गुलजार नार ही ... (भाग २)
गुलजार नार ही ... (भाग १)
'तू खूप कामात नसशील तर मला घरापर्यंत सोडशील ? अरे पटकन मदतीला येईल असे आता घरी कोणीच नाहीये...' मंदाकिनीने विचारले आणि आम्ही एकदम आकाशात विहार करायला लागलो. लगेचच रिक्षा बोलावून आम्ही तिचे सामान आत भरले, तोवर थोडीशी लंगडत ती देखील आत येऊन बसली. शक्यतो मध्ये सुरक्षित अंतर ठेवून आणि नाना कल्पना रंगवत मी तिच्या शेजारी बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला....
-------------------------------------
सामानाची एक बॅग मध्ये आणि एक बॅग पायापाशी ठेवून आमचा प्रवास सुरू होता. थोड्यावेळाने मंदाकिनीने मधली सामानाची बॅग उचलून ती देखील खाली ठेवली आणि जरा आरामात बसली. मी आपला भीत भीत एक कोपरा पकडून बसलो होतो. मंदाकिनी माझ्याकडे वळून काहीतरी विचारायला लागली जे मला त्या डबड्या रिक्षाच्या खडखडाट पटकन ऐकता देखील येईना. नाईलाजाने मी थोडा जवळ सरकलो आणि आमचे संभाषण सुरू झाले. काही वेळापूर्वीच मी तिच्याशी बोललो होतो, पण तेव्हाचा प्रसंग वेगळा होता आणि आजूबाजूला बरेच लोक देखील होते. आता मात्र आम्ही दोघेच, आणि ते ही इतक्या जवळ बसलेलो होतो. माझ्या छातीत विनाकारण धडधड वाढत होती. 'साल्या तुझ्या डोळ्यातून नुसती वासना बदबदा सांडत असते' असे मित्रांना ऐकवलेले बोल आठवून आता ते मलाच स्वतःला लागू होतात का काय याची भिती वाटत होती आणि माझी नजर उगाचच चोरली जात होती.
ती नक्की काय विचारत होती आणि मी काय सांगत होतो ते देवालाच माहिती. माझी अवस्था मात्र बिकट व्हायला लागली होती. नजर फिरून फिरून पुन्हा मंदाकिनी वरतीच आदळत होती. बोलताना तिच्या गुलाबी ओठांची हालचाल, एका संथ लयीत हालणारा तो कंठमणी, पापण्यांची नाजूक फडफड, स्लिव्हलेस मधून दिसणारे दंड आणि कडेला बसलेलो असल्याने तिच्या पोटाचा दिसणार काही भाग .... अक्षरशः घशाला कोरड पडायला सुरुवात झाली होती. एवढ्यात रिक्षा दाण्णकन एका खड्ड्यातून गेली आणि मंदाकिनी माझ्या दिशेने सरकली. तिला सावरायच्या प्रयत्नात मी पटकन एका हाताने तिच्या खांद्याला आधार दिला आणि एक हात तिच्या कमरेवरती पडला. पटकन मी स्वतःला सावरले आणि हात बाजूला घेऊन सॉरी म्हणून टाकले. मंदाकिनी मात्र 'अरे त्यात काय..' असे म्हणून मधाळ हसली. अर्थात पुन्हा एकदा माझ्या हालचालीत आणि बोलण्यात चोरटेपणा आला, राहून राहून तिचा झालेला स्पर्श आणि तिच्या सेंटचा वास मनात दरवळत होता. मंदाकिनी मात्र अगदी मोकळ्या ढाकळ्या गप्पा मारायच्या मूड मध्ये दिसत होती. शेवटी एकदाचे मंदाकिनीचे घर आले आणि मला हुश्श झाले.
'एक पाच मिनिटं थांबा, मी मॅडमला सोडून आलोच. रिटर्न जायचे आहे.' मी रिक्षावाल्याला 'आदेश' दिला.
"अरे ? तू थांबणार नाहीयेस ? येवढी मदत केलीस आणि घर न बघताच, काही न घेताच जाणार ? ते काय चालायचे नाही, आणि तुला हे सामान पण वरती न्यायचे आहे.' मंदाकिनी डोळे मिचकावत म्हणाली आणि पैसे द्यायला तिने पर्स देखील उघडली. शेवटी मग मीच माघार घेत रिक्षावाल्याचे पैसे दिले आणि सामानाला हात घातला. किंचितशी लंगडत मंदाकिनी आणि तिच्यामागे दोन पिशव्या घेऊन मी अशी वरात लिफ्टच्या दिशेने निघाली. लिफ्टपाशी पोचलो तर पहिल्या मजल्यावरती कोणा महाभागाने लिफ्टचे दार अर्धवट उघडे ठेवले होते आणि लिफ्ट तार स्वरात किंचाळत होती. मंदाकिनीच्या चेहर्यावर आता 'हे काय नवीन संकट' टाईप भाव उमटले होते. शेवटी मीच तिला तिथल्या पायरीवरती बसवले आणि पहिल्या मजल्यावरून लिफ्ट खाली आणण्यासाठी वर गेलो. लिफ्ट मात्र दरवाजे घट्ट लावूनही खाली जायचे नाव घेईना. एक प्रयत्न म्हणून दुसर्या मजल्याचे बटण दाबले, तर सटवी वर जायला लगेच तयार. डोक्याला हात लावला आणि पुन्हा पहिल्या मजल्यावरती आलो. खालती येऊन मंदाकिनीला प्रॉब्लेम सांगितला. शेवटी मंदाच्याच आग्रहावरून माझ्या खांद्याचा आधार देत तिला पहिल्या मजल्यापर्यंत घेऊन आलो. येवढ्यातल्या येवढ्यात हा तिचा मला दुसर्यांदा स्पर्श होता, आणि तो देखील इतक्या जवळून. मंदाकिनी अगदी निवांतपणे एक हात माझ्या खांद्यावर आणि एक हाताने कठड्याचा आधार घेत वर चढत होती आणि इकडे आमची धडधड देखील वार चढत होती. डाव्या खांद्यावरती हात टाकून मंदा वर चढत होती आणि आता त्या डाव्या हाताने नक्की काय करावे हे मला सुचत नव्हते. शेवटी काय होईल ते होईल, आर या पार असे धाडस करायचे ठरवून मी डाव्या हाताने मंदाच्या कमरेला विळखा घालत तिला आधार दिला. मी आधार दिल्या दिल्या मंदाकिनी झटकन थांबली आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. तसेही तिचा हात खांद्यावरच होता आणि खांद्यापासून गाल काय फार लांब नव्हता. मंदाकिनीने एकदम एकटक माझ्या डोळ्यात बघितले.. खुदकन गालात हसली आणि पुन्हा जिने चढायला लागली. आमचा चिमणी येवढा झालेला जीव भांड्यात पडला.
लिफ्टमधून मंदाच्या फ्लॅटपर्यंत पोचलो. अजूनही मंदाचा हात माझ्या खांद्यावरून तिने काढून घेतला नव्हता आणि त्यामुळे माझ्या मनाला उगाचच गुदगुल्या होत होत्या. मंदाच्या फ्लॅट छोटाच होता पण छान होता.
"अरे, सध्या मी एकटीच आहे, त्यामुळे पसाराच पसारा झालाय. हसू नकोस आमच्या फ्लॅटला."
"नाही हो मॅडम. उलट छान सजवला आहेत तुम्ही फ्लॅट. एकदम सुरेख दिसतोय, अगदी.." मी पटकन जीभ चावली.
"बोल बोल लाजू नकोस. आता काय वर्ग चालू नाही आणि तू सध्या माझ्या विद्यार्थी देखील नाहीस. मित्र म्हणून अगदी मनापासून बोल."
"नाही, म्हणजे मी म्हणत होतो की.. फ्लॅट खरंच सुरेख दिसतोय, अगदी... अगदी तुमच्यासारखा." ह्या वाक्यावर मंदाकिनी अगदी 'घायाळ' वगैरे करतात त्या टायपात हसली आणि आम्ही दाणकन कोचावरतीच बसून घेतले.
"तू बस, मी आलेच सरबत घेऊन."
"अहो नको, कशाला उगीच ? आधीच तुमचा पाय दुखतो आहे, त्यात येवढा त्रास कशाला? उलट तुम्ही बसा मीच मस्त पाणी घेऊन येतो फ्रीज मधून."
मंदाकिनीला तिथेच बसवून मी तिच्या किचन मध्ये शिरलो. सगळी मांडामांड अगदी जबरदस्त दिसत होती. फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली, ग्लास आणि बर्फ घेऊन मी बाहेर हजर झालो.
"घ्या हा बर्फ फिरवा पायावरून, लगेच आराम पडेल."
मंदाकिनी अगदी कौतुकाने माझ्याकडे बघायला लागली. तिच्यासमोरच बसून मी गार पाण्याचे घोट रिचवायला लागलो. घशाला मरणाची कोरड पडलीच होती म्हणा. पावलावरून बर्फ फिरवता फिरवता मंदाकिनी अचानक मला म्हणाली "काय रे मला मंदाकिनी म्हणता, तसे इतरांना काय काय म्हणता?"
'ढिश्क्याँव...' एकदम गोळी थेट झाडली गेली आणि नाका तोंडात पाणी जाऊन आमची ठसकुन मरायची अवस्था झाली. मंदाकिनी माझ्याशेजारी येऊन बसली आणि पाठीवरून हात फिरवायला लागली. "अरे सावकाश. येवढे काय झाले दचकायला? शेवटी तुमचे गुरु आहोत आम्ही, आम्हाला काय सगळे समजत नाही असे वाटते का काय तुम्हाला?"
मी आपले कसनुसे हसून मंदाकिनीकडे बघत राहिलो. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. पाठीवरती हात फिरवता फिरवता मंदाकिनी माझ्यावरती बरीच रेलली होती. तिचा पाठीवरून फिरणारा हात काही वेगळेच सुचवू पाहतं होता, मी मात्र त्याचा अर्थ लावायला धजत नव्हतो. तो स्पर्श आपल्याला वाटतो तसा नाहीये, हे असले विचार म्हणजे आपल्या अश्लील मनाचे चाळे आहेत हेच राहून राहून वाटत होते. मंदाकिनीचा हात आता हळूहळू पाठीबरोबरच माझ्या खांद्यावरून देखील फिरायला लागला होता. ह्या गडबडीत मंदाचा पदर बराच एका बाजूला सरकला होता आणि त्यामुळे दिसणारा नजारा माझ्या छातीचे ठोके आणि ठसक्याचे प्रमाण अजून वाढवत होता. च्यायला ! हिच्या घरात मी अती वेगाने पडलेल्या हृदयाच्या ठोक्यांनी मृत्यू पावणार बहुदा अशी माझी खात्रीच होत चालली होती.
मंदाकिनीच्या चेहर्यावर आता एक प्रकारची गुलाबी छटा आली होती, तिचा श्वासोच्छ्वास देखील चांगलाच जोर पकडायला लागला होता. तिच्या उष्ण श्वासाला मी माझ्या गालावरती सहजपणे जाणवू शकत होतो. आता काहीतरी करायलाच हवे होते, पण मगाशी जिन्यात केलेले धाडस पुन्हा माझ्याकडून घडू शकेल का नाही ह्याची मलाच खात्री होत नव्हती. आजपावेतो वाचलेली सगळी 'ज्ञानवर्धक' पुस्तके, पारायण केलेले सिनेमे.. कशा कशा ज्ञानाचा काही उपयोग होईना, पुढे काय करावे हेच सुचेना. शेवटी धाडस करत मी माझ्या डाव्या हाताने मंदाच्या कानावरती आलेली बट थरथरत्या बोटांनी मागे सारली, आणि तसाच हात तिच्या केसांवरून फिरवत गालावरती आणला. हे सगळे करत असताना छाती फाडून आता आतले घड्याळ बाहेर येणार असे वाटायला लागले होते, पाय देखील कापत होते. माझी बोटे मंदाच्या गालावरती फिरायला लागली आणि मंदाकिनीने एकदम मोठा श्वास घेऊन आपले डोळे गच्च बंद करून घेतले. माझा हात तिच्या गालावरून नुसताच फिरत होता, येवढी मजल तर मारली पण आता पुढे काय करावे तेच सुचेना झाले होते. त्या गुलाबी गालावरून हात फिरवत फिरवत माझी बोटे आता मी तिच्या मऊशार ओठांवरती आणली.. सायी सारख्या नाजूक ओठांवरून बोटे फिरवताना एक वेगळेच स्पर्शसुख मिळत होते. मंदाकिनीने अचानक आपले डोळे उघडले.. मी घाबरून माझा हात चटकन मागे घेतला, पण आता मंदाकिनी थांबायला तयार नव्हती. तिने सरळ माझ्या अंगावरच स्वतःला झोकून दिले आणि मला घट्ट मिठीत घेतले. तिच्या गुलाबी ओठांनी माझ्या ओठांचा ताबा घेतला आणि .....
(क्रमशः)
Book traversal links for गुलजार नार ही ... (भाग २)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अर्धवटराव, बि.का., म.क., स्मीता
हॅ हॅ हॅ श्रामो
आठवण
अगं बै!! काय हा चावटपणा!!
नै तर काय! आणि तेहि
नै तर काय! आणि तेहि
स्वप्नरंजन ? अवांतरः वाचताना
अजिबात विश्वास बसत नाही रे
विनंती वजा सुचना,
(ताणलेल्या रबरा सारखी अवस्था झालेला)...
जबरा
दुरूस्ती
नांवच बदलायचं तर...
त्याला "परिकथेतील दाऊद" नांव
बुवा,
राजकुमारजी- लै टायम नका घेउ.
खुदकन गालात हसली आणि पुन्हा
हैय्यो...
स्त्रियाही गैरफायदा घेतात :)
आयच्या गावात.... अरे काय रे
एवढंच...
ओ श्रामो
आजकाल
हं
सूत्र
तर
सूत्र
ओ श्रामो, का प-याच्या
दुहेरी
प्रॉब्लेम हो!
मेलो...