूराजांनी केलाय.
नायिकाभेद मध्ये अनेक प्रकारच्या नायिकांचे वर्णन त्यांनी शृंगाररसातून केलंय,नायिकांचे ६ भेद यातून मांडण्यात आले आहेत.
नखसिख, नायिकाभेद या ग्रंथांचं लिखाण त्यांनी 'नृपशंभू' या नावाने केलं, ब्रज भाषा शिकण्यासाठी आणि या ग्रंथाच्या निर्मिती साठी त्यांना मातिराम आणि कवी भूषण या भावांनी मदत केल्याचे सांगण्यात येते,
प्रसिद्ध ब्रजकवी आणि विद्वान रत्नाकर त्रिपाठी (तीकावापूर) यांची चिंतामणी,मतीराम,भूषण आणि नीलकंठ (जटाशंकर) हि चार मुले.
कवी भूषण
त्यातल्या कवी भूषण यांनी शिवरायांवर लिहिलेले शिवराजभूषण आणि शिवबावनी हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
शिवरायांच्या पराक्रमांचे ३८४ छंदांमधून शिवराजभूषण मध्ये काव्यमय वर्णन आहे,
तर शिवरायांच्या गुणांचे ५२ छंदांमधून शिवबावनी मध्ये काव्यमय वर्णन आहे.
८ भाषा अवगत असणाऱ्या संभाजीराजांनी जयपूर च्या महाराजा रामसिन्हाला लिहिलेली संकृत पत्रे सुद्धा मिळाली आहेत,तसेच त्यांनी स्वत: लिहीलेलं एक संस्कृत दानपत्र सुद्धा आहे.
बुधभूषण चे काही पाठ अजूनही बनारस विश्व हिंदू विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात शिकवले जातात.
ज्या हाताने लेखणी चालवली नंतर त्याच हातांनी लीलया समशेर चालवणारा हा महायोद्धा कुठे आणि बखरकार,नाटककार,दंतकथा लेखकांनी रंगवलेला संभाजी कुठे.
सारेच अपसमज गळून पडतात.
माहिती संदर्भ/साभार - डॉ.प्रभाकर ताकवले,
नागरी प्रचारिणी सभा,बनारस
(संभाजी महाराजांच्या नायिकाभेद ग्रंथातील स्त्रियांचे ८ भेद आणि त्यांचे उपभेद आपल्यासमोर मांडण्याचा पुढील काही भागांमध्ये प्रयत्न करणार आहे,
काही सूचना असतील तर जरूर कळवा)
यापैकी बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ आहे, यामध्ये राज्यव्यवस्था,शिवरायांची राजनीती,वंश,मंत्री,शासन यासंबंधीचे लेखन तर आहेच पण यातील श्लोक वाचताना पिता-पुत्र नात्यातील हळुवार भावना आणि छत्रपती वडिलांबद्दल असलेला आदरही ठिकठिकाणी प्रकट केलेला आहे.
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालीतो विळखा
करितो धर्माचा र्हास
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल
त्या शिवप्रभुंची विजयदुंदूभी गर्जूदे खास ! "
तसेच त्यांचे निष्कलंक चारित्र्य उमजून घेण्यासाठी त्यांनी राजाचे वर्तन कसे असावे यावर लिहिलेला हा श्लोक आहे , पुढे त्यांनी सात दोषांच वर्णन केलंय (वादण्ड,पारूष्य,दुरयातंच,पान,स्त्री,मृगया आणि द्यूत)
व्यसनादि च सर्वाणि भूपति: परिवर्जयेत् |
सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया: ||
शंभूमुद्रा
१३६ पदे असलेल्या नखसिख मध्ये लावण्यवतीचे केसांपासून ते नखापर्यंतचे वर्णन आहे,या काव्यमय ग्रंथामध्ये शृंगाररसाचा वापर मोठ्या खुबीने वर्णन करताना शंभूराजांनी केलाय.
नायिकाभेद मध्ये अनेक प्रकारच्या नायिकांचे वर्णन त्यांनी शृंगाररसातून केलंय,नायिकांचे ६ भेद यातून मांडण्यात आले आहेत.
नखसिख, नायिकाभेद या ग्रंथांचं लिखाण त्यांनी 'नृपशंभू' या नावाने केलं, ब्रज भाषा शिकण्यासाठी आणि या ग्रंथाच्या निर्मिती साठी त्यांना मातिराम आणि कवी भूषण या भावांनी मदत केल्याचे सांगण्यात येते,
प्रसिद्ध ब्रजकवी आणि विद्वान रत्नाकर त्रिपाठी (तीकावापूर) यांची चिंतामणी,मतीराम,भूषण आणि नीलकंठ (जटाशंकर) हि चार मुले.
प्रतिक्रिया
लेखमालेची ओळख छान झाली
असेच म्हणतो .. पुढील लेखनास
छान. पण...
जुन्या काळचा गाढवावर बसून
ठाउक नै ब्वा...
बास का..?
या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर ८-१० लाख नक्कीच भरते...
मनुचीनं दिला आकडा?
मनोबा, मनुची आणि शंभूराजे
<(त्यामुळेच शिवरायांनी
इब्राहिम खान गारदी हा
+१
इब्राहिम खान गारदी हा
...अरे देवा...त्या इब्राहीम
माफ करा!
असुद्याहो...पण मूळ कागदपत्रे
हो तुमचं बरोबर आहे! यापुढे
सुंदर माहिती.!
मनोबाशी सहमत. या छाव्याबद्दल
छान माहिती..
हो ना ते पण आहेच, पण
एक शंका
लिहिणार तर आहेच सौरभ, कारण हे
वोक्के
धन्स...
मस्त माहिती
उत्कृष्ट लेखमाला..... वाचतोय
शुभेच्छा.
वाचलेरा हय !! आपला एक दोस्त
छान सुरुवात
नाणेघाटाहुन येताना बोलला
छान माहिती
पोर्तुगीस,इटालियन,फ्रेंच ...
उत्तम सुरुवात. पुढील भागांची
>>तसेच आग्र्याहून सुटकेनंतर
माझ्या माहितीत...
होय वल्लीशेठ,स्वराज्याचा भाग न गमावता
उत्तम सुरुवात
आवडले
अरे वा..