प्रा. यनावाला यांची निरिश्वरवादी मते ते नेहमीच पोटतिडीकेने मांडत असतात. स्वखुशीने बुडणार्या लोकांना वाचवावयाचे प्रयत्न करणार्या अशा लोकांबद्दल मला नेहमीच कुतूहल (व आदरही ) वाटत असतो. आमची वर्गवारी निराळी. माझ्याकडे कधीही पूजा नसते पण कोणी बोलावलेच तर आनंदाने जातो, रुपया टाकतो, "प्रसाद छान झाला आहे" असे म्हणून परत एकदा मागून खातो ( घरी आल्यावर बायकोची बोलणीही!) पण कोणाला सुधारावे असे कधीच वाटले नाही. तर सांगत काय होतो यनावालांनी उपक्रमवर असाच एक लेख टाकला व त्या ललित लेखाला चांगले ९७ प्रतिसाद लाभले. खुन्नस म्हणून राजेश गुर्जींनी ( घासकडबी याचे लघुरूप गुर्जी का करतात हो ?) " गॉड्स ऍडवोकेट " असा एक नवीन धाग उघडला. त्यालाही ७५ प्रतिसाद लाभले. भलेभले ! त्या साठेमारीत माझ्यासारख्या प्रौढ लेकराला कळण्यासारखे फारसे काही नव्हते. पण त्यातले एक इंग्रजी वाक्य कळले. "Absence of evidence is evidance of absence " म्हणजे "असल्याचा पुरावा नसणे हा नसल्याचा पुरावा असतो ". "देव आहे याचा पुरावा देता येत नाही हाच देव नाही याचा पुरावा आहे." असेल, असेल (किंवा नसेलही ) आपल्याला काय कळते ? पण मला एक लहान शंका आहे (लघु नव्हे). ती तिथल्या विद्वान विचारवंतांना विचारावयाचे धाडस नसल्याने इथे विचारतो. म्हणजे इथेही विचारवंत आहेत हो पण त्यांनीच निरसन केले पाहिजे असे नाही ; तुम्ही तुमची मते सांगा.
शंका अशी की खरेच वरील विधान सार्वत्रिक आहे कां ? याला छेद देणारी एखादी वस्तू असेल तरीही मग देव नाही हे ठरवण्यासाठी याचा उपयोग नाही. " माझे माझ्या आईवरील प्रेम. " या अमेय,निराकार, स्थलकालाबाधित गोष्टीला काहीही पुरावा नाही. इतरांचे सोडा, मी देखील काही "पुरावा" देऊ शकणार नाही. मग हे प्रेम नाहीच असे सिद्ध झाले कां ? हे एक सोडा, तुमच्या आमच्या सर्वांच्या अशा भावनांबद्दल कोणता "पुरावा" मिळणार आहे ? श्री. यनावालांबरोबर चर्चा करतांना ते म्हणाले " तुम्हाला आनंद झाला की तुम्ही हसता, चेहरा खुलतो, दु:ख झाले तर तुम्ही रडता, ... हा झाला पुरावा. " मला पटले नाही. हसणे हा आनंदाचा परिणाम आहे, तो "आनंद" नव्हे. कार्यकारणभावात गल्लत करू नये. ते असेही म्हणाले की या भावना मेंदूच्या कोणत्या भागात निर्माण होतात ते शास्त्रज्ञांनी शोधले आहे. हाही पुरावा वाटत नाही.
हे झाले माझे विचार. फार तार्किक आहेत असे मी म्हणत नाही. एखादेवेळी सुस्पष्ट नसतीलही. पण मला काय विचारावयाचे आहे हे कळवण्यापुरते पुरेसे आहेत. आता तुम्ही काय म्हणता ?
( हा प्रश्न उपक्रमवर का नाही हे विचारू नका, मला येथील मते पाहिजे आहेत.)
शरद
वाचने
21165
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या कडे आहे पुरावा देव असल्याचा!!
अरे रे!
In reply to माझ्या कडे आहे पुरावा देव असल्याचा!! by अर्धवटराव
हाच तुमचा प्रॉब्लेम !!
In reply to अरे रे! by Nile
.
In reply to हाच तुमचा प्रॉब्लेम !! by अर्धवटराव
ते तुमच्यासाठी नाहिच हो !!
In reply to . by अन्नू
मी काहीच वाचले नाही
.