मीही कवि होणार!
अलिकडे 'आव आव, झटपट कवि बन जाव' असली काही मोहीम चालू असलेली दिसते. इथं असं नव्हे एकूणच सगळीकडे. तेंव्हा म्हटलं त्याच भूमिकेत शिरून त्याच भूमिकेचा जरा समाचार घ्यावा! बर्याच दिवसापासून वाटतोय तिटकारा उठसूट प्रसवणार्या काव्यमक्षिकांचा. पण आज 'प्रेयसी'मुळे कहर झाला!
होणार, मीही कवि होणार,
छंद नको मज, नकोत वृत्ते
अलंकारही नकोत भलते
गद्यामध्ये 'एण्टर' पेरुनि
मुक्तछंद लिहिणार.. मीही कवि होणार!
यमक तेवढे ठाऊक मजला
तितके पुरते कवी व्हायला
अंत्यपदे जुळवुनी, बाकिचा
कचरा मी भरणार.. मीही कवि होणार
कविता म्हणजे हवीच प्रीती
द्विपुएव सर्वनाम चित्ती
विशेषणांच्या खिरापतीने
तुझे पोट भरणार.. मीही कवि होणार!
हात घेतला जेव्हा हाती,
पाऊस पडता ओली माती
हाती माती साथी घेउनि
काव्यशिल्प घडणार, मीही कवि होणार!
प्रेमासह जर निसर्ग असला
डब्बल ज्याक्पॉट नक्कि लागला
रूपक नि चेतनागुणोक्ति
बोनसमधि मिळणार.. मीही कवि होणार!
रोज एक या फ्रीक्वेन्सीने
कविता पाडीन जलदगतीने
प्रतिसादाच्या शून्या पाहून
नाही डगमगणार.. मीही कवि होणार!
कविता माझ्या नसतील भारी
लोकांना ना आवडल्या तरी
विडंबकांना मुबलक कच्चा
माल मी पुरवीणार.. मीही कवि होणार!
चर्चा व्हावी अशी आशाअपेक्षा आहे! ;)
=)) =))
खी खी खीभारी, खरच भारी
हॅ हॅ हॅ!!
हाण्ण , हाण्ण लेका !
अहो, नवकवींना-लेखकांना
कधी कधी सिध्या साध्या
LOL!
=)) =)) =)) =))=)) =))=))
ह्हा ह्हा ह्हा ह्हा बापरे
अरे चावट माणसा....... =)) =))
मेवे,
भयानक सुन्दर पडलीये हि
झक्कास. आवडली.
झक्कास. आवडली.
हा हा हा .. लैच भारी कविता
हाहा
काय हे मेवे, पार टांगा पल्टी
धन्यवाद!
काही अंशी सहमत
लिहावंच.
आहे ना.
नमस्कार,विश्लेशण बरचस
सहमतच !!
>>> च्यायला, एक काळ होता
जरा शांतपणे घ्या
:)
छान -
बर्याच कवितांच पीक आलेल दिसत
ह्या धाग्यातला मजकूर पुन्हा
येस.
धन्स अ लॉट माऊ !!
आवडली
आवडली
आवडली
O M G