मोहितो... । व्हाइट रशिअन... । झणझणीत मरीआइ... । अनारीटा... | बी 52... | क्लासिक मार्टीनी...
आज शुक्रवार, विकांताचे वेध लागले असतीलच. तर मग ह्या विकांतासाठी सादर आहे नवीन कॉकटेल.
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “लॉन्ग आयलंड आइस्ड टी”
पार्श्वभूमी:
हे कॉकटेल सत्तरच्या दशकात अमेरिकेत न्यु यॉर्क येथिल 'लॉन्ग आयलंड' मधल्या एका बारमधल्या बार टेंडरने बनवले. त्यामुळे त्याच्या नावात लॉन्ग आयलंड आले आहे आणि 'आइस्ड टी'च्या रंग साधर्म्यामुळे लॉन्ग आयलंड आइस्ड टी असे नाव सार्थ झाले .
ह्या कॉकटेलमधे प्रत्यक्षात आइस्ड टी नसतो. ह्या कॉकटेलमधे बरीच स्पिरीट्स वापरलेली असल्यामुळे अतिशय जहाल (Potent) असे हे कॉकटेल असते. नुसते लागणारे साहित्य बघितले तरी याची कल्पना येईल :)
ह्या कॉकटेलची बरीच (खुपच) व्हेरिएशन्स आहेत. अॅक्चुअल आइस्ड टी वापरलेलेही. पण खरे आणि अस्सल कॉकटेल हे टकिला वापरूनच बनवले जाते. टकिला आणि ट्रिपल सेक मुळे चव आइस्ड टी कडे झुकते.
प्रकार: मिक्स्ड ड्रिंक कॉकटेल
साहित्य:
व्हाईट रम- 15 मिली
वोडका - 15 मिली
टकीला-15 मिली
जीन – 15 मिली
ट्रिपल सेक – 15 मिली
स्वीट अॅन्ड सार सिरप - 25 मिली
बर्फ
लिंबाचा काप सजावटीसाठी
बार स्पुन
ग्लास: – हाय बॉल
हाय बॉल ग्लासमधे बर्फ भरून घ्या.
सर्व स्पिरीट्स एका मागोमाग एक अशी त्या बर्फावर ओतुन घ्या. सर्वात शेवटी स्वीट अॅन्ड सार सिरप ओता. आता खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे आइस टी सारखा रंग येइल.
मग त्यात कोला (आवडीप्रमाणे: कोक, पेप्सी किंवा थम्स अप) घालून टॉप अप करा.
मस्त रंग आणी चव असलेले कॉकटेल तयार आहे :)
बार स्पुन घेउन आता सर्व मिश्रण व्यवस्थित स्टर करा.
लॉन्ग आयलंड आइस्ड टी तयार आहे :)
'एक्स्ट्रा लॉन्ग' असे व्हेरिएशन असते आणि जर तसे हवे असेल तर साहित्यातील सर्व स्पिरीट्स 15 मिली ऐवजी 25 ते 30 मिली करा. हे एक्स्ट्रा लॉन्ग असे व्हेरिएशन आपापल्या हिमती आणी कुवतीनुसारच आजमावून बघा.
नंतरच्या परिणामाला हा सोक्या जबाबदार असणार नाही ;)

वाचने
13103
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहाहा...काय ढवळलयं ! काय
=))
In reply to आहाहा...काय ढवळलयं ! काय by मदनबाण
काय दिवस आले?
In reply to =)) by सोत्रि
बंटी और बबली मध्ये अभिषेक
सूपर.
टॉप अप करा म्हणजे?
वा वा!
क्या केहने...लाँग आयलंड...
एकदम जहाल....
जबराट आहे हे!! सोकाजीराव
सोकाजी काका ;आमच्या एका तज्ञ
विजुभौ, त्याला "Watermelon
In reply to सोकाजी काका ;आमच्या एका तज्ञ by विजुभाऊ
चला, आता एक फ्रुट पार्टी करु.
In reply to विजुभौ, त्याला "Watermelon by सोत्रि
पडत्या 'फळाची' आज्ञा
In reply to विजुभौ, त्याला "Watermelon by सोत्रि
:-)
वा वा वा.... लॉन्ग आयलंड आपल
दारवांमधलं काहीएक समजत
_/\__/\__/\_ तुमच्या
सोकाजीराव गंमत नाही,पण खरच
एकदा प्रयत्न तरी करुन बघा...
In reply to सोकाजीराव गंमत नाही,पण खरच by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद गुर्जी!
In reply to सोकाजीराव गंमत नाही,पण खरच by अत्रुप्त आत्मा
थांब-आखू च दे अता मला
In reply to धन्यवाद गुर्जी! by सोत्रि
हे १२०-३०० म्हणजे नेमकं काय
In reply to थांब-आखू च दे अता मला by अत्रुप्त आत्मा
१२०-३०० हे तंबाखू चे प्रकार आहेत
In reply to हे १२०-३०० म्हणजे नेमकं काय by प्रचेतस
ख्याक ख्याक
In reply to धन्यवाद गुर्जी! by सोत्रि
आधि मला वाटायचं थोडंसं