✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गुलजार नार ही ... (भाग २)

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Wed, 12/07/2011 - 13:21  ·  लेख
लेख
गुलजार नार ही ... (भाग १) 'तू खूप कामात नसशील तर मला घरापर्यंत सोडशील ? अरे पटकन मदतीला येईल असे आता घरी कोणीच नाहीये...' मंदाकिनीने विचारले आणि आम्ही एकदम आकाशात विहार करायला लागलो. लगेचच रिक्षा बोलावून आम्ही तिचे सामान आत भरले, तोवर थोडीशी लंगडत ती देखील आत येऊन बसली. शक्यतो मध्ये सुरक्षित अंतर ठेवून आणि नाना कल्पना रंगवत मी तिच्या शेजारी बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला.... ------------------------------------- सामानाची एक बॅग मध्ये आणि एक बॅग पायापाशी ठेवून आमचा प्रवास सुरू होता. थोड्यावेळाने मंदाकिनीने मधली सामानाची बॅग उचलून ती देखील खाली ठेवली आणि जरा आरामात बसली. मी आपला भीत भीत एक कोपरा पकडून बसलो होतो. मंदाकिनी माझ्याकडे वळून काहीतरी विचारायला लागली जे मला त्या डबड्या रिक्षाच्या खडखडाट पटकन ऐकता देखील येईना. नाईलाजाने मी थोडा जवळ सरकलो आणि आमचे संभाषण सुरू झाले. काही वेळापूर्वीच मी तिच्याशी बोललो होतो, पण तेव्हाचा प्रसंग वेगळा होता आणि आजूबाजूला बरेच लोक देखील होते. आता मात्र आम्ही दोघेच, आणि ते ही इतक्या जवळ बसलेलो होतो. माझ्या छातीत विनाकारण धडधड वाढत होती. 'साल्या तुझ्या डोळ्यातून नुसती वासना बदबदा सांडत असते' असे मित्रांना ऐकवलेले बोल आठवून आता ते मलाच स्वतःला लागू होतात का काय याची भिती वाटत होती आणि माझी नजर उगाचच चोरली जात होती. ती नक्की काय विचारत होती आणि मी काय सांगत होतो ते देवालाच माहिती. माझी अवस्था मात्र बिकट व्हायला लागली होती. नजर फिरून फिरून पुन्हा मंदाकिनी वरतीच आदळत होती. बोलताना तिच्या गुलाबी ओठांची हालचाल, एका संथ लयीत हालणारा तो कंठमणी, पापण्यांची नाजूक फडफड, स्लिव्हलेस मधून दिसणारे दंड आणि कडेला बसलेलो असल्याने तिच्या पोटाचा दिसणार काही भाग .... अक्षरशः घशाला कोरड पडायला सुरुवात झाली होती. एवढ्यात रिक्षा दाण्णकन एका खड्ड्यातून गेली आणि मंदाकिनी माझ्या दिशेने सरकली. तिला सावरायच्या प्रयत्नात मी पटकन एका हाताने तिच्या खांद्याला आधार दिला आणि एक हात तिच्या कमरेवरती पडला. पटकन मी स्वतःला सावरले आणि हात बाजूला घेऊन सॉरी म्हणून टाकले. मंदाकिनी मात्र 'अरे त्यात काय..' असे म्हणून मधाळ हसली. अर्थात पुन्हा एकदा माझ्या हालचालीत आणि बोलण्यात चोरटेपणा आला, राहून राहून तिचा झालेला स्पर्श आणि तिच्या सेंटचा वास मनात दरवळत होता. मंदाकिनी मात्र अगदी मोकळ्या ढाकळ्या गप्पा मारायच्या मूड मध्ये दिसत होती. शेवटी एकदाचे मंदाकिनीचे घर आले आणि मला हुश्श झाले. 'एक पाच मिनिटं थांबा, मी मॅडमला सोडून आलोच. रिटर्न जायचे आहे.' मी रिक्षावाल्याला 'आदेश' दिला. "अरे ? तू थांबणार नाहीयेस ? येवढी मदत केलीस आणि घर न बघताच, काही न घेताच जाणार ? ते काय चालायचे नाही, आणि तुला हे सामान पण वरती न्यायचे आहे.' मंदाकिनी डोळे मिचकावत म्हणाली आणि पैसे द्यायला तिने पर्स देखील उघडली. शेवटी मग मीच माघार घेत रिक्षावाल्याचे पैसे दिले आणि सामानाला हात घातला. किंचितशी लंगडत मंदाकिनी आणि तिच्यामागे दोन पिशव्या घेऊन मी अशी वरात लिफ्टच्या दिशेने निघाली. लिफ्टपाशी पोचलो तर पहिल्या मजल्यावरती कोणा महाभागाने लिफ्टचे दार अर्धवट उघडे ठेवले होते आणि लिफ्ट तार स्वरात किंचाळत होती. मंदाकिनीच्या चेहर्‍यावर आता 'हे काय नवीन संकट' टाईप भाव उमटले होते. शेवटी मीच तिला तिथल्या पायरीवरती बसवले आणि पहिल्या मजल्यावरून लिफ्ट खाली आणण्यासाठी वर गेलो. लिफ्ट मात्र दरवाजे घट्ट लावूनही खाली जायचे नाव घेईना. एक प्रयत्न म्हणून दुसर्‍या मजल्याचे बटण दाबले, तर सटवी वर जायला लगेच तयार. डोक्याला हात लावला आणि पुन्हा पहिल्या मजल्यावरती आलो. खालती येऊन मंदाकिनीला प्रॉब्लेम सांगितला. शेवटी मंदाच्याच आग्रहावरून माझ्या खांद्याचा आधार देत तिला पहिल्या मजल्यापर्यंत घेऊन आलो. येवढ्यातल्या येवढ्यात हा तिचा मला दुसर्‍यांदा स्पर्श होता, आणि तो देखील इतक्या जवळून. मंदाकिनी अगदी निवांतपणे एक हात माझ्या खांद्यावर आणि एक हाताने कठड्याचा आधार घेत वर चढत होती आणि इकडे आमची धडधड देखील वार चढत होती. डाव्या खांद्यावरती हात टाकून मंदा वर चढत होती आणि आता त्या डाव्या हाताने नक्की काय करावे हे मला सुचत नव्हते. शेवटी काय होईल ते होईल, आर या पार असे धाडस करायचे ठरवून मी डाव्या हाताने मंदाच्या कमरेला विळखा घालत तिला आधार दिला. मी आधार दिल्या दिल्या मंदाकिनी झटकन थांबली आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. तसेही तिचा हात खांद्यावरच होता आणि खांद्यापासून गाल काय फार लांब नव्हता. मंदाकिनीने एकदम एकटक माझ्या डोळ्यात बघितले.. खुदकन गालात हसली आणि पुन्हा जिने चढायला लागली. आमचा चिमणी येवढा झालेला जीव भांड्यात पडला. लिफ्टमधून मंदाच्या फ्लॅटपर्यंत पोचलो. अजूनही मंदाचा हात माझ्या खांद्यावरून तिने काढून घेतला नव्हता आणि त्यामुळे माझ्या मनाला उगाचच गुदगुल्या होत होत्या. मंदाच्या फ्लॅट छोटाच होता पण छान होता. "अरे, सध्या मी एकटीच आहे, त्यामुळे पसाराच पसारा झालाय. हसू नकोस आमच्या फ्लॅटला." "नाही हो मॅडम. उलट छान सजवला आहेत तुम्ही फ्लॅट. एकदम सुरेख दिसतोय, अगदी.." मी पटकन जीभ चावली. "बोल बोल लाजू नकोस. आता काय वर्ग चालू नाही आणि तू सध्या माझ्या विद्यार्थी देखील नाहीस. मित्र म्हणून अगदी मनापासून बोल." "नाही, म्हणजे मी म्हणत होतो की.. फ्लॅट खरंच सुरेख दिसतोय, अगदी... अगदी तुमच्यासारखा." ह्या वाक्यावर मंदाकिनी अगदी 'घायाळ' वगैरे करतात त्या टायपात हसली आणि आम्ही दाणकन कोचावरतीच बसून घेतले. "तू बस, मी आलेच सरबत घेऊन." "अहो नको, कशाला उगीच ? आधीच तुमचा पाय दुखतो आहे, त्यात येवढा त्रास कशाला? उलट तुम्ही बसा मीच मस्त पाणी घेऊन येतो फ्रीज मधून." मंदाकिनीला तिथेच बसवून मी तिच्या किचन मध्ये शिरलो. सगळी मांडामांड अगदी जबरदस्त दिसत होती. फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली, ग्लास आणि बर्फ घेऊन मी बाहेर हजर झालो. "घ्या हा बर्फ फिरवा पायावरून, लगेच आराम पडेल." मंदाकिनी अगदी कौतुकाने माझ्याकडे बघायला लागली. तिच्यासमोरच बसून मी गार पाण्याचे घोट रिचवायला लागलो. घशाला मरणाची कोरड पडलीच होती म्हणा. पावलावरून बर्फ फिरवता फिरवता मंदाकिनी अचानक मला म्हणाली "काय रे मला मंदाकिनी म्हणता, तसे इतरांना काय काय म्हणता?" 'ढिश्क्याँव...' एकदम गोळी थेट झाडली गेली आणि नाका तोंडात पाणी जाऊन आमची ठसकुन मरायची अवस्था झाली. मंदाकिनी माझ्याशेजारी येऊन बसली आणि पाठीवरून हात फिरवायला लागली. "अरे सावकाश. येवढे काय झाले दचकायला? शेवटी तुमचे गुरु आहोत आम्ही, आम्हाला काय सगळे समजत नाही असे वाटते का काय तुम्हाला?" मी आपले कसनुसे हसून मंदाकिनीकडे बघत राहिलो. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. पाठीवरती हात फिरवता फिरवता मंदाकिनी माझ्यावरती बरीच रेलली होती. तिचा पाठीवरून फिरणारा हात काही वेगळेच सुचवू पाहतं होता, मी मात्र त्याचा अर्थ लावायला धजत नव्हतो. तो स्पर्श आपल्याला वाटतो तसा नाहीये, हे असले विचार म्हणजे आपल्या अश्लील मनाचे चाळे आहेत हेच राहून राहून वाटत होते. मंदाकिनीचा हात आता हळूहळू पाठीबरोबरच माझ्या खांद्यावरून देखील फिरायला लागला होता. ह्या गडबडीत मंदाचा पदर बराच एका बाजूला सरकला होता आणि त्यामुळे दिसणारा नजारा माझ्या छातीचे ठोके आणि ठसक्याचे प्रमाण अजून वाढवत होता. च्यायला ! हिच्या घरात मी अती वेगाने पडलेल्या हृदयाच्या ठोक्यांनी मृत्यू पावणार बहुदा अशी माझी खात्रीच होत चालली होती. मंदाकिनीच्या चेहर्‍यावर आता एक प्रकारची गुलाबी छटा आली होती, तिचा श्वासोच्छ्वास देखील चांगलाच जोर पकडायला लागला होता. तिच्या उष्ण श्वासाला मी माझ्या गालावरती सहजपणे जाणवू शकत होतो. आता काहीतरी करायलाच हवे होते, पण मगाशी जिन्यात केलेले धाडस पुन्हा माझ्याकडून घडू शकेल का नाही ह्याची मलाच खात्री होत नव्हती. आजपावेतो वाचलेली सगळी 'ज्ञानवर्धक' पुस्तके, पारायण केलेले सिनेमे.. कशा कशा ज्ञानाचा काही उपयोग होईना, पुढे काय करावे हेच सुचेना. शेवटी धाडस करत मी माझ्या डाव्या हाताने मंदाच्या कानावरती आलेली बट थरथरत्या बोटांनी मागे सारली, आणि तसाच हात तिच्या केसांवरून फिरवत गालावरती आणला. हे सगळे करत असताना छाती फाडून आता आतले घड्याळ बाहेर येणार असे वाटायला लागले होते, पाय देखील कापत होते. माझी बोटे मंदाच्या गालावरती फिरायला लागली आणि मंदाकिनीने एकदम मोठा श्वास घेऊन आपले डोळे गच्च बंद करून घेतले. माझा हात तिच्या गालावरून नुसताच फिरत होता, येवढी मजल तर मारली पण आता पुढे काय करावे तेच सुचेना झाले होते. त्या गुलाबी गालावरून हात फिरवत फिरवत माझी बोटे आता मी तिच्या मऊशार ओठांवरती आणली.. सायी सारख्या नाजूक ओठांवरून बोटे फिरवताना एक वेगळेच स्पर्शसुख मिळत होते. मंदाकिनीने अचानक आपले डोळे उघडले.. मी घाबरून माझा हात चटकन मागे घेतला, पण आता मंदाकिनी थांबायला तयार नव्हती. तिने सरळ माझ्या अंगावरच स्वतःला झोकून दिले आणि मला घट्ट मिठीत घेतले. तिच्या गुलाबी ओठांनी माझ्या ओठांचा ताबा घेतला आणि ..... (क्रमशः)

Book traversal links for गुलजार नार ही ... (भाग २)

  • ‹ गुलजार नार ही ...
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
साहित्यिक
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
14730 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

आर

विनायक प्रभू
Wed, 12/07/2011 - 15:55 नवीन
आर तिच्या मारी टोपी
  • Log in or register to post comments

अजून वेळ आहे हो

प्यारे१
Wed, 12/07/2011 - 15:58 नवीन
अजून वेळ आहे हो मास्तर......... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

_/|_

मी-सौरभ
Wed, 12/07/2011 - 16:09 नवीन
आता पराचा हा क्रमशः हापिसात बसून वाचणे बंद.. परा साहेब : हे असले धागे विकांताला प्रसिद्ध करत जा ना. घरी बसून शांतपणे वाचता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

जब्र्या

स्पा
Wed, 12/07/2011 - 16:06 नवीन
पऱ्या भारी सुरुये गाडी नक्की हा लेखकाला झालेला भास असणार :D दिवा स्वप्न बघत बसला असेल बिचारा
  • Log in or register to post comments

+ १

अमृत
Wed, 12/07/2011 - 16:58 नवीन
असेच म्हणतो... अमृत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

चांगले चालु आहे. पुढील भाग

मोहनराव
Wed, 12/07/2011 - 16:10 नवीन
चांगले चालु आहे. पुढील भाग लवकर येउद्या. ;)
  • Log in or register to post comments

कोणाची आठवण झाली का रे ?

कपिलमुनी
Wed, 12/07/2011 - 16:22 नवीन
नुतन मधल्या कोणाची आठवण झाली का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

या वेळी खाली (क्रमशः) पाहुन

गणपा
Wed, 12/07/2011 - 16:11 नवीन
या वेळी खाली (क्रमशः) पाहुन बरे वाटले. ;) =)) =))
  • Log in or register to post comments

का?

विवेक मोडक
Wed, 12/07/2011 - 16:20 नवीन
त्यात बरं वाटण्याजोगं काय आहे/ आजचं मरण उद्यावर एवढच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

जाउदे विमो तुम्हास्नी नाय

गणपा
Wed, 12/07/2011 - 16:28 नवीन
जाउदे विमो तुम्हास्नी नाय कळायच त्ये. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक मोडक

उ लाला उ लाला ..तु है मेरी फँटसी

कपिलमुनी
Wed, 12/07/2011 - 16:19 नवीन
उ लाला उ लाला ..तु है मेरी फँटसी
  • Log in or register to post comments

यो बाब्बो ..... उंगली जो तुने

इरसाल
Wed, 12/07/2011 - 16:26 नवीन
यो बाब्बो ..... उंगली जो तुने फेरी है चोरीसे फेरी है यहा वहा.............पुढचे वाक्य कापिलमुनीचे वाचावे (वर)
  • Log in or register to post comments

अगं बाब्बो!!!

किसन शिंदे
Wed, 12/07/2011 - 16:37 नवीन
अगं बाब्बो!!! :D
  • Log in or register to post comments

लै भा री

विवेकखोत
Wed, 12/07/2011 - 16:39 नवीन
लई भारी आता जास्ती दिवस क्रमश ठेवून उसुकता तनु नका काय ??:)
  • Log in or register to post comments

मचाक मचाक

शाहिर
Wed, 12/07/2011 - 16:40 नवीन
असा आवाज येउ लागला आहे ;)
  • Log in or register to post comments

आता... ???

गवि
Wed, 12/07/2011 - 16:43 नवीन
आता हो???!!!! Image removed.
  • Log in or register to post comments

वाचतोय

तिमा
Wed, 12/07/2011 - 16:56 नवीन
बाबुराव अर्नाळकरांची पुस्तके वाचली होती त्याची आठवण झाली. फक्त , तेंव्हा वाचताना सुद्धा कानशीले गरम व्हायची, तशी आता होत नाहीत. -- तिरशिंग बापुडवाणे
  • Log in or register to post comments

होतं अस्स! वय झालं की

सोत्रि
Wed, 12/07/2011 - 17:05 नवीन
होतं अस्स! वय झालं की तिरशिंगराव, असच होतं ;) - (हिरवा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

परत एकदा

मी-सौरभ
Wed, 12/07/2011 - 18:38 नवीन
मास्तरांनकडून चांदीचे औषधी गुण यावर सल्ला घेऊन बघा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

किंवा ह्याच्यातून पाणी, दुध

इरसाल
गुरुवार, 12/08/2011 - 09:49 नवीन
किंवा ह्याच्यातून पाणी, दुध वा तत्सम पेय Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

अर्नाळकरांची पुस्तके वाचून

विजुभाऊ
Wed, 12/07/2011 - 17:04 नवीन
अर्नाळकरांची पुस्तके वाचून कानशिले गरम झालेली तुम्ही पहिलीच व्यक्ती असाल. असो. अवांतरः परा..... डोळे उघड.... आमच्या वहिनीनी हे वाचले तर? कोणाला अ‍ॅटॅक येईल?
  • Log in or register to post comments

.

आदिजोशी
Wed, 12/07/2011 - 18:29 नवीन
अर्नाळकर हा कोडवर्ड असावा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ज ब रा...

मोदक
Wed, 12/07/2011 - 17:17 नवीन
ज ब रा...
  • Log in or register to post comments

जबराट

प्रचेतस
Wed, 12/07/2011 - 17:47 नवीन
'परा'कोटीचा उत्कंठावर्धक.
  • Log in or register to post comments

हा भाग

मन१
Wed, 12/07/2011 - 17:49 नवीन
हा भाग वाचला. प्रतिक्रिया क्रमशः देणार आहे. क्रमशः
  • Log in or register to post comments

.

आदिजोशी
Wed, 12/07/2011 - 18:30 नवीन
पुढचा भाग कधी टाकताय??????????????????
  • Log in or register to post comments

आवडला ! पुढील भागाची वाट

snowy
Wed, 12/07/2011 - 19:11 नवीन
आवडला ! पुढील भागाची वाट बघतोय
  • Log in or register to post comments

आमचा पुणें नामक शहरात

यकु
Wed, 12/07/2011 - 19:18 नवीन
आमचा पुणें नामक शहरात सदाशिवराव भाऊच्या नावाने वसवलेल्या पेठेवरचा विश्वास कायम आहे! एवढं सरळ असणार नाय हे काम. ;-) बाकी उत्सुकता लागून राहिली आहेच.
  • Log in or register to post comments

हेच

पैसा
Wed, 12/07/2011 - 19:54 नवीन
आणि असंच! प्रतिक्रिया पण क्रमशः
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

+१न असेच म्हणते

प्रीत-मोहर
Wed, 12/07/2011 - 21:00 नवीन
शब्दाशब्दाशी सहमत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

क्रमश : धन्यवाद

सुहास..
Wed, 12/07/2011 - 20:10 नवीन
क्रमश : धन्यवाद
  • Log in or register to post comments

परा तुला मंदाकिनीची शपथ !!

अर्धवटराव
Wed, 12/07/2011 - 23:34 नवीन
>>तिच्या गुलाबी ओठांनी माझ्या ओठांचा ताबा घेतला आणि .... "आणि माझं स्वप्न भंग झालं..." असं काहि आलं पुढल्या भागात तर ते दारा, फिरोज वगैरे मंडळीना तुझीच सुपारी देईन पराभाऊ... मिपावर ( बहुतेक पहिल्यांदाच ) इतकी छान गुलाबी थंडी पसरलीये... उसका दही नहि जमानेका क्या... अवांतर: आयला... आमचीच शाळा/कॉलेज असले भंगार का होते कोण जाणे... मंदाकिनी तर सोडा, गेला बाजार हुमा खान, राखी सावंत, डबल गेला बाजार अलका कुबल देखील नव्हत्या... पण हे एका दृष्टीने बरच झालं म्हणा... नाहितर डिग्रीचे वांधे झाले असते ;) (सायेबा राजीव कपूर) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

>>तिच्या गुलाबी ओठांनी माझ्या

मोहनराव
गुरुवार, 12/08/2011 - 14:40 नवीन
>>तिच्या गुलाबी ओठांनी माझ्या ओठांचा ताबा घेतला आणि .... "आणि माझं स्वप्न भंग झालं..." असं काहि आलं पुढल्या भागात तर ................ पराचा जाहीर निषेध करण्यात येईल!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

तिच्या गुलाबी ओठांनी माझ्या ओठांचा ताबा घेतला आणि .....

चिंतामणी
गुरुवार, 12/08/2011 - 00:09 नवीन
(क्रमशः) :love: :8) :8-) :shy: :love:
  • Log in or register to post comments

मस्त! पुढील भागाच्या

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 12/08/2011 - 00:52 नवीन
मस्त! पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

हैदोस

मोग्याम्बो
गुरुवार, 12/08/2011 - 05:23 नवीन
पराने "हैदोस" घातलाय नुसता ;)
  • Log in or register to post comments

परा मस्त च्यान कथा जमली आहे

मृत्युन्जय
गुरुवार, 12/08/2011 - 10:29 नवीन
परा मस्त च्यान कथा जमली आहे हो. पुढील भागांच्या कधी नव्हे ते इतक्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

अगदी

मैत्र
गुरुवार, 12/08/2011 - 11:15 नवीन
+१ मृत्युंजय... हैदोस घातला आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

उठलोच.

नगरीनिरंजन
गुरुवार, 12/08/2011 - 13:50 नवीन
कथा वाचून खुर्चीतून उठलोच. पुढच्या भागात केएलपीडी नक्की.
  • Log in or register to post comments

आशा. आशेवर तर जगतो माणूस. असं

प्यारे१
गुरुवार, 12/08/2011 - 14:37 नवीन
आशा. आशेवर तर जगतो माणूस. असं निराश नाही व्हायचं नन्नि..... सॉरी ननि. ;) उठा. जागे व्हा. चालायला लागा. ध्येय मिळेपर्यंत थांबू नका. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

पराभौ, 'Standing Ovation' :)

इष्टुर फाकडा
गुरुवार, 12/08/2011 - 16:59 नवीन
यावरून आठवलं, आमच्या भावे च्या ब्याच मध्ये एक अशाच (वासरात लंगडी या न्यायाने 'अशाच') बाई होत्या, त्या गरोदर असताना आमच्या कंपूने भक्तिभावाने 'कोणीतरी येणार येणार गं' हे गाणं भेकलं....परिणामस्वरूप गोसावी नामक राक्षसाने आमचा माज मोडला.
  • Log in or register to post comments

हा या कथेचा

चिंतामणी
गुरुवार, 12/08/2011 - 17:05 नवीन
उत्तारार्ध आहे का??????? :~ :-~ :puzzled: . . . . . . . . . . . . . . . ;) ;-) :wink:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

या कथेचा उत्तरार्ध लिहायची

इष्टुर फाकडा
गुरुवार, 12/08/2011 - 20:29 नवीन
या कथेचा उत्तरार्ध लिहायची आमची प्राज्ञा नाही चिंतामणराव !! तेणे पाहिजे 'तिळाचे', येरागबाळ्याचे काम नोहे :)
  • Log in or register to post comments

गंडवागंडवी

श्रावण मोडक
गुरुवार, 12/08/2011 - 22:02 नवीन
उगाच टेम्पो वाढवून हा पऱ्या गंडवणार. कारण पुढचं काही लिहिण्याची त्याची हिंमत नाही. :) त्याला तो अनुभवही नसेल. काय पऱ्या, बरोबर? :)
  • Log in or register to post comments

असं म्हणता...

अर्धवटराव
Fri, 12/09/2011 - 00:47 नवीन
मग श्रामो, क्लायमॅक्सचं तुम्हीच घ्या मनावर. तुमची हिंमत तर आहेच... आणि आयुष्य इतकं कोळुन प्याल्यानंतर काहिना काहि अनुभव खात्रिने असणार.. काय... (हिंमतवाला) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अर्धवटरावांना फुल्ल सहमती!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 12/09/2011 - 18:43 नवीन
अर्धवटरावांना फुल्ल सहमती! मोडकसाहेब घ्याच तुम्ही मनावर! तुम्हाला त्यात मानवी मनाचे कंगोरे वगैरेही दाखवता येतील आणि झालंच तर मग समाज नावाची गुंतागुंतीची चीजही दाखवता येईल नीट व्यवस्थित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मी पण सहमत...

मस्त कलंदर
Fri, 12/09/2011 - 19:24 नवीन
मोडक लिहाच हो काहीतरी.. नाहीतरी यापुढे पर्‍या काही लिहिल्सं वाटत नाही. या निमित्ताने कार्यकर्त्यांनी देखील केलेल्या (कुठल्यातरी आणि कसल्यातरी बॅगवरच्या)काही नोंदी अशा तशांवर लिहायला सुरूवात करावी असं मी जाताजाता सुचवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मी पण, मी पण...

स्मिता.
Fri, 12/09/2011 - 19:56 नवीन
मोडक लिहाच हो काहीतरी.. नाहीतरी यापुढे पर्‍या काही लिहिल्सं वाटत नाही.
माझीही याला फुल्ल सहमती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

छ्या...

श्रावण मोडक
Sat, 12/10/2011 - 01:44 नवीन
तुम्हाला त्यात मानवी मनाचे कंगोरे वगैरेही दाखवता येतील ...!
आता या विषयात मानवी मनाचे कंगोरे लिहायचे? छ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

नाय तर नाय!

पिवळा डांबिस
Sat, 12/10/2011 - 05:17 नवीन
आता या विषयात मानवी मनाचे कंगोरे लिहायचे? छ्या... नाय "मानवी मनाचे कंगोरे" लिहायचे तर जाऊ द्या... श्रामो, तुम्ही या विषयातील तुमच्या "काही नोंदी कशा-कशाच" लिहा पाहू!!!! ;) बाकी पराच्या कथेबद्दल... चांगलं आहे! इतकंच लिहू शकतो! ("आवडलं!!" असं लिहिलं तर लगेच पोरं, "काय काका? शोभतं का!" आसं आचरटपणे विचारणार!!) :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा