✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लग्न पाहावे करून.

व
विवेकखोत यांनी
Wed, 11/30/2011 - 10:24  ·  लेख
लेख
मला तशी लिहियाची सवय नाही पण गेल्या सहा महिन्यात तिने (म्हणजे माझी वाग्दत्त वधू) सवय लावली मला असे वाटे कि या लिखाणाला अजून थोडी पोलीशिंग ची गरज आहे. बघू कसे जमते ते. आता नियमित ब्लोग लिहिण्याची सवय लावणार आहे.(काही चुकले तर माफी असावी ) जुने लोक म्हणतात ते काही खोटे नाही, आता मझे लग्न महिन्यावर आले , घरामध्ये नुसता गोंधळ हे आन ते आन , खरेदी, पत्रिका नि अजून काय काय , पण खरेच खूप चं अनुभूती आहे. लग्न मधली धमाल काही ओरच पण लग्न म्हणजे एक जबाबदारी हे मला कळले अचानक ४-५ वर्षाने मोठे झाल्या सारखे वाटते आहे. पण ते सुद्धा आवश्यक आहे ते मला पटते कारण एक stability येते माणसाच्या आयुष्यात, खूप सुखकारक बदल घडून येतात आता हेच पहा न मी आता पर्यंतच्या आयुष्यात जेवढे apple खाल्ले नाहीत तेवढे या ६ महिन्यात (म्हनजे लग्न ठरल्या पासून )खाली आहेत. मला सुद्धा माझ्या मध्ये फरक जाणवत आहे. प्रेमाचे नाते पण खूप हळुवार फुलत जाते. पण असो खूप छान अनुभव आहे . तसे आमच्या जॉब प्रोफेशन मध्ये जमीन अस्मान चे अंतर आहे, ती निसर्गात रमणारी तर मी eletronics gadgetsमध्ये रमणारा, ती प्राणी पक्षी आणि फुले या वर प्रेम करणारी आणि मी आपला computer आणि mobile सारख्या वस्तूमध्ये रमणारा, वाटले कसे जमावे आपले हा हा म्हणता कसे दिवस सरले काही कळले नाही. दोन्ही वेगळ्या प्रोफेशन मध्ये असल्या मुळे जॉब विषयी काही जास्त बोलणे होत नवते त्याचा आम्हाला फायदाच झाला कधीही गप्पा कंटाळवाण्या झाल्या नाहीत. engagement ते लग्न हा प्रवास खूप पटकन झाला. अजून लग्नाला मोजकेच दिवस बाकी आहेत. बघू कसे काय जमते ते
  • लग्न पाहवे करून पार्ट -२

Book traversal links for लग्न पाहावे करून.

  • लग्न पाहवे करून पार्ट -२ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
21348 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

मी आता पर्यंतच्या आयुष्यात

प्रचेतस
Wed, 11/30/2011 - 10:26 नवीन
मी आता पर्यंतच्या आयुष्यात जेवढे apple खाल्ले नाहीत तेवढे या ६ महिन्यात (म्हनजे लग्न ठरल्या पासून )खाली आहेत
अ‍ॅपल कशाला खाताय, कांदे खा आता.
  • Log in or register to post comments

_/\_

सुहास झेले
Wed, 11/30/2011 - 10:30 नवीन
:D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लग्न पाहावे करून.

विवेकखोत
Wed, 11/30/2011 - 11:34 नवीन
का मस्करी करताय अहो हे सगळे तुमच्या आयुष्यात सुधा घडेल व घडणार असेल अहो बायको जे म्हणेल ते कराव लागते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बायको तुम्हाला अ‍ॅपल खा

स्पंदना
Wed, 11/30/2011 - 11:51 नवीन
बायको तुम्हाला अ‍ॅपल खा म्हणतेय अन तुम्ही अ‍ॅपल 'खाली ' ??? कलयुग कलयुग !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकखोत

खीक

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/30/2011 - 11:57 नवीन
अ‍ॅपल कशाला खाताय, कांदे खा आता.
रात्री चांदीच्या ग्लासातून कांद्याचा रस घेतलात तर अतीउत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पराशेट..पराशेट.. थांबा.. आधी

गवि
Wed, 11/30/2011 - 12:02 नवीन
पराशेट..पराशेट.. थांबा.. आधी त्यांना अंदाज घेऊ द्या. तुम्ही एकदम फारच जालीम उपाय सांगता बुवा. सफरचंदाने भागत असेल तर कांदा अन सोनाचांदीभस्म कशाला उगाच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तसे नाही हो

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/30/2011 - 12:08 नवीन
पराशेट..पराशेट.. थांबा.. आधी त्यांना अंदाज घेऊ द्या. तुम्ही एकदम फारच जालीम उपाय सांगता बुवा. सफरचंदाने भागत असेल तर कांदा अन सोनाचांदीभस्म कशाला उगाच?
आधीच आपण तयारीत असलेले बरे. उद्या गुढघेदुखीचा त्रास सुरू व्हायला नको. आधीच काळजी घेतलेली बरी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हो..न....!

प्रभाकर पेठकर
Wed, 11/30/2011 - 12:55 नवीन
तुम्ही एकदम फारच जालीम उपाय सांगता बुवा. सफरचंदाने भागत असेल तर कांदा अन सोना चांदी भस्म कशाला उगाच? नाहितर काय..! उगीच क्रॅश लँडींग व्हायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

एक तर्क

सर्वसाक्षी
Wed, 11/30/2011 - 13:13 नवीन
त्यांची पत्नि हिमाचली वा काश्मिरी असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

कशाव्रुन ?

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/30/2011 - 13:19 नवीन
त्यांची पत्नि हिमाचली वा काश्मिरी असावी.
ह्या तर्कामागचे तर्कीक जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

सफरचंद हे कारण असावे.

प्रचेतस
Wed, 11/30/2011 - 13:21 नवीन
सफरचंद हे कारण असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मग एखाद्या केसमधे कांदे खात

गवि
Wed, 11/30/2011 - 13:23 नवीन
मग एखाद्या केसमधे कांदे खात असतील तर वधू लासलगावची असेल म्हणावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सहमत

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/30/2011 - 13:28 नवीन
इन दॅट कॅस, बर्‍याच बायकांना स्मशान निवासी म्हणावे लागेल. कारण त्या नवर्‍याचे डोके खातात आणि रक्त पितात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सगळ्याच केसेस मध्ये बायका

किचेन
Wed, 11/30/2011 - 14:05 नवीन
सगळ्याच केसेस मध्ये बायका स्मशान निवासीच असतात. लहानपणापासूनच नवर्याचे डोक्याचा भेजा फ्रय कसा बनवावा ह्याची शिकवण त्यांना मिळालेली असते. जर नोन वेज खात असाल तर लोबस्तर ,कोलंबी बघा तरी करून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

लॉब्स्टर? कोळंबी?

गवि
Wed, 11/30/2011 - 14:11 नवीन
करेक्षन ... तुम्हाला ऑयस्टर म्हणायचं असावं.. ओव्हर अँड औट..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

ऑयस्टर मिळाला तर बाकी कसलीच

किचेन
Wed, 11/30/2011 - 14:21 नवीन
ऑयस्टर मिळाला तर बाकी कसलीच गरज लागणार नाही! पण सांभाळून खा. तो एकदम गिळायचा असतो म्हणे! चांदीच्या आणि कांद्याच्या मानाने परवडेबल आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

चांदीच्या आणि कांद्याच्या

गणपा
Wed, 11/30/2011 - 14:25 नवीन
चांदीच्या आणि कांद्याच्या मानाने परवडेबल आहे!
नक्की कुठे रहाता तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

मुद्दामच लिहील.इथे ओयास्तेर

किचेन
Wed, 11/30/2011 - 14:44 नवीन
मुद्दामच लिहील.इथे ओयास्तेर बघायला मिळत नाही आणि तुम्ही ओय्स्तेर कसा सुचवता? चांदीच्या पेल्यातल पाणी,दुध,बदाम,मंजुळा,भस्म, मटन इथ्पार्यांच ठीक आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

लग्नात उखाणा घ्यायला मदत

विजुभाऊ
Wed, 11/30/2011 - 14:51 नवीन
लग्नात उखाणा घ्यायला मदत चांदीच्या पेल्यात तुळशीच्या मंजुळा **** राव अंगात दम आहे तर थोडी ज्वारी दळा चांदीच्या पेल्यात तुळशीच्या मंजुळा *** रावांचे नाव घेता भरुन येतो गळा. चांदीच्या पेल्यात तुळशीच्या मंजुळा **** राव आले.*** पंत तुम्ही पळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

* राव आले.*** पंत तुम्ही

सूड
Wed, 11/30/2011 - 15:12 नवीन
* राव आले.*** पंत तुम्ही पळा हे लय भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

प्र का टा आ

सूड
Wed, 11/30/2011 - 14:30 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

सगळ्याच केसेस मध्ये बायका

पियुशा
Wed, 11/30/2011 - 15:13 नवीन
सगळ्याच केसेस मध्ये बायका स्मशान निवासीच असतात. लहानपणापासूनच नवर्याचे डोक्याचा भेजा फ्रय कसा बनवावा ह्याची शिकवण त्यांना मिळालेली असते. एक स्त्री असुन तु असा प्रतिसाद दिलास ;) निषेढ ;) (किचेन तै तु नक्की कीचेन तैच आहेस ? की कीचेन दादा ? ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

तैच अहे कि पियु! पन पण सत्य

किचेन
Wed, 11/30/2011 - 15:41 नवीन
तैच अहे कि पियु! पन पण सत्य ते सत्य असत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

चला ..एका तरी स्त्री ला

कपिलमुनी
Wed, 11/30/2011 - 15:55 नवीन
चला ..एका तरी स्त्री ला सत्याची जाणीव आहे म्हणायची .. (पाशवी शक्ती कुठे दिसत नहित आज काल, नहितर किचेन चे अवघड झाले असते )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

खूप सुखकारक बदल घडून येतात

मीनाक्षी देवरुखकर
Wed, 11/30/2011 - 10:29 नवीन
खूप सुखकारक बदल घडून येतात आता हेच पहा न मी आता पर्यंतच्या आयुष्यात जेवढे apple खाल्ले नाहीत तेवढे या ६ महिन्यात (म्हनजे लग्न ठरल्या पासून )खाली आहेत होणारि बाय्को डॉक्टर आहे काय? नाय सहज विचारल जुनी विन्ग्लीश म्हन आठवली
  • Log in or register to post comments

ओ बै

अन्या दातार
Wed, 11/30/2011 - 11:20 नवीन
काय्तर बओलून र्‍हाताल तुमी. सपर्चंद डागदरास दूर ठेवाया खात्याल. आता होणारी बाय्को डागदर आसंल तर कशापायी तिला दूर ठिवाचं? (अ‍ॅप्पल आणि डॉक्टर या दोघांना दूर ठेवायला बघणारा) अन्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनाक्षी देवरुखकर

हे मात्र बेस बोल्लात राव!!

मोहनराव
Wed, 11/30/2011 - 13:52 नवीन
हे मात्र बेस बोल्लात राव!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

ह ह पु वा

कपिलमुनी
Wed, 11/30/2011 - 11:14 नवीन
चांदीचा पेला आणि तुळशीच्या मंजुळा..... :D :D (अजुन काय काय वाचावे लागणार ) पु ले शु. आणि लग्नाला बोलवा बर का..( किचेन तै ना तरी नक्कि , त्या पेला भेट देतात )...
  • Log in or register to post comments

सुखी संसाराची सोपी वाटचाल!

किचेन
Wed, 11/30/2011 - 13:04 नवीन
हो आणि आता पराशेठ आणि कपिलमुनी(?), म्हणतायत तर आम्ही सगळे मिपाकर मिळून तुम्हाला चांदीचा पेला,कांद्याच पोत,बदामचा डबा,तुळशीच्या मंजुळा (आणखीन काही उरलाय का?) भेट देऊ! आणि वर जे सोन अनि चांदि लिहिलय तेहि देउ!फक्त सग्ळ्याचा उपयोग एक्दम करु नका! ;) सुखी संसाराची सोपी वाटचाल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

खूप सुखकारक बदल घडून येतात

किसन शिंदे
Wed, 11/30/2011 - 11:22 नवीन
खूप सुखकारक बदल घडून येतात आता हेच पहा एकदा लग्न आटपले कि कळेल लवकरच ;)
  • Log in or register to post comments

मग नंतर दु:खकारक बदलसुद्धा

मोहनराव
Wed, 11/30/2011 - 13:55 नवीन
मग नंतर दु:खकारक बदलसुद्धा लक्षात येतील!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

हा हा हा काय रे बाबा, धन्य

रेवती
Wed, 11/30/2011 - 21:06 नवीन
हा हा हा काय रे बाबा, धन्य आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

खरेच खूप चं अनुभूती आहेसहमत.

नगरीनिरंजन
Wed, 11/30/2011 - 11:29 नवीन
खरेच खूप चं अनुभूती आहे
सहमत. आमच्या लहानपणी तीर्थरूपांनी आमच्या कानाखाली जाळ काढल्यावर कानात असाच "चं" आवाज येत असायचा बराच वेळ. लग्न झाल्यावर जाळ न काढताही हा आवाज सतत ऐकू येतो हे तुम्हाला आधीच कसे कळले?
  • Log in or register to post comments

हो रे मित्रा... अतिशय सुखद

गवि
Wed, 11/30/2011 - 11:33 नवीन
हो रे मित्रा... अतिशय सुखद आहे ही आयुष्यातली घटना.. ..(का तोडा एखाद्याचे सुखस्वप्न आधीच?)
  • Log in or register to post comments

+ १ सहमत (++१ सहमत = कंसातील

शिल्पा नाईक
Wed, 11/30/2011 - 13:17 नवीन
+ १ सहमत (++१ सहमत = कंसातील वाक्य) थोड्या दिवसांत जमीनीवर येतात सगळेजण, ले़खक पण येतील. अन पुढे मुलं झाली की जमीनीत जावसं वाटू लागेल. :( तोवर घेउ देत त्यांना 'सुखद अनूभव' :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आजच सकाळी एक वन लाईनर

गवि
Wed, 11/30/2011 - 13:22 नवीन
आजच सकाळी एक वन लाईनर वाचली. पोर जन्मल्यावर पहिली दोन वर्षं त्याला पायावर उभं रहायला आणि बोलायला शिकवण्यात जातात आणि पुढची सोळा वर्षं त्याला "खाली बस" आणि "गप्प बस" म्हणण्यात खर्ची पडतात. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा नाईक

=))

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/30/2011 - 13:26 नवीन
पोर जन्मल्यावर पहिली दोन वर्षं त्याला पायावर उभं रहायला आणि बोलायला शिकवण्यात जातात आणि पुढची सोळा वर्षं त्याला "खाली बस" आणि "गप्प बस" म्हणण्यात खर्ची पडतात.
ह्या द्विअर्थी वाक्याचे गवि ह्यांनी रसग्रहण देखील टाकावे अशी विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

रसग्रहणाची आर्डर टंकनिकेला

गवि
Wed, 11/30/2011 - 13:33 नवीन
रसग्रहणाची आर्डर टंकनिकेला दिली आहे. थोड्या वेळात टंकेलसे वाटते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

++१ सहमत. पण ती पहिली २ वर्ष

शिल्पा नाईक
Wed, 11/30/2011 - 13:30 नवीन
++१ सहमत. पण ती पहिली २ वर्ष पण महाग पडतात हो. मला जुळी मुलं आहेत. सध्या २ वर्ष पुर्ण होताहेत. जन्माला येण्या आधी पासून वाईट अवस्था आहे माझी (ह. घ्या. ) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

रोज दैनंदीनी लिहीत चला :)

लीलाधर
Wed, 11/30/2011 - 11:41 नवीन
मला तशी लिहियाची सवय नाही पण गेल्या सहा महिन्यात तिने (म्हणजे माझी वाग्दत्त वधू) सवय लावली मला आत्तापासूनच होम मिनीस्टरच्या तालावर चालताय? नक्कीच तुम्ही होम मिनीस्टर मध्ये एस एम एस करा तुमचा नंबर लागेल. रोज दैनंदीनी लिहीत चला :)
  • Log in or register to post comments

बोले तो ऽ ऽ लाइफ मे सेटल होने

स्पंदना
Wed, 11/30/2011 - 11:48 नवीन
बोले तो ऽ ऽ लाइफ मे सेटल होने को मंगता है । हां ना? क्या बोलती तु ? वो विवेकखोत, वो अपना मिसळ्पाव वाला? वो सेटल होने जा रहा है । तो लाइफ मे सेटल होने को मंगता ।
  • Log in or register to post comments

ह.ह. पु. वा.

रानी १३
Wed, 11/30/2011 - 11:53 नवीन
नगरीनिरंजन तुमचा प्रतिसाद वाचुन खुप हसु आले.
  • Log in or register to post comments

लग्नाआधी शुद्धीकरणाची गरज..

प्रभाकर पेठकर
Wed, 11/30/2011 - 13:23 नवीन
पण, लिखाणाला - 'ण' लिहिता येतो नं! मग, 'हे आन ते आन' - हे 'न' कशाकरिता?? जॉब प्रोफेशन, जॉब विषयी - अर्धचंद्र टाकता येतो नं? मग ब्लोग - हे कशा करीता?? नवते - लेखात इतकी जोडाक्षरे व्यवस्थित लिहिणार्‍याला 'व्ह' लिहिता येत नाही?? लग्नाला मोजकेच दिवस बाकी आहेत. बघू कसे काय जमते ते काय कसे जमते ते पाहायचे आहे?? तसही, काळजी करू नका. सगळ्यांना जमते.
  • Log in or register to post comments

ठ्ठो !!

कपिलमुनी
Wed, 11/30/2011 - 13:27 नवीन
सगळ्यांना जमते. ह ह पू वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

खल्लास !

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/30/2011 - 13:24 नवीन
काय कसे जमते ते पाहायचे आहे?? तसही, काळजी करू नका. सगळ्यांना जमते.
Image removed. __/\__ पेठकर काका आजकाल तुफान फलंदाजी करत आहेत.
  • Log in or register to post comments

+१

मन१
Wed, 11/30/2011 - 13:42 नवीन
अग्गा गा यो........... पेठकर अंकल, लैच भारी की हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

लग्न म्हणजे एक जबाबदारी हे

विजुभाऊ
Wed, 11/30/2011 - 13:38 नवीन
लग्न म्हणजे एक जबाबदारी हे मला कळले अचानक ४-५ वर्षाने मोठे झाल्या सारखे वाटते आहे. अरे बापरे...आत्ताच ही अवस्था.......
  • Log in or register to post comments

विजुभौ- पुढच्या अवस्थे विषयी नुकताच एक विनोद वाचनात आला.

चिंतामणी
Wed, 11/30/2011 - 14:02 नवीन
माणूस- केमिस्टला - मला विषाची बाटली द्या. केमिस्ट- प्रीस्र्कीप्षन असल्याशिवाय देता येणार नाही. माणूस- हि माझी लग्न पत्रिका बघा. केमिस्ट-बस झाल वेड्या,आता रडवतो का मला? लहान देऊ का मोठी? :( :-( :sad: विवेकखोत- ह.घे. :) :-) :smile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

सीग्राम्स इम्पिरियल ब्लूच्या

गवि
Wed, 11/30/2011 - 14:09 नवीन
सीग्राम्स इम्पिरियल ब्लूच्या सगळ्या जाहिराती फटाफट डोळ्यासमोर तरळून गेल्या..विशेषतः - उसकी वाईफ की ऑफिशियल टूर.. सात दिन की .. कॅन्सल हो गयी.. किंवा कब है अ‍ॅनिव्हर्सरी सर..? कल................. थी.... ओह..फाईव्ह कॅरट डायमंड रिंग सर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

उसकी वाईफ की ऑफिशियल टूर.. सात दिन की .. कॅन्सल हो गयी..

चिंतामणी
Wed, 11/30/2011 - 14:18 नवीन
इथे बघा. ;) ;-) :wink:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा