✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लग्न पाहावे करून.

व
विवेकखोत यांनी
Wed, 11/30/2011 - 10:24  ·  लेख
लेख
मला तशी लिहियाची सवय नाही पण गेल्या सहा महिन्यात तिने (म्हणजे माझी वाग्दत्त वधू) सवय लावली मला असे वाटे कि या लिखाणाला अजून थोडी पोलीशिंग ची गरज आहे. बघू कसे जमते ते. आता नियमित ब्लोग लिहिण्याची सवय लावणार आहे.(काही चुकले तर माफी असावी ) जुने लोक म्हणतात ते काही खोटे नाही, आता मझे लग्न महिन्यावर आले , घरामध्ये नुसता गोंधळ हे आन ते आन , खरेदी, पत्रिका नि अजून काय काय , पण खरेच खूप चं अनुभूती आहे. लग्न मधली धमाल काही ओरच पण लग्न म्हणजे एक जबाबदारी हे मला कळले अचानक ४-५ वर्षाने मोठे झाल्या सारखे वाटते आहे. पण ते सुद्धा आवश्यक आहे ते मला पटते कारण एक stability येते माणसाच्या आयुष्यात, खूप सुखकारक बदल घडून येतात आता हेच पहा न मी आता पर्यंतच्या आयुष्यात जेवढे apple खाल्ले नाहीत तेवढे या ६ महिन्यात (म्हनजे लग्न ठरल्या पासून )खाली आहेत. मला सुद्धा माझ्या मध्ये फरक जाणवत आहे. प्रेमाचे नाते पण खूप हळुवार फुलत जाते. पण असो खूप छान अनुभव आहे . तसे आमच्या जॉब प्रोफेशन मध्ये जमीन अस्मान चे अंतर आहे, ती निसर्गात रमणारी तर मी eletronics gadgetsमध्ये रमणारा, ती प्राणी पक्षी आणि फुले या वर प्रेम करणारी आणि मी आपला computer आणि mobile सारख्या वस्तूमध्ये रमणारा, वाटले कसे जमावे आपले हा हा म्हणता कसे दिवस सरले काही कळले नाही. दोन्ही वेगळ्या प्रोफेशन मध्ये असल्या मुळे जॉब विषयी काही जास्त बोलणे होत नवते त्याचा आम्हाला फायदाच झाला कधीही गप्पा कंटाळवाण्या झाल्या नाहीत. engagement ते लग्न हा प्रवास खूप पटकन झाला. अजून लग्नाला मोजकेच दिवस बाकी आहेत. बघू कसे काय जमते ते
  • लग्न पाहवे करून पार्ट -२

Book traversal links for लग्न पाहावे करून.

  • लग्न पाहवे करून पार्ट -२ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
21348 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

http://www.youtube.com/watch?

किचेन
Wed, 11/30/2011 - 14:50 नवीन
http://www.youtube.com/watch?v=QKqRkc3sQ6c
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

अच्छा पुढल्या महिन्यात लग्न

सूड
Wed, 11/30/2011 - 13:44 नवीन
अच्छा पुढल्या महिन्यात लग्न आहे तुमचं तर !!
  • Log in or register to post comments

संपादक मंडळाने

कपिलमुनी
Wed, 11/30/2011 - 13:50 नवीन
मनोधैर्य वाढवावे ( लग्नासाठी नव्हे , लेख आणि प्रतिक्रियेसाठी ..नाहीतर नवलेखकाच्या भ्रुणहत्येच पाप लागायच )
  • Log in or register to post comments

+१सहमत! इथे येऊन एक आठवडाच

किचेन
Wed, 11/30/2011 - 14:48 नवीन
+१सहमत! इथे येऊन एक आठवडाच झालाय आणि काय काय कानावर पडतंय! विवेकराव मी पा वर स्वागत आहे! शुद्धलेखनाविषयी काही प्रश्न असतील तर कृपया मला विचारू नये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

नाही नाही यांनाच विचारा!!!

मोहनराव
Wed, 11/30/2011 - 16:14 नवीन
<<शुद्धलेखनाविषयी काही प्रश्न असतील तर कृपया मला विचारू नये!>> तुम्हालाच शुद्धलेखनाविषयी विचारलेले बरे...कारण तुमच्या प्रत्येक धाग्यावर खुप लोकांनी खुपदा सांगितले आहे व उशीर का होईना पण शुद्धलेखन सुधारले आहे... त्यामुळे आता दुसर्‍यांना सल्ले द्यायला मुभा आहे!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

आनंद गगनात मावेना! धन्यवाद!

किचेन
Wed, 11/30/2011 - 16:17 नवीन
आनंद गगनात मावेना! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

अळी

विनायक प्रभू
Wed, 11/30/2011 - 14:42 नवीन
तुम्हाला अ‍ॅपल मधे अळी मिळाली काहो?
  • Log in or register to post comments

हा हा हा

jaypal
Wed, 11/30/2011 - 14:57 नवीन
लेख भारी आणि प्रतिसादांनी तर लग्ना आधीच बार उडवलाय "पुढिल" वाटचालिस शुभेच्छा ;-) Image removed.
  • Log in or register to post comments

जयपाल

किसन शिंदे
Wed, 11/30/2011 - 15:00 नवीन
या लेखासाठी अतिशय समर्पक कार्टून शोधून काढलंत.. :bigsmile: _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

आता तुमच्या दोघांच्या नवीन

किचेन
Wed, 11/30/2011 - 15:03 नवीन
आता तुमच्या दोघांच्या नवीन आयुष्य सुखाचे जावो.तुम्ही दोघाही आयुष्यभर एकमेकांना समजून घ्याल आणि एकमेकांची काळजी घ्याल अशी अपेक्षा करते.या पुढे तुमचा आयुष्य सुखाच समृद्धीचा असो अशी अपेक्षा करते. लग्न झाल्यावर थोड्या फार प्रमाणात कुरबुरी होणारच.पण त्या तिथल्या तिथेच सोडून द्यायच्या.भांडायचं पण ती भांडण ताणून धरायचं नाही.तिथल्या तीथे सोडून द्यायचा.मुलींचा स्वभाव मुळातच हळवा असतो.काहीही झाल तरी लगेच रडायला लागतात.तिच्या डोळ्यातून आपल्यामुळे पाणी येणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची. नांदा सौख्य भरे!
  • Log in or register to post comments

मुलींचा स्वभाव मुळातच हळवा

विजुभाऊ
Wed, 11/30/2011 - 16:05 नवीन
मुलींचा स्वभाव मुळातच हळवा असतो.काहीही झाल तरी लगेच रडायला लागतात.तिच्या डोळ्यातून आपल्यामुळे पाणी येणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची. या वर कोणताही अनुभवी शहाणा माणुस विश्वास ठेवणार नाही. ठेवु नये. एकवेळ नायगार्‍याच्या धारेला लागलेला माणूस पोहुन बाहेर निघु शकेल पण डोळ्यातुन आलेल्या पाण्याच्या धारेत वाहुन गेलेला पोहुच शकत नाही. तुम्ही त्य अधारेत वहात जात ही मेख एकदा कळाली की संपले. असो. अर्थात ही ठेच ज्याची त्यानेच लावुन घ्यायची असते. बाबा बुलेशा म्हणुन गेलाय आग और इश्क बराबर दोनो पर पानी आग बुझाये... आशीक के जब आसू निकले और अगन लग जाये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

अस काय करता?माझ वधू वर सूचक

किचेन
Wed, 11/30/2011 - 16:20 नवीन
अस काय करता?माझ वधू वर सूचक केंद्र आहे कि नै! माझे वरील प्रतिसाद बघून कोण म्हणेल का तसं? म्हणून मी टिपिकल प्रतिसाद दिला! जणू माझ्याकडूनच लग्न ठरलंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

एकवेळ नायगार्‍याच्या धारेला

गणपा
Wed, 11/30/2011 - 16:30 नवीन
एकवेळ नायगार्‍याच्या धारेला लागलेला माणूस पोहुन बाहेर निघु शकेल पण डोळ्यातुन आलेल्या पाण्याच्या धारेत वाहुन गेलेला पोहुच शकत नाही. तुम्ही त्य अधारेत वहात जात ही मेख एकदा कळाली की संपले.
स्वाणूभव.. स्वाणूभव.. म्हणतात हो हाच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

धन्यवाद

विवेकखोत
Wed, 11/30/2011 - 15:24 नवीन
माझ्या पहिल्या वहिल्या पोस्ट ला भर भरून प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद. माझ्या लिखाण मध्ये काही त्रुटी असतील तर क्षमा असावी. पण मी लिहिण्याचा एक प्रयत्न करत आहे. आपल्या दिलेल्या प्रतिक्रिया व सूचना मी लक्षात ठेवीन ...
  • Log in or register to post comments

खोतसाहेब..

गवि
Wed, 11/30/2011 - 15:34 नवीन
खोतसाहेब.. तुमच्या लग्नाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा.. पहिलं लिखाण आहेत म्हणालात त्यामुळे लिहावंसं वाटलं. इथे आम्ही चालवलेल्या थट्टामस्करीमुळे काहीतरी भलताच गैरसमज करून घेऊ नका.. इथे असेच वाईट मनावर कोवळे संस्कार करणारे प्रतिसाद नेहमीच येतच असतातच.. विशेषतः लग्न, हनिमून, थंडी, कांदा, मटण वगैरे विषय निघाले की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकखोत

मनावर कोवळे संस्कार करणारे

किचेन
Wed, 11/30/2011 - 15:45 नवीन
मनावर कोवळे संस्कार करणारे प्रतिसाद वरील पैकी एका तरी प्रतिक्रियेत संस्कार आहेत का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हे राम..

गवि
Wed, 11/30/2011 - 15:46 नवीन
हे राम..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

विनंती

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/30/2011 - 15:49 नवीन
ह्या वर्षाअखेर संपन्न होणार्‍या 'मिपारत्न' सोहळ्यात, श्री. गवि ह्यांना 'प्रोत्साहनकार' पुरस्काराने सन्मानीत करावे असा ठराव मी मांडत आहे. टूकाररत्न परा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

संस्कार आहे

सर्वसाक्षी
Wed, 11/30/2011 - 16:03 नवीन
हे राम! हा तर अंत्यसंस्कार आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मोठे व्हा किचेन

मोहनराव
Wed, 11/30/2011 - 15:51 नवीन
मोठे व्हा किचेन ताई/माई/आक्का!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

अहो काय हे किचेनतै.

रेवती
Wed, 11/30/2011 - 21:11 नवीन
अहो काय हे किचेनतै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

इथे असेच वाईट मनावर कोवळे

विजुभाऊ
Wed, 11/30/2011 - 17:06 नवीन
इथे असेच वाईट मनावर कोवळे संस्कार करणारे प्रतिसाद नेहमीच येतच असतातच.. विशेषतः लग्न, हनिमून, थंडी, कांदा, मटण वगैरे विषय निघाले की. अरे दारु राहिली की.....ल्ह्ययची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अरे दारु राहिली की.

चिंतामणी
गुरुवार, 12/01/2011 - 00:26 नवीन
ते बरोबर आहे हो विजुभौ. पण अजून एक गोष्ट राहीली ना. इथे असेच वाईट मनावर कोवळे संस्कार करणारे प्रतिसाद नेहमीच येतच असतातच.. विशेषतः लग्न, हनिमून, थंडी, कांदा, मटण,दारु, चांदीचा पेला वगैरे विषय निघाले की. :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ब्लॉग

तिमा
Wed, 11/30/2011 - 16:23 नवीन
खोतसाहेब, तुम्हाला इथे काहीही लिहायला हरकत नाही. फक्त हा ब्लॉग नाही एवढे ध्यानात ठेवावे. पाहिजे तर एक वेगळा ब्लॉग उघडून त्याच्या लिंका इथे द्याव्या. 'लग्नानंतरचे अनुभव' यावरही क्रमशः लिहायला हरकत नाही. आत्ताच एवढ्या प्रतिक्रिया आल्यात. तेंव्हा तर किती येतील याची कल्पना करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकखोत

>>आत्ताच एवढ्या प्रतिक्रिया

अन्या दातार
Wed, 11/30/2011 - 16:32 नवीन
>>आत्ताच एवढ्या प्रतिक्रिया आल्यात. तेंव्हा तर किती येतील याची कल्पना करा. नशीब, फक्त कल्पनाच करा असे म्हणला नाहीत ते! आणि एवढ्या प्रतिक्रिया आल्या म्हणजे सध्या सगळे चांदीच्या पेल्यातून पाणी पीताहेत ना. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

नमस्कार

विवेकखोत
Wed, 11/30/2011 - 16:38 नवीन
काय saheb अशी थट्टा मस्करी कराल पुढे लिहिण्याची हिम्मत नाही होणार , खरे तर तुमी जुन्या blogger लोकांनी प्रोत्साहन द्यायला हवे तुमी तर आमचीच वात लावताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

सचित्र..

प्रभाकर पेठकर
Wed, 11/30/2011 - 18:57 नवीन
'लग्नानंतरचे अनुभव' यावरही क्रमशः लिहायला हरकत नाही. लेख सचित्र असावेत, अशी नम्र विनंती. >>>>आमचीच वात लावताय. हां तेवढी 'वात' बाकी सांभाळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

बाबौ.... काकांचा आयडी हॅक तर

गणपा
Wed, 11/30/2011 - 19:50 नवीन
बाबौ.... काकांचा आयडी हॅक तर नाही ना झाला? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

काय हे??

मी-सौरभ
गुरुवार, 12/01/2011 - 00:05 नवीन
ह्या सगळ्याला प्रभूमास्तरच जबाबदार आहेत..... त्या ५५+ मुळे काय काय होतय बघा म्हणावं >>हां तेवढी 'वात' बाकी सांभाळा. आणि वाट पण चूकू नका बरं का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

लग्नाच्या हार्दिक शुभेछा

परीनिता
Wed, 11/30/2011 - 16:31 नवीन
लग्नाच्या हार्दिक शुभेछा
  • Log in or register to post comments

वाचक

गौरी१२
Wed, 11/30/2011 - 17:50 नवीन
विवेक भाऊ ... तुम्ही फलंदाजी नका करू गोलंदाजी करा. अशी विकेट द्यायची नाही तर घ्यायची ..... म्हणजे अहो लेखक नाही वाचक व्हा ...आणि विकेट काढा. ;) :) .......... मी एक वाचक !!! :)
  • Log in or register to post comments

वाचक

गौरी१२
Wed, 11/30/2011 - 17:51 नवीन
विवेक भाऊ ... तुम्ही फलंदाजी नका करू गोलंदाजी करा. अशी विकेट द्यायची नाही तर घ्यायची ..... म्हणजे अहो लेखक नाही वाचक व्हा ...आणि विकेट काढा. ;) :) .......... मी एक वाचक !!! :)
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

अन्या दातार
Wed, 11/30/2011 - 17:56 नवीन
वाचक होऊन विकेट कश्या काढतात ब्वा? विकेट काढायला निदान प्रतिसाद तरी टंकावे लागतातच. आणि जर सगळेच विकेटा काढायला बसले तर विकेट घ्यायच्या कुणाच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरी१२

काहिही न लिहिता विकेटी कशा

विजुभाऊ
Wed, 11/30/2011 - 18:04 नवीन
काहिही न लिहिता विकेटी कशा काढायच्या याचे क्लासेस घ्यायला भडकमकर मास्तराना सांगायला हवे
  • Log in or register to post comments

एक सुचना-कांदा वगैरे तत्सम

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/30/2011 - 18:28 नवीन
एक सुचना-कांदा वगैरे तत्सम बाबींबरोबर पान खात नसलात/असलात तरी नुसता वडीकाताचा तुकडा अधुन मधुन चघळत रहा... प्रत्येक ओव्हरला एक सिक्सर हमखास बसेल. ;-) बयकांच्या द्रुष्टिकोनातुन नवरा म्हणजे= लग्नापूर्वी नाथ,लग्न झाल्यावर प्राणनाथ,आणी पोर झालं की अनाथ :-D
  • Log in or register to post comments

_/\_

मी-सौरभ
गुरुवार, 12/01/2011 - 00:07 नवीन
आमचा साष्टांग नोंदवून घ्या हो बुवा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आमचा साष्टांग नोंदवून घ्या हो

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/01/2011 - 16:37 नवीन
आमचा साष्टांग नोंदवून घ्या हो बुवा.... >>> घेतला बुवा.___ -----^----- ___ :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

अजून लग्नाला मोजकेच दिवस बाकी

रेवती
Wed, 11/30/2011 - 21:16 नवीन
अजून लग्नाला मोजकेच दिवस बाकी आहेत. बघू कसे काय जमते ते बापरे हसून पुरेवाट झाली किंवा वाट लागली काहीही म्हणा. तुम्हाला लग्नासाठी शुभेच्छा. आम्ही लेखी शुभेच्छा देवू शकतो. विनायक प्रभूंकडे गेलात तर शाब्दिक शुभेच्छा मिळतील, शिवाय चांदीचा पेला फ्री, फ्री, फ्री! मिपावर जर तुमचा पहिलाच धागा असेल तर स्वागत दणक्यात झाले म्हणायचे.
  • Log in or register to post comments

एपलमधे लोह असते ना

आशु जोग
Wed, 11/30/2011 - 23:38 नवीन
एपलमधे लोह असते ना
  • Log in or register to post comments

आत्ता कळाले की ईव्ह ने अ‍ॅपल

विजुभाऊ
गुरुवार, 12/01/2011 - 14:43 नवीन
आत्ता कळाले की ईव्ह ने अ‍ॅपल का खाल्ले होते. सालं बाबा अ‍ॅडमच्या जमान्यापासून हे चालत आलय
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा