मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तोच थंडगार भात

विदेश · · जे न देखे रवी...
(चाल : तोच चन्द्रमा नभात ) तोच थंडगार भात तीच प्लेट पाहुनी एकांती मजसमीप तीच भीति का मनीं ! खारट चटणी तशीच रोज तेच भांडणे पोळ्यांनी सोडियले नीट येथ भाजणे भाजीचा गंध तोच तीच कुबट फोडणी ! सारे जरि ते तसेच संधि आज ती कुठे ? मीहि तोच, तीच तीहि, दुसरी मेस ती कुठे ? ती कपात ना दरात अश्रु दोन लोचनी ! त्या पहिल्या आम्टीच्या आज लोपल्या खुणा डाळ ह्या जलात व्यर्थ मूढ शोधतो पुन्हा नीट ये न ते कळून भंगल्या भुकेतुनी ! ( पूर्व प्रसिद्धी- शब्दगाssरवा २०११)

वाचने 2091 वाचनखूण प्रतिक्रिया 13

सर्वसाक्षी 28/12/2011 - 10:16
झकास विडंबन. पोळ्यांनी सोडियले नीट येथ भाजणे> हे विशेष आवडले. अनेकदा पोळ्या करणार्‍या बायांनाही हा रोग लागतो खरा.

प्रास 28/12/2011 - 12:03
विदेशराव, खूपच झक्कास विडंबन. शब्द न् शब्द चातुर्याने योजलेला आहे आणि छंद अतीव चपखल बसवला आहे.
त्या पहिल्या आम्टीच्या आज लोपल्या खुणा डाळ ह्या जलात व्यर्थ मूढ शोधतो पुन्हा नीट ये न ते कळून भंगल्या भुकेतुनी !
हे विशेष आवडलेले आहे. यातल्या प्रत्येक ओळीतून त्या काळच्या मनातलं कारुण्य ओथंबून वाहत आहे. आपण तुमच्या कवितांचे फ्यान आहोतच हे वे. सां. न.

वाहीदा 28/12/2011 - 12:04
तुम्हाला पोळी नेहमीच करपलेली किंवा कच्चीच गिळावी लागते काय ? आमटीची फ़ोडणी जळालेली असते का ? भाजी ची फ़ोडणी ही कुबट वाटते का ? तर मग वेळ का दवडता ? आता आसवे गाळणे थांबवा गणपाशेफ़ ऑनलाईन क्लासेस येथे त्वरित संपर्क साधा http://kha-re-kha.blogspot.com/ ;-)

सूड 28/12/2011 - 12:20
मस्तच केलंय !! सैंपाकी अज्ञातवासात काही आठवडे अशा सैंपाकाची टेस्ट घेतल्या गेली आहे. :D