(चाल : तोच चन्द्रमा नभात )
तोच थंडगार भात तीच प्लेट पाहुनी
एकांती मजसमीप तीच भीति का मनीं !
खारट चटणी तशीच रोज तेच भांडणे
पोळ्यांनी सोडियले नीट येथ भाजणे
भाजीचा गंध तोच तीच कुबट फोडणी !
सारे जरि ते तसेच संधि आज ती कुठे ?
मीहि तोच, तीच तीहि, दुसरी मेस ती कुठे ?
ती कपात ना दरात अश्रु दोन लोचनी !
त्या पहिल्या आम्टीच्या आज लोपल्या खुणा
डाळ ह्या जलात व्यर्थ मूढ शोधतो पुन्हा
नीट ये न ते कळून भंगल्या भुकेतुनी !
( पूर्व प्रसिद्धी- शब्दगाssरवा २०११)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2127
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
निव्वळ अप्रतिम.
.
मस्त कविता..
मस्त आहे कविता. आवडली.
कडवं नी कडवं तुमी गोड केलं
कडवं नी कडवं तुमी गोड केलं बगा विदेसराव....!
लै भारि.
लै भारि.
लै भारि. :-)
त्या बॅचलर लोकांच अंतःकरण
त्या बॅचलर लोकांच अंतःकरण उलगडुन दाखवलत आज, वा ! वा!! जुने दिवस आठ्वले...मजा आली.
विदेश राव धन्यवाद..
Mess is always a mess असे मी
Mess is always a mess
असे मी नेहमीच वर्णन करत असतो. तुम्ही आज ते काव्यातून मांडलेत. धन्यवाद. :)
मीटरात बसतंय की मस्त.. आवडले.
मीटरात बसतंय की मस्त..
आवडले.
मस्त जमलय
झकास विडंबन.
पोळ्यांनी सोडियले नीट येथ भाजणे> हे विशेष आवडले. अनेकदा पोळ्या करणार्या बायांनाही हा रोग लागतो खरा.
विदेशराव, खूपच झक्कास विडंबन.
विदेशराव,
खूपच झक्कास विडंबन. शब्द न् शब्द चातुर्याने योजलेला आहे आणि छंद अतीव चपखल बसवला आहे.
हे विशेष आवडलेले आहे. यातल्या प्रत्येक ओळीतून त्या काळच्या मनातलं कारुण्य ओथंबून वाहत आहे.
आपण तुमच्या कवितांचे फ्यान आहोतच हे वे. सां. न.
आता आसवे गाळणे थांबवा, गणपाशेफ़ ऑनलाईन क्लासेस ला भेट द्या
तुम्हाला पोळी नेहमीच करपलेली किंवा कच्चीच गिळावी लागते काय ?
आमटीची फ़ोडणी जळालेली असते का ?
भाजी ची फ़ोडणी ही कुबट वाटते का ?
तर मग वेळ का दवडता ? आता आसवे गाळणे थांबवा
गणपाशेफ़ ऑनलाईन क्लासेस येथे त्वरित संपर्क साधा
https://kha-re-kha.blogspot.com/ ;-)
मस्तच केलंय !!
मस्तच केलंय !!
सैंपाकी अज्ञातवासात काही आठवडे अशा सैंपाकाची टेस्ट घेतल्या गेली आहे. :D
छान जमलंय विडंबन!
अगदी चपखल शब्द योजना आणि मात्रा न मात्रा बरोब्बर!
:)
:)
:)
लाजवाब, चवदार विडंबन !
-पार्टनर