Skip to main content

भरारी

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 14/12/2011 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार हा असा, काळोखल्या दिशा तुजवीण सख्या रे, दयनीय ही दशा मारू कुणा मी हाका तू देवाघरचा वासी सांगू दुखः कुणाला तू केवळ मनात वससी दाखवू कुणाला मनातली स्वप्ने तुजसवे पाहिलेली जो तो हळहळे क्षणभर नि दाखवे सहानुभूती नको खोटा आधार कुणाचा जगण्यासाठी तुझ्या प्रेमाच्या बळावर मरीन भरारी मोठी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2557
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

"तुझ्या प्रेमाच्या बळावर मारीन भरारी मोठी" शेवटची ओळ कृपया वर दिल्याप्रमाणे वाचावी, ही विनंती.

अंधार हा असा, काळोखल्या दिशा तुजवीण सख्या रे, दयनीय ही दशा अशी करुण भीषण दाटलेली दु:खाची स्थिती.. ..आणि चार्पाच ओळीतच तुझ्या प्रेमाच्या बळावर मारीन भरारी मोठी अहो एक तर एक मूड एस्टॅब्लिश होऊ द्या की.. नंतर काळानुसार भरारी होईलही.. पण एक कडवे नाही संपत तोसवर त्यातच उभारी, भरारी, बळ वगैरे ?

@ गवि त्याचं काय आहे न भाऊ, सत्य परिस्थितीची जाणीव जेव्हा आ वासून समोर उभी राहते न तेव्हा तुमचे मूड का काय ते इस्टॅब्लिश होत आहेत का नाही हे विचार करायची मानसिक ताकद राहायलाच हवी असे नाही, काय बरोबर न ? @ जाई.साहित्ययात्री काव्य इस्टंट आहे का नाही हे तुम्ही कसे काय ठरवता हो ? कुणाचा काय आणि कसा मूड आहे, कविता कधी सुचली ह्या गोष्टींबद्दल एवढ्या अधिकारवाणीने (काही कल्पना नसताना) लिहिणे बरोबर नव्हे ... कसे ? बाकी कविता करण्यासाठी तुमच्यासारखे लोकं "भावनेचा रवंथ करणे" अपेक्षितात हे वाचून जरा विचित्र वाटतंय !!

In reply to by navinavakhi

तुमचेच शब्द उधार घेऊन थोडं स्पष्ट बोलतो.. सत्य परिस्थितीची जाणीव जेव्हा आ वासून समोर उभी राहते ... तेव्हा लोक "शा ला शा" जुळवून यमकजोड्या लावून त्या आ वासायला लावणार्‍या परिस्थितीचं मीटरबाज वर्णन करण्याइतकी भानावरच नसतात हो.. अंधार हा असा, काळोखल्या दिशा तुजवीण सख्या रे, दयनीय ही दशा कविता ही परत जमिनीवर आल्यावरच केली जाते.. रचली जाते... "त्या" सुन्न करणार्‍या क्षणांची समोरच्याला / वाचकाला जाणीव करुन देण्यासाठी.. तेव्हा त्यात काही विजोड दिसले तर ते समजून घ्यायला हवं असं माझं मत आहे. तेव्हा "परिस्थितीतून जात असतानाच" आणि भानावर नसतानाच आपोआप कविता बनते अशी पुस्तकी गैरसमजूत करुन घेऊन कविता करु नये अशी विनंती.. इथे कोणावरच मी उगाच टीकात्मक छद्मी ताशेरे ओढल्याचं उदाहरण तुम्हाला मिळेलसं वाटत नाही.. काही लक्षात आणून दिलेलं आपल्याला आवडत नसेल तर मग माझा प्रतिसाद असा वाचावा: "मस्त कविता आहे नवखीताई.. आवडली.." धन्यवाद.

बाकी... कविता करण्यासाठी तुमच्यासारखे लोकं "भावनेचा रवंथ करणे" अपेक्षितात हे वाचून जरा विचित्र वाटतंय !! या वाक्याचे जनक कोण आहेत ते माहीत नाही पण एक अतीव सुंदर वास्तवदर्शी आणि फिट्ट वर्णन करणारे वाक्य निर्माण केल्याबद्दल कर्त्याचे आभार. कविता करणं मुळीच वाईट नाही, त्या खूप छान होऊ शकतात.... पण भावनेचा रवंथ ही "फॅक्ट" समजून केल्या तर उत्तम व्हाव्यात.. :) कविताच का? कोणतेही लिखाण कमीजास्त प्रमाणात हेच असतं की...

गविँशी बाडिस नवखीताई आम्हा दोघांचाही रोख तुमच्या कवितेवर होता तुमच्यावर वैयक्तिक टीका करायची नव्हती बाकी मला नसू देत कविता करता येत पण समजतात तरी बऱ्‍यापैकी तुमच्याप्रमाणे इथे प्रकाश१११, मिका, पाभे, गणेशा असे अनेक कवी आहेत त्यांच्यापैकी कुणीही अस म्हटलल नाही आणि तरीही जर आवडल नसेल तर मीही गविँप्रमाणेच म्हणते तुमची कविता आवडली विषय संपला धन्यवाद

@नवखीताई, फार रोचक चर्चा चालू आहे. इथं आज ज्याला त्याला कोलावरी डी हवयं... कसं देणार ? म्हणजे इतर काही अस्तित्वातच नाही का ? तूम्ही छान लिहताय वाचायला मज्या येतेय. टिकाकारांकडे स्नेह्पूर्वक दूर्लक्ष करा व आपले काम (कविता प्रसिध्द करणे )चालू ठेवा. वाहती नदी जसं मार्गात दगड धोंडे आहेत , चढ उतार आहेत याचा अजिबात विचार करत नाही, तर तिच काम प्रवाही राहणे इतकच आहे म्हणून वाटलं तर ओलांडून पटल तर वळसा घालून ती अडथळ्यंची पर्वा न करता स्वतःच्या मस्तीत वाहातच राहते.. तूम्ही सूध्दा हेच करा... ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच खरं.... बाकी काव्य सूरेख, वाचताना काळजाला बोट लागले माझ्या. धन्यवाद.