भारताची आर्थिक परिस्थिती ढासळत आहे काय?
रॉयटर्स वृत्तसंस्थेचा अलिकडील एका लेख अस्वस्थ करणारा आहे. लेखातील निदान बरोबर असेल, तर भारताची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे असे दिसते.
मूळ लेखाचा दुवा येथे देतो. व थोडक्यात त्यातील मुद्दे मांडतो.
http://www.reuters.com/article/2011/12/05/us-economy-india-funding-idUSTRE7B40JL20111205
कमीकमी होणारे उत्पादन, व हाताबाहेर जाणारी महागाई ह्यांमुळे भारताच्या आर्थिक परिस्थितीवर ताण आहेतच. (गेल्या वर्षांत अनेकदा आक्रमकपणे इंटरेस्ट रेट्स वाढवूनही महागाई कमी होण्याची लक्षणे नाहीत). ह्या कारणांमुळे तसेच विशेषतः युरोपातील आर्थिक पडझडींमुळे भारतात स्टॉक्स व बाँड्समधे गुंतवणूक करणारे परदेशी गुंतवणूकदार वेगाने गुंतवणूक कमी करीत आहेत. ह्यामुळे रूपयावर ताण येवून तो खाली जात आहे. (गेल्या चार महिन्यात १६ % अधोगति).
आपले करंट अकाउंट डेफिसिट, अकौंटिंगच्या ह्या वर्षाच्या (एप्रिल २०११ - मार्च २०१२), दुसर्या तिमाहीत, पहिल्या तिमहीच्या तिप्पटीने वाढले (सुमारे १४ बिलीयन यू. एस. डॉ.). सर्व वर्षभरात ते सुमारे ५४ बिलीयन डॉ. होईल असा अंदाज आहे.
लेखांत म्हटले आहे की रूपयाची पिछेहाट थांबवण्यात रिझर्व बँकेस 'इकडे आड, तिकडे विहीर' अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. एका टोकास काहीच मध्यस्थी न केल्यास रूपया घसरत रहील. दुसर्या टोकास आक्रमकपणे मध्यस्थी केली तरी ती महागात पडेल. आपल्याकडे सध्या सुमारे ३०० बिलीयन डॉ. ची परदेशी चलनाची गंगाजळी आहे खरी, पण करन्ट अकाउंट डेफिसिट व नजीकच्या काळांत मॅच्युअर होणार्या कर्जरोख्यांच्या परतफेडी, ह्यांत जी रक्कम खर्ची पडेल त्यानंतर जेमतेम २० बिलीयन डॉ. इतकीच परकीय चलनाची गंगाजळी शिल्लक राहील.
तसेच आक्रमकपणे परकीय चलन विकत घेण्याच्या प्रयत्नात रूपयाचे बाजारातील चलन कमी होईल, त्याचे परिणाम बँकांच्या गंगाजळींवर व त्यानंतर सर्वच व्यवहारांत (कंपन्यांना कर्जे मिळणे इ.) दिसू लागतील.
तेव्हा ह्यातून रिझर्व बॅंकेस एक मार्ग सुचवला आहे तो बॅंकांचे कॅपिटल रेशो कमी करण्याची परवानगी देणे, हा. तो कितपत परिणामकारक असेल, ह्याविषयी लेखात काही म्हटलेले नाही.
नजीकच्या भविष्यात रूपया अगदी ५५ च्याही खाली जाईल, असे सर्वसाधारणपणे म्हटले जात आहे.
मी अर्थशास्त्रज्ञ नाही, तेव्हा ह्यावर त्या क्षेत्रातील जाणकारांनी प्रकाश टाकावा, अशी विनंति करतो. माहितीपूर्ण, अभ्यास्पूर्ण चर्चा अपेक्षित आहे. लेखात काही ठोस माहिती दिलेली आहे, काही गृहितके आहेत, त्या अनुषंगाने, व आपल्याकडील माहितीवरून, ह्याविषयी चर्चा व्हावी. कॉन्स्पिरसी थेयरी मांडायची असली तरी ती साधार असावी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
परीस्थीती अवघड बनत चालली आहे हे नक्कि...
होय..... आपण म्हणता
सावधानता
प्रतिसाद
उत्तम
+१
+२
-२
+३
भाववाढ जास्त महत्त्वाची
कॅच २२
होय आणि नाही
महत्वाचा विषय.
नाही
मार्केट
जॉन मेनार्ड किन्स
वाचत तर होतोच आणी तुमची पण
अर्थशास्र
सत्य
रुपया अवमूल्यन
काळजी
आपली अर्थ व्यवस्था पुर्नपने
आता बोललाच आहात तर......
एक प्रश्न विचारतो ...
+१०० टु विजुभाउ - युरोपिय(
>>अशा वेळी आपल्या परदेशातल्या
भारतीय इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रापुढील समस्या-१
भारतातील इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगापुढील समस्या-२
आपला प्रतिध्वनी
मनोबा ... पीन पाइंट
हु केअर्स?
ह्म्म्म
जर ते पैसे भारतात परत आणले
कमी
'.देशाचा फायदा होतो का तोटा
Pareto Law
-१
+१
जबरदस्त विश्लेषण, अतिशय
इथे मनोबा...
मंदी, उत्पादन घट आणि रोजगार
सल्ला
मिडिया??
फरक
-१ . आधीच वाचलेत
या संदर्भात प्रतिक्रीया
अर्थ व्यवस्थेचा कणा
+१
+ १००० टू अविनाश काका, शेवटी
०.५ सहमत.