ब्रेक अप...
माझी अपेक्षापूर्ती न करणाऱ्या या अनामिक नात्याचा मला भयंकर कंटाळा आलाय बघ. तू म्हणशील पुरुष इथून तिथून सारखेच असतात, मलाही तसंच समज हवं तर. तुझे सारे आरोप अन् आक्षेप मला मान्य आहेत. हो, मीही पुरुष आहे. मीही तुझ्यावर प्रेम करतांना एकच अपेक्षा ठेवली होती. ती सुरुवातीला तू समरसून पूर्ण करीत गेलीस. परंतु आता काळ बदलला, आपण जरा समंजस झालो आहोत. तुला तुझे करियर घडवायचे आहे. तू आता मध्यावर आली आहेस. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. तू जीव तोडून काम करतेस, प्रसंगी ओव्हर टाईमलाही थांबतेस. त्यामुळे होतं काय की तुझ्याकडे स्वतःसाठीच जिथे वेळ नसतो, तिथे माझ्यासाठी तू कधी वेळ काढणार, कधी मला एकांतात भेटायला येणार? नाहीच जमत ते तुला. गेले काही महिने तू मला जशी हवी होती तशी भेटत नाहीये. वाटतं तू मला टाळते आहेस, भेटण्याचे ठरवूनही येत नाहीस. प्रयत्न करते म्हणतेस अन् ऐनवेळी काहीतरी कारण पुढे करून मला हुलकावणी देतेस. त्यानंतर उडणारा विस्फोट मी शब्दांत नाही सांगू शकत. तू येणार म्हणून केलेली जय्यत तयारी तशीच वाया जाते. मानसिकच नव्हे तर शारीरिक खच्चीकरण केल्यासारखे होते. मी आतल्या आत कोमजून जातो. कशासाठी आपण हा अट्टहास चालवला आहे? असाही प्रश्न पडतो. कामधंदा सोडून तुझी प्रतीक्षा करीत रहावी अन् तू ‘वेळ नाही ना रे मिळाला, बघू पुढच्यावेळी भेटू..’ असं सहज म्हणतेस अन् माझ्या नजीक यायचं प्रकर्षानं टाळतेस. हे काही मला पटत नाही बघ. मी इतक्या आर्जवाने तुला बोलावतो, एकदातरी येच म्हणतो पण तू मात्र किती सफाईदार खोटे बोलून मला वाकुल्या दाखविल्यासारखे करतेस. तुझं हे खिजवणं आहे की तुझी मजबुरी हे कळायला मार्ग नसतो. मी प्रतिप्रश्न करताच तू तुझे अनेक प्रॉब्लेम्स सांगत सुटतेस. ‘घरी खूप कामं पडलीयेत रे, मला कामाहून घरी निघायलाच उशीर झालाय कसं भेटू शकते तुला? आज नाईटशिप करून थकलेय रे, नवऱ्याचा फोन आला होता त्याने लवकर बोलावलंय अरे, घरी पाहुणे आलेत काय करू रे? वेळच नाही बघ तुझ्याकडे यायला.’ अशी कितीतरी संयुक्तिक कारणे तू मला सुनावून सहीसलामत (हसत) सुटतेस.
मग मला प्रश्न पडतो की हे अनैतिक संबंध कशासाठी? यात आपला काय फायदा? ही ‘बया’ तर आपल्याला बोटावर नाचविल्यासारखे खेळवीत आहे. जिच्यासाठी आपण धावाधाव करून साड्या खरेदी केल्या, त्यावर मॅचींग ब्लाउज शिवायला टाकले. ब्लाउजचं माप देण्यासाठी तू आलीच नाहीस, पण तुझा एक जुना ब्लाउज टेलरला देण्याकरिता माझ्याकडे सुपूर्त करण्यास तुला बरे वेळ मिळाला? कितीतरी महागडे ड्रेसमटेरियल तुझ्यासाठी मी खरेदी केले होते, त्यांची शिलाई देखील मीच दिली. परंतु तू एकदाही ते ड्रेस घालून मला निवांत बिलगली नाहीस. तू म्हणेल ती चीज हजर करतांना मला किती यातायात करावी लागली हे तुझ्या गावी नसावे असेच तू वागायचीस. केवळ एक सूप्त इच्छेच्या तृप्तीसाठी मी तुझ्याभोवती गोंडा घोळायचो. तुझी मागणी पूर्ण केली की तू मला पुरुष म्हणून जे हवं ते देशील अशी अपेक्षा बाळगून मी गोल गोल फिरत राहायचो. खरं म्हणजे तू मला तुझ्या हितासाठी फक्त वापरून घेतलं, हो वापरूनच घेतलं. तू तुझा स्वार्थ पाहिलास. तुला तुझ्या पायावर उभं करतांना मी हात सढळ ठेवला. तुझी फी भरली. तुला आलेले कित्येक प्रॉब्लेम्स सोल्व्ह केले. बसचा पास काढून दिला. येता जाता मला मिसकॉल देता यावा म्हणून तुला मोबाईल घेऊन दिला. त्यातला बॅलन्स संपत आला की तू मोठ्या अधिकारवाणीने सांगायचीस, ‘अरे तेवढा बॅलन्स टाक रे..’ मी टाकायचो. मला मात्र तू फक्त मिसकॉल देणार, उलटपक्षी मीच फोन करावा अशी तुझी अट असायची. हे मला कधीच न उलगडलेलं कोडं होतं. म्हणजे तुझा मोबाईल रिचार्ज करायचा मी, तू मात्र तो बॅलन्स इतरांना फोन करून उडवून टाकायचीस. मी तुला रिटर्न कॉल का म्हणून करायचा? माझ्याच पैशातून तू मलाच फोन करीत नाहीस म्हणजे टू मच हं. मग मी ठरवले आता रिचार्ज तर करायचा नाहीच शिवाय रिटर्न कॉलही करायचा नाही. मी तसं तुला सांगताच तुझी ओरड सुरु झाली- ‘आता तू पहिल्यासारखा राहिला नाहीस रे, खूप बदललास. आखडू झालास. बरोबर आहे तुला तुझी बायको भेटली ना, आता माझी गरजच उरली नाहीये.’ परंतु तूच मला टाळीत चालली आहेस हे मी सांगू कुणाला?
त्यात हे आपले अनैतिक संबंध एकदम चोरी छिपे चालत आलेले. त्याचं बोदरेशन काय कमी असतं? तुझा कधीही मिसकॉल येऊ शकतो म्हणूनच मी माझा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला आहे. चारचौघांत किंवा कुटुंबीयांत आपले प्रेम उघड करायचे नाही म्हणून किती तारेवरची कसरत करावी लागते म्हणून सांगू? तुलाही तुझ्या नवऱ्यापुढे माझा कॉल घेता येत नसतो. चुकून तू घरी असतांना मी कॉल केला तर तू अजूनही किती झापतेस मला. पण तू मला कधीही मिसकॉल देऊन मोकळी होणार. (अगदी बायकोजवळ झोपलेलो असतांनाही!) हे कसे काय सहन करायचे? का तर म्हणे तुला नाईट ड्युटी असते, झोप येत नाही म्हणून मला मिसकॉल! धन्य तुझी प्रेमकहाणी. म्हणजे तू तुझा स्वार्थ किती पाहत, जपत आलीयेस पहा. जरा काही खुट्ट झालं, तुझं तुझ्या नवऱ्याशी वाजलं किंवा सासू बोलली, कामाच्या ठिकाणी काही वादंग झाले तर पटकन मला दहा-बारा मिसकॉल देऊन टाकायचे. मी करतोच रिटर्न कॉल. की गाऱ्हाणे ऐकवत बसायचं. माझा बॅलन्स संपलाच म्हणून समजा. दुखाःच्या वेळीच मी आठवणार, इतर आनंदाच्या प्रसंगी का नाही? कधी सहज म्हणून मिसकॉल येतच नाही तुझा. तुला चांगली नोकरी मिळाली, किती पेमेंट मिळाले हे तर तू कधीच मला कळविले नाहीस. तसा माझा अधिकार नसेलही परंतु ज्याच्यामुळे आपण शिकून सावरून, नवे क्षितीज पादाक्रांत करून स्वतःच्या पायावर उभे राहिलो आहोत, त्याला एकदा तरी सांगावसं वाटलं नाही तुला की, ‘चल रे, आज माझा पहिला पगार झालाय. चल कुठेतरी मस्तपैकी कॉफी पिऊ यात...’
छे, घरी जातांना मात्र तू आलेल्या पगारातून सासूला चपला नेशील, पोरांना खाऊ नेशील, नवऱ्याला पगाराचं पुडकं देशील. तुला इथवर आणून पोचविणारा मी कोरडाच राहणार. तुझी भेट तर दूरच, दर्शनही दुर्लभ झाले आहे. अलिकडे तू माझ्याशी फटकून वागते आहेस की खरोखरच घरातलं, बाहेरचं उरकता उरकता तुझ्या नाकीनऊ येत असतील कळायला मार्ग नाही. जर तसं असेल आणि भविष्यात आपण भेटूच शकणार नसू तर मग हे प्रेमाचं गोंडस नाव दिलेलं ओझं वागवायचं का म्हणून? जिथे गाठीभेटी होण्याची सुतराम शक्यता नाही ते तकलादू प्रेम टिकवून ठेवायचंच कशासाठी? तू मला भेटत नाहीस तर का म्हणून मी तुझ्यासाठी झुरायचं? तू जर मला टाळते आहेस, माझ्या अर्जवांना किंमत देत नाहीस, फक्त फोनवर बोलतेस (मीच कॉल केल्यावर) तर मी का म्हणून व्यर्थ खर्च करायचा? ज्यातून काही हशील होत नाही तिथे अशील बनून जाण्यात काही अर्थ आहे का?
माझ्या मते प्रेम-बीम सबकुछ झूठ असतं बघ. एक पुरुष म्हणून माझी मलाच जाणवलेली तळमळ सांगतो- मी तुझ्यावर प्रेम केलं ते मनात एक छुपा ‘हेतू’ ठेवूनच. माझी इच्छा तू पूर्ण करावीस इतकाच माफक आशय त्यात दडलेला होता. तुझ्या अडीअडचणी समजून घेण्यात मला अजिबात इंटरेस्ट नव्हता, नाही देखील. केवळ तोंडदेखलेपणा म्हणून मी तुला ऐकून घेत आलोय, भलेबुरे जे जसे सुचतील ते सल्ले देत आलोय. त्यामागे उद्देश एकच तुझा एकांत मिळावा, तुझा मदमस्त सहवास लाभावा, तू मला तृप्त करून सोडावंस. हो, नक्कीच. एक पुरुष म्हणून प्रेम करतांना जे त्याला अपेक्षित असतं तेच मीही अपेक्षित ठेवलं होतं. संधी साधून मी तुझं सर्वस्व लुटलं त्यावेळी फार मोठी मर्दुमकी गाजविल्याचा भास होत राहिला. त्याच भ्रमात मला तुझी चटक लागली अन् तू जे जे सांगितले ते ते करीत गेलो. तुझा अनुनय करता करता त्या बदल्यात तुझं शरीर मागू लागलो. वेळ प्रसंगी ते तू माझ्या हवाली करीत गेलीस त्यात वाद नाहीच, परंतु जेव्हा आज तू तुझ्या इच्छित स्थळी पोचली आहेस तेव्हा मला नकळत झिडकारून पुढे जाणं तुला शोभतं का? कबूल मला माझी बायको मिळालीय पण मग तू तुझी पोळी भाजून घेतल्यावर मला टाळणे योग्य नाही. पुरुष म्हणून मी तुझ्याकडून एकच अपेक्षा बाळगून असतो त्या बदल्यात तू तुझी दहा कामे करवून घेतेस आणि वर पुन्हा मला ठेंगा दाखवतेस म्हणून तर खरं माझा जळफळाट चालला आहे. खिसा रिकामा होतोय अन् हाती धुपाटणे राहतेय याची मला तीव्र जाणीव होऊ लागल्यानेच मी तुझ्याशी फारकत घ्यायचं ठरवलं आहे...
तू कदाचित म्हणशील, ‘सगळे पुरुष सारखेच असतात. स्त्रीला वासनेच्या दृष्टीनेच बघतात.’ हो हेही मला एकदम कबूल आहे. मी कोणी देव नाही निरपेक्ष प्रेम करायला. मीही एक प्राणीच आहे. त्यातही पुरुष. म्हणजे निसर्गनियमाप्रमाणे मी प्रेम करावं ते वासनेच्या अधीन राहूनच! आणि तुला म्हणून सांगतो जिथे वासना नसते ते प्रेम नसतेच मुळी, त्याला 'निष्काम' मैत्री म्हणता येईल हवं तर! स्त्रीवर प्रेम केलं आणि ‘ते’ घडलं नाही तर तो पुरुष बुळाच म्हणावा अन् दुसरं काय? तेव्हा मी ज्या हेतुपुरस्सर तुझ्यावर प्रेम केलं त्याचा मला पुरुष म्हणून अभिमानच वाटतो. खंत एकच राहते की आजकाल तू फक्त तुझा स्वार्थ साधून घेत आहेस. मी टाळीसाठी हात पुढे करतोय अन् तू दूर जातेस हे काही बरोबर नाहीये. टाळी एका हाताने वाजूच शकत नाही हे माहीत असतांनाही तू जवळ येण्याचे टाळावे हेच मला खटकतेय. माझी इच्छा पूर्ण होत नाही तर मी का म्हणून तुझ्यावर खर्च करावा? म्हणूनच आज आपण ब्रेकअप घ्यायचे म्हणजे घ्यायचे. पुन्हा कधीही भेटायचे नाही. मी तुला रिटर्न कॉल करणार नाही. तुझा कॉल मात्र आजपासून घेणार. ती तयारी ठेव तू. तूही आता कमावते आहेस, तुला खुपच वाटत असेल ना माझ्याशी बोलायचे तर बॅलन्स शिल्लक ठेवत जा. मला वेळ असेल किंवा जर बोलावेसे वाटले तरच मी फोन रिसिव्ह करीन तुझा. नाहीतर नाही. अब मेरी मर्जी...
मला माहितीये तू आता आसवे ढाळू लागशील. 'मी इतकी वाईट आहे का रे?' असं विचारशील. पण मी मुळीच बधणार नाही. जिथे मला हवं ते तू देऊ शकत नाहीस तिथे माकडउड्या मारण्यात काहीच अर्थ नाहीये. जे मिळूच शकत नाही त्याची आस धरून वेळ, पैसा, श्रम वाया घालविण्यात मला तरी आता रस उरलेला नाहीये. बघ तुला पटतेय का? नाही पटले तरी चालेल मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम आहे. जितक्या वेळा तू मला उपभोगू दिलंस त्याच्या कैकपटीने अधिक त्याग मी केलेला आहे. घरादाराकडे दुर्लक्ष केलं आहे, वेळ दवडला आहे, पैसा ओतला आहे. आता कुठेतरी हे थांबायलाच हवं. म्हणून हा अंतिम निर्णय- ब्रेक अप.
मग तू म्हणशील, ‘तू मला लुटलंस, माझं सर्वस्व तुला देऊन बसले.’ पण हे मी मानीत नाही. एक तर आपले हे अनैतिक संबंध ना तुझ्या नवऱ्याला कळले, ना माझ्या बायकोला. दुनियेपासून कितीतरी लपतछपत आपण भेटत राहिलो. हा व्यभिचार फक्त तुला व मलाच माहीत आहे. हे गैरवर्तन केवळ आपल्या दोघांतच सीमित राहिलं आहे, राहणार आहे. म्हणजे तू जे काचेचं भांडं समजतेस ते आजही शाबूत आहे. त्यावर कुणीही दगडफेक अजून तरी केलेली नाहीये, ते भांडं फुटण्याचा संभव नाहीच. कारण हा मामला म्हणजे तेरी भी चूप मेरी भी चूप या पठडीतला आहे. तू मला जे बहाल केलंस ते निसर्ग नियमाला धरून होतं. विजातीय धृवांमध्ये आकर्षण व्हायलाच पाहिजे तेच खरं प्रेम. मात्र त्या प्रेमाच्या बदल्यात तू मला कफल्लक केलंस, करते आहेस हे निसर्गनियमाला धरून आहे का? आज तू कमावू लागली आहेस, यशस्वी झाली आहेस, तुला तुझा नवरा आदराने वागवू लागला आहे, तुझी सासू तू ड्युटीवर गेल्यानंतर मागे सर्व कामे उरकू लागली आहे, सर्व काही आलबेल चालेलेलं आहे म्हणून तू मोठ्या मिजासखोरीत वावरू लागली आहेस, तुझ्या डोक्यात हवा शिरली आहे, तुझे पाय जमिनीवर ठरू पाहत नाहीत, एकंदर काय तर तू कृतघ्न होत चालली आहेस. गेल्या महिन्यात तुला पेमेंट वाढवून मिळालं हे एका अक्षरानं तू मला कळवलं नाहीस, मात्र नवऱ्यासोबत बटर चिकन खाऊन सेलिब्रेशन केलंस. वाह रे तुझी नियत. तुझं बरं चाललेलं असतांना, तू ऐशोरामात असतांना, आनंदी असतांना माझा विसर तुला का पडावा? ज्याच्यामुळे हे वैभव पाहत आहोत त्याला एक फोन करवत नाही तुला? हा कुठला न्याय म्हणायचा?
मग अशा परिस्थितीत मी तुझी संगत सोडणे योग्य नव्हे काय? सांग. मी तर ठरवले आहे, तुझंही अंतर्मत वेगळं असू शकणार नाही. ‘जो माझ्याकडे वासनेची शिकार म्हणून पाहतो त्याला का म्हणून भेटायचे?’ असं तुला वाटत असेल, पटलं असेल तर मान्य. तुझा हा आरोप शिरसावंद्य आहे. कारण मी पुरुष या नात्याने तुझ्या स्त्रीत्वाकडे भोगवस्तू म्हणूनच पाहत आलोय. त्यामुळे तू मला निखालस टाळू शकतेस. माझ्याशी असलेले निनावी संबंध तोडू शकतेस. मलाही तेच हवे आहे. कारण माझ्या लेखी- “जिथे ‘काम’ नाही तिथे रामराम घालण्यात अर्थच नाही.” तेव्हा बाय बाय बाय...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काय हे डॉक? तुम्ही खरच मेडिकल
प्रखर वास्तववादी लेखन, फक्त
तुझी मागणी पूर्ण केली की तू
ह्म्म... पुन्हा तेच. आपल्याला
आपल्याला वैद्यकीय उपचारांची
प्रतिसाद,प्रतिसाद, प्रतिसाद, प्रतिसाद, प्रतिसाद, प्रतिसाद......
चायला...प्रेम आणि व्याभिचार
गेट वेल सून
तेच तेच आणि तेच
>>या येवढ्या सगळ्या अक्षर
हा हा हा
या येवढ्या सगळ्या अक्षर
मा. परा, आपण स्वतःला काय
ठ्ठो....ठ्ठो....
=)) तुमचा प्र अन सही भयंकर
गलिच्छ लिखाण संपूर्ण वाचले.
दोन वाक्ये
दोन वाक्ये
गेल्या महिन्यात तुला पेमेंट
डॉक्टरसाहेब...... तुमचा नायक
<<<जस्ट मेक अ नोट : प्रॉब्लेम
झेंडा, यस्स...
मीही तुझ्यावर प्रेम करतांना
तुम्ही का इंग्रजी सोडेनात
शिल्पा ब-Ji woh aisa hai ke
आ.शू.
कै नको, ते तर फारच त्रासदायक
/-/
:)
@शिल्पा -ji
काय होते ??
+१.
मनापासुन बरंच कै करण्याची
@गवि YOU SIMPLY ROCKS! MADE MY DAY
मनापासुन बरंच कै करण्याची
जल्ला तुमा सगल्यांचा चाल्ला
/-/
तुम्हाला एवढी इच्छा असेल या
मग देऊ दे ना कानडि प्रतिसाद
मिपाचे घोषवाक्य...
.
मनोरुग्ण बनाल हो , हे असल
अरे कशाला प्रतिक्रिया
धागा खाली...
Relax man ! This thread is
असे लिहिल्याने स्वतः लिहिणारा
स्वतःच्या स्वार्थासाठी एक
(No subject)
आईचा घो !
अत्युच्च प्रतिसाद.... लाईकड.